मराठी मुरली · Brahma Kumaris

मराठी मुरली · 13 ऑक्टोबर, 2024

ओम शांती · BapDada ·

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली13 ऑक्टोबर, 2024 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

13.10.2024
प्रभात:मुरली
ओम शांती
“अव्यक्त बापदादा”

“विशेषता या परमात्म देणग्या आहेत - यांना विश्व सेवेमध्ये अर्पण करा”

आज ग्रेट-ग्रेट ग्रॅण्ड फादर ब्रह्माबाबा आणि शिवबाबा आपल्या विश्वाच्या चोहोबाजूंच्या श्रेष्ठ भाग्यवान ब्राह्मण कुळाला खूप-खूप अरब-खरब वेळा दिव्य अलौकिक जन्माची मुबारक देत आहेत. त्याच बरोबर अति स्नेहाच्या, हृदयापासून प्रेमाच्या आत्मिक फुलांनी जन्माच्या शुभेच्छा देत आहेत. प्रत्येक ब्राह्मण आत्म्याची विशेषता पाहून हर्षित होत आहेत. मनातल्या मनात गाणे गात आहेत - ‘वाह मुलांनो वाह!’ आजच्या दिवशी अमृतवेलेपासून सर्वांच्या हृदयामध्ये याच आनंदाच्या लहरी दिसून येत आहेत - ‘वाह बाबांचा आणि आमचा अलौकिक जन्म!’ बाबा देखील अमृतवेलेपासून सर्व मुलांच्या शुभेच्छांच्या माळा पाहून खुश होत आहेत. हा बर्थ डे संपूर्ण कल्पामध्ये या संगमयुगामध्येच साजरा केला जातो. सतयुगामध्ये देखील कोणी असा अलौकिक जन्म दिवस साजरा करणार नाही. तिथे देखील असा विचित्र जन्म दिवस असणार नाही, ज्यामध्ये पिता आणि मुलांचा एकाच वेळी जन्म होईल. आतापर्यंत असे कधी ऐकले आहे का की, पिता आणि मुलाचा जन्म एकाच दिवशी झाला? परंतु आजच्या दिवशी तुम्हा मुलांचा आणि बापदादांचा जन्म एकाच दिवशी साजरा करत आहात. तर ‘वाह-वाह!’ चे गाणे गात आहात ना!

आज बापदादा अमृतवेलेला एक माळा बनवत होते. कोणती माळा? १०८ ची फायनल माळा बनवत नव्हते जे तुम्ही विचार कराल की, आमचे नाव होते, आमचे नाव होते… परंतु आज अगदी सुरुवातीपासून, स्थापनेपासून आता विनाश जवळ येईपर्यंत कोण-कोणती मुले ‘अमर भव’चे वरदानी बनले आहेत! त्यांची माळा बनवत होते. हा देखील ड्रामा अनुसार त्या आत्म्यांचा उच्च ते उच्च भगवंतासोबत सर्व चरित्र पाहण्याचा, ऐकण्याचा श्रेष्ठ पार्ट आहे परंतु ते फार थोडे आहेत! तुम्हा सर्वांचा देखील पार्ट आहे, का बरें? बापदादा ब्राह्मण वंशावळी बनवत आहेत. त्यामुळे विश्वाच्या तुलनेमध्ये तुम्ही जे काही ब्राह्मण आत्मे आहात ते खूप-खूप-खूप भाग्यवान आहात, असे का? कारण तुम्ही कोटींमध्ये कोणीच्या लाईनमध्ये आणि कोणीमध्ये सुद्धा कोणी आहात, एका बाजूला विश्वातील कोट्यावधी आत्मे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रत्येक ब्राह्मण, एक आहात. तर जन्म दिवसानिमित्त बापदादा प्रत्येक मुलाला, फक्त काहीजणांनाच नाही सर्व मुलांची जन्मपत्रिका पाहत प्रत्येकाच्या विशेषतांच्या माळा गळ्यामध्ये घालत होते. तुम्ही सर्व मग ते नवे असो, किंवा सुरुवातीचे असो, किंवा मधल्या काळातील असो परंतु विशेष आहात आणि विशेषच राहणार. संपूर्ण कल्प विशेष राहणार. संपूर्ण कल्प विश्वाच्या सर्व आत्म्यांची तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांसाठी महानतेची दृष्टी असते. तर तुम्ही प्रत्येकजण आपल्या विशेषतांना जाणता का? जर जाणत असाल तर एक हात वर करा. खूप छान. त्या विशेषतांना काय करता? जाणता हे खूप चांगले आहे, मानता हे ही खूप छान आहे परंतु त्या विशेषतांचे काय करता? (सेवेमध्ये लावतो) दुसऱ्या प्रकारे यूज तर करत नाही ना? या विशेषता परमात्म देणगी आहेत. परमात्म देणगी सदैव विश्व सेवेमध्ये अर्पण करायची आहे. विशेषता जर निगेटिव्ह रूपामध्ये यूज केल्या तर ते अभिमानाचे रूप बनते कारण ज्ञानामध्ये आल्यानंतर, ब्राह्मण जीवनामध्ये आल्यानंतर बाबांद्वारे खूप विशेषता प्राप्त होतात कारण बाबांचे बनल्याने विशेषतांच्या खजिन्याचे अधिकारी बनता. केवळ एक-दोन विशेषताच नाहीत, तर अनेक विशेषता आहेत. ज्याचे यादगारमध्ये (स्मृतीरूपामध्ये) देखील तुमच्या विशेषतांचे वर्णन आहे - ‘१६ कला संपन्न’; तर केवळ १६ नाही, १६ अर्थात संपूर्ण. सर्व गुण संपन्न. संपूर्ण निर्विकारीपणा याचा डिटेल (विस्तार) खूप आहे. म्हटले जाते ‘संपूर्ण निर्विकारी’ परंतु ‘संपूर्ण’ मध्ये बरेच डिटेल्स आहेत. मग विशेषता तर बाबांद्वारे प्रत्येक ब्राह्मणाला वारशामध्ये प्राप्त होतातच. परंतु त्या विशेषतांना धारण करा आणि मग सेवेमध्ये लावा. ‘माझी ही विशेषता आहे’, असे नाही, तर ‘ही परमात्म देणगी आहे’. परमात्म देणगी समजल्याने विशेषतेमध्ये परमात्म शक्ती भरली जाते. माझी म्हटल्याने अभिमान आणि अपमान दोन्हीचा सामना करावा लागतो. कोणत्याही प्रकारचा अभिमान, मग तो ज्ञानाचा असो, योगाचा असो, सेवेचा असो, बुद्धीचा असो, कोणत्या गुणाचा असो. आणि ज्याला अभिमान असतो त्याचे लक्षण आहे - त्याला अपमान अगदी लगेच फील होणार. तर विशेष आत्मे आहात अर्थात परमात्म देणगीचे अधिकारी आहात.

तर आज तुम्ही सर्व बापदादांचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आला आहात ना! आणि बापदादा तुम्हा सर्वांचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आले आहेत. तुम्ही तर फक्त बापदादांचा बर्थ डे साजरा करणार परंतु बापदादा साऱ्या ब्राह्मण कुळाचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आले आहेत. मग जरी ते देशामध्ये दूरच्या ठिकाणी बसले असतील, किंवा विदेशामध्ये कोणत्या दूरच्या कोपऱ्यात बसले असतील, परंतु जेपण ब्राह्मण आत्मे, ब्राह्मण कुळाचे बनले आहेत, त्या सर्वांचा बर्थ डे बापदादा देखील साजरा करत आहेत, तुम्ही देखील साजरा करत आहात. सर्वांचा साजरा करत आहात कि केवळ इथे बसलेल्यांचा साजरा करत आहात? सर्वांची आठवण आहे ना! सर्वजण बघत आहेत की आमचा सुद्धा साजरा करत आहेत कि नाही? तर सर्वांचा साजरा करत आहात. सर्वाना मुबारक, मुबारक, मुबारक असो. साजरे करणे म्हणजे उमंग-उत्साहामध्ये येणे. तर मनामध्ये उत्साह आहे ना, वाह! आमचा अलौकिक जन्म दिवस!

तर आज अमृतवेलेपासून जन्म दिनाचा खूप-खूप उत्साह-उमंग सर्वांमध्ये होता ना! बापदादांनी ग्रीटिंग कार्ड सुद्धा पाहिली, तुम्ही या डोळ्यांनी पाहता, बापदादा तर सूक्ष्ममध्येच तुमच्या अगोदरच बघतात. परंतु बापदादांनी पाहिले की सर्वजण आपल्या मनाचा उमंग दाखविण्यासाठी किती उमंग-उत्साहात असतात. आजकाल तर ई-मेल खूप स्वस्त आहे ना! तर खूपजण ई-मेल सुद्धा करतात. बापदादांपाशी सर्व काही पोहोचते. मग ते ई-मेल असो, किंवा कार्ड असो, किंवा पत्र असो, नाहीतर मनातील संकल्प असो. अमृतवेलेपासून वतनमध्ये जर चोहो बाजूची ग्रीटिंग कार्डस्, पत्र, ई-मेल, संकल्प सर्व एकत्र केले तर ते बघूनच खूप मजा येईल. हे विचित्र एक्झिबिशन (प्रदर्शन) असते. तर बर्थ डे ला भविष्याकरिता संकल्प केला जातो. जसा बर्थ डे चा नंबर वाढत जातो, वर्ष पुढे जाते, असेच पुरुषार्थामध्ये किंवा आपल्या अमूल्य जीवनामध्ये, मनामध्ये अर्थात संकल्पामध्ये, बुद्धीच्या निर्णय शक्तीमध्ये, वाणी मध्ये, सेकंदामध्ये सफलता मूर्त बनण्याच्या शक्तीमध्ये, संबंध-संपर्कामध्ये प्रत्येक वेळी संपर्क-संबंधवाल्याला कोणत्या ना कोणत्या प्राप्तीची अनुभूती व्हावी, असे आपल्या भविष्याकालीन वर्षासाठी दृढ संकल्पाचे व्रत घेतले का? कारण विशेष शिवजयंतीच्या दिवशी ब्राह्मण आत्म्यांची दोन लक्ष्य असतात - एक स्वतःशी प्रतिज्ञा करण्याचे आणि दुसरे बाबांच्या प्रत्यक्षतेचा झेंडा फडकविण्याचे, ही विशेष दोन लक्ष्य या दिवशी प्रत्येकाच्या मनात असतात. तर बापदादांनी तुम्हा सर्वांनी केलेल्या प्रतिज्ञांचा (मागील काळामध्ये केलेल्या प्रतिज्ञांचा) पोतामेल पाहिला. दरवर्षी प्रत्येकाने विधिपूर्वक संकल्पाद्वारे, वाणीद्वारे प्रतिज्ञा केली आहे. खूप चांगले केले आहे. परंतु आता आजच्या दिवसानंतर म्हणजेच जन्म दिवस साजरा केल्यानंतर एका शब्दाला विशेष अंडरलाइन करा. कॉमन शब्द आहे, नवीन नाहीये. तो शब्द आहे - ‘निरंतर दृढता’. कधी दृढता आणि कधी दृढतेमध्ये सुद्धा निष्काळजीपणा, असे नको. जर निरंतर दृढता असेल तर त्याची निशाणी आहे - निरंतर प्रत्येक संकल्प, बोल, कर्माद्वारे स्वतःमध्ये, सेवेमध्ये आणि संबंधामध्ये १०० टक्के सफलता. जोपर्यंत या सर्व गोष्टींच्या बाबतीत ब्राह्मणांमध्ये सदैव सफलतेची कमी आहे तोपर्यंत ड्रामा अनुसार प्रत्यक्षता थांबलेली आहे. सफलता प्रत्यक्षतेचा आधार आहे. प्रत्येक बोल सफलता पूर्वक असावा, प्रत्येक संकल्प सफलता पूर्वक असावा, म्हणून आजकालच्या यादगारमध्ये (स्मृतीरूपामध्ये) गुरु म्हणवून घेणाऱ्यांना सुद्धा ‘सत वचन महाराज’ म्हटले जाते. भले खोटे जरी बोलत असतील परंतु भक्त म्हणतात - ‘सत वचन’. तर हे तुमच्या वचनांचे गायन आहे. ‘महाराज’, ‘महान’, हे तर तुम्हीच बनता ना! म्हणून सत वचन महाराज अर्थात महान आत्मे. असा कधीही विचार करू नका की माझा भाव नव्हता परंतु बोलून गेलो, निघून गेले, भाव असल्याशिवाय भावनेचे बोल निघू शकत नाहीत, हे तर स्वतःची फसवणूक केल्यासारखे आहे. कधी म्हणतात निघून गेले, का निघून गेले? काय, कंट्रोलींग पॉवर नाही आहे का जे निघून गेले? होऊन गेले, म्हणजे तुम्ही राजा नाही आहात का? कोणत्या ना कोणत्या कर्मेंद्रियांच्या अधीन झालात ना - जे निघून गेले, होऊन गेले!

तर या वर्षामध्ये मुबारक सोबत निरंतर प्रत्येक गोष्टीमध्ये दृढतेला अंडरलाइन करा. आज बर्थ डे आहे म्हणून बापदादा आज ऐकवत नाहीत परंतु बाबांनी सर्वांच्या चार्टवरून एक गोष्ट नोट केली, परंतु शेवटच्या खेपेला ऐकवेन. आज तर साजरे करायचे आहे, ऐकवायचे नाहीये. १५ दिवसानंतर ऐकवेन. (बापदादा ऐकवतील तर १५ दिवसांमध्ये सर्वजण ठीक होतील) अच्छा, पहिले सांगा १५ दिवसामध्ये सुधारणा होईल, तर मग ऐकवणे ठीक आहे. जर १५ दिवसांमध्ये परिवर्तन झाले तर बापदादा तर माहीत नाही काय करतील! तर ऐकवू का? म्हणजे मग १५ दिवसांमध्ये परिवर्तन होईल? संकल्प कराल? अच्छा, पांडव करतील, ऐकवू का? ऐकणे तर सोपे आहे, परंतु करणार का? करावे लागेल. (बापदादांनी मागे बसणाऱ्यांना, मातांना, टिचर्सना, डबल फॉरेनर्सना सर्वांना विचारले, सर्वांनी हात हलवला) सर्वजण हात तर खूप छान उचलतात.

डबल फॉरेनर्सचे तीन ग्रुप आहेत ना? (अंतर्मुखी, मस्ताना, शक्ती ग्रुप) अच्छा, अंतर्मुखी ग्रुपने हात वर करा. अंतर्मुखीमध्ये थोडे आहेत. दुसरा ग्रुप आहे - मस्ताना, अच्छा मस्ताना ग्रुपवाले उभे रहा. सदैव मस्त राहणारे आहात ना! ‘मस्ताना’चा अर्थ काय झाला? सदैव मस्त राहणारे ना! तिसरा ग्रुप आहे - शक्ती. शक्ती ग्रुप शक्तिशाली आहे ना! नावे तर खूप छान ठेवली आहेत. पहा अगदी सुरुवातीला जेव्हा भट्टी होती तर तुमच्या ग्रुपची नावे काय होती? (डिवाईन युनिटी, मनोहर पार्टी, सुप्रीम पार्टी) नावे तर सुंदर आहेत ना? तर हे देखील ग्रुप चांगले बनले आहेत. नाव लक्षात राहीले तर नावासोबत कर्तव्य देखील लक्षात राहील. अच्छा डबल फॉरेनर्स कुमार उभे रहा. अच्छा, हा कुमारांचा ग्रुप आहे. चांगले केले आहे, बापदादांनी डबल फॉरेनर्सच्या रिफ्रेशमेंटचा समाचार खूप चांगला ऐकला आहे. बापदादा अंतःकरणापासून मुबारक सुद्धा देत आहेत; परंतु सर्व ग्रुपना जे आज अंडरलाइन केले आहे, त्याची आठवण देखील करून देत आहेत.

डबल फॉरेनच्या टीचर्स खूप आहेत. टीचर बनणे खूप-खूप श्रेष्ठ भाग्याचे लक्षण आहे कारण बापदादा टीचर्सना गुरु-बंधूच्या रूपामध्ये पाहतात, इतके समान रूपामध्ये पाहतात कारण बाबांच्या आसनावर बसतात, टिचर्सना हा अधिकार मिळतो. जसे गुरुचे आसन असते ना, तर हे मुरलीचे तख्त, मुरली धारण करवून घेणे आणि मुरली ऐकविणे. केवळ ऐकविणे नाही परंतु मुरली धारण करवून घेणे, हे टीचर्सना बापदादांनी गुरु-बंधूचे तख्त दिले आहे आणि फॉरेनमध्ये तर बघितले जाते की खूप लवकरात-लवकर तख्तनशीन होतात. बापदादा खुश होतात, जबाबदारीचा मुकुट धारण करणे, हिम्मत ठेवणे, ही देखील काही कमी गोष्ट नाहीये परंतु ‘गुरु-बंधू’ अर्थात ‘बाप समान’. तसेतर सर्वांना बाप समान बनायचेच आहे परंतु तरीही टीचर्सना विशेष जबाबदारीचा मुकुट आहे. बाप-दादांना देखील टीचर्सचे संघटन खूप चांगले वाटते. परंतु आजचा विशेष शब्द आहे - “निरंतर अटेन्शन”.

अच्छा - भारतातील टीचर्स उभ्या रहा, भारतातील टीचर्स देखील काही कमी नाही आहेत. तर ऐकले, टीचर्सना बाबा कोणत्या नजरेने पाहतात. ही क्लासची, मुरली ऐकविण्याची सीट… खूप भाग्यवान आहात. खूप-खूप-खूप लक्की आहात कारण साकार रूपामध्ये निमित्त कोण आहे? अच्छा, दादी तर एक फॉरेनमध्ये राहते, एक मधुबनमध्ये राहते परंतु प्रत्येक स्थानावर साकार रूपामध्ये निमित्त टीचर्स आहेत की निमित्त पांडव देखील आहेत. असे नाही फक्त टीचर्स (बहिणी) आहेत, पांडव देखील आहेत, ज्यांना तुम्ही मोठे भाऊ म्हणता ना. पांडव तर नक्कीच आवश्यक आहेत. शक्ती आणि पांडव दोघांच्या सोबतीनेच सुरुवातीपासून कार्य चालत आले आहे, जरी पांडव कमी होते परंतु विश्वकिशोर तर होते ना. आनंदकिशोर, विश्वकिशोर सुरुवातीचे आहेत. तर पांडवांची सोबत तर आहे ना. परंतु मेजॉरिटी टीचर्सची जास्त आहे ज्या निमित्त बनतात. तुम्ही बॅकबोन आहात, टीचर्सचे देखील बॅकबोन आहात. प्रत्येकाचा पार्ट आहे. परंतु विदेशामध्ये ही विशेषता आहे की पांडव देखील टीचर बनतात, भारतामध्ये कमी बनतात तर टीचर्सना बापदादा नेहमी म्हणतात - ‘टीचर म्हणजे आपल्या फीचर्सद्वारे बाबांचा साक्षात्कार घडविणाऱ्या. फीचर्सद्वारे फ्युचर स्पष्ट दाखविणाऱ्या’. तर अशा टीचर्स आहात ना? ज्यामुळे तुम्हाला पाहून बापदादांच्या पालनेची अनुभूती व्हावी. परमात्म गुण, परमात्म शक्ती तुमच्या चेहऱ्यावरून आणि बोलण्यातून दिसाव्यात. असे नाही की अमकी टिचर म्हणाली, असे नाही. बापदादांनी टीचर्सच्या फीचर्सद्वारे अनुभव करवला. प्रत्येकाचे कनेक्शन बाबांसोबत जोडणे - हे आहे टीचर्सचे कर्तव्य. प्रत्येकाच्या हृदयातून नेहमी ‘बाबा’ निघावे.

हे ग्रुप देखील चांगले बनवले आहेत कारण पर्सनल रिफ्रेशमेंट मिळाल्याने त्यांना अनुभूती चांगली होते. ग्रुपमुळे चांगला रिझल्ट मिळाला ना! चांगले आहे.

चोहो बाजूच्या जन्मोत्सव साजरा करणाऱ्या ब्राह्मण आत्म्यांना, सदैव अलौकिक जन्माचे अलौकिक दिव्य कर्तव्य करणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव ‘एक बाप दूसरा न कोई’, असे एकनामी आणि सर्व खजिन्यांचे इकॉनॉमीचे अवतार असणाऱ्या मुलांना सदैव प्रत्येक वरदान आणि वारशाला जीवनाद्वारे प्रत्यक्ष करणाऱ्या उमंग-उत्साहामध्ये राहणाऱ्या मुलांना, बापदादांची अलौकिक जन्माच्या मुबारक सहित प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

दादींसोबत:- दादीजीने बापदादांना बर्थ डे च्या खूप-खूप शुभेच्छा दिल्या. आज माळेमध्ये तुम्ही सर्व आलात. माळा आठवली ना! सुरुवातीच्या स्थापनेचे रत्न, तर त्यामध्ये तुम्ही माळेचे मणी होता. चांगले आहे स्थापनेमध्ये देखील निमित्त बनला, पालनेमध्ये सुद्धा निमित्त बनला, आता बाबांसोबत जाण्यामध्ये देखील निमित्त बनाल. दरवाजा बापदादा एकटे उघडणार काय? (नाही) तुमच्यासाठी थांबले आहेत. याल तर दरवाजा उघडू. परंतु सेवा पूर्ण करावी लागेल ना कारण साकारमध्ये तुम्हा लोकांना निमित्त बनवले आहे. तर साकार मधील कार्य तर पूर्ण करावे लागेल ना. आजकाल सर्वजण कोणाला पाहतात? सर्वांची नजर कुठे जाते? तुम्हा लोकांवरच जाते. जे निमित्त बनले आहेत, त्यांच्यावरच सर्वांची नजर जाते. नजरेमध्ये तर सर्वांना बसवले कारण बाबांची नजर काही छोटी तर नाही आहे, बेहदची नजर आहे. तर सर्वजण नजरेमध्ये आहेत. सर्व नुरे रत्न आहेत. खूप छान. प्रत्येकजण आपापला पार्ट बजावत आहेत आणि बजावणारच आहेत. ड्रामामध्ये बांधील आहात. मजा येत आहे ना! खूप छान आहे!

वरदान:- अल्पकालीन आधाराच्या किनाऱ्याला सोडून एका बाबांना आधार बनविणारे यथार्थ पुरुषार्थी भव पुरुषार्थाचा अर्थ हा नाही कि एकदा केलेली चूक पुन्हा-पुन्हा करत रहाल आणि पुरुषार्थाला आपला आधार बनवाल. योग्य पुरुषार्थी अर्थात पुरुष बनून रथाद्वारे कार्य करणारे. आता अल्पकालीन आधाराच्या किनाऱ्याला सोडून द्या. बरीच मुले बाबांऐवजी हदच्या किनाऱ्याला आधार बनवतात. भले मग ते आपल्या स्वभाव-संस्कारांना, नाहीतर परिस्थितीला… हे सर्व अल्पकाळाचे आधार दिखावा मात्र, धोकेबाज आहेत. एक बाबांचाच आधार छत्रछाया आहे.
सुविचार:- नॉलेजफूल तो आहे जो मायेला दुरूनच ओळखून स्वतःला समर्थ बनवेल.

||| ओम शांती |||

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.