मराठी मुरली · Brahma Kumaris

मराठी मुरली · 27 फेब्रुवारी, 2025

ओम शांती · BapDada ·

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली27 फेब्रुवारी, 2025 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

27.02.2025
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो - सत्याचा संग ज्ञानमार्गामध्येच मिळतो, आता तुम्ही सत्य बाबांसोबत बसला आहात, बाबांच्या आठवणीमध्ये रहाणे अर्थात सत्संग करणे”
प्रश्न:- सत्संगाची आवश्यकता तुम्हा मुलांना आत्ताच आहे - असे का?
उत्तर:- कारण तमोप्रधान आत्मा एका सत्य बाबा, सत्य शिक्षक आणि सद्गुरुच्या संगानेच (सहवासानेच) सतोप्रधान अर्थात काळ्यापासून गोरी बनू शकते. सत्संगाशिवाय निर्बल आत्मा बलवान बनू शकत नाही. बाबांच्या संगतीने आत्म्यामध्ये पवित्रतेची शक्ती येते, २१ जन्मांसाठी तिचा बेडा पार होतो (जीवन रुपी नौका पार होते).

ओम् शांती. मुलांनो, सत्संगामध्ये बसला आहात, या सत्संगामध्ये तुम्ही मुले कल्प-कल्प संगमयुगावरच बसता. दुनिया तर हे जाणत नाही की ‘सत्संग’ कशाला म्हटले जाते. ‘सत्संग’ हे नाव अविनाशी चालत आलेले आहे. भक्तीमार्गामध्ये देखील म्हणतात - आम्ही अमक्या सत्संगाला जातो. आता खरे तर भक्तीमार्गामध्ये कोणी सत्संगाला जात नाही. सत्संग असतोच ज्ञानमार्गामध्ये. आता तुम्ही सत्याच्या संगतीमध्ये (सहवासामध्ये) बसले आहात. आत्मे सत्य बाबांच्या संगतीमध्ये बसले आहेत. बाकी कोणत्याही ठिकाणी आत्मे परमपिता परमात्म्याच्या संगतीमध्ये बसत नाहीत. बाबांना ओळखतच नाहीत. भले म्हणतात - आम्ही सत्संगाला जातो परंतु ते देह-अभिमानामध्ये येतात. तुम्ही देह-अभिमानामध्ये येणार नाही. तुम्ही समजता, आपण आत्मे आहोत, बाबांच्या संगतीमध्ये बसलो आहोत. इतर कोणताही मनुष्य सत्याच्या संगतीमध्ये बसू शकत नाही. ‘सत्याची संगत’ - हे नाव देखील आत्ताचेच आहे. ‘सत्याची संगत’ - याचा यथार्थ अर्थ बाबा बसून समजावून सांगतात. तुम्ही आत्मे आता परमात्मा बाबा जे सत्य आहेत, त्यांच्या सोबत बसले आहात. ते सत्य बाप, सत्य टीचर, सतगुरू आहेत. तर जणू तुम्ही सत्संगामध्ये बसला आहात. मग भले इथे किंवा घरी बसला आहात परंतु स्वतःला आत्मा समजून आठवण बाबांची करता. आम्ही आत्मे आता सत्य बाबांची आठवण करत आहोत अर्थात सत्याच्या संगतीमध्ये आहोत. बाबा मधुबनमध्ये बसले आहेत. बाबांची आठवण करण्याच्या युक्त्या सुद्धा अनेक प्रकारच्या मिळतात. आठवणीनेच विकर्मे नष्ट होतील. हे देखील मुले जाणतात - आपण १६ कला संपूर्ण बनतो आणि मग उतरता-उतरता कला कमी होत जातात. भक्ती देखील अगोदर अव्यभिचारी असते नंतर मग घसरत-घसरत व्यभिचारी भक्ती झाल्यामुळे तमोप्रधान बनतात तर मग त्यांना सत्याची संगत (सत्संग) जरूर पाहिजे. नाही तर पवित्र कसे बनतील? तर आता तुम्हा आत्म्यांना सत्य बाबांची संगत मिळाली आहे (सहवास मिळाला आहे). आत्मा जाणते मला बाबांची आठवण करायची आहे, त्यांचीच सोबत आहे. आठवणीला देखील संगत म्हणतात. हा आहे सत्याचा सहवास. हा देह असताना देखील तुम्ही आत्मे माझी आठवण करा, ही आहे सत्याची संगत. जसे म्हणतात ना - याला मोठ्या माणसाची संगत लागली आहे, म्हणून देह-अभिमानी झाला आहे. आता तुमची संगत झाली आहे सत्य बाबांसोबत, ज्यामुळे तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता. बाबा म्हणतात - मी एकदाच येतो. आता आत्म्याचा परमात्म्याशी संग (सहवास) झाल्यामुळे तुम्ही २१ जन्मांकरिता पार होता. नंतर मग तुम्हाला संगत लागते देहाची. हा देखील ड्रामा बनलेला आहे. बाबा म्हणतात माझ्याशी तुम्हा मुलांची संगत झाल्यामुळे तुम्ही सतोप्रधान बनता, ज्याला गोल्डन-एज्ड (सतयुग) म्हटले जाते.

साधू-संत इत्यादी तर समजतात की आत्मा निर्लेप आहे, सगळे परमात्माच परमात्मा आहेत. तर याचा अर्थ आहे परमात्म्यामध्ये अशुद्धता आली आहे. परमात्म्यामध्ये तर अशुद्धता येऊ शकत नाही. बाबा म्हणतात - काय मज परमात्म्यामधे अशुद्धता येते? नाही. मी तर सदैव परमधाममध्ये रहातो कारण मला तर काही जन्म-मरणामध्ये यायचे नाहीये. हे तुम्ही मुले जाणता, तुमच्यामध्ये देखील कोणाची संगत माझ्याशी जास्त आहे, कोणाची कमी आहे. कोणी तर चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करून योगामध्ये रहातात, जितका वेळ आत्मा बाबांची संगत करेल (बाबांच्या सहवासामध्ये राहील) तितका फायदा आहे; विकर्म विनाश होतील. बाबा म्हणतात - ‘हे आत्म्यांनो, मज पित्याची आठवण करा, माझी संगत धरा’. मला या शरीराचा आधार तर घ्यावाच लागतो. नाही तर परमात्मा बोलणार कसा? आत्मा ऐकणार कशी? आता तुम्हा मुलांची संगत आहे सत्यासोबत. सत्य बाबांची निरंतर आठवण करायची आहे. आत्म्याला सत्याची संगत करायची आहे. आत्मा सुद्धा अद्भुत आहे, परमात्मा सुद्धा अद्भुत आहे, दुनिया देखील अद्भुत आहे. ही दुनिया कशी फेरी मारते, आश्चर्य आहे. तुम्ही संपूर्ण ड्रामामध्ये ऑलराऊंड पार्ट बजावता. तुमच्या आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे - आश्चर्य आहे. सतयुगी आत्मे आणि आजकालचे आत्मे. त्यामध्ये देखील तुमची आत्मा सर्वात जास्त ऑलराऊंडर आहे. नाटकामध्ये कोणाचा पार्ट सुरवातीपासून असतो, कोणाचा मधून, कोणाचा पार्ट शेवटी असतो. ती आहेत सर्व हदची नाटके, ती देखील आत्ता निघाली आहेत. आता विज्ञानाची इतकी काही ताकद आहे. सतयुगामध्ये किती त्याची शक्ती असेल. नवी दुनिया किती लवकर बनत असेल. तिथे पवित्रतेचे बळ आहे मुख्य. आता सर्व निर्बल आहेत. तिथे आहेत बलवान. हे लक्ष्मी-नारायण बलशाली आहेत ना. आता रावणाने बळ हिरावून घेतले आहे; आणि मग तुम्ही त्या रावणावर विजय प्राप्त करून किती बलशाली बनता. जितकी सत्यची संगत कराल अर्थात आत्मा जितकी सत्य बाबांची आठवण करते तितकी बलशाली बनते. शिक्षणाने देखील बळ (शक्ती) तर मिळते ना. तुम्हाला देखील बळ मिळते, साऱ्या विश्वावर तुम्ही हुकूम चालवता. आत्म्याचा सत्यासोबत योग संगमावरच होतो. बाबा म्हणतात - आत्म्याला माझी संगत मिळाल्यामुळे आत्मा खूप बलशाली बनते. बाबा वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी आहेत ना, त्यांच्याकडून बळ मिळते. यामध्ये सर्व वेद-शास्त्रांच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान येते.

जसे बाबा ऑलमाइटी आहेत, तसे तुम्ही देखील ऑलमाइटी बनता. विश्वावर तुम्ही राज्य करता. तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला माझ्याकडून किती बळ (शक्ती) मिळते, यांना (ब्रह्मा बाबांना) देखील शक्ती मिळते, जितकी बाबांची आठवण कराल तितकी शक्ती मिळेल. बाबा बाकी काही त्रास देत नाहीत. फक्त आठवण करायची आहे, बस्स. ८४ जन्मांचे चक्र आता पूर्ण झाले आहे, आता परत जायचे आहे. हे समजणे काही मोठी गोष्ट नाहीये. जास्त विस्तारामध्ये जाण्याची तर काहीच गरज नाहीये. बीजाला जाणल्याने समजून येते की, याच्यातून हे सारे झाड कसे उत्पन्न होते. थोडक्यात समजून येते. या खूप विचित्र गोष्टी आहेत. भक्तीमार्गामध्ये मनुष्य किती त्रास सहन करत असतात, कष्ट करतात, मिळत काहीच नाही. तरी देखील बाबा येऊन तुम्हाला विश्वाचा मालक बनवतात. आपण योगबलाने विश्वाचे मालक बनतो, हाच पुरुषार्थ करायचा आहे. भारताचा योग प्रसिद्ध आहे. योगामुळे तुमचे आयुष्य खूप वाढते. सत्याच्या संगतीचा किती फायदा होतो, आयुष्य देखील मोठे आणि शरीर देखील निरोगी बनते. या सर्व गोष्टी तुम्हा मुलांच्याच बुद्धीमध्ये पक्क्या केल्या जातात. तुम्हा ब्राह्मणांशिवाय बाकी कोणाचीही सत्यासोबत संगत नाही आहे. तुम्ही प्रजापिता ब्रह्माची संतान आहात, आजोबा-नातू आहात. तर इतका आनंद झाला पाहिजे ना की, आपण आजोबा-नातू आहोत. वारसा देखील आजोबांकडून मिळतो, हीच आठवणीची यात्रा आहे. बुद्धीमध्ये हेच पक्के लक्षात राहिले पाहिजे. त्या सत्संगांमध्ये तर जाऊन एका जागी बसतात, इथे असे काही नाही. असे नाही की एका जागी बसल्यावरच सत्याची संगत होईल. नाही, उठता-बसता, चालता-फिरता आपण सत्याच्या संगतीमध्ये आहात परंतु जर तुम्ही त्यांची आठवण करत असाल तर. जर आठवण करत नसाल तर देह-अभिमानामध्ये आहात, देह तर असत्य गोष्ट आहे ना. देहाला सत्य म्हणणार नाही. शरीर तर जड आहे, ५ तत्त्वांनी बनलेले आहे, शरीरामध्ये आत्मा नसेल तर चुरपूर (हालचाल) होणार नाही. मग तर मनुष्याच्या शरीराला काहीच किंमत नाही आहे, बाकी सर्वांच्या (पशूंच्या) शरीराला किंमत आहे. भाग्य तर आत्म्याला मिळायला हवे ना, मी अमका आहे, असे आत्मा म्हणते ना. बाबा म्हणतात - आत्मा कशी झाली आहे पहा, अंडी, मांस, मासे सर्व खाते. प्रत्येकजण भस्मासूर आहे, आपणच आपल्याला भस्म करतात. ते कसे? काम-चितेवर बसून प्रत्येकजण स्वतःला भस्म करत आहे तर भस्मासुर झाले ना? आता तुम्ही ज्ञान-चितेवर बसून देवता बनत आहात. सारी दुनिया काम-चितेवर बसून भस्म झाली आहे, तमोप्रधान काळी झाली आहे. बाबा येतात मुलांना काळ्यापासून गोरे बनविण्याकरिता. तर बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - देह-अभिमान सोडून स्वतःला आत्मा समजा. मुले शाळेत शिकतात परंतु अभ्यास तर घरी असताना देखील डोक्यात राहतो ना. तर या गोष्टी देखील तुमच्या डोक्यात राहिल्या पाहिजेत. हे आहे तुमचे विद्यार्थी जीवन. एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. उठता-बसता, चालता-फिरता हे नॉलेज डोक्यात राहिले पाहिजे.

इथे मुले येतात ताजेतवाने होतात, युक्त्या सांगितल्या जातात की अशा पद्धतीने समजावून सांगा. दुनियेमध्ये तर भरपूर सत्संग आहेत. किती मनुष्य एकत्र गोळा होतात. खरे तर तो काही सत्याचा संग नाही आहे. सत्याचा संग तर आता तुम्हा मुलांनाच मिळतो. बाबाच येऊन सतयुग स्थापन करतात. तुम्ही मालक बनता. देह-अभिमान किंवा खोट्या अभिमानामुळे तुम्ही कोसळता (पतन होते) आणि सत्याच्या संगतीमुळे तुम्ही वर चढता. अर्धे कल्प तुम्ही प्रारब्ध भोगता. असे नाही की तिथे देखील तुम्हाला सत्याचा संग आहे. नाही, सत्याची संगत आणि खोट्याची संगत म्हणूनच तर म्हणतात - जेव्हा दोन्ही उपस्थित असतात. सत्य बाबा जेव्हा येतात, तेच येऊन सर्व गोष्टी समजावून सांगतात. जोपर्यंत ते सत्य बाबा येत नाहीत तोपर्यंत कोणाला कळतही नाही. आता बाबा तुम्हा मुलांना सांगतात - ‘हे आत्म्यांनो, माझ्या सोबत संगत ठेवा. देहाची जी संगत मिळाली आहे त्यापासून उपराम व्हा (मुक्त व्हा). देहाची संगत भले सतयुगामध्ये देखील असेल परंतु तिथे तुम्ही आहातच पावन . आता तुम्ही सत्याच्या संगतीने पतितापासून पावन बनता आणि मग शरीर देखील सतोप्रधान मिळेल. आत्मा देखील सतोप्रधान असेल. आता तर दुनिया देखील तमोप्रधान आहे. दुनिया नवीन आणि जुनी असते. नवीन दुनियेमध्ये बरोबर ‘आदि सनातन देवी-देवता धर्म’ होता. आज त्या धर्माला गायब करून ‘आदि सनातन हिंदू धर्म’ म्हणतात, संभ्रमित झाले आहेत. आता तुम्ही भारतवासी समजता की आपण प्राचीन देवी-देवता धर्माचे होतो. सतयुगाचे मालक होतो. परंतु ती नशा कुठे आहे? कल्पाचा कालावधीच प्रदीर्घ लिहून ठेवला आहे. सर्व गोष्टी विसरून गेले आहेत. याचे नावच आहे भूल-भुलैयाचा खेळ. आता सत्य बाबांकडून तुम्ही सर्व ज्ञान जाणल्यामुळे श्रेष्ठ पद प्राप्त करता आणि मग अर्ध्या कल्पानंतर खाली घसरता (पतन होते) कारण रावण राज्य सुरू होते. दुनिया जुनी तर होईल ना. तुम्ही समजता आपण नवीन दुनियेचे मालक होतो, आता जुन्या दुनियेमध्ये आहोत. काहींना तर हे सुद्धा आठवत नाही. बाबा आपल्याला स्वर्गवासी बनवत आहेत. अर्धा कल्प आपण स्वर्गवासी असणार; मग अर्ध्याकल्पानंतर खाली घसरता (पतित बनता) कारण रावण राज्य सुरू होते. दुनिया जुनी तर होणारच ना. तुम्हाला समजते की, बाबा आपल्याला स्वर्गवासी बनवत आहेत. अर्धे कल्प आपण स्वर्गवासी असणार नंतर मग नरकवासी बनणार. तुम्ही देखील नंबरवार पुरुषार्थानुसार मास्टर सर्वशक्तिमान बनला आहात. हा आहे ज्ञान अमृताचा डोस. शिवबाबांना जुनी कर्मेंद्रिये मिळाली आहेत. नवा देह तर मिळत नाही. जुना बाजा (जुना देह) मिळतो. बाबा येतात देखील वानप्रस्थमध्येच. मुलांना आनंद होतो तेव्हा मग बाबांना देखील आनंद होतो. बाबा म्हणतात - मी मुलांना नॉलेज देऊन रावणापासून सोडविण्यासाठी जातो. पार्ट तर आनंदाने बजावला जातो ना. बाबा खूप आनंदाने पार्ट बजावतात. बाबांना कल्प-कल्प यावे लागते. हा पार्ट कधी बंद होत नाही. मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. जितकी सत्यची संगत कराल तितका आनंद होईल, आठवण कमी करतात त्यामुळे तितकासा आनंद होत नाही. बाबा मुलांना मिळकत देतात. जी मुले सच्च्या मनाचे आहेत, त्यांच्यावर बाबांचे खूप प्रेम असते. सच्च्या मनावर साहेब राजी असतात. आतून बाहेरून जे सच्चे असतात, बाबांचे मदतगार बनतात, सेवेसाठी तत्पर असतात ते बाबांना प्रिय वाटतात. आपल्या मनाला विचारायचे आहे - मी खरीखरी सेवा करतो का? सच्च्या बाबांसोबत संगत ठेवतो का? जर सच्च्या बाबांसोबत संगत ठेवली नाहीत तर काय गती (अवस्था) होईल? अनेकांना मार्ग सांगत रहाल तर उच्च पद सुद्धा प्राप्त कराल. सत्य बाबांकडून मी काय वारसा प्राप्त केला आहे, हे आपल्या आतमध्ये डोकावून पहायचे आहे. हे तर जाणतो सर्व नंबरवार आहेत. कोणी किती वारसा मिळवतात, कोणी किती मिळवतात. रात्रं-दिवसाचा फरक असतो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) तुम्हाला या देहाची जी संगत मिळाली आहे, या संगती पासून उपराम (अलिप्त) रहायचे आहे. सत्याच्या संगतीने पावन बनायचे आहे.

२) या विद्यार्थी-जीवनामध्ये चालता-फिरता बुद्धीमध्ये हे नॉलेज फिरत राहिले पाहिजे. एम ऑब्जेक्टला समोर ठेवून पुरुषार्थ करायचा आहे. सच्च्या मनाने बाबांचे मदतगार बनायचे आहे.

वरदान:- अव्यभिचारी आणि निर्विघ्न स्थिति द्वारे पहिल्या जन्माचे प्रारब्ध प्राप्त करणारे समीप आणि समान भव
१. जी मुले इथे बाबांचे गुण आणि संस्कार यांच्या समीप आहेत, सर्व नात्यांनी बाबांच्या सोबतीचा किंवा समानतेचा अनुभव करतात तेच तिथे (सतयुगामध्ये) रॉयल कुळामध्ये पहिल्या जन्माच्या नात्याने जवळ येतात. २. प्रथम तेच येतील जे सुरुवातीपासून आत्तापर्यंत अव्यभिचारी आणि निर्विघ्न राहिले आहेत. निर्विघ्न याचा अर्थ असा नाही की विघ्न येणारच नाहीत परंतु विघ्न-विनाशक किंवा विघ्नांवर सदैव विजयी बनले. जर या दोन्ही गोष्टी आदिपासून अंतापर्यंत ठीक असतील तर पहिल्या जन्मामध्ये साथीदार बनाल.
बोधवाक्य:- शांतीच्या शक्तीने निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तन करा.

||| ओम शांती |||

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना, एकता आणि एकाग्रता धारण करा:-

एकांतवासी अर्थात सदैव स्थूल एकांताबरोबरच एकाच्या अंतामध्ये (आठवणीमध्ये) रहाणे. एकाग्रतेच्या शक्तीने कोणत्याही आत्म्याचा संदेश त्या आत्म्यापर्यंत पोहोचवू शकता, कोणत्याही आत्म्याचे आवाहन करू शकता, कोणत्याही आत्म्याच्या आवाजाला कॅच करू शकता. कोणत्याही आत्म्याला दूर बसून सहयोग देऊ शकता.

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.