| 07.10.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हा मुलांना कुंभी पाक नरकातून बाहेर काढण्यासाठी, तुम्ही मुलांनी बाबांना निमंत्रण देखील यासाठीच दिले आहे” | |
| प्रश्न:- | तुम्ही मुले खूप मोठे मोठ्यात मोठे कारागीर आहात - ते कसे? तुमची कारागिरी कोणती आहे? |
| उत्तर:- | आम्ही मुले अशी कारागिरी करतो ज्यामुळे सारी दुनियाच नवीन बनते, त्यासाठी आम्ही कोणती वीट अथवा घमेले इत्यादी उचलत नाही परंतु आठवणीच्या यात्रेद्वारे नवीन दुनिया बनवितो. आम्हाला आनंद आहे की आम्ही नवीन दुनियेची कारागिरी (सुंदर रचना) करत आहोत. आम्हीच मग अशा स्वर्गाचे मालक बनणार आहोत. |
ओम् शांती. गोड-गोड रुहानी मुलांप्रति रूहानी बाबा समजावून सांगत आहेत, तुम्ही जेव्हा आपापल्या गावातून निघता तेव्हा हे बुद्धीमध्ये असते की आम्ही शिवबाबांच्या पाठशाळेमध्ये जात आहोत. असे नाही की कोणत्या साधु-संत इत्यादीचे दर्शन करण्यासाठी अथवा शास्त्र इत्यादी ऐकण्यासाठी येता. तुम्ही जाणता, आम्ही शिवबाबांकडे जात आहोत. दुनियेतील मनुष्य तर समजतात ‘शिव’ तर वर राहतात. ते जेव्हा आठवण करतात तेव्हा डोळे उघडे ठेवून बसत नाहीत, ते डोळे बंद करून ध्यानामध्ये बसतात. शिवलिंग बघितलेले असते. शिवाच्या मंदिरात गेले तरी देखील शिवची आठवण करताना वर बघतील नाहीतर मंदिराची आठवण येईल. बरेचजण तर डोळे बंद करून बसतात. असे समजतात दृष्टी कुठे नावा-रूपामध्ये जर गेली तर आपली साधना भंग होईल. आता तुम्ही मुले जाणता आम्हीसुद्धा शिवबाबांची आठवण करत होतो. कोणी श्रीकृष्णाची आठवण करतात, कोणी रामाची आठवण करतात, कोणी आपल्या गुरुची आठवण करतात. गुरुचे देखील छोटे लॉकेट बनवून घालतात. गीतेचे देखील अगदी छोटे लॉकेट बनवून घालतात. भक्ती मार्गामध्ये तर सर्व असेच आहे. घरी बसून देखील आठवण करतात. आठवण करत यात्रा करण्यासाठी देखील जातात. प्रतिमा तर घरी ठेवून त्याची पूजा करू शकतात परंतु हा देखील भक्तीचा रिवाज पडलेला आहे. जन्म-जन्मानंतर यात्रेला जातात. चार धामची यात्रा करतात. चार धाम का म्हणतात? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण… चारही दिशांना फेरी मारतात. भक्तीमार्ग जेव्हा सुरू होतो तेव्हा आधी एकाचीच भक्ती केली जाते, त्याला म्हटले जाते अव्यभिचारी भक्ती. सतोप्रधान होते, आता तर यावेळी तमोप्रधान आहेत. भक्ती देखील व्यभिचारी, अनेकांची आठवण करत राहतात. तमोप्रधान ५ तत्वांनी बनलेले शरीर, त्याची देखील पूजा करतात. तर जणू तमोप्रधान भूतांची पूजा करतात, परंतु या गोष्टींना कोणी समजतात थोडेच. भले इथे बसले आहेत परंतु बुद्धीयोग कुठेतरी भटकत राहतो. इथे तर तुम्हा मुलांना डोळे बंद करून शिवबाबांची आठवण करायची नाहीये. तुम्ही जाणता - बाबा, खूप दूरच्या देशाचे रहिवासी आहेत. ते येऊन मुलांना श्रीमत देतात. श्रीमतावर चालल्यानेच श्रेष्ठ देवता बनाल. देवतांची सर्व राजधानी स्थापन होत आहे. तुम्ही इथे बसून आपले देवी-देवतांचे राज्य स्थापन करत आहात. अगोदर तुम्हाला थोडेच माहिती होते की ते कसे स्थापन होते. आता जाणता बाबा आमचे पिता देखील आहेत, शिक्षक बनून शिकवतात आणि मग सोबत देखील घेऊन जातील, सद्गती करतील. गुरु लोक कोणाची सद्गती करत नाहीत. इथे तुम्हाला समजावून सांगितले जाते - हे एकच पिता, शिक्षक, आणि सद्गुरु आहेत. बाबांकडून वारसा मिळतो, सद्गुरु जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये घेऊन जाणार. या सर्व गोष्टींना वृद्ध माता तर समजू शकणार नाहीत. त्यांच्यासाठी मुख्य गोष्ट आहे - स्वतःला आत्मा समजून शिवबाबांची आठवण करायची आहे. आम्ही शिवबाबांची मुले आहोत, आम्हाला बाबा स्वर्गाचा वारसा देतात. वृद्ध मातांना मग अशा बोबड्या भाषेमध्ये बसून समजावून सांगितले पाहिजे. हा तर प्रत्येक आत्म्याचा अधिकार आहे बाबांकडून वारसा घेणे. मृत्यू तर समोर उभा आहे. जुनी दुनिया तिच परत नवीन जरूर बनणार आहे. नवीन जुनी बनते. घर तयार होण्यासाठी किती थोडे महिने लागतात आणि मग जुने होण्यासाठी शंभर वर्षे लागतात.
आता तुम्ही मुले जाणता ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. हे युद्ध जे आता होते ते मग ५००० वर्षानंतर पुन्हा होईल. या सर्व गोष्टी वृद्ध माता तर समजू शकणार नाहीत. हे मग ब्राह्मणींचे काम आहे त्यांना समजावून सांगणे. त्यांच्यासाठी तर एकच शब्द पुरेसा आहे - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. तुम्ही आत्मे परमधाममध्ये राहणारे आहात. मग इथे शरीर घेऊन पार्ट बजावता. आत्मा इथेच दुःखाचा आणि सुखाचा पार्ट बजावते. मूळ गोष्ट बाबा सांगतात - ‘माझी आठवण करा आणि सुखधामची आठवण करा’. बाबांची आठवण केल्याने पापे नष्ट होतील आणि मग स्वर्गामध्ये याल. आता जेवढी जो आठवण करेल तेवढी पापे नष्ट होतील. वृद्ध मातांना तर सवय झाली आहे, सत्संगामध्ये जाऊन कथा ऐकतात. त्यांना मग वारंवार बाबांची आठवण करून द्यायची आहे. शाळेमध्ये तर अभ्यास शिकायचा असतो, कथा ऐकायची नसते. भक्तीमार्गामध्ये तर तुम्ही पुष्कळ कथा ऐकल्या आहेत परंतु त्याने काहीही फायदा होत नाही. घाणेरड्या दुनियेतून नवीन दुनियेमध्ये तर जाऊ शकत नाही. मनुष्य तर ना रचयिता पित्याला, ना रचनेला जाणत. नेती-नेती (आम्हाला ठाऊक नाही) म्हणतात. तुम्ही देखील आधी जाणत नव्हता. आता तुम्ही भक्तिमार्गाला चांगल्या प्रकारे जाणले आहे. घरामध्ये देखील बऱ्याचजणांकडे मुर्त्या असतात, वस्तू तीच आहे, काही-काही पती देखील पत्नीला म्हणतात - तू घरामध्ये मूर्ती ठेवून त्याची पूजा करत बस. बाहेर त्रास सहन करण्यासाठी का जातेस, परंतु तिची भावना असते. आता तुम्ही समजता तीर्थ यात्रा करणे म्हणजे भक्तिमार्गातील त्रास सहन करणे आहे. अनेकदा तुम्ही ८४ चे चक्र फिरले आहात. सतयुग-त्रेतामध्ये तर कोणती यात्रा असत नाही. तिथे कोणते मंदिर वगैरे असत नाही. या यात्रा इत्यादी सर्व भक्तिमार्गामध्येच करतात. ज्ञानमार्गामध्ये हे सर्व काही करत नाहीत. त्याला म्हटले जाते भक्ती. ज्ञान देणारा तर एकाशिवाय दुसरा कोणीही नाही. ज्ञानाद्वारेच सद्गती होते. सद्गती दाता एक बाबाच आहेत. शिवबाबांना काही श्री श्री म्हणत नाहीत, त्यांना अशा टायटलची (उपाधीची) आवश्यकताच नाही. त्यांना म्हणतातच ‘शिवबाबा’, ही तर स्तुती करतात. तुम्ही बोलावता - ‘शिवबाबा, आम्ही पतित बनलो आहोत, आम्हाला येऊन पावन बनवा’. भक्तीमार्गाच्या दलदलीमध्ये गळ्यापर्यंत अडकले आहेत. अडकल्यावर मग ओरडतात, विषय वासनेच्या दलदली मध्ये एकदम अडकून पडतात. शिडी खाली उतरता-उतरता अडकून पडतात. कोणाच्याच लक्षात येत नाही, तेव्हा मग म्हणतात - ‘बाबा, आम्हाला यातून बाहेर काढा’. बाबांना देखील ड्रामा अनुसार यावेच लागते. बाबा म्हणतात - या सर्वांना दलदलीमधून बाहेर काढण्यासाठी मी बांधिल आहे. याला म्हटले जाते कुंभी-पाक नरक. रौरव नरक देखील म्हणतात. हे बाबा बसून समजावून सांगतात, त्यांना (दुनियावाल्यांना) थोडेच हे समजते.
तुम्ही बाबांना पहा कसे निमंत्रण देता. निमंत्रण तर कोणत्या लग्न-समारंभ इत्यादीमध्ये दिले जाते. तुम्ही म्हणता - ‘हे पतित-पावन बाबा, या पतित दुनियेमध्ये, रावणाच्या दुनियेमध्ये या. यामध्ये आम्ही गळ्यापर्यंत अडकलेले आहोत. बाबांशिवाय दुसरे कोणीही काढू शकणार नाही. म्हणतात देखील, ‘दूर देशाचे राहणारे शिवबाबा’, हा रावणाचा देश आहे. सर्वांची आत्मा तमोप्रधान झाली आहे म्हणून बोलावता देखील की येऊन पावन बनवा. ‘पतित-पावन सिताराम’, असे गात-आळवत राहतात. असे नाही की ते पवित्र राहतात. ही दुनियाच पतित आहे, रावण राज्य आहे, यामध्ये तुम्ही अडकून पडले आहात. तर मग तुम्ही मला हे निमंत्रण दिले आहे - ‘बाबा, येऊन आम्हाला कुंभी-पाक नरकातून बाहेर काढा. तर बाबा आले आहेत. तुमचे किती आज्ञाधारक सेवक आहेत. ड्रामामध्ये अपार दुःख तुम्हा मुलांनीच बघितली आहेत. वेळ पुढे सरकत राहतो. एक सेकंद दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. आता बाबा तुम्हाला लक्ष्मी-नारायणासारखे बनवत आहेत; मग तुम्ही अर्धा कल्प राज्य करणार - स्मृतीमध्ये आणा. आता वेळ फार थोडा आहे. मृत्यूचे तांडव सुरू होईल तेव्हा मनुष्य गोंधळून जातील. थोड्याच वेळात काहीही होईल. अनेकांचे तर केवळ आवाज ऐकूनच हार्ट फेल होईल. असे मरतील की काही विचारू नका. बघा वृद्ध माता पुष्कळ आल्या आहेत. बिचाऱ्या काहीच समजू शकत नाहीत. जसे तीर्थयात्रेला जातात ना, तर एकमेकांना बघून ‘आम्ही देखील येतो’, असे म्हणून यायला तयार होतात.
आता तुम्ही जाणता भक्ती मार्गातील तीर्थयात्रेचा अर्थच आहे खाली उतरणे, तमोप्रधान बनणे. तुमची मोठ्यात मोठी यात्रा ही आहे, ज्याने तुम्ही पतित दुनिये मधून पावन दुनिये मध्ये जाता. तर या मुलींना थोडी तरी शिवबाबांची आठवण करून देत रहा. शिवबाबांचे नाव लक्षात आहे? थोडे जरी ऐकतील तर स्वर्गामध्ये येतील. हे फळ जरूर मिळणार आहे. बाकी पद तर मिळणार आहे अभ्यासाने. त्यामध्ये खूप फरक पडतो. उच्च ते उच्च आणि मग कनिष्ठ ते कनिष्ठ, रात्रं-दिवसाचा फरक पडतो. कुठे पंतप्रधान, कुठे नोकर-चाकर. राजधानीमध्ये नंबरवार असतात. स्वर्गामध्ये देखील राजधानी असेल. परंतु तिथे पाप-आत्मे घाणेरडे विकारी असणार नाहीत. ती आहेच निर्विकारी दुनिया. तुम्ही म्हणाल - ‘आम्ही हे लक्ष्मी-नारायण नक्की बनणार’. तुम्हाला हात वर करताना पाहून सर्व वृद्ध माता देखील हात वर करतील. समजत काहीच नाहीत. तरीदेखील बाबांकडे आल्या आहेत तर स्वर्गामध्ये तर जातील परंतु सर्वजणी अशा (लक्ष्मी-नारायण) थोड्याच बनतील. प्रजा देखील बनेल. बाबा म्हणतात, मी गरिबांचा कैवारी आहे, तर बाबा गरिबांना पाहून खुश होतात. भले कितीही मोठ्यात-मोठे श्रीमंत पदमपती आहेत, त्यांच्यापेक्षा देखील हे गरीब २१ जन्मांसाठी उच्च पद प्राप्त करतील. हे देखील चांगले आहे. वृद्ध माता जेव्हा येतात तेव्हा बाबांना आनंद होतो की श्रीकृष्ण पुरीमध्ये तर जातील ना. ही आहे रावण पुरी, जे चांगल्या रीतीने शिकतील ते श्रीकृष्णाला देखील मांडीवर खेळवतील. प्रजा थोडीच आत येऊ शकेल. ते तर कधीतरी दर्शन घेतील. जसे पोप खिडकीतून दर्शन देतात, तर दर्शन घेण्यासाठी लाखोंनी गोळा होतात. परंतु त्यांचे आपण काय दर्शन घेणार. सदा पावन तर एक बाबाच आहेत जे येऊन तुम्हाला पावन बनवतात. साऱ्या विश्वाला सतोप्रधान बनवतात. तिथे ही ५ भूते असणार नाहीत. ५ तत्व देखील सतोप्रधान बनतात, तुमची गुलाम बनतात. कधीही अशी गर्मी होणार नाही ज्यामुळे नुकसान होईल. ५ तत्व देखील कायद्यानुसार चालतात. अकाली मृत्यू होत नाही. आता तुम्ही स्वर्गामध्ये जात आहात तर नरकातून बुद्धीयोग काढून टाकला पाहिजे. जसे नवीन घर बनवतात तर जुन्या मधून बुद्धी निघून जाते. बुद्धी नवीन घरामध्ये जाते, ही तर मग आहे बेहदची गोष्ट. नवीन दुनियेची स्थापना होत आहे, जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. तुम्ही आहात नवीन दुनिया स्वर्ग बनविणारे. तुम्ही अतिशय उत्तम कारागीर (उत्तम रचनाकार) आहात. स्वतःसाठी स्वर्ग बनवत आहात. किती महान उत्तम कारागीर आहात, आठवणीच्या यात्रेद्वारे नवीन दुनिया स्वर्ग बनवता. थोडी जरी आठवण कराल तर स्वर्गामध्ये याल. तुम्ही गुप्त वेशामध्ये आपला स्वर्ग बनवत आहात. तुम्ही जाणता, आपण या शरीराला सोडून मग जाऊन स्वर्गामध्ये निवास करणार तर अशा बेहदच्या बाबांना विसरता कामा नये. आता तुम्ही स्वर्गामध्ये जाण्यासाठी शिकत आहात. आपली राजधानी स्थापन करण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. ही रावणाची राजधानी नष्ट होणार आहे. तर आतून किती आनंद झाला पाहिजे. आपण तर हा स्वर्ग अनेक वेळा बनवला आहे, राज्य घेतले आणि मग गमावले आहे. याची जरी आठवण केलीत तरी खूप चांगले. आपण स्वर्गाचे मालक होतो, बाबांनी आम्हाला असे बनवले होते. बाबांची आठवण कराल तर तुमची पापे भस्म होतील. किती सहजपणे तुम्ही स्वर्गाची स्थापना करत आहात. जुन्या दुनियेच्या विनाशासाठी कितीतरी गोष्टी पुढे येत राहतात. नैसर्गिक आपदा, मुसळ (मिसाईल्स) इत्यादी द्वारे सारी जुनी दुनिया नष्ट होईल. आता बाबा आले आहेत तुम्हाला श्रेष्ठ मत देण्यासाठी, श्रेष्ठ स्वर्गाची स्थापना करण्यासाठी. तुम्ही अनेकदा अशी स्थापना केली आहे तर बुद्धीमध्ये हे लक्षात ठेवले पाहिजे. अनेकदा राज्य घेतले आहे आणि गमावले आहे. बुद्धीमध्ये हा विचार चालत रहावा आणि या गोष्टी एक-दोघांनाही सांगा. दुनियादारीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. बाबांची आठवण करा, स्वदर्शन चक्रधारी बना. इथे मुलांनी व्यवस्थित ऐकून मग त्यावर खूप मंथन करायचे आहे, चिंतन करायचे आहे की, आज बाबांनी काय सांगितले. शिवबाबांची आणि वारशाची तर जरूर आठवण केली पाहिजे. बाबा तळहातावर बहीश्त (स्वर्ग) घेऊन आले आहेत, तर पवित्र देखील बनायचे आहे. पवित्र बनला नाहीत तर दंड भोगावा लागेल. पद देखील खूप कमी दर्जाचे मिळवणार. स्वर्गामध्ये उच्च पद प्राप्त करायचे असेल तर चांगल्या प्रकारे धारणा करा. बाबा रस्ता तर खूप सोपा सांगतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- २) बाबांच्या आठवणीमध्ये डोळे बंद करून बसायचे नाही. श्रीकृष्णाच्या राजधानीमध्ये येण्यासाठी चांगला अभ्यास करायचा आहे.
| वरदान:- | मन-बुद्धीला झमेल्यांपासून (झंझटांपासून) दूर ठेवून भेटीचा उत्सव साजरा करणारे झमेलामुक्त भव बरीच मुले विचार करतात की हे झंझट संपले तर माझी अवस्था आणि सेवा चांगली होईल; परंतु झंझटे पहाडासमान असतात. पहाड हलणार नाही, परंतु जिथे झंझट असेल तिथून आपल्या मन-बुद्धीला दूर करा किंवा उडत्या कलेद्वारे झंझाटवाल्या पहाडाच्या देखील वर निघून जा तर पहाड देखील तुम्हाला सोपा असल्याचा अनुभव होईल. झंझाटांच्या दुनियेमध्ये झंझटे तर येणारच, तुम्ही मुक्त रहा तर भेटीचा उत्सव साजरा करू शकाल. |
| बोधवाक्य:- | या बेहदच्या नाटकामध्ये हिरो पार्ट बजावणारेच हिरो पार्टधारी आहेत. |