मराठी मुरली · Brahma Kumaris

आजची मुरली · 28 डिसेंबर, 2025

ओम शांती · BapDada · 28 डिसेंबर, 2025

आजची मुरली — दररोज सकाळी नवी.

18
मुरली28 डिसेंबर, 2025 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

2025-12-28
प्रभात:मुरली
ओम शांती
“अव्यक्त बापदादा”
रिवाइज १८-०३-२००८ मधुबन

“‘कारण’ शब्दाला ‘निवारण’मध्ये परिवर्तन करून मास्टर मुक्तिदाता बना, सर्वांना बाबांच्या संगाचा रंग लावून समान बनण्याची होळी साजरी करा”

आज सर्व खजिन्यांचे मालक बापदादा आपल्या चोहो बाजूंच्या खजिन्यांनी संपन्न मुलांना बघत आहेत. प्रत्येक मुलाच्या खजिन्यामध्ये किती खजिने जमा झाले आहेत, ते बघून हर्षित होत आहेत. खजिने तर सर्वांना एकाच वेळी एकसारखेच मिळाले आहेत तरी सुद्धा जमेचे खाते सर्व मुलांचे वेगवेगळे आहे परंतु वेळेनुसार आता बापदादा सर्व मुलांना सर्व खजिन्यांनी संपन्न बघू इच्छितात, कारण हे खजिने फक्त आता एका जन्मासाठी नाही आहेत, हे अविनाशी खजिने अनेक जन्म सोबत चालणारे आहेत. यावेळच्या खजिन्यांना तर सर्व मुले जाणताच. बापदादांनी कोणकोणते खजिने दिले आहेत ते म्हटल्याबरोबरच सर्वांच्या समोर आले आहेत. सर्वांच्या समोर खजिन्यांची लिस्ट इमर्ज झाली आहे ना! कारण बापदादांनी या अगोदर देखील सांगितले आहे की खजिने तर मिळाले परंतु जमा करण्याची विधी काय आहे? जो जितका निमित्त आणि निर्मान बनतो तितकेच खजिने जमा होतात. तर चेक करा - निमित्त आणि निर्मान बनण्याच्या विधीद्वारे माझ्या खात्यामध्ये किती खजिने जमा झाले आहेत. जितके खजिने जमा असतील, तितका तो भरपूर (संपन्न) असेल. त्यांच्या चलन आणि चेहऱ्यावरून संपन्न आत्म्याचा रुहानी नशा स्वतःच दिसून येतो. त्याच्या चेहऱ्यावर सदैव रुहानी नशा अथवा फखुर (अभिमान) झळकत असतो आणि जितका म्हणून रुहानी अभिमान असेल तितकाच निश्चिंत बादशहा असेल. रुहानी अभिमान अर्थात रुहानी नशा ही निश्चिंत बादशहाची निशाणी आहे. तर स्वतःला चेक करा की माझ्या चलनमध्ये (वर्तनामध्ये) आणि चेहऱ्यावर निश्चिंत बादशहाचा निश्चय आणि नशा आहे? आरसा तर सर्वांना मिळालेला आहे ना! तर मनाच्या आरशामध्ये आपला चेहरा चेक करा. कोणत्याही प्रकारची फिकीर तर नाही आहे ना? काय होणार! कसे होणार! असे तर नाही होणार! कोणताही संकल्प राहीला तर नाही आहे? निश्चिंत बादशहाचा संकल्प हाच असेल - जे होत आहे ते खूप छान आणि जे होणार आहे ते आणखीच चांगल्यात ते चांगले होणार. याला म्हटले जाते अभिमान, रुहानी अभिमान अर्थात स्वमानधारी आत्मा. विनाशी धनवाले जितके कमावतात तितके काळानुसार चिंतेमध्ये असतात. तुम्हाला आपल्या ईश्वरीय खजिन्यांच्या बाबतीत चिंता आहे? निश्चिंत आहात ना! कारण, जे खजिन्यांचे मालक आणि परमात्म बालक आहेत ते नेहमीच स्वप्नामध्ये देखील निश्चिंत बादशहा आहेत, कारण त्यांना निश्चय आहे की हे ईश्वरीय खजिने या जन्मामध्येच तर काय परंतु अनेक जन्म सोबत आहेत, सोबत असणार म्हणून ते निश्चयबुद्धी निश्चिंत आहेत.

तर आज बापदादा चोहो बाजूंच्या मुलांचे जमेचे खाते बघत होते. अगोदर देखील सांगितले आहे की विशेष तीन प्रकारची खाती जमा केली आहेत आणि करू शकता. एक आहे - आपल्या पुरुषार्था प्रमाणे खजिने जमा करणे. हे एक खाते आहे. दुसरे खाते आहे - आशीर्वादांचे खाते. आशीर्वादांचे खाते जमा होण्याचे साधन आहे - सदैव संबंध-संपर्क आणि सेवेमध्ये असताना संकल्प, बोल आणि कर्मामध्ये, तिन्हीमध्ये स्वतः देखील स्वतःवर संतुष्ट आणि दुसरे देखील सर्व आणि सदैव संतुष्ट असावेत. संतुष्टता आशीर्वादांचे खाते वाढवते. आणि तिसरे खाते आहे - पुण्याचे खाते. पुण्याच्या खात्याचे साधन आहे - जी कोणती सेवा करता, मग ती मनाने, किंवा वाणीने, किंवा कर्माने, नाहीतर संबंधामध्ये, संपर्कामध्ये येत असताना सदैव निःस्वार्थ आणि बेहदची वृत्ति, स्वभाव, भाव आणि भावनेने सेवा करणे, यामुळे पुण्याचे खाते आपोआप जमा होते. तर चेक करा - चेक करता येते ना! येते का? ज्यांना येत नाही त्यांनी हात वर करा. ज्यांना येत नाही, कोणीच नाही, याचा अर्थ सर्वांना येते. तर चेक केले आहे का की, स्व-पुरुषार्थाचे खाते, आशीर्वादांचे खाते, पुण्याचे खाते तिन्ही किती परसेंटमध्ये जमा झाले आहे? चेक केले आहे का? जे करतात त्यांनी हात वर करा. चेक करता का? पहिली लाईन नाही करत? चेक नाही करत? काय म्हणता? करता ना! कारण बापदादांनी सांगून टाकले आहे, इशारा दिला आहे की आता समयाची समीपता तीव्र गतीने पुढे जात आहे त्यामुळे वारंवार आपले चेकिंग करायचे आहे कारण बापदादा प्रत्येक मुलाला राजयोगी सो राजा बच्चा पाहू इच्छितात. हाच परमात्म पित्याला रुहानी नशा आहे की प्रत्येक मुलगा राजा बच्चा आहे. स्वराज्य अधिकारी सो विश्व-राज्य अधिकारी परमात्म बच्चा आहे.

खजिने तर बापदादांकडून मिळतच राहतात. या खजिन्यांना जमा करण्याची खूप सोपी विधी आहे - विधी म्हणा अथवा चावी म्हणा, ती जाणता ना! जमा करण्याची चावी कोणती आहे? जाणता का? तीन बिंदू. आहे ना सर्वांकडे ही चावी? तीन बिंदू लावा आणि खजिने जमा होत जातील. मातांना चावी लावायला येते ना, माता चावी सांभाळण्यामध्ये हुशार असतात ना! तर सर्व मातांनी ही तीन बिंदूंची चावी सांभाळून ठेवली आहे? लावली आहे? बोला, मातांनो चावी आहे? ज्यांच्या जवळ आहे त्यांनी हात वर करा. चावी चोरीला तर जात नाही ना? तसे तर घराच्या प्रत्येक गोष्टीची चावी मातांना सांभाळायला खूप छान येते. तर ही चावी देखील नेहमी सोबत असते ना!

तर वर्तमान समयी बापदादा हेच इच्छितात की, आता वेळ नजदीक असल्याकारणाने बापदादा एक शब्द सर्व मुलांच्या मनातून, संकल्पामधून, बोलामधून आणि प्रॅक्टिकल कर्मातून चेंज झालेला पाहू इच्छित आहेत. हिंमत आहे? हाच एक शब्द बापदादा प्रत्येक मुलाचा परिवर्तन करू इच्छितात, जो एकच शब्द वारंवार तीव्र पुरुषार्थापासून निष्काळजी पुरुषार्थी बनवतो आणि आता समयानुसार कोणता पुरुषार्थ पाहिजे? आणि तीव्र पुरुषार्थ सर्वांना हवा देखील आहे की तीव्र पुरुषार्थींच्या लाईनमध्ये यावे परंतु एक शब्द निष्काळजी बनवतो. ठाऊक आहे तो एक शब्द कोणता आहे? परिवर्तन करण्यासाठी तयार आहात? तयार आहात? हात वर करा, तयार आहात? बघा, तुमचा फोटो टी. व्ही. मध्ये येत आहे. तयार आहात, अच्छा मुबारक असो. अच्छा - तीव्र पुरुषार्थाने परिवर्तन करायचे आहे की करू, बघू…. असे तर नाही ना? एक शब्द ओळखला तर असालच, कारण सर्व जण हुशार आहेत, तो एक शब्द हाच आहे की ‘कारण’ शब्दाला परिवर्तन करून ‘निवारण’ शब्दाला समोर आणा. कारण समोर आल्यामुळे अथवा कारणाचा विचार केल्यामुळे निवारण होत नाही. तर बापदादा फक्त बोलण्यापुरते नाही परंतु संकल्पापर्यंत या ‘कारण’ शब्दाला ‘निवारण’ मध्ये परिवर्तन करू इच्छित आहेत; कारण ही ‘कारणे’ भिन्न-भिन्न प्रकारची असतात आणि ‘कारण’ हा शब्द विचारामध्ये, बोलण्यामध्ये, कर्मामध्ये आल्यामुळे तीव्र पुरुषार्थासमोर एक बंधन बनतो; कारण तुम्हा सर्वांचा बापदादांसोबत वायदा आहे, प्रेमाने केलेला वायदा आहे की, आम्ही सर्वजण बाबांच्या, विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये साथीदार आहोत. बाबांचे साथीदार आहात, बाबा एकटे करत नाहीत, मुलांना सोबत घेतात. तर विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये तुमचे कोणते कार्य आहे? सर्व आत्म्यांच्या कारणांना देखील निवारण करणे; कारण आजकाल मेजॉरिटी दुःखी आणि अशांत असल्यामुळे आता मुक्तीची अपेक्षा करत आहेत. दुःख अशांतीपासून, सर्व बंधनांमधून मुक्ती हवी आहे आणि मुक्तिदाता कोण आहेत? बाबांसोबत तुम्ही मुले देखील मुक्तिदाता आहात. तुमच्या जड चित्रांकडे आजपर्यंत काय मागतात? आता दुःख, अशांती वाढत असलेली पाहून सर्व मेजॉरिटी आत्मे तुम्हा मुक्तिदाता आत्म्यांची आठवण करत आहेत. मनामध्ये दुःखी होऊन ओरडत आहेत - हे मुक्तिदाता मुक्ति द्या. काय तुम्हाला आत्म्यांच्या दुःख, अशांतीची हाक ऐकू येत नाही? परंतु मुक्तिदाता बनून अगोदर या ‘कारण’ शब्दाला मुक्त करा. तर आपोआपच मुक्तीचा आवाज तुमच्या कानांमध्ये घुमेल. अगोदर स्वतःच्या आतून या शब्दापासून मुक्त व्हाल तेव्हा दुसऱ्यांना देखील मुक्त करू शकाल. आता तर दिवसेंदिवस तुमच्या समोर ‘मुक्तिदाता मुक्ती द्या’ म्हणणाऱ्यांची लाईन लागणार आहे. परंतु अजून पर्यंत आपल्या पुरुषार्थामध्ये विविध प्रकारच्या ‘कारण’ शब्दाच्या कारणामुळे मुक्तीचा दरवाजा बंद आहे; त्यामुळे आज बापदादा या शब्दाचे, याच्या सोबत इतरही कमजोर शब्द येतात. विशेष आहे - ‘कारण’, मग त्यामध्ये अजून इतरही कमजोरी असतात, ‘असे-तसे’, ‘कसे’, हे शब्द देखील त्याचे सोबती आहेत, जे दरवाजा बंद असण्याचे कारण आहेत.

तर आज सर्व जण होळी साजरी करण्यासाठी आला आहात ना. सर्व जण धावत-पळत आले आहेत. प्रेमाच्या विमानामध्ये चढून आले आहेत. बाबांवर प्रेम आहे, त्यामुळे बाबांसोबत होळी साजरी करण्यासाठी पोहोचले आहेत. मुबारक असो, स्वागत आहे. बापदादा मुबारक देत आहेत. बापदादा बघत आहेत, व्हील-चेअरच्या आधारे चालणारे देखील, तब्येत थोडी वर-खाली होत असताना देखील हिंमतीने पोहोचले आहेत. बापदादा हे दृश्य बघतात, इथे क्लासमध्ये येतात ना. प्रोग्राममध्ये येतात तर चेअरच्या आधारे देखील चालत गाईडला धरून येतात. तर याला काय म्हटले जाईल? परमात्म प्रेम. बापदादा देखील अशा हिंमतवान, प्रेमळ हृदयाच्या मुलांना खूप-खूप मनापासून आशीर्वाद, विशेष हृदयापासूनचे प्रेम देत आहेत. हिंमत ठेऊन आले आहेत, बाबांची आणि परिवाराची मदत आहेच. सर्वांना ठीक स्थान मिळाले आहे ना? मिळाले आहे का? ज्यांना स्थान ठीक मिळाले आहे त्यांनी हात वर करा. फॉरेनर्सना ठीक मिळाले आहे? जत्रा आहे जत्रा. तिथे जत्रेमध्ये तर माती देखील उडत असते, तर खाणे देखील चालत असते. तुम्हाला ब्रह्मा भोजन चांगले मिळाले, मिळते का? अच्छा हात हलवत आहेत. झोपण्यासाठी तीन पावले पृथ्वी मिळाली? असे मिलन पुन्हा ५ हजार वर्षांनंतर संगमावरच होईल. पुन्हा होणार नाही.

तर आज बापदादांना संकल्प आहे की सर्व मुलांच्या जमेच्या खात्याला पहावे. बघितले सुद्धा आहे, पुढे देखील पाहतील कारण की बापदादांनी अगोदरच मुलांना ही सूचना दिलेली आहे की, जमेचे खाते जमा करण्याची वेळ आत्ता संगमयुग आहे. या संगमयुगावर आता जितके जमा करू इच्छिता, साऱ्या कल्पाचे खाते आत्ता जमा करू शकता. नंतर मग जमेच्या खात्याची बँकच बंद होईल. मग काय करणार? म्हणून बापदादांना मुलांवर प्रेम आहे ना. तर बापदादा जाणतात की मुले निष्काळजीपणामध्ये कधी विसरून जातात, होईल, बघू, करत तर आहोत, चालत तर आहोत ना. अगदी मजेत सांगतात - तुम्ही बघत नाही आहात, आम्ही करत आहोत, होय, चालत तर आहोत, आणखी काय करू शकतो? परंतु चालणे आणि उडणे किती फरक आहे? चालत आहात त्याची मुबारक आहे. परंतु आता चालण्याची वेळ संपत आली आहे. आता उडण्याची वेळ आहे, तेव्हाच ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. साधारण प्रजेमध्ये येणे, भगवंताचा बच्चा आणि साधारण प्रजा! हे शोभते काय?

आज होळी साजरी करण्यासाठी आला आहात ना तर होळीचा अर्थ आहे - ‘झाले ते झाले’, तर आजपासून बापदादा हेच इच्छितात की झाले ते झाले, कोणत्याही कारणाने जर कोणतीही कमजोरी राहिली असेल तर आता तो क्षण होऊन गेला तो गेला असे समजून आपले चित्र स्मृतिमध्ये आणा, आपलाच चित्रकार बनून आपले चित्र काढा. ठाऊक आहे - बापदादा आत्ता देखील प्रत्येक मुलाचे कोणते चित्र समोर बघत आहेत? माहित आहे कोणते चित्र बघत आहेत? आता तुम्ही सर्वांनी आपला फोटो काढा. येतो ना फोटो काढता, येतो ना! श्रेष्ठ संकल्पाच्या लेखणीद्वारे आपले चित्र आता लगेच समोर आणा. अगोदर सर्वांनी ड्रिल करा, माईंड ड्रिल. कर्मेंद्रियांचे ड्रिल नाही, मनाचे ड्रिल करा. रेडी, ड्रिल करण्यासाठी रेडी आहात! मान हलवा. बघा सर्वात श्रेष्ठ ते श्रेष्ठ चित्र असते - ताज, तख्त, तिलकधारीचे. तर आपले चित्र समोर आणा इतर सर्व संकल्प बाजूला करून बघा, तुम्ही सर्व बापदादांचे दिलतख्तनशीन आहात. तख्त आहे ना! असे तख्त तर कुठेही मिळणार नाही. तर अगोदर हे चित्र काढा की, मी विशेष आत्मा, स्वमानधारी आत्मा, बापदादांची पहिली रचना श्रेष्ठ आत्मा, बापदादांच्या दिलतख्तनशीन आहे. तख्तनशीन झालात! त्याचसोबत मी परमात्म रचना या वृक्षाच्या मुळाशी बसलेली पूर्वज आणि पूज्य आत्मा आहे, या स्मृतीची तिलकधारी आहे. स्मृतीचा तिलक लावला! त्याचसोबत मी निश्चिंत बादशहा, सर्व चिंतांचे ओझे बापदादांवर सोपवून डबल लाईटची ताजधारी आहे. तर ताज, तिलक आणि तख्तधारी, अशी बाबांची अर्थात परमात्म्याची प्रिय आत्मा आहे.

तर असे आपले चित्र काढलेत. हा डबल लाईटचा ताज सदैव चालता-फिरता धारण करू शकता. कधीही आपला स्वमान आठवाल तेव्हा हे ताज, तिलक, तख्तनशीन आत्मा आहे, हे आपले चित्र दृढ संकल्पाद्वारे समोर आणा. आठवते आहे - अगदी सुरुवातीला तुम्हा लोकांचा अभ्यास निरंतर एका शब्दाच्या स्मृतीमध्ये असायचा, तो एक शब्द होता - ‘मी कोण?’ हा ‘मी कोण’? हा शब्द वारंवार स्मृतिमध्ये आणा आणि आपल्या भिन्न-भिन्न स्वमान, टाइटल, भगवंताकडून मिळालेली टाइटल. आजकाल लोकांना, मनुष्याला मनुष्याकडून टाइटल मिळते तरी सुद्धा किती महत्वाचे समजतात आणि तुम्हा मुलांना बाबांद्वारे किती टाइटल अथवा स्वमान मिळाले आहेत? सदैव स्वमानाची लिस्ट आपल्या बुद्धिमध्ये मनन करत रहा. ‘मी कोण’? लिस्ट समोर आणा. याच नशेमध्ये रहाल तर ‘कारण’ जे आहे ना, तो शब्द मर्ज होईल आणि ‘निवारण’, प्रत्येक कर्मामध्ये दिसून येईल. जेव्हा निवारणाचे स्वरूप बनाल तर सर्व आत्म्यांना निर्वाणधाम, मुक्तिधाममध्ये सहज जाण्याचा रस्ता सांगून मुक्त कराल.

तर दृढ संकल्प करा - दृढ संकल्प करता येतो का? जेव्हा दृढता असते तर दृढता सफलतेची चावी आहे. दृढ संकल्पामध्ये जरा सुद्धा कमजोरी आणू नका कारण मायेचे काम आहे पराभूत करणे आणि तुमचे काम काय आहे? तुमचे काम आहे - बाबांच्या गळ्यातील हार बनणे, मायेकडून हार खाणे नाही. तर सर्वांनी हा संकल्प करा - मी सदैव बाबांच्या गळ्यातील विजयी माळा आहे. गळ्यातील हार आहे. गळ्यातील हार, विजयी हार आहे.

तर बापदादा हात वर करायला सांगतात तर तुम्ही काय बनणार? सर्व जण काय उत्तर देतात? एकच उत्तर देतात लक्ष्मी-नारायण बनणार. राम-सीता नाही. तर लक्ष्मी-नारायण बनणारे आम्ही बापदादांच्या विजयी माळेचे मणी आहोत, पूज्य आत्मे आहोत. भक्त तुमच्या माळेचा मणी जपता-जपता आपल्या समस्यांना समाप्त करतात. असे श्रेष्ठ मणी आहात. तर आज बापदादांना काय देणार? होळीची काहीतरी गिफ्ट द्याल ना! हा ‘कारण’ शब्द, हा ‘तर-तर’, आणि ‘कारण’, ‘तर-तर’ कराल तर पोपट बनाल ना. ‘तर-तर’ सुद्धा नाही, ‘असे-तसे’ सुद्धा नाही, कोणत्याही प्रकारचे कारण नाही, निवारण. अच्छा.

बापदादा प्रत्येक मुलाला समान बनण्याची, श्रेष्ठ संकल्प करण्याची पद्म-पद्मपटीने मुबारक देत आहेत. मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो. नशा आहे ना - आमच्या इतका पद्मा-पदम भाग्यवान कोण? याच नशेमध्ये रहा. अच्छा.

आता एका सेकंदामध्ये सर्व ब्राह्मण आपल्या राजयोगाचा अभ्यास करत मनाला एकाग्र करण्याचा, मालक बनून मनाला जिथे हवे, जितका वेळ हवे, जसे हवे तसे आता-लगेच मनाला एकाग्र करा. मन कुठेही इकडे-तिकडे चंचल होऊ नये. ‘मेरा बाबा, मीठा बाबा, प्यारा बाबा’, या प्रेमाच्या संगाच्या रंगाची, अध्यात्मिक होळी साजरी करा. (ड्रिल) अच्छा.

चोहो बाजूच्या श्रेष्ठ विशेष होली आणि हाइएस्ट मुलांना, सदैव स्वतःला बाप समान सर्व शक्तींनी संपन्न मास्टर सर्वशक्तीवान अनुभव करणाऱ्या, सदैव प्रत्येक कमजोरीपासून मुक्त बनून अन्य आत्म्यांना देखील मुक्ती देणाऱ्या मुक्तिदाता मुलांना, सदैव स्वमानाच्या सीटवर सेट राहणाऱ्या, सदैव अमर भवच्या वरदानाचे अनुभव स्वरूप बनून राहणाऱ्या, अशा चोहो बाजूच्या, भले समोर बसणारे, किंवा दूर बसल्या प्रेमामध्ये एकरूप झालेल्या मुलांना प्रेमपूर्वक आठवण अथवा आपल्या उमंग-उत्साह, पुरुषार्थाचे समाचार देणाऱ्यांना बापदादांची खूप-खूप हृदयापासून प्रेमपूर्वक आठवण आणि हृदयापासून पद्म-पद्मपटीने प्रेमपूर्वक आठवण स्वीकार असो आणि सर्व राजयोगी सो राज्य अधिकारी मुलांना नमस्ते.

वरदान:- ऑलमाइटी सत्तेच्या आधारे आत्म्यांना मालामाल करणारे पुण्य आत्मा भव
जसे दान-पुण्याची सत्ता असणाऱ्या सत्कर्मी राजांमध्ये सत्तेची फुल शक्ती होती, ज्या शक्तीच्या आधारे कोणालाही जे हवे ते बनवत होते. तसे तुम्हा महादानी पुण्य आत्म्यांना डायरेक्ट बाबांद्वारे प्रकृतिजीत, मायाजीतची विशेष सत्ता मिळालेली आहे. तुम्ही आपल्या शुद्ध संकल्पाच्या आधारे कोणत्याही आत्म्याचे बाबांशी नाते जोडून श्रीमंत बनवू शकता. फक्त या सत्तेला यथार्थ रीतीने युज करा.
सुविचार:- जेव्हा तुम्ही संपूर्णतेच्या शुभेच्छा साजऱ्या कराल तेव्हा वेळ, प्रकृति आणि माया निरोप घेतील.

||| ओम शांती |||

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. जेव्हा मन-बुद्धी कर्मामध्ये खूप बिझी असेल, त्यावेळी डायरेक्शन द्या - फुलस्टॉप. कर्माचे देखील संकल्प स्टॉप व्हावेत. ही प्रॅक्टिस एका सेकंदासाठीही करा परंतु अभ्यास करत जा, कारण अंतिम सर्टिफिकेट एका सेकंदाचा फुलस्टॉप लावण्या बद्दलच मिळणार आहे. सेकंदामध्ये विस्ताराला सामावून घ्या, सार स्वरूप बना, हाच अभ्यास कर्मातीत बनवेल.

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.