| 16.10.2025 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - एकांतामध्ये बसून आता असा अभ्यास करा जो हा अनुभव व्हावा की मी आत्मा शरीरा पासून भिन्न आहे, यालाच जिवंतपणी मरणे म्हटले जाते” | |
| प्रश्न:- | ‘एकांत’ याचा अर्थ काय आहे? एकांतामध्ये बसून तुम्हाला कोणता अनुभव करायचा आहे? |
| उत्तर:- | ‘एकांत’ याचा अर्थ आहे एकाच्याच आठवणीमध्ये या शरीराचा अंत व्हावा अर्थात एकांतामध्ये बसून असा अनुभव करा की मी आत्मा या शरीराला सोडून बाबांकडे जात आहे. बाकी कशाचीही आठवण राहू नये. बसल्या-बसल्या अशरीरी व्हा. जणूकाही आपण या शरीरासाठी मेलो आहोत. आपण फक्त आत्मा आहोत, शिवबाबांची मुले आहोत, या प्रॅक्टिसने देह भान सुटत जाईल. |
ओम् शांती. मुलांना बाबा सर्वप्रथम हे समजावून सांगतात की गोड-गोड मुलांनो, जेव्हा इथे बसता, तर स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत रहा, इतर कुठेही बुद्धी जाता कामा नये. हे तुम्ही मुले जाणता आपण आत्मा आहोत. पार्ट मी आत्मा बजावते या शरीराद्वारे. आत्मा अविनाशी, शरीर विनाशी आहे. तर तुम्हा मुलांना देही-अभिमानी बनून बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे. मी आत्मा आहे, या कर्मेंद्रियांद्वारे काम करायचे अथवा नाही करायचे हे माझ्यावर अवलंबून आहे. स्वतःला शरीरापासून वेगळे समजले पाहिजे. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजा. देहाला विसरून जा. मी आत्मा स्वतंत्र आहे. मला एका बाबांव्यतिरिक्त इतर कोणाचीही आठवण करायची नाहीये. जिवंतपणी मेलेल्या अवस्थेमध्ये रहायचे आहे. मज आत्म्याचा योग राहिला पाहिजे बाबांसोबत. बाकी तर दुनिये पासून, घरापासून मेलो आहोत. म्हणतात ना - ‘आप मुये मर गई दुनिया’. आता जिवंतपणी तुम्हाला मरायचे आहे. आपण आत्मे शिवबाबांची मुले आहोत. शरीराचे भान उडवून लावत राहिले पाहिजे. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजा आणि माझी आठवण करा. शरीराचे भान सोडून द्या. हे जुने शरीर आहे ना. जुन्या वस्तूला सोडून दिले जाते ना. स्वतःला अशरीरी समजा. तुम्हाला आता बाबांची आठवण करत-करत बाबांकडे जायचे आहे. असे करता-करता मग तुम्हाला सवय लागेल. आता तर तुम्हाला घरी जायचे आहे तर मग या जुन्या दुनियेची आठवण का करावी. एकांतामध्ये बसून अशी स्वतःशी मेहनत करायची आहे. भक्तीमार्गामध्ये देखील देवघरामध्ये बसून माळा जपतात, पूजा करतात. तुम्ही देखील एकांतामध्ये बसून हा प्रयत्न करा तर सवय लागेल. तुम्हाला मुखाने तर काहीच बोलायचे नाही आहे. यामध्ये आहे बुद्धीची गोष्ट. शिवबाबा तर आहेत शिकविणारे. त्यांना काही पुरुषार्थ करायचा नाहीये, हे बाबा (ब्रह्मा) पुरुषार्थ करतात, ते मग तुम्हा मुलांना देखील शिकवतात. जितके शक्य होईल असे बसून विचार करा. आता आपल्याला जायचे आहे आपल्या घरी. या शरीराला तर इथेच सोडायचे आहे. बाबांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील आणि आयुष्य देखील वाढेल. मनामध्ये हे चिंतन चालले पाहिजे. बाहेरून काही बोलायचे नाहीये. भक्तीमार्गामध्ये देखील ब्रह्म तत्त्वाला किंवा कोणी शिवाची देखील आठवण करतात. परंतु ती आठवण काही यथार्थ नाही आहे. बाबांचा परिचयच नाही तर आठवण कशी करतील. तुम्हाला तर आता बाबांचा परिचय मिळाला आहे. पहाटे उठून एकांतामध्ये अशा स्वतःशी गोष्टी करत रहा. विचार सागर मंथन करा, बाबांची आठवण करा. बाबा, आता मी आलो की आलो तुमच्या खऱ्या गोदीमध्ये. ती आहे रूहानी गोद. तर अशा प्रकारे स्वतःशी गोष्टी केल्या पाहिजेत. बाबा आलेले आहेत. बाबा कल्प-कल्प येऊन आम्हाला राजयोग शिकवतात. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा आणि चक्राची आठवण करा’. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. बाबांमध्येच संपूर्ण ज्ञान आहे ना चक्राचे. ते मग तुम्हाला देतात. तुम्हाला त्रिकालदर्शी बनवत आहेत. तिन्ही काळांना अर्थात आदि-मध्य-अंताला तुम्ही जाणता. बाबा देखील परम-आत्मा आहेत. त्यांना शरीर तर नाही आहे. आता या शरीरामध्ये (ब्रह्मा बाबांच्या शरीरामध्ये) बसून तुम्हाला समजावून सांगत आहेत. ही वंडरफुल गोष्ट आहे. भागीरथावर विराजमान होतात तर जरूर दुसरी आत्मा आहे. अनेक जन्मांच्या अंताचा जन्म यांचा आहे. नंबर वन पावन तेच मग नंबर वन पतित बनतात. ते स्वतःला भगवान, विष्णू इत्यादी तर म्हणत नाहीत. इथे एकही आत्मा पावन नाही आहे, सर्व पतितच आहेत. तर बाबा मुलांना समजावून सांगतात, असे-असे विचार सागर मंथन करा तर यामुळे तुम्हाला आनंद देखील होईल, यामध्ये एकांत देखील जरूर पाहिजे. एकाच्याच आठवणीमध्ये शरीराचा अंत होतो, यालाच म्हटले जाते - ‘एकांत’. हे शरीर सुटून जाईल. संन्यासी देखील ‘ब्रह्म’च्या आठवणीमध्ये किंवा ‘तत्व’च्या आठवणीमध्ये राहतात. त्याच आठवणीमध्ये राहता-राहता शरीराचे भान सुटून जाते. बस्स, आपल्याला ‘ब्रह्म’मध्ये लीन व्हायचे आहे. असे बसून राहतात. तपस्येमध्ये बसल्या-बसल्या शरीर सोडतात. भक्तीमध्ये तर मनुष्य खूप धक्के खातात, यामध्ये धक्के खाण्याची गोष्ट नाही. आठवणी मध्येच रहायचे आहे. अखेरीला कोणाचीही आठवण राहू नये. गृहस्थ व्यवहारामध्ये तर रहायचेच आहे. बाकी सवड काढायची आहे. स्टुडंटला अभ्यासाची आवड असते ना. हा देखील अभ्यास आहे, परंतु स्वतःला आत्मा न समजल्याने पिता-टीचर-गुरु सर्वांना विसरून जातात. एकांतामध्ये बसून अशा प्रकारे चिंतन करा. गृहस्थी घरामध्ये तर व्हायब्रेशन चांगले नसते. जर वेगळा प्रबंध असेल तर एका खोलीमध्ये एकांतामध्ये बसा. मातांना तर दिवसा सुद्धा वेळ मिळतो. मुले इत्यादी शाळेमध्ये निघून जातात. जितका वेळ मिळेल हाच प्रयत्न करत रहा. तुम्हाला तर एक घर आहे, बाबांची तर कितीतरी असंख्य दुकाने आहेत अजूनही वृद्धी होत राहील. लोकांना तर धंदा इत्यादीची चिंता असते तर झोप देखील उडून जाते. हा व्यापार देखील आहे ना. किती मोठे व्यापारी आहेत. किती मोठा मट्टा-सट्टा (देवाण-घेवाण) करतात. जुने शरीर इत्यादी घेऊन नवीन देतात, सर्वांना रस्ता सांगतात. हा देखील धंदा त्यांना करायचा आहे. हा व्यापार तर खूप मोठा आहे. व्यापाऱ्याला व्यापाराचाच विचार असतो. बाबा अशा प्रकारे प्रॅक्टिस करतात आणि मग सांगतात - असे-असे करा. जितके तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये रहाल तर आपणच झोप उडून जाईल. कमाई मध्ये आत्म्याला खूप मजा येईल. कमाईसाठी लोक रात्रीचे सुद्धा जागरण करतात. सीझनमध्ये तर पूर्ण रात्रभर सुद्धा दुकान उघडे असते. तुमची कमाई रात्रीची आणि पहाटेची खूप चांगली होईल. स्वदर्शन चक्रधारी बनाल, त्रिकालदर्शी बनाल. २१ जन्मांकरिता धन जमा करता. लोक श्रीमंत बनण्यासाठी पुरुषार्थ करतात. तुम्ही देखील बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश होतील. बळ मिळेल. आठवणीच्या यात्रेमध्ये राहिला नाहीत तर खूप घाटा होईल कारण डोक्यावर पापांचे ओझे खूप आहे. आता जमा करायचे आहे, एकाचीच आठवण करायची आहे आणि त्रिकालदर्शी बनायचे आहे. हे अविनाशी धन अर्ध्या कल्पासाठी जमा करायचे आहे. हे तर खूप मौल्यवान आहे. विचार सागर मंथन करून रत्न काढायची आहेत. बाबा जसे स्वतः करतात, मुलांना देखील युक्ती सांगतात. मुले म्हणतात - ‘बाबा, मायेची वादळे खूप येतात’.
बाबा म्हणतात - जितके शक्य होईल आपली कमाई करायची आहे, हीच उपयोगाला येणार आहे. एकांतामध्ये बसून बाबांची आठवण करायची आहे. सवड असेल तर मंदिरे इत्यादी ठिकाणी खूप सेवा देखील करू शकता. बॅज जरूर लावलेला असावा. सर्व समजतील ही तर रूहानी मिलेट्री आहे. तुम्ही लिहिता देखील - आम्ही स्वर्गाची स्थापना करत आहोत. आदि सनातन देवी-देवता धर्म होता, आता नाही आहे जो पुन्हा स्थापन करत आहात. हे लक्ष्मी-नारायण ऑब्जेक्ट आहे ना. कधीतरी हे ट्रान्सलाईटचे चित्र बॅटरी सहित घेऊन परिक्रमा कराल आणि सर्वांना सांगाल, हे राज्य आम्ही स्थापन करत आहोत. हे चित्र सर्वात फर्स्टक्लास आहे. हे चित्र खूप प्रसिद्ध होईल. लक्ष्मी-नारायण काही एकटे तर नव्हते, त्यांची राजधानी होती ना. हे स्वराज्य स्थापन करत आहेत. आता बाबा म्हणतात - मनमनाभव. बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. म्हणतात - आम्ही गीता-सप्ताह साजरा करणार. हे सर्व प्लॅन कल्पा पूर्वीप्रमाणे बनत आहेत. परिक्रमेमध्ये हे चित्र घ्यावे लागेल. याला पाहून सर्व खुश होतील. तुम्ही म्हणाल - बाबांची आणि वारशाची आठवण करा, मनमनाभव. हे गीतेतील शब्द आहेत ना. भगवान शिवबाबा आहेत, ते म्हणतात - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. ८४ च्या चक्राची आठवण कराल तर हे (लक्ष्मी-नारायण) बनाल. लिटरेचर देखील तुम्ही सौगात म्हणून देत रहा. शिवबाबाचा भंडारा तर भरपूर आहे. पुढे चालून खूप सेवा होईल. एम ऑब्जेक्ट किती क्लियर आहे. एक राज्य, एक धर्म होता, खूप श्रीमंत होते. लोकांना वाटते एक राज्य, एक धर्म असावा. लोकांना जे हवे आहे ती चिन्हे आता दिसून येतील तेव्हा समजतील हे तर बरोबर सांगत आहेत. १०० टक्के पवित्रता, सुख, शांतीचे राज्य पुन्हा स्थापन करत आहोत आणि मग तुम्हाला देखील आनंद होईल. आठवणी मध्ये राहिल्यानेच तीर लागेल. शांतीमध्ये राहून मोजकेच शब्द बोलायचे आहेत. जास्त आवाज नको. गाणी, कविता इत्यादी बाबा काहीच पसंत करत नाहीत. बाहेरच्या लोकांशी रीस (ईर्ष्या) करायची नाही. तुमची गोष्टच वेगळी आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे, बस्स. स्लोगन्स देखील चांगली असावीत जी मनुष्य वाचून जागे होतील. मुलांची वृद्धी होत राहते. खजिना तर भरपूर राहतो. मुलांनी दिलेले मग मुलांच्याच उपयोगाला येते. बाबा तर पैसे घेऊन येत नाहीत. तुमच्याच वस्तू तुमच्याच उपयोगाला येतात. भारतवासी जाणतात आपण खूप सुधारणा करत आहोत. ५ वर्षाच्या आत इतके धान्य होईल ज्यामुळे धान्याचा कधी तुटवडा पडणार नाही. आणि तुम्ही जाणता - अशी परिस्थिती असेल जे खाण्यासाठी अन्न देखील मिळणार नाही. असे नाही धान्य काही स्वस्त होईल.
तुम्ही मुले जाणता आपण २१ जन्मांसाठी आपले राज्य-भाग्य प्राप्त करत आहोत. हा थोडाफार त्रास तर सहन करायचाच आहे. म्हटले जाते - ‘खुशी जैसी खुराक नहीं’. अतींद्रीय सुख गोप-गोपींचे गायले गेले आहे. असंख्य मुले होतील. जे पण सैंपलिंग वाले असतील ते येत राहतील. झाड इथेच वाढणार आहे ना. स्थापना होत आहे. इतर धर्मांमध्ये असे होत नाही. ते तर वरून येतात. हे तर जणूकाही झाड स्थापन झालेलेच आहे, यामध्ये मग नंबरवार येत जातील, वृद्धी होत जाईल. काहीच त्रास नाही. त्यांना तर वरून येऊन पार्ट बजावायचाच आहे, यामध्ये महिमा करण्यासारखे काय आहे. धर्म स्थापकांच्या मागे येत राहतात. ते काय सद्गती करिता शिक्षण देतील? काहीच नाही. इथे तर बाबा भविष्य देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. संगमयुगावर नवीन सैपलिंग (कलम) लागते ना. अगोदर रोपट्यांना कुंडीमध्ये लावून नंतर मग खाली जमिनीमध्ये लावतात. वृद्धी होत राहते. तुम्ही देखील आता रोपटे लावत आहात, मग सतयुगामध्ये वृद्धी होऊन राज्य-भाग्य मिळवाल. तुम्ही नवीन दुनियेची स्थापना करत आहात. मनुष्य समजतात अजून कलियुगाची खूप वर्षे बाकी आहेत कारण शास्त्रांमध्ये लाखो वर्षे लिहिलेली आहेत. समजतात कलियुगाची अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत. त्यानंतर मग बाबा येऊन नवीन दुनिया बनवतील. बरेचजण समजतात की, ही तीच महाभारत लढाई आहे. गीतेचा भगवान देखील जरूर असेल. तुम्ही सांगता श्रीकृष्ण तर नव्हता. बाबांनी सांगितले आहे - श्रीकृष्ण तर ८४ जन्म घेतात. एक फीचर्स (चेहरामोहरा) दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. तर इथे मग श्रीकृष्ण कसे येतील. कोणीही या गोष्टींवर विचार करत नाहीत. तुम्ही समजता श्रीकृष्ण स्वर्गाचा प्रिन्स, तो मग द्वापरमध्ये कुठून येईल. या लक्ष्मी-नारायणाच्या चित्राला पाहूनच लक्षात येते - शिवबाबा हा वारसा देत आहेत. सतयुगाची स्थापना करणारे बाबाच आहेत. हा गोळा, झाड इत्यादीची चित्रांची कमतरता थोडीच आहे. एके दिवशी तुमच्याकडे ही सर्व चित्रे ट्रान्सलाईटची बनतील. मग सर्वजण म्हणतील - आम्हाला अशी चित्रे पाहिजेत. या चित्रांद्वारे मग विहंग मार्गाची सेवा होईल. तुमच्याकडे इतकी मुले येतील जो तुमच्याकडे मोकळा वेळच राहणार नाही. असंख्य येतील. खूप आनंद होईल. दिवसेंदिवस तुमची ताकद वाढत जाईल. ड्रामा अनुसार जे फूल बनणारे असतील त्यांना टच होईल. तुम्हा मुलांना असे म्हणावे लागणार नाही की बाबा यांच्या बुद्धीला टच करा. टच काही बाबा थोडेच करतील. वेळेवर आपोआपच टच होईल. बाबा तर रस्ता सांगतील ना. खूप मुली लिहितात - ‘आमच्या पतीच्या बुद्धीला टच करा’. असे सर्वांच्या बुद्धीला टच करतील मग तर सर्व स्वर्गामध्ये जमा होतील. अभ्यासाचीच मेहनत आहे. तुम्ही खुदाई खिदमतगार (ईश्वरीय सेवाधारी) आहात ना. खरी-खरी गोष्ट बाबा अगोदरच सांगतात - काय-काय करायचे आहे, अशी चित्रे घेऊन जावी लागतील, शिडीचे देखील घेऊन जावे लागेल. ड्रामा अनुसार स्थापना तर होणारच आहे. बाबा सेवेसाठी जे डायरेक्शन देतात, त्यावर लक्ष द्यायचे आहे. बाबा म्हणतात - हे बॅजेस विविध प्रकारचे लाखोनी बनवा. ट्रेनच्या तिकिटा पासून शंभर मैला पर्यंत सेवा करून या. एका डब्यातून दुसऱ्या डब्यामध्ये, मग तिसऱ्या डब्यामध्ये, खूप सोपे आहे. मुलांना सेवेची आवड असली पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) विचार सागर मंथन करून चांगली-चांगली रत्ने काढायची आहेत, कमाई जमा करायची आहे. खरे-खरे खुदाई खिदमतगार बनून सेवा करायची आहे.
२) शिक्षणाची खूप आवड बाळगायची आहे. जेव्हा पण वेळ मिळेल एकांतामध्ये निघून जा. असा अभ्यास असावा जे जिवंतपणी या शरीरा पासून मेलेले असावे, या स्टेजचा अनुभव होत रहावा. देहाचे भान देखील विसरावे.
| वरदान:- |
आपल्या मूळ संस्कारांच्या परिवर्तना द्वारे विश्व परिवर्तन करणारे उदाहरण स्वरूप भव प्रत्येकामध्ये आपला जो मूळ संस्कार आहे, ज्याला नेचर म्हणता, जो वेळो-वेळी पुढे जाण्यामध्ये अडथळे आणतो, त्या मूळ संस्काराचे परिवर्तन करणारे उदाहरण स्वरूप बना तेव्हा संपूर्ण विश्वाचे परिवर्तन होईल. आता असे परिवर्तन करा जेणेकरून कोणीही असे वर्णन करू नये की, यांचा हा संस्कार तर सुरुवातीपासूनच आहे. जेव्हा परसेंटेज मध्ये, अंश मात्र देखील जुना कोणता संस्कार दिसणार नाही, वर्णनामध्ये येणार नाही तेव्हा म्हणणार हे तर संपूर्ण परिवर्तनामध्ये उदाहरण स्वरूप आहेत. |
| बोधवाक्य:- | आता प्रयत्न करण्याची वेळ निघून गेली, त्यामुळे हृदयापासून प्रतिज्ञा करून जीवनाचे परिवर्तन करा. |
अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
जसे सायन्स प्रयोगामध्ये येते तर वाटते की सायन्स चांगले कार्य करत आहे, असा सायलेन्सच्या शक्तीचा प्रयोग करा, यासाठी एकाग्रतेचा अभ्यास वाढवा. एकाग्रतेचा मूळ आधार आहे - मनाची कंट्रोलिंग पॉवर, ज्याद्वारे मनोबल वाढते, यासाठी एकांतवासी बना.