मराठी मुरली · Brahma Kumaris

आजची मुरली · 20 नोव्हेंबर, 2026

ओम शांती · BapDada · 20 नोव्हेंबर, 2026

आजची मुरली — दररोज सकाळी नवी.

18
डाउनलोड PDF
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

20.11.2026
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो, सेवे सोबतच आठवणीच्या यात्रेला देखील कायम ठेवा, या रुहानी यात्रेमध्ये कधीही शिथिल होऊ नका”
प्रश्न:- मुलांचे मन जर रुहानी सेवेमध्ये लागत नसेल तर त्याचे कारण काय आहे?
उत्तर:- जर रुहानी सेवेमध्ये मन लागत नसेल तर जरूर देह-अभिमानाची ग्रहचारी आहे. चालता-चालता देह-अभिमानामुळे जेव्हा आपसामध्ये नाराज होतात तेव्हा सेवाच सोडून देतात. एकमेकांचे तोंड बघताच सेवेचे विचार नाहीसे होतात, म्हणून बाबा म्हणतात - या ग्रहचारीपासून सावध राहा.
गीत:- हमारे तीर्थ न्यारे हैं…

ओम् शांती. या गाण्याच्या ओळीने मुलांना सावध केले. काय म्हटले? बुद्धीमध्ये हे लक्षात ठेवायचे आहे की आपण तीर्थ यात्रेवर आहोत आणि आमची ही यात्रा सर्वात वेगळी आहे. या यात्रेला विसरू नका. सर्व काही या यात्रेवरच अवलंबून आहे. बाकीचे तर भौतिक यात्रांवर जाऊन मग परत येतात; आणि जन्म-जन्मांतर यात्रा करतच येतात. आपले काही ते तीर्थ नाही आहे. अमरनाथ मध्ये जाऊन मग मृत्यूलोकमध्ये परत येणे. तुमची काही ती यात्रा नाहीये; बाकीच्या सर्व मनुष्यांच्या त्या यात्रा आहेत. तीर्थ क्षेत्रावर जाऊन, प्रदक्षिणा घालून मग परत येऊन पतित बनतात. तऱ्हेतऱ्हेच्या यात्रा आहेत ना. देवींची मंदिरे देखील असंख्य आहेत. विकारी असणाऱ्यांसोबत किती लोक यात्रेला जातात. तुम्हा मुलांनी तर निर्विकारी राहण्याचा पण केलेला आहे. तुम्हा निर्विकारींची ही यात्रा आहे. निर्विकारी बाबा जे एव्हर-प्युअर (सदा पावन) आहेत, त्यांची आठवण करायची आहे. पाण्याच्या सागराला विकारी अथवा निर्विकारी म्हणणार नाही. आणि ना काही त्याच्यामधून उगम पावलेल्या गंगा निर्विकारी बनवतील. मनुष्यमात्र इतके काही पतित बनले आहेत की, काहीही समजत नाहीत. त्या भौतिक यात्रा आहेत - अल्पकालीन क्षणभंगुर यात्रा. ही यात्रा खूप मोठी आहे. तुम्हा मुलांनी उठता-बसता या यात्रेचाच विचार करायचा आहे. यात्रेवर जातात तेव्हा कामधंदा, गृहस्थ व्यवहार इत्यादी सर्व विसरायचे असते. ‘अमरनाथ की जय…’ बस्स, असे म्हणत जातात. महिने दोन महिने तीर्थयात्रा करून मग येऊन घाणीमध्ये पडतात (विकारात जातात). आणि मग गंगास्नान करण्यासाठी जातात. त्यांना हे ठाऊकच नाही आहे की आपण रोजच पतित बनतो. गंगा-यमुनेच्या काठी राहणारे देखील रोज पतित बनतात. रोज गंगेवर जाऊन स्नान करतात. एकतर नियम असतो आणि दुसरे मग मोठ्या विशेष दिवसानिमित्त स्नान करण्यासाठी जातात; समजतात की गंगा पतित-पावनी आहे. असे तर नाही खास त्याच दिवशी गंगा पावन बनविणारी बनते, आणि नंतर मग पावन बनविणारी राहत नाही. ज्या दिवशी जत्रा भरते त्याच दिवशी फक्त ती पतित-पावनी बनते. नाही. ती तर आहेच आहे. दररोज सुद्धा स्नान करण्यासाठी जातात. जत्रेच्या वेळेला विशेष दिवशी देखील जातात. काहीच अर्थ नाही. गंगा-यमुना चीज तर तीच आहे. त्यामध्ये प्रेते देखील सोडतात.

आता तुम्हा मुलांना रुहानी यात्रेवर राहायचे आहे. बस्स, आता आपण घरी चाललो. यामध्ये गंगास्नान करण्याची अथवा शास्त्र पठण करण्याची काही गोष्टच नाही. बाबा येतात देखील एकदाच. सारी दुनिया देखील एकदाच पतितापासून पावन बनते. हे देखील जाणता - सतयुग आहे नवीन दुनिया, कलियुग आहे जुनी दुनिया. नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश करण्यासाठी बाबांना जरूर यायचेच आहे. हे त्यांचेच काम आहे. परंतु मायेने असे काही तमोप्रधान-बुद्धी बनवले आहे जे काहीच समजत नाहीत. प्रदर्शनीमध्ये किती असंख्य मोठ्या व्यक्ती येतात. संन्यासी देखील येतील, तरी देखील समजतीलमात्र कोटींमध्ये कोणीच. तुम्ही लाखो-करोडोंना हे ज्ञान समजावून सांगता तेव्हा कुठे एखादा विरळा येतो. पुष्कळ लोकांना सांगावे लागेल. सरते शेवटी तुमचे हे ज्ञानाचे स्पष्टीकरण आणि चित्रे इत्यादी सर्व वर्तमानपत्रांमध्ये देखील छापून येईल. शिडीचे चित्र देखील वर्तमानपत्रामध्ये छापले जाईल. म्हणतील - हे तर फक्त भारतासाठीच आहे, मग बाकीच्या धर्माचे कुठे जातील. कयामतची (महाविनाशाची) वेळ देखील गायली गेली आहे. कयामत अर्थात परत जाण्याची वेळ. जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन दुनियेची स्थापना होईल तर जरूर बाकीचे सगळे परत जातील ना. सर्वांचा विनाश होणार आहे. नवीन दुनिया स्थापन होत आहे. या गोष्टी तुम्हा मुलांशिवाय इतर कोणीही जाणत नाही. तुम्ही जाणता - नरकवासीयांचा विनाश, स्वर्गवासीयांची स्थापना होत आहे. कल्प-कल्प असेच होते. आता जो थोडा-बहुत वेळ आहे, तेवढ्या काळामध्ये देखील पुष्कळ जणांना माहिती मिळत जाईल. मेळावे होत राहतील. सर्व ठिकाणाहून मुले पत्र लिहून विचारत असतात की, आम्ही मेळावा किंवा प्रदर्शनी आयोजित करावी का? परंतु त्याचसोबत आपल्या आठवणीची यात्रा देखील विसरता कामा नये. मुले एकदमच सुस्त झाली आहेत. यात्रा अशी करतात जसे म्हातारे करतात. जणू काही ताकदच नाहीये, काही खाल्लेच नाहीये. बाबांचा किती विचार चालत असतो. विचार करता-करता झोपच उडून जाते. विचार सागर मंथन तर सर्वांनी केले पाहिजे ना. मुले जाणतात - आम्हाला बेहदचे बाबा शिकवत आहेत. तर मुलांना किती अपार खुशी झाली पाहिजे. या शिक्षणाद्वारे आपण विश्वाचे मालक बनतो. काहीजणांचे तर असे काही वर्तन आहे - जणू काही खेकडे आहेत. बाबा, खेकड्यांना देवता बनवतात. तरी देखील मुश्किलीने एखाद्याचे वर्तन सुधारते. या शिडीच्या चित्रामध्ये खूप चांगले नॉलेज आहे. परंतु मुले इतके काम करत नाहीत. यात्राच करत नाहीत. बाबांची आठवण करतील तेव्हा बुद्धीचे कुलूप देखील उघडत जाईल. गोल्डन-बुद्धी बनत जाईल. तुम्हा मुलांची पारस-बुद्धी झाली पाहिजे, अनेकांचे कल्याण केले पाहिजे. तुम्ही सतोप्रधानापासून आता तमोप्रधान बनला आहात, आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. श्रीकृष्णाला श्याम-सुंदर म्हणतात.

बाबांनी सावळ्या आत्म्याला बसून समजावून सांगितले आहे. हे आत्मा जाणते की, बाबा आम्हाला विश्वाचा मालक बनवत आहेत तर आनंदाने मन किती भरून गेले पाहिजे. यामध्ये अहंकाराची कुठली गोष्ट नाही. बाबा किती निरहंकारी आहेत. बुद्धीमध्ये किती आनंद भरून राहतो. उद्या आपण हिऱ्या-माणकांचे महाल बनवणार. नवीन दुनियेमध्ये राज्य करणार. ही तर अगदीच पतित दुनिया आहे. या दुनियेतील मनुष्य तर काहीच कामाचे नाहीत, काहीच जाणत नाहीत. हे देखील दाखवले पाहिजे की, हिऱ्यासमान जीवन होते. तेच मग ८४ जन्म घेऊन कवडीसमान बनतात. हे शिडीचे चित्र एक नंबरचे चित्र आहे. मग दुसऱ्या नंबरचे आहे त्रिमूर्तीचे चित्र.

तुम्ही म्हणता - निकटच्या भविष्यामध्ये भारत श्रेष्ठाचारी बनेल. श्रेष्ठाचारी दुनियेमध्ये फार थोडे मनुष्य असतील, आता किती असंख्य मनुष्य आहेत. महाभारत लढाई देखील समोर उभी आहे. सर्व आत्मे मच्छरांसदृश्य जातील. आग भडकत आहे. परिस्थिती जितकी सुधारण्यासाठी प्रयत्न करतात तितकीच बिघडत जात आहे. बाबा मुलांना राजयोग शिकवत आहेत. मुलांना किती नशा चढवतात. काहीजण तर इथून बाहेर पडले आणि सारे ज्ञान उडून जाते. काहीच लक्षात राहत नाही. नाहीतर आवड असली पाहिजे की जाऊन सेवा करावी. बाबा देखील गुण पाहून सेवेवर पाठवतील ना. यामध्ये खूप हर्षित राहतील. सेवेमध्ये आनंदाचा पारा चढेल. चांगली-चांगली जुनी मुले आपसामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून नाराज होतात. असे थोडेच आहे की या गोष्टींमुळे तुम्ही सेवाच करणार नाही. सेवा तर आनंदाने केली पाहिजे. ज्याच्याशी जमत नाही, त्याचे तोंड पाहिले तरी देखील सेवेचा विचार उडून जातो. सेवेमध्ये मन लागत नाही, तर दूर निघून जातात. मग तर ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये काही फरकच राहिला नाही. देह-अभिमानाची ग्रहचारी येऊन बसते. हा आहे पहिल्या नंबरचा आजार. बाबा म्हणतात - मुलांनो, देही-अभिमानी बना. आत्माच सर्व काही करते ना. आत्माच विकारी आणि निर्विकारी बनते. स्वर्गामध्ये निर्विकारी होती. रावण राज्यामध्ये आत्माच विकारी बनली आहे. हा ड्रामा देखील असा बनलेला आहे, म्हणून बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. जे निर्विकारी होते, तेच पतित विकारी बनले आहेत. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये की आपणच निर्विकारी होतो, आता विकारी बनलो आहोत. आपण आत्मे मूलवतनचे राहणारे आहोत. तिथे तर आपण आत्मे निर्विकारी असणार. इथे शरीरामध्ये येऊन पार्ट बजावता-बजावता विकारी बनलो आहोत. हे बाबा बसून समजावून सांगत आहेत. आत्मा शांतीधाम वरून येते तर जरूर पवित्रच असेल; नंतर मग अपवित्र बनली आहे. पवित्र दुनियेमध्ये ९ लाख असतात. तर मग इतके सर्व आत्मे कुठून आले? जरूर शांतीधामहून आले असतील. ते आहे पीसफुल इनकार्पोरियल वर्ल्ड (शांत, निराकारी दुनिया). तिथे सर्व आत्मे पवित्र असतात, मग पार्ट बजावता-बजावता सतो, रजो, तमोमध्ये येतात. पावन पासून पतित बनायचेच आहे. मग बाबा येऊन सर्वांना पावन बनवतील. हा ड्रामा चालतच राहतो. ड्रामाच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य बाबांशिवाय इतर कोणीही सांगू शकणार नाही. त्या बाबांना कोणी जाणतही नाहीत. ऋषी-मुनी देखील नेती-नेती म्हणत गेले आहेत. आम्ही भगवंताला आणि त्याच्या रचनेला जाणत नाही. आणि मग म्हणतात देखील - गॉडफादर इज नॉलेजफुल. ते परमात्मा सर्व आत्म्यांचे पिता, बीजरूप आहेत. ते आहेत आत्म्यांचे बीजरूप आणि हे प्रजापिता ब्रह्मा आहेत मनुष्य सृष्टीचे बीजरूप. ते निराकार बाबा यांच्यामध्ये प्रवेश करून मनुष्यांना मनुष्याद्वारे समजावून सांगत आहेत. त्यांना मनुष्य सृष्टीचे बीजरूप म्हणणार नाही. ते आहेत आत्म्यांचे पिता आणि हे ब्रह्मा आहेत मनुष्य सृष्टीचे प्रजापिता, ज्यांच्याद्वारे बाबा येऊन ज्ञान देतात. शरीर वेगळे, आत्मा वेगळी आहे ना. मन-बुद्धी-चित्त आत्म्यामध्ये आहे. आत्मा पार्ट बजावण्याकरिता येऊन शरीरामध्ये प्रवेश करते.

तुम्ही जाणता जेव्हा कोणी शरीर सोडतात तर जाऊन दुसरा पार्ट बजावतील, यामध्ये रडून काय होणार. गेला तो गेला, परत येऊन थोडाच आमचा काका, मामा बनेल. रडून काय फायदा. तुमची मम्मा गेली, ड्रामा अनुसार पार्ट बजावत आहे. असे पुष्कळ जातात. कोणी कुठे जाऊन जन्म घेतात. हे लक्षात येते की, जसा-जसा आज्ञाधारक मुलगा असेल तितका चांगल्या घरामध्ये जरूर जन्म घेतला असेल. इथून जाणारे चांगल्या घरामध्येच जातील. नंबरवार तर असतात ना. जसे जे कर्म करतात तशाच घरामध्ये जातात. शेवटी तुम्ही जाऊन राजाच्या घरामध्ये जन्म घेता. राजांकडे कोण जातील, ते स्वतः समजू शकतात ना. तरी देखील दैवी संस्कार तर घेऊन जातात ना. यामध्ये खूप विशाल बुद्धीने विचार सागर मंथन करायचे आहे. बाबा ज्ञानाचा सागर आहेत. तर मुलांना देखील ज्ञानाचा सागर बनायचे आहे. नंबरवार तर असतातच. समजून येते - पुढे जाऊन उन्नती होत जाईल. असे होऊ शकते की, जे आज काम करू शकत नाहीत, ते उद्या बऱ्याचजणांच्याही पुढे वेगाने निघून जातील. ग्रहचारी उतरेल. कोणावर राहूची ग्रहचारी बसते तर गटारात कोसळतात (पतन होते). हाड न् हाड मोडून पडते. बेहदच्या बाबांकडे प्रतिज्ञा करून मग घसरतात (विकारात जातात) तर धर्मराजाकडून खूप सजा देखील भोगाव्या लागतात. हे बेहदचे बाबा आहेत, बेहदचा धर्मराज आहे, आणि बेहदची सजा मिळते. एखाद्या गोष्टीमध्ये कानाडोळा केलात किंवा उलटे काम केलेत तर जरूर सजा भोगाल. हे समजत नाहीत की आपण भगवंताची अवज्ञा (आज्ञेचे उल्लंघन) करत आहोत. इतक्या साऱ्या गोष्टी बाबा समजावून सांगत राहतात. श्रीमतावर चला, सेवेमध्ये मदतगार बना. ‘योग’च्या यात्रेवर राहा. चित्रांवरून समजावून सांगण्याची प्रॅक्टिस कराल तर सवय होईल. नाहीतर उच्चपद कसे मिळणार. अज्ञानकाळामध्ये एखाद्याचा मुलगा सुपुत्र असतो (खूप चांगला गुणी असतो) आणि एखादा तर कुपुत्र असतो (खूप अवगुणी देखील असतो). इथे देखील काहीजण तर लगेचच बाबांचे काम करून दाखवतात. तर मुलांना बेहदची सेवा करायची आहे. बेहदच्या आत्म्यांचे कल्याण करायचे आहे. संदेश द्यायचा आहे - मनमनाभव. बाबांची आठवण केल्याने तुमची बुद्धी तमोप्रधानापासून सतोप्रधान बनेल. आता कलियुगी तमोप्रधान दुनियेचा शेवट आहे. आता सतोप्रधान बनायचे आहे. आत्म्यांची देखील तिथे नंबरवार दुनिया आहे ना, जे मग नंबरवार येऊन पार्ट बजावतात. येतील देखील नंबरवार ड्रामा अनुसार. आता सर्व आत्मे रावण राज्यामध्ये दुःखी आहेत. ते देखील समजतात थोडेच. जर कोणाला म्हटले की, तुम्ही पतित आहात, तर चिडतील. बाबा म्हणतात - हे आहेच विशश वर्ल्ड (विकारी दुनिया). बाबा म्हणतात - तुम्ही आपले राज्य-भाग्य घ्याल. बाकी सर्वजण विनाश होऊन घरी निघून जाणार आहेत. हे तर गायले गेले आहे - महाभारत लढाई लागणार आहे, यामध्ये सर्व धर्म नष्ट होऊन बाकी एक धर्म राहील. या युद्धानंतर स्वर्गाचे दरवाजे उघडतात. किती चांगल्या प्रकारे मुलांना समजावून सांगतात. पुढे जाऊन तुमच्या गोष्टी ऐकतील आणि येत राहतील. सूर्यवंशी, चंद्रवंशी जे पतित बनले आहेत तेच येऊन नंबरवार आपला वारसा घेतील. प्रजा तर पुष्कळ बनेल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) भगवंताच्या आज्ञांचे कधीही उल्लंघन करायचे नाही. बेहद सेवेमध्ये सपूत बच्चा बनून मदतगार बनायचे आहे.

२) ज्ञान-धनाच्या गुप्त आनंदाने बुद्धीला समृद्ध ठेवायचे आहे. आपसामध्ये कधीही नाराज व्हायचे नाही.

वरदान:- प्रत्येक पाऊल आदेशानुसार टाकून मायेला कुर्बान व्हायला लावणारे सहजयोगी भव
जी मुले प्रत्येक पाऊल आदेशानुसार टाकतात त्यांच्यासमोर सारे विश्व कुर्बान होते (फिदा होते), त्याच सोबत माया देखील आपल्या वंशासहित कुर्बान होते. अगोदर तुम्ही बाबांवर कुर्बान व्हा म्हणजे मग माया तुमच्यावर कुर्बान होईल. आणि आपल्या श्रेष्ठ स्वमानामध्ये राहून प्रत्येक आदेशानुसार चालत राहा म्हणजे मग जन्म-जन्मांतरीच्या कष्टामधून सुटका होईल. आता सहजयोगी आणि भविष्यामध्ये सहज जीवन असेल. तर असे सहज जीवन बनवा.
बोधवाक्य:- स्वतःच्या परिवर्तनाद्वारे अन्य आत्म्यांचे परिवर्तन करणे, हेच जीवनदान देणे आहे.

||| ओम शांती |||

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

संकल्प केला आणि ज्या स्थितीमध्ये स्थित होऊ इच्छिता त्यामध्ये स्थित झाले, हीच आहे पित्या समान संपूर्ण अवस्था अथवा कर्मातीत अंतिम स्टेज. जितके संपूर्ण अवस्थेच्या समीप असाल अर्थात बाबांच्या समीप असाल, त्याच अनुसार भविष्य प्रारब्धामध्ये देखील राज्य-अधिकारी असाल. जितका नशा असेल तितका आपला कर्मातीत अवस्थेचा निशाणा समीप दिसून येईल.

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.