| 06.10.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
“अव्यक्त बापदादा”
|
“बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या वृत्तीला पॉझिटिव बनवा”
आज विश्व कल्याणी बापदादा आपल्या चारही बाजूंच्या मुलांना पाहून हर्षित होत आहेत. प्रत्येक मुलाच्या मनातील उमंग बघत देखील आहेत आणि ऐकत देखील आहेत. सर्वांच्या मनामध्ये लक्ष्य एकच आहे की लवकरात लवकर बाप समान बनावे. मुलांचे लक्ष्य पाहून, हिम्मतीला पाहून, श्रेष्ठ संकल्पाला पाहून बापदादा खुश आहेत. त्याच सोबत हे देखील बघत आहेत की, सर्वांचे लक्ष्य उच्च ते उच्च आहे परंतु प्रत्यक्ष रूपामध्ये लक्षण मात्र नंबरवार आहे. लक्ष्य आणि लक्षण समान असणे अर्थात बाप समान बनणे. जी सेवेच्या स्टेजवर निमित्त मुले आहेत, ती सदैव एकाच संकल्पामध्ये राहतात की बाबांना प्रत्यक्ष कसे करावे, कधी होईल! असा संकल्प चालतो ना? बाबा मग मुलांना विचारतात की, ‘मुलांनो, तुम्ही सर्वजण तुमच्या संपन्न, संपूर्ण स्वरूपामध्ये कधी प्रत्यक्ष होणार?’ बाबांचा मुलांसाठी प्रश्न आहे की ती तारीख तरी फिक्स केली आहे का? की तारीखच फिक्स करायची नाहीये?
डबल फॉरेनर्स म्हणतात की, कोणत्याही प्रोग्रामची तारीख एक वर्ष आधी फिक्स केली जाते, असे म्हणतात ना! तर बाबा म्हणतात स्वतःला प्रत्यक्ष करण्याची तारीख फिक्स केली आहे? मीटिंग तर खूप केल्या आहेत ना! करतच राहतात. आज अमकी मीटिंग आहे, उद्या अमकी आहे. आता देखील किती मीटिंगवाले आले आहेत, तीन मीटिंगवाले आजही बसले आहेत. हे तर खूप चांगले आहे, परंतु या मीटिंगची तारीख कोणती आहे? जो विचार कराल तेच बोल असावेत, तेच कर्म असावेत. संकल्प, बोल, आणि कर्म तीनही श्रेष्ठ लक्ष्य प्रमाण असावेत. बापदादा बघतात की ही सर्व विश्व कल्याणाच्या निमित्त बनलेली मुले, सर्व आत्म्यांचे कल्याणकारी प्रत्यक्ष रूपामध्ये स्टेजवर कधी येणार? प्रत्येकजण गुप्त पुरुषार्थामध्ये आहे, लगनमध्ये (धूनमध्ये) आहे, हे देखील बापदादा बघतात. परंतु या विशेष संकल्पाच्या धूनमध्ये कधी मग्न होणार? धून तर आहे परंतु निरंतर या संकल्पाला संपन्न करण्यामध्ये मग्न राहणे अर्थात निरंतर याच संकल्पाला पूर्ण करण्यासाठी प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये असावे. आता संकल्प आणि प्रत्यक्ष कर्मामध्ये अंतर आहे. होणार तर आहेच आणि करायचे देखील मुलांनाच आहे. बाबा बॅकबोन तर आहेतच.
तर बापदादा बघत होते की सर्वात तीव्रगतीची सेवा आहे - “वृत्ती द्वारे व्हायब्रेशन पसरविणे”. वृत्ती, वेगवान रॉकेट पेक्षा देखील अतिशय फास्ट आहे. वृत्ती द्वारे वायुमंडळाला परिवर्तन करू शकता. जिथे पाहिजे, जितक्या आत्म्यांसाठी पाहिजे वृत्तीद्वारे बसल्या-बसल्या पोहोचवू शकता. वृत्तीद्वारे दृष्टी आणि सृष्टी परिवर्तन करू शकता. परंतु एक गोष्ट वृत्ती द्वारे सेवा करण्यामध्ये अडथळा आणत आहे, वृत्ती द्वारे व्हायब्रेशन पसरते. तुमची जड चित्रे (मुर्त्या) आत्तापर्यंत, शेवटच्या जन्मापर्यंत व्हायब्रेशन द्वारे सेवा करत आहेत ना! बघितले आहे ना! मंदिरे पाहिली आहेत ना! डबल फॉरेनर्सनी मंदिरे पाहिली आहेत? बघितली नसतील तर बघून घ्या कारण तुमचीच मंदिरे आहेत ना! कुमारींनो तुमची मंदिरे आहेत का भारतीयांची मंदिरे आहेत? सर्वांची मंदिरे आहेत, अच्छा. मुबारक. मंदिरातील मुर्त्या प्रत्यक्ष रूपामध्ये व्हायब्रेशन द्वारे सेवा करत आहेत अर्थात तुम्ही आत्मे मंदिराच्या मुर्त्या सेवा करत आहात. कित्येक भक्त व्हायब्रेशन द्वारे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत आहेत. तर हे चैतन्य मुर्त्यांनो, आता आपल्या शुभ भावनेच्या वृत्तीने, शुभ कामनांच्या वृत्तीने वायुमंडळामध्ये व्हायब्रेशन पसरवा. परंतु…, ‘परंतु’, म्हणणे चांगले वाटत नाही परंतु म्हणावे लागते. पांडव ‘परंतु’ शब्द चांगला वाटतो का? चांगला वाटत नाही. परंतु, ‘परंतु’ आहे का नष्ट झाला आहे? यासाठी सर्वात सोपी विधी आहे - प्रथम प्रत्येकाने स्वतःला आतून चेक करा - एका सेकंदामध्ये चेक करू शकता. आत्ता लगेच करा. सेकंद देऊ का, की बोलून होईपर्यंत सेकंद मिळाला. आता स्वतःला आतून चेक करा - माझ्या वृत्तीमध्ये कोणत्या आत्म्याप्रती देखील कोणते निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे? विश्वाचे वायूमंडळ परिवर्तन करायचे आहे, परंतु आपल्या मनामध्ये कोणत्या एका आत्म्याप्रती देखील जर व्यर्थ व्हायब्रेशन किंवा खरे व्हायब्रेशन जरी निगेटिव्ह असेल तर तो विश्व परिवर्तन करू शकणार नाही. बाधा येत राहील, वेळ लागेल. वायुमंडळामध्ये शक्ती राहणार नाही. बरीच मुले म्हणतात - ‘तो तर आहेच असा ना! आहेच ना! मग व्हायब्रेशन तर असणार ना!’ बाबांना सुद्धा ज्ञान देतात, बाबा तुम्हाला माहित नाही, ती आत्मा आहेच अशी. परंतु बाबा विचारत आहेत की, ‘तो वाईट आहे, चुकीचा आहे, असता कामा नये; परंतु वाईट आपल्या वृत्तीमध्ये ठेवा, अशी बाबांनी परवानगी दिली आहे काय?’ जे समजतात यासाठी बाबांची परवानगी नाही, त्यांनी एक हात वर करा. टी.व्ही. मध्ये दाखवा. (दादींना). तुम्ही बघत आहात ना! अच्छा. हात वर केला होता हे लक्षात ठेवा. डबल फॉरेनर्सनी हात वर केला! बापदादांच्या टी.व्ही. मध्ये तर येतच आहे. जोपर्यंत प्रत्येक ब्राह्मण आत्म्याच्या स्वतःच्या वृत्तीमध्ये कोणत्याही आत्म्याप्रती निगेटिव्ह व्हायब्रेशन असेल तर विश्वकल्याणा प्रति वृत्तीद्वारे वायुमंडळामध्ये व्हायब्रेशन पसरवू शकणार नाही. हे पक्के समजा. मग कितीही सेवा करा, रोज आठ-आठ भाषणे करा, योग शिबिर करा, खूप प्रकारचे कोर्स करा परंतु कोणाबद्दलही आपल्या वृत्तीमध्ये कोणते जुने निगेटिव्ह व्हायब्रेशन ठेवू नका. ठीक आहे, तो वाईट आहे, खूप चुका करतो, खूपजणांना दुःख देतो, परंतु तुम्ही त्याला दुःख देणारा म्हणून जबाबदार ठरविण्या ऐवजी, त्याला परिवर्तन करण्यासाठी मदतगार बनू शकत नाही का! दुःख देण्यामध्ये मदत करायची नाही, त्याला परिवर्तन करण्यामध्ये तुम्ही मदतगार बना. जर कोणती अशी देखील आत्मा आहे जी तुम्ही समजता, बदलणारच नाही. चला, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती बदलणारी नाही आहे, परंतु नंबरवार तर आहेत ना! तर तुम्ही असा का विचार करता - हा तर बदलणारच नाही. तुम्ही का ठरवता, ते तर बाबा जज (निर्णय घेणारे) आहेत ना. तुम्ही सर्व एकमेकांचे जज बनले आहात. बाप देखील बघत तर आहेत, हा असा आहे, हा असा आहे, हा असा आहे… ब्रह्मा बाबांना प्रत्यक्षामध्ये बघितलेत ना की, कशीही आत्मा आहे, वारंवार चुका करणारे आत्मे होते परंतु बापदादा (विशेष साकारूपामध्ये ब्रह्मा बाबांनी) सर्व मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण देताना, सर्व मुलांना गोड-गोड म्हटले. दोन-चार कडू आणि बाकीचे गोड… असे म्हणाले काय? तरीदेखील अशा आत्म्यांप्रति देखील नेहमी दयाळू बनले. क्षमेचा सागर बनले. परंतु तुम्ही आपल्या वृत्तीमध्ये कोणाबद्दलही जर निगेटिव्ह भाव ठेवलात, तर यामुळे तुम्हाला काही फायदा आहे? जर तुम्हाला यामध्ये फायदा असेल, तर भले ठेवा, परवानगी आहे. जर फायदा नसेल, त्रास होतो…, ती गोष्ट समोर येईल. बापदादा बघतात, त्यावेळेस त्याला आरसा दाखवला पाहिजे. तर ज्या गोष्टीमध्ये आपला काहीच फायदा नाही, नॉलेजफुल बनणे वेगळी गोष्ट आहे; नॉलेज आहे - हे चुकीचे आहे, हे बरोबर आहे. नॉलेजफुल बनणे चुकीचे नाही आहे, परंतु वृत्तीमध्ये धारण करणे हे चुकीचे आहे कारण आपलाच मूड ऑफ, व्यर्थ संकल्प, आठवणीची ताकद कमी होणे असे नुकसान होते. जर प्रकृतीला देखील तुम्ही पावन बनविणारे आहात मग हे तर आत्मे आहेत. वृत्ती, व्हायब्रेशन आणि वायुमंडळ तिघांचाही आपसात संबंध आहे. वृत्तीने व्हायब्रेशन बनते, व्हायब्रेशनने वायुमंडळ बनते. परंतू मूळ आहे - ‘वृत्ती’. जर तुम्ही समजता की लवकर-लवकर बाबांची प्रत्यक्षता व्हावी तर तीव्रगतीचा प्रयत्न आहे - सर्वांनी आपल्या वृत्तीमध्ये स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी सकारात्मकता धारण करा. नॉलेजफुल भले बना परंतु आपल्या मनामध्ये निगेटिव्ह (नकारात्मकता) धारण करू नका. निगेटिव्हचा अर्थ आहे कचरा. आत्ताच्या आत्ता वृत्ती पॉवरफुल करा, व्हायब्रेशन पॉवरफुल बनवा, वायुमंडळ पॉवरफुल बनवा कारण सर्वांनी अनुभव केला आहे, वाणीद्वारे परिवर्तन, शिकवणीद्वारे परिवर्तन अतिशय धीम्या गतीने होते, होते परंतु अतिशय धीम्या गतीने. जर तुम्हाला फास्ट गती पाहिजे असेल तर नॉलेजफूल बनून, क्षमा स्वरूप बनून, दयाळू बनून, शुभ भावना, शुभ कामनेद्वारे वायुमंडळाला परिवर्तन करा. बघा, तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष पाहिले आहे, मधुबनमध्ये जे कोणी येतात, सर्वात जास्त प्रभाव कोणत्या गोष्टीचा पडतो? वायुमंडळाचा. इथे देखील सगळे जरी नंबरवार आहेत परंतु ब्रह्मा बाबांची कर्मभूमी आहे, बापदादांची वरदान भूमी आहे, ती वायुमंडळाला परिवर्तन करते. अनुभव आहे ना! तर व्हायब्रेशनद्वारे वायुमंडळ बनविणे, हे आहे जलद गतीने हृदयावर छाप टाकणे. वायुमंडळ हृदयावर ठसा उमटवते. ऐकलेल्या गोष्टी तुम्ही विसरून जाऊ शकता परंतु वायुमंडळाचा हृदयावर जो ठसा उमटतो, तो विसरू शकत नाही. असे आहे का? तर बापदादा ऐकत राहतात, प्रत्यक्षता कधी होणार, आपसामध्ये रूहरीहान तर चांगली करता. चांगले आहे. पांडव बोला, आता काय करणार? वायुमंडळ शक्तिशाली बनवा. भले मग सेवाकेंद्र आहे, जेपण स्थान आहे, प्रवृत्तीमध्ये आहात तरीही वायुमंडळ शक्तिशाली असावे. चारही बाजूंचे वायुमंडळ जर संपूर्ण निर्विघ्न, दयाळू, शुभ भावना, शुभकामना वाले बनले तर प्रत्यक्षता होण्यास काहीच वेळ लागणार नाही.
आता बापदादांनी जी तारीख दिली आहे, ती बापदादांच्या लक्षात आहे. हिशोब तर विचारणार ना! प्रत्येकाने स्वतःचा हिशोब (चार्ट) तर ठेवला आहे ना! तर खात्यामध्ये बापदादा हेच चेक करतील - वृत्तीमध्ये, दृष्टीमध्ये, बोलामध्ये दयाळू, शुभ भावना आणि शुभकामना वाली आत्मा किती टक्के राहिली? अजून १५ दिवस तर बाकी असतील ना! जास्त आहेत. अच्छा, जर कोणी केले नसेल तर १५ दिवस तरी करा, तरीही पास होतील. झालेल्या गोष्टींना बिंदू लावा आणि दयेचा सिंधू बना. क्षमेचा सिंधू बना. (बापदादांनी ड्रिल करून घेतली).
सर्वांनी ऐकले! अच्छा. तीन मीटिंगवाले जे आले आहेत, एक स्पार्कवाले हात वर करा. अच्छा. खूप चांगले. आता याच विषयावर रिसर्च करा - ‘प्रॅक्टिकलमध्ये वायुमंडळ कसे श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवू शकतो!’ रिसर्च करत आहात ना! असे वायुमंडळ बनविण्यासाठी काय-काय बुद्धीमध्ये ठेवायचे आहे, कोण-कोणते कर्म करायचे आहे, संबंध-संपर्कामध्ये काय करायचे आहे. चांगले आहे स्वतःला बिझी ठेवता, चांगली गोष्ट आहे. परंतु बापदादा हा प्रॅक्टिकल अनुभव पाहू इच्छितात की, प्रॅक्टिकलमध्ये कसे केले आणि त्याचा परिणाम काय झाला? जर मध्येच काही अडचण आली असेल तर कोणती आली? हा अनुभव प्रत्यक्ष करून बघा, फक्त पॉईंट्स (मुद्दे) काढू नका, ‘हे करायचे आहे, हे करायचे आहे’. नाही. करा. अनुभव करून उदाहरण बनून दाखवा आणि ते उदाहरण इतरांना देखील मदत करेल. बरोबर आहे ना! हे (रमेश भाई) निमित्त आहेत ना. चांगले आहे. अजूनही पंधरा दिवस आहेत, अजून शेवट झालेला नाहीये. आता खूप वेळ गेली, परंतु थोडी राहिली आहे तर स्पार्कवाले असे प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक) करून बघा आणि इतरांना दाखवा. ठीक आहे? करू शकाल? होऊ शकेल? अच्छा, ठीक आहे, खूप चांगले. अच्छा.
दुसरी मीटिंग आहे ट्रान्सपोर्टची:- ट्रान्सपोर्टवाले तर सर्वांना सुख देतील. ट्रान्सपोर्टवाले हात वर करा. अच्छा. बहिणी, बहिणींशिवाय गत्यंतर नाही. तर ट्रान्सपोर्टवाले काय करणार आहात? फक्त फिरवून आणणार का? ट्रान्सपोर्टवाले आपसामध्ये असे प्रोग्राम बनवा ज्यामुळे कोणत्याही आत्म्याला कमीत-कमी वेळेमध्ये दुःखाच्या दुनिये पासून पार करून त्याला थोड्या वेळासाठी तरी शांतीची यात्रा करवू शकाल. चला, परमधाम पर्यंत म्हटले तर असे पोहोचणे अवघड आहे परंतु दुःखाच्या दुनियेमध्ये शांतीची यात्रा तर करू शकता. असे भरपूर प्लॅन तर बनवा, चारही प्रकारच्या यात्रावाल्यांना बापदादांचा संदेश तर पोहोचवत आहात, पोहोचवणारच आहात; कारण कोणताही वर्ग (क्षेत्र) राहून जाता कामा नये ना. हे चांगले आहे जो विंग्जचा शोध लावला (विविध क्षेत्रानुसार सेवा देण्याचा शोध लावला) आहे, हे चांगले आहे, कोणाची दूषणे मिळणार नाहीत. कोणतेही क्षेत्र राहून जाणार नाही, प्रत्येकजण आपल्या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी उत्सुक तर असतात ना! हे खूप चांगले आहे. परंतु आता ज्या काही विंग्ज बनल्या आहेत, कधीपासून विंग्ज चालू केल्या आहेत, दीड-दोन वर्षे झाली का जास्त झाली? (दहा-बारा वर्षे) विंग्जच्या सेवेला १०-१२ वर्षे झाली, अच्छा. बराच काळ झाला आहे. विंग्जवाल्यांकरिता बापदादांचा एक संकल्प आहे. बापदादांनी दोन-तीन वेळा सांगितले आहे परंतु झाले नाही, की प्रत्येक विंगने जितका काळ जी काही सेवा केली आहे, त्या प्रत्येक विंगचे विशेष सेवाभावी आहेत भले मग ते सहयोगी आहेत, हाफ योगी आहेत, कधी कधी येतात, रेग्युलर नाहीत, असे काही प्रत्येक विंगमधील कमीत-कमी पाच जण तरी समोर आले पाहिजेत. मधुबनमध्ये त्यांना सर्व बघतील की विंग्जवाल्यांनी, भले १०-१२ असतील परंतु पक्के असणारे निदान ५ तरी आणा; चांगले सहयोगी, सेवेच्या निमित्त बनणारे ५-५ तर निघू शकतात का नाही! निघू शकत असतील तर आणा. (कधी आणायचे?) ते दादींवर अवलंबून आहे. (बापदादांच्या प्रोग्राममध्ये आणायचे का?) ते मग तसे बापदादांना भेटण्या लायक असावेत, ५ तर निघू शकतीलच. जास्त म्हणत नाहीत, फक्त पाच, बस्स. तर या दादी पास करतील.
इंजिनीयर्स:- इंजिनीयरचे तर कामच आहे प्लॅन बनविणे. तर तीव्र पुरुषार्थाचा कोणता प्लॅन बनवला आहे का फक्त सेवेचा बनवलात? इंजिनियर्सनी दर महिन्याला तीव्र पुरुषार्थासाठी कोणता तरी नवीन-नवीन प्लॅन बनविला पाहिजे. सल्ला दिला पाहिजे मग फायनल तर दादी करतील. दादी तुमच्या सोबत आहेत, परंतु इंजिनियर्स आणि विज्ञान, विज्ञानवाल्यांनी असा कोणता तरी प्लॅन बनवला पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर नवीन दुनिया येईल. बस, अशाच मीटिंग करत राहणार, प्लॅन बनवत राहणार, कधी पर्यंत? काहीतरी तीव्र प्रगतीचे प्लॅन बनवा कारण लक्ष्य तर तुमच्या विंगचे हेच आहे की असा प्लॅन बनावा ज्यामुळे लवकरात-लवकर आपले राज्य येईल. तर असा देखील प्लॅन बनवा आणि सेवेमध्ये देखील कमी वेळामध्ये जास्त सफलता प्रत्यक्ष दिसून येईल, असे प्लॅन बनवा. असे प्लॅन बनवाल ना! लास्ट टर्नमध्ये सर्व रिपोर्ट ऐकतील की प्रत्येक विंगने सफलतेला वेगवान बनविण्यासाठी कोणता प्लॅन बनवला! फक्त बनवायचा नाही, १५ दिवस त्याचा अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिकलमध्ये आणायचे आहे. ठीक आहे ना. आता प्रॅक्टिकल व्हायला हवे ना! सर्वजण एकमेकांना सांगत असतात, बापदादा तर सर्वांची रुहरीहान ऐकत असतात. सर्व म्हणतात प्रत्यक्ष व्हावे, प्रत्यक्ष व्हावे. परंतु आधी तुम्ही तर प्रत्यक्ष व्हा. बाबा देखील तुमच्या द्वारे प्रत्यक्ष होतील ना! अच्छा - आत्ताच्या आत्ता आपल्या वृत्तीला एकाग्र करू शकता? वृत्ती कुठेही विचलित होऊ नये. अचल, एकाग्र, शक्तिशाली रहावी. (बाप दादांनी ड्रिल करून घेतली). अच्छा.
चारही बाजूंच्या सर्व सेवाभावी मुलांना, सदैव आपल्या श्रेष्ठ व्हायब्रेशन द्वारे सेवा करणाऱ्या तीव्रगतीचा पुरुषार्थ करणाऱ्या मुलांना, सदैव क्षमेचा मास्टर सागर, सदा शुभ भावना, शुभकामनेद्वारे अतिशय कमजोर आत्म्यांना देखील शक्तिशाली बनविणाऱ्या अशा मास्टर सर्व शक्तिमान मुलांना बापदादांची खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
| वरदान:- |
समयानुसार प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होणारे ज्ञानी योगी तू आत्मा भव ज्ञानाचा अर्थ आहे समज. हुशार त्याला म्हटले जाते जो समयानुसार हुशारीने कार्य करून सफलता प्राप्त करेल. हुशार असल्याची निशाणी आहे ते कधीही धोका खाऊ शकत नाहीत. आणि योगीची निशाणी आहे क्लीन आणि क्लिअर बुद्धी. ज्याची बुद्धी क्लीन आणि क्लिअर आहे तो कधीही असे म्हणणार नाही की, ‘माहित नाही असे का झाले!’ हे शब्द ज्ञानी आणि योगी आत्मे बोलू शकत नाहीत, ते प्रत्येक कार्यामध्ये ज्ञान आणि योगाचा वापर करतात. |
| सुविचार:- | अचल-अडोल तेच राहतात जे आपल्या आदि-अनादि संस्कार-स्वभावाला लक्षात ठेवतात. |