मराठी मुरली · Brahma Kumaris

आजची मुरली · 25 मे, 2025

ओम शांती · BapDada · 25 मे, 2025

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली25 मे, 2025 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

25.05.2025
प्रभात:मुरली
ओम शांती
“अव्यक्त बापदादा”

“शिक्षणासोबत क्षमा आणि दयेला आत्मसात करा, आशीर्वाद द्या, आशीर्वाद घ्या तर तुमचे घर आश्रम बनेल”

आज बापदादा सर्व मुलांच्या मस्तकामध्ये प्युरिटीची रेषा बघत आहेत कारण ब्राह्मण जीवनाचे फाउंडेशनच आहे पवित्रता. पवित्रतेच्या रेषा कोणत्या आहेत, जाणता का? पवित्रता सर्वांना प्रिय आहे. पवित्रता सुख, शांती, प्रेम, आनंदाची जननी आहे. पवित्रता मानवाचा खरा शृंगार आहे. पवित्रता नाही तर मानव जीवनाचे मूल्य नाही. जसे पाहता की देवता पवित्र आहेत, म्हणूनच माननीय आणि पूज्यनीय आहेत. पवित्रता नाही तर आजकाल मानवाचे जीवन पहात आहात. बापदादांनी तुम्हा सर्व मुलांना ब्राह्मण जन्माचे वरदान हेच दिले - ‘पवित्र भव’, ‘योगी भव’. ज्या आत्म्यामध्ये पवित्रता आहे, त्याचे वर्तन, आचरण, चेहरा चमकतो म्हणून पवित्रताच जीवनाला श्रेष्ठ बनविणारी आहे. वास्तवामध्ये तुम्हा सर्व मुलांचे आदि स्वरुपच पवित्रता आहे. अनादि स्वरूप देखील पवित्रता आहे. अशा पवित्र आत्म्यांची विशेषता त्यांच्या जीवनामध्ये सदैव पवित्रतेची पर्सनॅलिटी दिसून येते. पवित्रतेची रियल्टी, पवित्रतेची रॉयल्टी चेहऱ्यावर आणि वर्तनातून दिसून येते. या रेषा जीवनाचा शृंगार आहेत. रियल्टी आहे - मी अनादि आदि स्वरुप या स्मृतिने समर्थ बनतो. रॉयल्टी आहे - स्वतः देखील स्वमानामध्ये राहणार आणि प्रत्येकाला सन्मान देऊन चालणारा. पर्सनॅलिटी आहे - सदैव संतुष्टता आणि प्रसन्नता. स्वतः देखील संतुष्ट आणि इतरांना देखील संतुष्ट करणारा. पवित्रतेमुळे प्राप्ति सुद्धा खूप आहेत. बापदादांनी तुम्हा सर्व मुलांना काय-काय प्राप्ति करवून दिल्या आहेत, ते जाणता ना! किती खजिन्यांनी भरपूर केले आहे, जर प्राप्तिनां स्मृतिमध्ये ठेवले तर भरपूर व्हाल.

सर्वात पहिला खजिना दिला आहे - ज्ञानाचा खजिना. ज्याद्वारे जीवन जगत असताना दुःख अशांती पासून मुक्त होता. व्यर्थ संकल्प, निगेटिव्ह संकल्प, विकल्प, विकर्मापासून मुक्त होता. जर कोणताही व्यर्थ संकल्प अथवा विकल्प येत जरी असेल, तर ज्ञानाच्या बळाने विजयी बनता.

दुसरा खजिना आहे - आठवण, योग. ज्याद्वारे शक्तींची प्राप्ति होते आणि शक्तिंच्या आधारे सर्व समस्यांना, सर्व विघ्नांना सहज पार करता.

तिसरा खजिना आहे - धारणांचा, ज्याद्वारे सर्व गुणांची प्राप्ती होते. आणि चौथा खजिना आहे - सेवेचा, ज्याद्वारे सेवा केल्याने, ज्यांची सेवा करता त्यांचे आशीर्वाद मिळतात, आनंद मिळतो.

बाबांद्वारे सर्व मुलांना इतके खजिने प्राप्त होतात. बाबा सर्वांना एक सारखेच खजिने देतात, कोणाला कमी, कोणाला जास्त देत नाहीत. परंतु घेणाऱ्यांमध्ये फरक होतो. काही मुले तर खजिन्यांना प्राप्त करुन खाऊन, पिऊन, मौज करतात आणि मग मजा करून संपवून टाकतात. आणि काही मुले खाऊन, पिऊन, मौज करून जमा सुद्धा करतात. आणि काही मुले कार्यामध्ये सुद्धा लावतात परंतु वाढवत जातात. वाढवण्याची चावी आहे - खजिन्याला स्वतःप्रति आणि दुसऱ्यांप्रति यूज करणे. जो युज करतो तो वाढवतो. तर आपणच आपल्याला विचारा की हे विशेष खजिने जमा आहेत? जमा आहेत, काय म्हणणार? होय, की थोडे-थोडे? ज्यांच्याकडे हे खजिने जमा आहेत ते सदैव भरपूर राहतात. बघा कोणतीही वस्तू पुरेपूर भरलेली असते ना, तर ती डचमळत नाही. जर पूर्णपणे भरलेली नसेल तर डचमळते, हलते. कोणत्याही वस्तूला जर पूर्णपणे भरले नाही तर ती हलते तर इथे देखील जर सर्व खजिन्यांनी भरपूर नसाल, तर डळमळतात. सदैव हा नशा रहावा की बाबांचे खजिने माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. बाबांनी दिले, तुम्ही घेतले तर सर्व खजिने कोणाचे झाले? तुमचे झाले ना. तर ज्यांच्याकडे खजिने आहेत, ते किती नशेमध्ये राहतात? जसे राजाचा छोटासा मुलगा राजकुमार असतो, त्याला ठाऊकही नसते की आपल्या वडिलांकडे काय-काय खजिना आहे परंतु त्याला नशा असतो की वडिलांचे खजिने माझे खजिने आहेत आणि त्या खजिन्यांच्या आनंदामध्येच असतो. जर आनंद कमी होतो तर त्याचे कारण काय असते? बाबांनी तर खजिने दिले आहेत, ऐकले. परंतु एक आहेत ऐकणारे, दुसरे आहेत सामावून घेणारे, जे सामावून घेणारे आहेत ते नशेमध्ये राहतात.

आज नवीन मुले सुद्धा आली आहेत. बापदादा तुम्हा लक्की मुलांना तुम्हा सर्वांच्या भाग्याची मुबारक देत आहेत. आपल्या भाग्याला ओळखले! ओळखले आहे? परमात्म प्रेम, अविनाशी प्रेम जे केवळ एकच जन्म नाही परंतु सदैव प्रेम अनेक जन्म कायम राहते कारण हा जो काळ चालू आहे, हा काळ सुद्धा संगमयुग भाग्यवान युग आहे. सतयुगाला देखील भाग्यवान म्हणतात परंतु वर्तमान संगमयुगाचा काळ त्याही पेक्षा भाग्यवान आहे. असे का? या संगमयुगामध्येच बाबांद्वारे अखंड भाग्याचे वरदान, वारसा प्राप्त होतो. तर अशा संगमयुगामध्ये, भाग्यवान काळामध्ये तुम्ही सर्व आपले भाग्य घेण्यासाठी पोहोचले आहात. बापदादा मुलांना एक खूप सोपी पुरुषार्थाची विधी सांगत आहेत - सोपे हवे आहे ना! अवघड तर नको आहे ना! या मुलांना (जुन्यां मुलांना) तर भाग्याची सोपी विधी मिळाली आहे. मिळाली आहे ना? सर्वात सोपी, अजून काहीही करू नका, फक्त एकच गोष्ट करा, एक गोष्ट तर करू शकता ना! हो म्हणा किंवा नाही म्हणा! बोला - हां जी. तर सर्वात सोपी विधी आहे - अमृतवेलेपासून सर्वांना जे कोणी भेटेल, त्याच्याकडून आशीर्वाद घ्या आणि आशीर्वाद द्या. भले क्रोधी सुद्धा येईल, परंतु तुम्ही त्याला देखील आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या कारण आशीर्वाद तीव्र पुरुषार्थाचे खूप सोपे यंत्र आहे. जसे विज्ञानामध्ये रॉकेट आहे ना - तर किती वेगाने कार्य करते. तसे आशीर्वाद देणे आणि आशीर्वाद घेणे, हे देखील पुढे जाण्यासाठी एक खूप सोपे साधन आहे. अमृतवेलेला बाबांकडून सहज आठवणीने आशीर्वाद घ्या आणि संपूर्ण दिवस आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या, हे करू शकता ना? करू शकत असाल तर हात वर करा. कोणी शाप दिला तर काय कराल? तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर? पहा, तुम्ही परमात्म्याची मुले दात्याची मुले दाता आहात ना! मास्टर दाता तर आहात. तर दात्याचे काय काम असते? देणे. तर सर्वांत चांगली गोष्ट आहे आशीर्वाद देणे. कशीही व्यक्ती असो, परंतु आहे तर तुमचा भाऊ, बहीण. परमात्म्याची मुले तर भाऊ-बहीणी आहात ना. तर परमात्म्याचे मूल आहे, माझा ईश्वरीय भाऊ आहे, ईश्वरीय बहीण आहे, त्याला काय देणार! शाप द्याल का? बाबा कधी शाप देतात! देतील? देतात का? हो की नाही? होय-नाही काही बोला. खूप आनंदी रहाल. का? जर शाप देणाऱ्याला सुद्धा तुम्ही आशीर्वाद दिलात, तो देवो न देवो, परंतु तुम्ही आशीर्वाद घेणार, तर मग दुःख कशाला होईल. बापदादा तुम्हा आलेल्या मुलांना एक वरदान देत आहेत - वरदान लक्षात ठेवाल तर सदैव आनंदात रहाल. वरदान सांगू का? ऐकणार!

वरदान आहे - जरी तुम्हाला कोणी दुःख दिले तरी देखील तुम्ही दुःख घेऊ नका, तो देईल परंतु तुम्ही घेऊ नका. कारण देणाऱ्याने दिले परंतु घेणारे तर तुम्ही आहात ना! देणारा, घेणारा नाही. जर तो खराब वस्तू देत असेल, दुःख देतो, अशांती देतो, तर ही वाईट गोष्ट आहे ना. दुःख तुम्हाला आवडते का? नाही आवडत ना! तर खराब वस्तू झाली ना. तर खराब वस्तू घेतली जाते का? तुम्हाला जर कोणी खराब वस्तू दिली तर तुम्ही घ्याल? घेणार का? नाही घेणार ना. तर घेता कशासाठी? घेताच ना! जेव्हा दुःख घेता तर दुःखी कोण होते? तुम्ही होता की तो होतो? घेणारा जास्त दुःखी होतो. जर आतापासूनच दुःख घेतले नाहीत तर अर्धे दुःख तर तुमचे दूर झाले, घेणारच नाही ना! आणि तुम्ही दुःखा ऐवजी सुख द्याल तर आशीर्वाद मिळतील ना. तर सुखी सुद्धा रहाल आणि आशीर्वादांचा खजिना देखील भरपूर (विपुल) होत जाईल. प्रत्येक आत्म्याकडून, कशीही असो तुम्ही आशीर्वाद घ्या. शुभ भावना, शुभ कामना ठेवा. कधी-कधी काय होते? कोणी असे काही काम करते ना, तर शिकवण देण्याचा प्रयत्न करता. याला ठीक करू, शिकवण देता. शिकवण द्या परंतु शिकवण देण्याची सर्वोत्तम विधी आहे - क्षमेचे रूप बनून शिकवण द्या. केवळ शिकवण देऊ नका, दया-क्षमा सुद्धा करा आणि शिकवण सुद्धा द्या. दोन शब्द लक्षात ठेवा - शिकवण आणि क्षमा, दया. जर दयाळू बनून त्याला शिकवण द्याल तर तुमची शिकवण काम करेल. जर दयाळू बनून दिला नाहीत, तर शिकवण एका कानाने ऐकतील दुसऱ्या कानाने निघून जाईल. शिकवण धारण होणार नाही (अंगिकारली जाणार नाही). असे आहे ना? अनुभव आहे? तुम्ही सुद्धा कोणाचे शिक्षक तर बनत नाही? शिक्षक बनणे लवकर जमते परंतु क्षमा करणे, दोन्ही बरोबरीने हवे. आतापासून दया, दया करण्याची विधी आहे - शुभ भावना, शुभ कामना. जसे म्हणतात ना - खरे प्रेम, दगडाला सुद्धा पाझर फोडते… असेच क्षमा स्वरूपाने शिकवण दिल्याने तुमचे कार्य जे इच्छिता की, याने असे करु नये, असे होऊ नये, ते प्रत्यक्ष दिसून येईल. तुमच्या दयाळू बनून शिकवण देण्याच्या प्रभावाने त्याच्या कठोर हृदयाचे देखील परिवर्तन होईल. तर काय वरदान मिळाले? ना दुःख द्यायचे, ना दुःख घ्यायचे. पसंत आहे? पसंत असेल तर आता घेऊ नका. चूक करू नका. जर बाबा दुःख देत नाहीत तर फॉलो फादर तर करायचे आहे ना? करत आहात! कधी-कधी थोडे रागावता. रागवायचे नाही. दया करा. दये सोबत शिकवण द्या. वारंवार कोणावर रागावल्याने जी आत्मा आहे ना, ती अजूनच शत्रू बनते. तिरस्कार वाटतो. परमात्म संतान आहात ना! तर जसे बाबा पतिताला पावन बनविणारे आहेत, तर तुम्ही दुःखी असणाऱ्याला सुख देऊ शकत नाही? आता जाऊन ट्रायल करा, ट्रायल करणार ना! तर पहिल्यांदा चॅरिटी बिगिन्स ॲट होम, परिवारामध्ये जर कोणी दुःख दिले, तरी देखील दुःख घेऊ नका. आशीर्वाद द्या, दयाळू बना, अगोदर घरातल्यांसाठी करा. तुमच्या घराचा प्रभाव परिसरावर पडेल, परिसराचा प्रभाव देशावर पडेल, देशाचा प्रभाव विश्वामध्ये पडेल. सोपे आहे ना! आपल्या परिवारापासून सुरु करा कारण पहा घरातील एखादा जरी क्रोध करत असेल तर घराचे वातावरण कसे होते? घर वाटते की युद्धाचे मैदान वाटते? त्यावेळी चांगले वाटते का? नाही वाटत ना!

तुम्हा लोकांसाठी सुद्धा आहे (आज व्हीआयपींसोबत मधुबनमधील समर्पित भाऊ-बहिणी देखील समोर बसले आहेत) आपल्या-आपल्या सहकाऱ्यांकडून, आपल्या-आपल्या कार्यकर्त्यांकडून ना दुःख घ्यायचे, ना दुःख द्यायचे. आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या. जर तुम्ही अधिकाराने अशा वेळी देखील हृदयापासून ‘माझे बाबा’ म्हणाल, ‘परमात्मा बाबा, ‘माझे बाबा…’ तर एक म्हण आहे की, भगवान सदैव हजर आहेत. जर तुम्ही हृदयापासून, अधिकार रुपामध्ये अशा वेळी ‘माझे बाबा’ म्हटले, तर बाबा हजूर हाजिर होतील, कारण बाबा कशासाठी आहेत? मुलांसाठी तर आहेत. आणि अधिकारी मुलांना बाबा सहयोग देणार नाहीत, असे होऊच शकत नाही. असंभव. तर परिवर्तन करुन जा. जसे आलात, तसेच जाऊ नका. परिवर्तन करुनच जा कारण की बघा, इतका खर्च करून आला आहात, तिकीट तर लागले ना. खर्च देखील केला, वेळ देखील दिला तर त्याची किंमत तर ठेवणार ना! तर किंमत आहे - स्व परिवर्तनाने पहिल्यांदा आपल्या घराचे परिवर्तन, मग विश्वाचे, देशाचे परिवर्तन. तुमचे घर आश्रम बनावा. घर नाही, आश्रम. तसे शास्त्र देखील म्हणते गृहस्थ आश्रम, परंतु आज आश्रम नाही आहे. आश्रम वेगळा आहे, घर वेगळे आहे. तर घराला आश्रम बनवा. आशीर्वाद देणे आणि घेणे हे आश्रमाचे कार्य आहे. तुमचे घर मंदिर बनेल. मंदिरामध्ये मूर्ती काय करते? आशीर्वाद देते ना! मूर्तीसमोर जाऊन काय म्हणतात? आशीर्वाद द्या. ‘दया करा, दया करा’ असे म्हणत आळवतात. तर तुम्हाला देखील काय द्यायचे आहे? आशीर्वाद. ईश्वरीय प्रेम द्या, आत्मिक प्रेम. दैहिक प्रेम नाही, आत्मिक प्रेम. आज जे प्रेम आहे ते स्वार्थी प्रेम आहे. खरे हृदयापासूनचे प्रेम नाही आहे. स्वार्थ असेल तर प्रेम देतील, स्वार्थ नसेल तर डोन्ट केअर (निष्काळजीपणा करतात). तर तुम्ही काय करणार? आत्मिक प्रेम द्या, आशीर्वाद द्या, दुःख घेऊ नका, दुःख देऊ नका. बघा तुम्हाला चान्स मिळाला आहे, बापदादांना देखील आनंद वाटतो. इतके जे सर्व आलेले आहेत, (भारतामधील जवळ-जवळ २५० व्हीआयपीज् रिट्रीटमध्ये आले आहेत) एवढी घरे तरी आश्रम बनतील ना. बनवणार ना? पक्के? की थोडे-थोडे कच्चे? जे समजतात काहीही होऊ देत, थोडे सहन तर करावे लागेल, सामावण्याची शक्ती कार्यामध्ये लावावी लागेल, परंतु सहनशक्तीचे फळ खूप गोड असते. सहन करावे लागते परंतु फळ खूप गोड असते. तर जे पक्का वादा करत आहेत, घरा-घराला स्वर्ग बनवणार, मंदिर बनवणार, आश्रम बनवणार, त्यांनी हात वर करा. इतरांना पाहून हात वर करू नका कारण नंतर मग बापदादा हिशोब घेणार ना. दुसऱ्याला पाहून हात वर करू नका. सच्च्या मनाचा हात, मनापासून हात वर करा. अच्छा. दादी, तुम्ही यांना याचे काय बक्षीस देणार? हां, बोला दादी, इतकी मंदिरे बनणार तर तुम्ही त्यांना काय बक्षीस द्याल? (आपल्या घरच्यांना घेऊन येऊ देत) हे काही बक्षीस नाही दिलेत, हे तर काम सांगितलेत. (बाबा जी आज्ञा देतील) बघा, बक्षीस तर तुम्हाला मिळणारच, काही मोठी गोष्ट नाहीये, ‘परंतु…’ परंतु आहे? परंतु बोलू. तुम्ही गेल्यानंतर आपल्या धारणेद्वारे परिवर्तन करा आणि १५ दिवसानंतर, महिन्यानंतर आपला रिझल्ट लिहा, जे एका महिन्यामध्ये दुःख ना घेणार, ना देणार, त्याला खूप चांगले बक्षीस देणार. जर तुम्ही आलात तर मुबारक आहे, जर येऊ शकला नाहीत तरी देखील सेंटरवर पाठवू. अच्छा.

चोहो बाजूच्या देश विदेशच्या मुलांची आठवण बापदादांना मिळाली आहे. भले फोन द्वारे आठवण पाठवली आहे, पत्राद्वारे पाठवली आहे, अथवा मनामध्ये आठवण केली आहे, तर बापदादा सर्व मुलांना भले भारतातील, किंवा विदेशातील रिटर्नमध्ये पद्मगुणा आशीर्वाद आणि प्रेमपूर्वक आठवण देत आहेत.

चोहो बाजूच्या परमात्म प्रेमाच्या अधिकारी मुलांना, चोहो बाजुंनी सर्व खजिन्यांनी भरपूर, निर्विघ्न, निर्विकल्प, निरव्यर्थ संकल्प असणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, त्याचसोबत संपूर्ण परिवर्तन करणाऱ्या आणि करायला लावण्यासाठी उमंग-उत्साहामध्ये उडणाऱ्या मुलांना, त्याचसोबत बापदादांना सच्च्या मनाचा समाचार देणाऱ्या सच्च्या दिलाच्या मुलांना विशेष दिलारामच्या रुपामध्ये, पित्याच्या रुपामध्ये, शिक्षकाच्या रुपामध्ये, सद्गुरुच्या रुपामध्ये पद्मगुणा प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:- भटकणाऱ्या आत्म्यांना योग्य ठिकाणा दाखविणारे चैतन्य लाइट-माइट हाऊस भव
कोणत्याही भटकणाऱ्या आत्म्याला योग्य ठिकाणा दाखविण्यासाठी चैतन्य लाइट-माइट हाऊस बना. यासाठी २ गोष्टी लक्षात असाव्यात - १. प्रत्येक आत्म्याच्या इच्छेला पारखणे; जसे योग्य डॉक्टर त्याला म्हटले जाते जो नाडीला ओळखतो, अशा पारखण्याच्या शक्तिला कायम युज करा. २. सदैव आपल्याजवळ सर्व खजिन्यांचा अनुभव कायम ठेवा. सदैव हे लक्ष्य ठेवा की ऐकवायचे नाही परंतु सर्व नात्यांचा, सर्व शक्तींचा अनुभव करवायचा आहे.
सुविचार:- दुसऱ्यांचे करेक्शन करण्याऐवजी एका बाबांशी नीट कनेक्शन ठेवा.

||| ओम शांती |||

अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-

आपले निजी-स्वरुप आणि वरदानी स्वरुप सदैव स्मृतीमध्ये राहिले तर अपवित्रता आणि विस्मृतीचे नामो-निशाणही समाप्त होईल. विस्मृति आणि अपवित्रता काय असते, आता याची अविद्या झाली पाहिजे कारण हा संस्कार आणि स्वरुप तुमचे नाहीये परंतु तुमच्या मागील जन्माचे होते. आता तुम्ही ब्राह्मण आहात, हे तर शूद्रांचे संस्कार आणि स्वरुप आहे; असे आपल्यापेक्षा वेगळे अर्थात दुसऱ्याचे संस्कार असल्याचे अनुभव होणे, याला म्हटले जाते - न्यारा आणि प्यारा (वेगळा आणि आवडता).

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

Also searched asaajchi murali · आजची मुरली · आजची मुरली मराठी · murli in marathi · todays murli in marathi · bk marathi murli · marathi pdf murli · daily murli marathi · marathi murli today · om shanti aajchi murli

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.