| 18.10.2025 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| गोड मुलांनो - आत्म-अभिमानी होऊन बसा, मनामध्ये घोटत रहा - ‘मी आत्मा आहे…’ देही-अभिमानी बना, खरा चार्ट ठेवा तर हुशार बनत जाल, खूप फायदा होईल” | |
| प्रश्न:- | बेहदच्या नाटकाला समजणारी मुले कोणत्या एका लॉ (नियमाला) चांगल्या रीतीने समजतात? |
| उत्तर:- | हे अविनाशी नाटक आहे, यामध्ये प्रत्येक पार्टधारीला पार्ट बजावण्याकरिता आपल्या वेळेवर यायचेच आहे. कोणी म्हणेल आम्ही कायम शांतीधाम मध्येच बसून राहणार - तर हा लॉ नाही आहे. त्याला तर पार्टधारीच म्हणता येणार नाही. या बेहदच्या गोष्टी बेहदचे बाबाच तुम्हाला सांगतात. |
ओम् शांती. स्वतःला आत्मा समजून बसा. देह-अभिमान सोडून बसा. बेहदचे बाबा मुलांना समजावून सांगत आहेत. समजावून सांगितले त्यांना जाते जे बेसमज (बुद्धू) असतात. आत्मा समजते की बाबा खरे सांगत आहेत - मी आत्मा बुद्धू बनले आहे. मी आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे. मी आत्म-अभिमान सोडून देह-अभिमानामध्ये फसलो आहे. तर बुद्धू झालो ना. बाबा म्हणतात - सर्व मुले देह-अभिमानामध्ये येऊन बुद्धू बनले आहेत. मग तुम्ही बाबांद्वारे देही-अभिमानी बनता तर एकदम समजदार (हुशार) बनता. कोणी तर बनले आहेत, कोणी पुरुषार्थ करत राहतात. अर्धे कल्प लागले आहे बेसमज (बुद्धू) बनण्यामध्ये. या अंतिम जन्मामध्ये पुन्हा हुशार बनायचे आहे. अर्ध्या कल्पापासून बुद्धू बनता-बनता १०० टक्के बुद्धू बनतात. देह-अभिमानामध्ये येऊन ड्रामा प्लॅन अनुसार तुम्ही घसरत आला आहात (अधोगती होत गेली आहे). आता तुम्हाला समज मिळाली आहे तरी देखील खूप पुरुषार्थ करायचा आहे कारण मुलांमध्ये दैवी गुण देखील पाहिजेत. मुले जाणतात आपण सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण… होतो. पुन्हा यावेळी अवगुणी बनलो आहोत. कोणताही गुण राहिलेला नाही आहे. तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार पुरुषार्था नुसार या खेळाला समजतात. समजून घेता-घेता देखील इतकी वर्षे झाली आहेत. तरीही जे नवीन आहेत ते चांगले हुशार बनत जातात. इतरांना देखील असे बनविण्याचा पुरुषार्थ करतात. काहींना तर अजिबात समजलेले नाही आहे. बुद्धू ते बुद्धूच राहिले आहेत. बाबा आलेच आहेत समजदार (हुशार) बनविण्यासाठी. मुले समजतात मायेमुळे आम्ही बेसमज (बुद्धू) बनलो आहोत. आपण पूज्य होतो तर समजदार (हुशार) होतो. मग आम्हीच पुजारी बनून बुद्धू बनलो आहोत. आदि सनातन देवी-देवता धर्म प्राय: लोप झाला आहे. या विषयी दुनियेमध्ये कोणालाच माहीत नाही आहे. हे लक्ष्मी-नारायण किती हुशार होते, राज्य करत होते. बाबा म्हणतात तत् त्वम्. तुम्ही देखील स्वतःसाठी असे समजा. या खूप-खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबांशिवाय दुसरा कोणीही हे सांगू शकणार नाही. आता जाणीव होते - बाबाच सर्वोच्च बुद्धिवान ते बुद्धिवान असतील ना. एक तर ज्ञानाचा सागर देखील आहेत. सर्वांचे सद्गती दाता देखील आहेत. पतित-पावन देखील आहेत. एकाचीच महिमा आहे. इतके उच्च ते उच्च बाबा येऊन बाळांनो-बाळांनो असे म्हणून किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. मुलांनो, आता पावन बनायचे आहे. त्यासाठी बाबा एकच औषध देतात, म्हणतात - योगाद्वारे तुम्ही भविष्य २१ जन्म निरोगी बनाल. तुमचे सर्व रोग, दुःख नष्ट होतील. तुम्ही मुक्तिधाममध्ये निघून जाल. अविनाशी सर्जनकडे एकच औषध आहे. येऊन एकच इंजेक्शन आत्म्याला लावतात. असे नाही कोणी मनुष्य बॅरिस्टरी देखील करतील, इंजीनियरिंग देखील करतील. नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या धंद्यामध्येच राहतो. बाबांना म्हणतात - येऊन पतितापासून पावन बनवा कारण पतित बनण्यामध्ये दुःख आहे. शांतीधामला पावन दुनिया म्हणता येणार नाही. स्वर्गालाच पावन दुनिया म्हणणार. हे देखील समजावून सांगितले आहे लोकांना शांती आणि सुख हवे आहे. खरी-खुरी शांती तर तिथे आहे जिथे शरीर नाही, त्याला म्हटलेच जाते शांतीधाम. बरेच जण म्हणतात शांतीधाममध्येच रहावे, परंतु तसा लॉ नाही आहे. तो काही मग पार्टधारी नाही. मुलांना नाटक देखील समजले आहे. जेव्हा ज्या ॲक्टरचा पार्ट असेल तेव्हा बाहेर स्टेजवर येऊन पार्ट बजावतील. या बेहदच्या गोष्टी बेहदचे बाबाच समजावून सांगतात. ज्ञान सागर देखील त्यांनाच म्हटले जाते. सर्वांचे सद्गती दाता पतित-पावन आहेत. तत्व काही सर्वांना पावन बनविणारी असू शकत नाहीत. पाणी इत्यादी सर्व तत्व आहेत, ती कशी सद्गती करतील. आत्माच पार्ट बजावते. हठयोगाचा पार्ट देखील आत्माच बजावते. या गोष्टी देखील जे हुशार आहेत तेच समजू शकतात. बाबांनी कितीदा सांगितले आहे - कोणती अशी युक्ती काढा जेणेकरून मनुष्य समजतील - कसे पूज्य पासून मग पुजारी बनतात. पूज्य आहेत नवीन दुनियेमध्ये, पुजारी आहेत जुन्या दुनियेमध्ये. पावनला पूज्य, पतिताला पुजारी म्हटले जाते. इथे तर सर्व पतित आहेत कारण विकारातून जन्म घेतात. तिथे आहेत श्रेष्ठ. गातात देखील - संपूर्ण श्रेष्ठाचारी. आता तुम्हा मुलांना असे बनायचे आहे. मेहनत आहे. मुख्य गोष्ट आहे आठवणीची. सर्वजण म्हणतात आठवणीमध्ये राहणे खूप कठीण आहे. आपल्याला जितके वाटते तितके आठवणी मध्ये राहू शकत नाही. कोणी जर सच्चाईने चार्ट लिहिला तर खूप फायदा होऊ शकतो. बाबा मुलांना हे ज्ञान देतात की, मनमनाभव. तुम्ही अर्था सहित म्हणता, तुम्हाला बाबा प्रत्येक गोष्ट यथार्थ रीतीने अर्थासहित समजावून सांगतात. बाबांना मुले अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात. बाबा त्यांना खूष करण्यासाठी काही ना काही सांगतात. परंतु बाबा म्हणतात - माझे कामच आहे पतितांना पावन बनविणे. मला तर बोलावताच याच्याकरिता. तुम्ही जाणता- मी आत्मा शरीरासहित पावन होते, आता तीच आत्मा शरीरासहित पतित बनली आहे. ८४ जन्माचा हिशोब आहे ना.
तुम्ही जाणता - आता ही दुनिया काट्यांचे जंगल बनली आहे. हे लक्ष्मी-नारायण तर फूल आहेत ना. त्यांच्या समोर काटे (विकारी) जाऊन म्हणतात - ‘तुम्ही सर्व गुण संपन्न… आम्ही पापी-कपटी आहोत’. सर्वात मोठा काटा आहे - काम विकाराचा. बाबा म्हणतात - याला जिंकून जगतजीत बना. मनुष्य म्हणतात - भगवंताला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये यावेच लागते, भागीरथावर विराजमान होऊन यावेच लागेल. भगवंताला यायचेच आहे जुन्या दुनियेला नवीन बनविण्याकरिता. नवीन दुनियेला सतोप्रधान, जुन्या दुनियेला तमोप्रधान म्हटले जाते. जेव्हा की आता जुनी दुनिया आहे तर जरूर बाबांना यावेच लागेल. बाबांनाच रचयिता म्हटले जाते. तुम्हा मुलांना किती सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. किती आनंद झाला पाहिजे. बाकी कोणाचा कर्म भोगाचा हिशोब आहे, काहीही असेल तो तर भोगायचाच आहे, यामध्ये बाबा आशीर्वाद करत नाहीत. मला बोलावताच मुळी की, ‘बाबा, येऊन आम्हाला वारसा द्या’. बाबांकडून कोणता वारसा प्राप्त करू इच्छिता? मुक्ती-जीवनमुक्तीचा. मुक्ती-जीवनमुक्तीचे दाता एकच ज्ञानाचे सागर बाबा आहेत म्हणून त्यांना ज्ञान दाता म्हटले जाते. भगवंताने दान दिले होते परंतु कधी दिले, कोणी दिले, हे कोणाला माहित नाही. सगळा गोंधळ यामध्येच आहे. कोणाला ज्ञान दिले, हे देखील कोणालाच ठाऊक नाही. सारा गुंता इथेच आहे. कोणाला ज्ञान दिले, हे देखील कोणाला माहित नाही आहे. आता हे ब्रह्मा बसले आहेत - यांना ठाऊक झाले आहे की, आपण सो नारायण होतो आणि मग ८४ जन्म भोगले. हे आहेत नंबर वन मध्ये. बाबा (ब्रह्मा बाबा) सांगतात - माझे तर डोळेच उघडले आहेत. तुम्ही देखील म्हणाल - आमचे तर डोळेच उघडले आहेत. तिसरा नेत्र तर उघडतो ना. तुम्ही म्हणाल - आम्हाला बाबांचे, सृष्टी चक्राचे पूर्ण ज्ञान मिळाले आहे. मी जो आहे, जसा आहे - माझे डोळे उघडले आहेत. किती वंडर आहे. आपण प्रथम आत्मा आहोत आणि कालांतराने आम्ही स्वतःला देह समजून बसलो आहोत. आत्मा म्हणते मी एक शरीर सोडून दुसरे घेतो. तरी देखील आपण स्वतःला आत्मा असल्याचे विसरून जातो आणि देह-अभिमानी बनतो; यासाठी आता तुम्हाला सर्वप्रथम ही समज देतो (जाणीव करून देतो) की स्वतःला आत्मा समजून बसा. मनामध्ये हे घोटत रहा की, ‘मी आत्मा आहे’. आत्मा न समजल्याने बाबांना विसरून जाता. फील करता बरोबर आपण वारंवार देह-अभिमानामध्ये येतो. मेहनत करायची आहे. इथे बसता तेव्हा देखील आत्म-अभिमानी होऊन बसा. बाबा म्हणतात मी तुम्हा मुलांना राजाई देण्याकरिता आलो आहे. अर्धा कल्प तुम्ही माझी आठवण केली आहे. कोणतीही गोष्ट समोर येते तर म्हणतात - ‘हाय राम’, परंतु ईश्वर किंवा राम कोण आहेत, हे कोणालाच माहीत नाही. तुम्हाला सिद्ध करायचे आहे की ज्ञानाचा सागर, पतित-पावन, सर्वांचे सद्गती दाता, त्रिमूर्ती परमपिता परमात्मा शिव आहेत. ब्रह्मा-विष्णू-शंकर या तिघांचाही जन्म एकत्र आहे. ही केवळ शिवजयंतीच नाही परंतु ‘त्रिमूर्ती शिवजयंती’ आहे. जरूर जेव्हा शिवाची जयंती असेल तर ब्रह्माची देखील जयंती असेल. शिवाची जयंती साजरी करतात परंतु ब्रह्माने काय केले. लौकिक, पारलौकिक आणि हे आहेत अलौकिक पिता. हे आहेत प्रजापिता ब्रह्मा. बाबा म्हणतात नवीन दुनियेसाठी हे नवीन ज्ञान आता तुम्हाला मिळत आहे. नंतर हे प्राय: लोप होते. ज्यांना पिता रचता आणि रचनेचे ज्ञान नाही तर अज्ञानी झाले ना. अज्ञान निद्रेमध्ये झोपलेले आहेत. ज्ञानाद्वारे आहे - दिवस, भक्तिद्वारे आहे - रात्र. शिवरात्रीचा अर्थ देखील जाणत नाहीत म्हणून त्यांचा हॉलीडे देखील बंद करून टाकला आहे.
आता तुम्ही जाणता बाबा येतातच - सर्वांची ज्योत जागृत करण्यासाठी. तुम्ही हे दिवे पेटवून रोषणाई केलीत तर समजतील यांचा कोणता तरी मोठा दिवस आहे. आता तुम्ही दिवे पेटवता परंतु अर्थासहित. ते लोक थोडेच समजतील. तुमच्या भाषणावरून पूर्ण समजू शकत नाही. आता साऱ्या विश्वावर रावणाचे राज्य आहे, इथे तर मनुष्य किती दुःखी आहेत. रिद्धी-सिद्धीवाले देखील खूप हैराण करतात. वर्तमानपत्रांमध्ये देखील छापून येते, यांच्यामध्ये ईविल सोल आहे. खूप दुःख देतात. बाबा म्हणतात - या गोष्टींशी तुमचे काहीही कनेक्शन नाही. बाबा तर सरळ सोपी गोष्ट सांगतात - मुलांनो, तुम्ही माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. तुमची सारी दुःखे दूर होतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) यथार्थ रीतीने बाबांना आठवण करणे किंवा आत्म-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे, सच्चाईने आपला चार्ट ठेवायचा आहे, यामध्येच फार मोठा फायदा आहे.
२) सर्वात जास्त दुःख देणारा काटा आहे - काम विकार, यावर योगबलाने विजय प्राप्त करून पतितापासून पावन बनायचे आहे. बाकी कोणत्याही गोष्टींशी तुमचे कनेक्शन नाही.
| वरदान:- |
प्रॅक्टिकल जीवनाद्वारे परत्मात्म ज्ञानाचे प्रूफ देणारे धर्म युद्धामध्ये विजयी भव आता धर्म युद्धाच्या स्टेजवर यायचे आहे. त्या धर्म युद्धामध्ये विजयी बनण्याचे साधन आहे - तुमचे प्रॅक्टिकल जीवन. कारण परमात्म ज्ञानाचा पुरावाच तुमचे प्रॅक्टिकल जीवन आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामधून ज्ञान आणि गुण प्रॅक्टिकल मध्ये दिसून यावेत; कारण आजकाल चर्चा करून आपले व्यक्तिमत्व सिद्ध करू शकत नाही परंतु आपल्या प्रॅक्टिकल धारणायुक्त व्यक्तिमत्वाद्वारे एका सेकंदामध्ये कोणालाही शांत करू शकता . |
| बोधवाक्य:- | आत्म्याला उज्वल बनविण्याकरिता परमात्म स्मृती द्वारे मनातील शंकांना समाप्त करा. |
मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये:-
“योगा द्वारेच मुक्त होण्याची शक्ती मिळते”
सर्वप्रथम तर एक मुख्य पॉईंट अवश्य आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, जेव्हा या मनुष्य सृष्टी रुपी झाडाचे बीज रूप परमात्मा आहेत तर त्या परमात्म्या द्वारे जे नॉलेज प्राप्त होत आहे ते सर्व मनुष्यांकरिता जरुरी आहे. सर्व धर्मवाल्यांना हे नॉलेज घेण्याचा अधिकार आहे. भले प्रत्येक धर्माचे नॉलेज आपले-आपले आहे, प्रत्येकाचे शास्त्र आपले-आपले आहे, प्रत्येकाचे मत आपले-आपले आहे, प्रत्येकाचे संस्कार आपले-आपले आहेत परंतु हे नॉलेज सर्वांसाठी आहे. भले ते या ज्ञानाला घेऊ जरी शकले नाहीत, आपल्या घराण्यामध्ये देखील येणार नसतील परंतु तरीही ते सर्वांचे पिता असल्या कारणाने, त्यांच्याशी योग लावल्याने पवित्र अवश्य बनतील. या पवित्रतेमुळे त्यांच्याच सेक्शनमध्ये चांगले पद अवश्य प्राप्त करतील कारण योगाला तर सर्व लोक मानतात, खूप लोक असेही म्हणतात की, आम्हाला देखील मुक्ती पाहिजे, परंतु सजे पासून सुटून मुक्त होण्याची शक्ती देखील या योगाद्वारेच मिळू शकते.
“अजपाजप अर्थात निरंतर ईश्वरीय आठवण”
ही जी म्हण आहे की, ‘श्वासो-श्वास अजपाजप जपत रहा’ याचा यथार्थ काय आहे? जेव्हा आपण म्हणतो ‘अजपाजप’ तर याचा यथार्थ अर्थ आहे - जप न करता श्वासो-श्वास आपला बुद्धियोग निरंतर आपल्या परमपिता परमात्म्यासोबत लावणे आणि ही ईश्वरीय आठवण श्वासो-श्वास कायम चालू असते, त्या निरंतर ईश्वरीय आठवणीला अजपाजप म्हणतात. बाकी मुखावाटे कोणता जप जपणे अर्थात राम-राम म्हणणे, मनामध्ये कोणत्या मंत्राचे उच्चारण करणे, हे काही निरंतर चालू शकत नाही. ते लोक समजतात हे मुखावाटे मंत्र उच्चारण करत नाहीत, परंतु मनातल्यामनात उच्चारण करणे हे आहे अजपाजप. परंतु ही तर सहज एक विचार करण्याची गोष्ट आहे - जिथे आपला शब्दच ‘अजपाजप’ आहे, ज्याचा जप करण्याची देखील गरज नाही, खोलीमध्ये एका ठिकाणी बसून कोणत्या मूर्तीचे ध्यान सुद्धा करायचे नाहीये, ना कोणाची आठवण करायची आहे कारण ते देखील निरंतर खाल्या-पिल्या शिवाय राहू शकणार नाहीत; परंतु आपण जी ईश्वरीय आठवण करतो, तीच निरंतर चालू शकते कारण ही खूप सोपी आहे. जसे समजा लहान मुलगा आहे तो जेव्हा आपल्या वडिलांची आठवण करतो, तर तेव्हा त्याला आपल्या वडिलांचा फोटो समोर आणावा लागत नाही; परंतु मनसा-वाचा-कर्मणा आपल्या वडिलांची पूर्ण ऑक्युपेशन, ॲक्टिव्हीटी, गुणांसहित आठवण येते, बस्स; ते आठवल्यामुळे मुलाची देखील ती कृती चालते, तेव्हाच सन शोज फादर करेल. अगदी तसेच आपल्याला देखील बाकी सर्वांची आठवण मनामधून काढून टाकून, त्या एकाच खऱ्या पारलौकिक परमपिता परमात्म्याच्या आठवणीमध्ये रहायचे आहे, यामध्ये उठता-बसता, खाता-पिता निरंतर आठवणीमध्ये राहू शकता. त्या आठवणीनेच कर्मातीत बनता. तर या नॅचरल आठवणीलाच अजपाजप म्हटले जाते. अच्छा. ओम् शांती.
अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
अभ्यासाच्या प्रयोगशाळेमध्ये बसून, योगाचा प्रयोग करा तेव्हा एका बाबांचा सहारा आणि मायेच्या अनेक प्रकारच्या विघ्नांपासून किनारा अनुभव कराल. आता ज्ञानाचा सागर, गुणांचा सागर, शक्तींच्या सागरामध्ये वर-वरच्या लाटांमध्ये पोहता त्यामुळे अल्पकाळाची रिफ्रेशमेंट अनुभव करता. परंतु आता सागराच्या तळाला जा म्हणजे मग अनेक प्रकारचे विचित्र अनुभव करून रत्न प्राप्त कराल.