मराठी मुरली · Brahma Kumaris

आजची मुरली · 30 एप्रिल, 2026

ओम शांती · BapDada · 30 एप्रिल, 2026

आजची मुरली — दररोज सकाळी नवी.

18
डाउनलोड PDF
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

30.04.2026
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो - तुमची ही अद्भुत युनिव्हर्सिटी आहे, जिच्यामध्ये तुम्हाला बिघडलेल्या भाग्याला ठीक करणारे भोलेनाथ बाबा टीचर बनून तुम्हाला शिकवत आहेत”
प्रश्न:- या महाविनाशाच्या वेळी तुम्ही मुले सर्वांना कोणते लक्ष्य देत आहात?
उत्तर:- हे आत्म्यांनो, आता पावन बना, पावन बनल्याशिवाय परत जाऊ शकत नाही. अर्ध्याकल्पाचा जो रोग लागलेला आहे, त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सर्वांना ७ दिवस भट्टीमध्ये बसवता. पतितांच्या संगतीपासून दूर राहावे, इतर कोणाचीही आठवण येऊ नये तेव्हा कुठे बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होईल.
गीत:- तूने रात गँवाई…

ओम् शांती. हे मुलांना कोणी सांगितले? कारण शाळेत बसले आहात तर जरूर टीचरने सांगितले. प्रश्न हा आहे की हे टीचरने सांगितले, पित्याने सांगितले की सद्गुरुने सांगितले? ही महावाक्ये कोणी सांगितली? मुलांच्या बुद्धीमध्ये सर्वप्रथम हे आले पाहिजे की आमचे बेहदचे बाबा आहेत, ज्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते. तर बाबांनी सुद्धा म्हटले, शिक्षकाने सुद्धा म्हटले त्याच बरोबर सद्गुरुने सुद्धा म्हटले. हे तुमच्या बुद्धीत आहे, जे विद्यार्थी आहेत. इतर कॉलेज अथवा युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक शिकवतात, त्यांना काही पिता अथवा गुरू म्हणणार नाही. ही पाठशाळा देखील आहे आणि मग युनिव्हर्सिटी म्हणा अथवा कॉलेज म्हणा. आहे तर शिक्षण ना! सर्वप्रथम हे समजून घ्यायचे आहे, पाठशाळेमध्ये आपल्याला कोण शिकवत आहेत? मुले जाणतात - ते निराकार, जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत, सर्वांचे सद्गती दाता आहेत ते आम्हाला शिकवत आहेत. ही सर्व रचना त्या एका रचयित्याची प्रॉपर्टी आहे. ते स्वतःच बसून रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. तुम्ही मुलांनी बाबांकडे जन्म घेतला आहे. तुम्ही बुद्धीने जाणता आम्हां सर्व आत्म्यांचे ते पिता आहेत, ज्यांना ज्ञानाचा सागर, नॉलेजफुल म्हटले जाते. ज्ञानाचा सागर आहेत, पतित-पावन आहेत. ज्ञानामुळेच सद्गती होते, मनुष्य पतितापासून पावन बनतात. आता तुम्ही मुले इथे बसला आहात. इतर कुठल्याही शाळेमध्ये कोणाच्याच बुद्धीमध्ये हे असत नाही की, आपल्याला ज्ञानाचे सागर निराकार पिता शिकवत आहेत. हे इथेच तुम्ही जाणता. तुम्हालाच समजावून सांगितले जाते. खास भारत आणि आम साऱ्या दुनियेमध्ये असे कोणीही समजणार नाहीत की आपल्याला निराकार परमात्मा शिकवत आहेत. त्यांना शिकविणारे आहेतच मुळी मानवी टीचर. आणि मग असेही ज्ञान नाहीये ज्यामुळे समजतील की, आपण आत्मा आहोत. आत्माच शिकते. आत्माच सर्व काही करते. अमकी नोकरी आत्मा या कर्मेंद्रियांद्वारे करते. त्यांना तर असे वाटते की आपण अमके आहोत. लगेच आपले नाव-रूप आठवते - ‘मी हे करतो, मी असे करतो’. शरीराचे नावच आठवते, परंतु ते चुकीचे आहे. आपण तर आधी आत्मा आहोत ना. हे शरीर नंतर घेतले आहे. शरीराचे नाव बदलत रहाते, आत्म्याचे नाव काही बदलत नाही. आत्मा तर एकच आहे. बाबांनी सांगितले आहे - ‘मज आत्म्याला ‘शिव’ हे एकच नाव आहे’. हे सारी दुनिया जाणते. बाकी इतकी सर्व नावे शरीराला ठेवली जातात. शिवबाबांना तर शिवच म्हणतात, बस्स. त्यांचे काही शरीर दिसत नाही. मनुष्यांच्या शरीराला नाव दिले जाते, मी अमुक आहे. आम्हाला अमके शिक्षक शिकवत आहेत. नाव घेतील ना. वास्तविक आत्मा शरीराद्वारे टीचरचे काम करते, त्यांच्या आत्म्याला शिकवते. संस्कार आत्म्यामध्ये असतात. कर्मेंद्रियांद्वारे शिकवते, संस्कारानुसार पार्ट बजावते. परंतु शरीराला जी नावे दिली आहेत, त्याच्या आधारे सर्व व्यापार इत्यादी चालतात. इथे तुम्ही मुले जाणता - आम्हाला निराकार बाबा शिकवत आहेत. तुमची बुद्धी कुठे गेली! आम्ही आत्मे त्या बाबांचे बनलो आहोत. आत्मा समजते की, निराकार बाबा येऊन आम्हाला या साकार द्वारा (ब्रह्मा बाबांद्वारे) शिकवत आहेत. त्यांचे नाव आहे - शिव. शिवजयंती देखील साजरी करतात. शिव तर आहेत बेहदचे पिता, त्यांनाच परमपिता परमात्मा म्हटले जाते. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत, आता त्यांची जयंती कशी साजरी करतात. आत्मा शरीरामध्ये प्रवेश करते अथवा गर्भात येते ती वरून येते, हे कोणालाच कळत नाही. क्राईस्टला धर्मस्थापक म्हणतात. त्याची आत्मा सर्वप्रथम वरून आली पाहिजे. सतोप्रधान आत्मा येते. काहीही विकर्म केलेले नाहीये. पहिले सतोप्रधान, मग सतो, रजो तमोमध्ये येतात तेव्हा विकर्म होतात. जी आत्मा पहिल्यांदा जेव्हा वरून येते, ती सतोप्रधान असल्यामुळे कोणतेही दुःख भोगू शकत नाही. जेव्हा अर्धा काळ संपतो तेव्हा विकर्म करू लागते.

आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी खरोखर सूर्यवंशी राज्य होते बाकीचे सर्व धर्म तर नंतर आले. भारतवासी विश्वाचे मालक होते. भारताला अविनाशी खंड म्हटले जाते, इतर कोणताही खंड नव्हता. तर शिवबाबा आहेत बिघडलेल्या भाग्याला ठीक करणारे. भोलानाथ, शिवाला म्हटले जाते, शंकराला नाही. भोलानाथ शिव बिघडलेल्या भाग्याला ठीक करणारे आहेत. शिव आणि शंकर एक नाहीत, वेग-वेगळे आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांची काहीच महिमा नाहीये. महिमा फक्त एका शिवची आहे जे बिघडलेल्या भाग्याला ठीक करतात. ते म्हणतात - मी सामान्य वृध्द तनामध्ये येतो. याने (ब्रह्माने) ८४ जन्म पूर्ण केले आहेत, आता खेळ संपला आहे. हे जुने वस्त्र (शरीर), जुनी नाती देखील नष्ट होणार आहेत. आता कोणाची आठवण करायची? नष्ट होणाऱ्या गोष्टीची आठवण केली जात नाही. नवीन घर बनल्यावर जुन्या घरामधून मन उडते. ही तर आहे बेहदची गोष्ट. सर्वांची सद्गती होते अर्थात रावणाच्या राज्यातून सर्वांची सुटका होते. रावणाने सर्वांना बिघडवले आहे. भारत पूर्णपणे गरीब आणि भ्रष्टाचारी आहे. लोक भेसळ करणे, चोरी करणे, फसवणूक करणे याला भ्रष्टाचार समजतात. परंतु बाबा म्हणतात - पहिला भ्रष्टाचार आहे - मूत पलीती बनणे (अपवित्र बनणे). शरीर विकारातून जन्म घेते म्हणून याला विकारी दुनिया म्हटले जाते. सतयुगाला निर्विकारी म्हटले जाते. आपण सतयुगामध्ये प्रवृत्ती मार्गवाले देवी-देवता होतो. म्हणतात की, पवित्र बनल्यावर विकाराशिवाय मुले कशी जन्माला येतील? तर तुम्ही बोला, ‘आम्ही आमचे राज्य बाहुबळाने नाही तर योगबलाने स्थापन करतो. तर मग योगबलाने मुले जन्माला येऊ शकत नाहीत काय! जेव्हा ती आहेच मुळी निर्विकारी दुनिया, पवित्र गृहस्थ आश्रम. यथा राजा-राणी संपूर्ण निर्विकारी तथा प्रजा! इथे आहेत संपूर्ण विकारी. सतयुगामध्ये विकार असत नाहीत. त्याला म्हटले जाते ईश्वरीय राज्य, ईश्वराने स्थापन केलेले. आता तर आहे रावण राज्य. शिवबाबांची पूजा होते, ज्यांनी स्वर्ग स्थापन केला. रावण, ज्याने नरक बनवला, त्याला जाळत आले आहेत. द्वापरयुग कधी पासून सुरू झाले, हे देखील कोणाला ठाऊक नाहीये. ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे. ही आहेच तमोप्रधान आसुरी दुनिया. ती आहे ईश्वरीय दुनिया. त्याला स्वर्ग, दैवी पावन दुनिया म्हटले जाते. हा आहे नरक, पतित दुनिया. या गोष्टी त्यांनाच समजतील, जे रोज नियमितपणे शिकतील. खूप जण म्हणतात अमक्या ठिकाणी गीता पाठशाळा थोडीच आहे. अरे, हेड ऑफिस तर आहे ना. तुम्ही येऊन मार्गदर्शन घेऊन जा. मोठी गोष्ट तर नाहीये. सृष्टिचक्राला सेकंदामध्ये स्पष्ट करून सांगितले जाते. सतयुग-त्रेता होऊन गेले, मग द्वापर, कलियुग हे सुध्दा होऊन गेले. आत्ता आहे संगमयुग. नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी शिकायचे आहे. शिकणे प्रत्येकाचा हक्क आहे. बाबा आम्ही नोकरी करतो. ठीक आहे, एक आठवडा ज्ञान शिकून घेऊन मग जा, मुरली मिळत राहील. पहिले ७ दिवस भट्टीमध्ये जरूर रहायचे आहे. भले ७ दिवस येतील परंतु सर्वांची बुद्धी एकसारखी असणार नाही. ७ दिवस भट्टी अर्थात कोणाचीही आठवण येता कामा नये. कोणाशी पत्रव्यवहार इत्यादी सुद्धा होता कामा नये. सर्वच काही एकसारखे समजू शकत नाहीत. इथे पतितांना पावन बनायचे आहे. हा पतितपणा सुद्धा रोग आहे, अर्ध्या कल्पापासून मनुष्य महारोगी बनले आहेत. त्यांना वेगळे बसवावे लागेल. कोणाचीही संगत नसावी. बाहेर जातील, उलटे-सुलटे खातील, पतितांच्या हातचे खातील. सतयुगामध्ये देवता पावन आहेत ना. त्यांच्यासाठी बघा खास मंदिरे बनतात. देवतांना मग पतित स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत. या वेळी तर मनुष्य एकदम पतित भ्रष्टाचारी आहेत. शरीर विषातून (विकारातून) जन्म घेते म्हणून या शरीराला भ्रष्टाचारी म्हटले जाते. संन्याशांचे देखील शरीर विकारातून बनलेले आहे. बाबा म्हणतात - सर्वप्रथम आत्म्याला पवित्र बनायचे आहे, मग शरीर देखील पवित्र पाहिजे म्हणून जुनी अपवित्र शरीरे सर्व विनाश होणार आहेत. सर्वांना परत जायचे आहे. ही आहे महाविनाशाची वेळ. सर्वांना पवित्र बनून परत जायचे आहे. भारतामध्येच होळी साजरी करतात. इथे ५ तत्त्वांची शरीरे तमोप्रधान आहेत. सतयुगामध्ये शरीरे सुद्धा सतोप्रधान असतात. श्रीकृष्णाचे चित्र आहे ना. नरकाला लाथ मारायची असते कारण सतयुगामध्ये जायचे आहे. प्रेताला देखील जेव्हा स्मशानामध्ये घेऊन जातात तेव्हा अगोदर तोंड शहराच्या दिशेने आणि पाय स्मशानाकडे करतात. आणि जेव्हा स्मशानाच्या आत शिरतात तेव्हा तोंड स्मशानाच्या दिशेने करतात. आता तुम्ही स्वर्गात जात आहात त्यामुळे तुमचे तोंड त्या बाजूला आहे. शांतीधाम आणि सुखधाम, पाय दुःखधामच्या दिशेने आहेत. ती तर प्रेताबद्दलची गोष्ट आहे, इथे तर पुरुषार्थ करायचा असतो. स्वीट होमची आठवण करता-करता तुम्ही आत्मे स्वीट होममध्ये निघून जाल. हा आहे बुद्धीचा अभ्यास. हे बाबा बसून सर्व रहस्ये समजावून सांगतात. तुम्ही जाणता आता आम्हा आत्म्यांना घरी जायचे आहे. हे जुने वस्त्र, जुनी दुनिया आहे, नाटक पूर्ण झाले अर्थात ८४ जन्म पार्ट बजावला. हे देखील समजावून सांगितले आहे की, सगळेच काही ८४ जन्म घेत नाहीत. जे इतर धर्मांमध्ये येतातच मुळी अर्ध्या कल्पा नंतर त्यांचे जरूर कमीच जन्म असतील. इस्लामींपेक्षा बौद्धींचे कमी जन्म. ख्रिश्चनांचे त्याच्याहून कमी जन्म. गुरूनानकांचे शीख लोक आलेतच आत्ता. गुरूनानकांना ५०० वर्षे झाली तर ते थोडेच ८४ जन्म घेतील? हिशोब केला जातो. ५ हजार वर्षांमध्ये इतके जन्म तर ५०० वर्षांमध्ये किती जन्म झाले असतील? १२-१३ जन्म. ख्रिश्चन धर्माची २००० वर्षे असतील तर त्यांचे किती जन्म होतील? अर्ध्यापेक्षाही कमी जन्म असतील. हिशोब आहे ना. यामध्ये कोणी किती, कोणी किती ॲक्युरेट सांगू शकत नाही. या गोष्टींवर वाद घालण्यात जास्त वेळ वाया घालवायचा नाही. तुमचे काम आहे बाबांची आठवण करणे. फालतू गोष्टींमध्ये बुद्धी जाता कामा नये. बाबांशी योग लावायचा आहे, चक्राला जाणून घ्यायचे आहे. बाकी पापे तर आठवणीने नष्ट होतील. यातच मेहनत आहे, म्हणून भारताचा प्राचीन योग म्हणतात, जो बाबाच शिकवतात. सतयुग, त्रेतामध्ये तर योगाचा प्रश्नच नाही. मग भक्तिमार्गामध्ये हठयोग सुरू होतो. हा आहे सहज राजयोग. बाबा म्हणतात - माझी आठवण केल्याने पावन बनाल. मूळ गोष्ट आठवणीची आहे. कोणतेही पाप करायचे नाही. देवी देवतांची मंदिरे आहेत कारण पावन आहेत. पुजारी लोक तर पतित आहेत. पावन देवतांना स्नान इत्यादी घालतात. वास्तविक पतिताचा हात सुद्धा लागता कामा नये. हे सर्व भक्तीमार्गाचे रीती-रिवाज आहेत. आत्ता तर आपण पावन बनत आहोत. पवित्र बनल्यावर मग तर देवता बनू. तिथे तर पूजा इत्यादीची काहीच गरज नसते. सर्वांचे सद्गती दाता आहेतच मुळी एक बाबा. त्यांनाच भोलानाथ म्हणतात. मी पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये, जुन्या रावण राज्यामध्ये येतो. होय, कोणाच्याही तनामध्ये प्रवेश करून मुरली चालवू शकतात. याचा अर्थ हा नाही की सर्वव्यापी आहेत. प्रत्येकामध्ये तर आपली-आपली आत्मा आहे. फॉर्ममध्ये सुद्धा लिहून घेतले जाते - ‘तुमच्या आत्म्याचा पिता कोण आहे?’ परंतु समजत नाहीत. आत्म्यांचा पिता तर एकच असेल. आपण सर्व बांधव आहोत. पिता एकच आहेत. त्यांच्याकडून वारसा मिळतो - जीवनमुक्तीचा. तेच लिबरेटर, गाईड आहेत. सर्व आत्म्यांना स्वीट होमला घेऊन जातील म्हणून जुन्या दुनियेचा विनाश होतो. होळी पेटवली जाते ना. सर्व शरीरे नष्ट होतील. आणि सर्व आत्मे परत जातील. सतयुगामध्ये तर मग फार थोडे असतील. समजायला हवे की स्वर्गाची स्थापना कोण करून घेतात, कलियुगाचा विनाश कोण करून घेतात? ते तर स्पष्ट लिहिलेले आहे. म्हणतात - ‘मिठरा घुरत घुराय (प्रेम करा तर प्रेम मिळेल)’. बाबा म्हणतात जे माझ्यासाठी मनुष्याला देवता बनविण्याची खूप सेवा करतात ते मला जास्त प्रिय वाटतात.

जे पुरुषार्थ करतील तेच उच्च वारसा प्राप्त करतील. वारसा, आत्म्यांना परमात्मा बाबांकडून घ्यायचा आहे. आत्म-अभिमानी बनावे लागते. कित्येक जण खूप चुका देखील करतात, जुन्या सवयी पक्क्या झाल्या आहेत. तर कितीही समजवा, त्या सुटत नाहीत. त्यामुळे आपलेच पद कमी करून घेतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) कोणत्याही गोष्टीच्या वाद-विवादामध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. बुद्धी जास्त व्यर्थ गोष्टींमध्ये जाऊ नये. जितके शक्य होईल तितकी आठवणीच्या यात्रेद्वारे विकर्म विनाश करायची आहेत. आत्म-अभिमानी राहण्याची सवय लावायची आहे.

२) या जुन्या दुनियेपासून आपले तोंड फिरवायचे आहे. शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे. नवीन घर बनते आहे त्यामुळे जुन्यामधून मन काढून टाकायचे आहे.

वरदान:- ईश्वरीय कुळाच्या स्मृती द्वारे मायेशी सामना करणारे सदा समर्थ स्वरूप भव
कोणत्याही कार्यामध्ये सफलता प्राप्त करायची असेल तर पहिले स्मृती द्वारा समर्थी स्वरूप बना. समर्थी आल्याने मायेशी सामना करणे सोपे होईल. जशी स्मृती असते तसे स्वरूप बनते; त्यामुळे सदैव शक्तिशाली स्मृती असावी की, ‘जोपर्यंत हा ईश्वरीय जन्म आहे तोपर्यंत प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक कार्य ईश्वरीय सेवेसाठी आहे’. हे आपले ईश्वरीय कुळ आहे, ही स्मृतीची सीट सर्व कमजोरींना समाप्त करेल.
बोधवाक्य:- सत्य हे समयानुसार सिद्ध होतेच, त्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.

||| ओम शांती |||

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

बहुसंख्य मुलांसमोर सेवेमध्ये बाधा आणणारे मुख्य विघ्न येते ते म्हणजे - ‘हे मी केले, मीच हे करू शकतो…’ हा ‘मी’पणा येणे यालाच म्हटले जाते - ज्ञानाचा अहंकार, बुद्धीचा अहंकार, सेवेचा अहंकार; याच रूपामध्ये विघ्ने येतात. अशा प्रकारच्या विघ्नांना समाप्त करण्यासाठी सदैव एक शब्द लक्षात ठेवा की, ‘मी निमित्त आहे’. निमित्त बनल्यामुळेच निराकारी, निरहंकारी आणि नम्रचित्त, निरसंकल्प अवस्थेमध्ये राहू शकता; याच धारणा वायुमंडळाला निर्विघ्न बनवितात.

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.