| 09.10.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - विश्वाचे राज्य बाहुबळाने घेता येत नाही, त्यासाठी योगबल पाहिजे, हा देखील एक लॉ आहे” | |
| प्रश्न:- | स्वतः शिवबाबांनाच स्वतःच्या बाबतीत कोणते आश्चर्य वाटते? |
| उत्तर:- | बाबा म्हणतात, बघा कसे आश्चर्य आहे - मी तुम्हाला शिकवतो, हे मी कोणाकडूनही कधीच शिकलेलो नाही. माझे कोणी पिता नाहीत, माझा कोणी टीचर नाही, गुरु नाही. मी सृष्टी चक्रामध्ये पुनर्जन्म घेत नाही तरी देखील तुम्हाला सर्व जन्मांची कहाणी ऐकवतो. स्वतः ८४ च्या चक्रामध्ये येत नाही परंतु चक्राचे ज्ञान एकदम ॲक्युरेट देतो. |
ओम् शांती. रूहानी बाबा तुम्हा मुलांना स्वदर्शन चक्रधारी बनवतात अर्थात तुम्हाला या ८४ च्या चक्राची माहिती होते. आधी जाणत नव्हता. आता बाबांकडून तुम्हाला माहित झाले आहे. ८४ जन्मांच्या चक्रामध्ये तुम्ही येता जरूर. तुम्हा मुलांना ८४ च्या चक्राचे नॉलेज देतो. मी स्वदर्शन चक्रधारी आहे परंतु प्रॅक्टिकलमध्ये ८४ जन्मांच्या चक्रामध्ये येत नाही. तर यावरून समजून गेले पाहिजे की, शिवबाबांमध्ये सर्व ज्ञान आहे. तुम्ही जाणता, आपण ब्राह्मण आता स्वदर्शन चक्रधारी बनतो. बाबा बनत नाहीत. मग त्यांच्यामध्ये अनुभव कुठून आला? आम्हाला तर अनुभव प्राप्त होतो. बाबा अनुभव कुठून आणतात जो तुम्हाला ऐकवतात? प्रॅक्टिकलमध्ये अनुभव असायला हवा ना. बाबा म्हणतात - ‘मला ज्ञानाचा सागर म्हणतात, परंतु मी तर ८४ जन्मांच्या चक्रामध्ये येत नाही. मग माझ्यामध्ये हे ज्ञान कुठून आले?’ टीचर शिकवतो तर जरूर स्वतः शिकलेला आहे ना. हे शिवबाबा कसे शिकले? जर ते स्वतः ८४ जन्मांमध्ये येत नाहीत तर त्यांना ८४ च्या चक्रा विषयी कसे काय माहित झाले. बाबा बीजरूप असल्यामुळे जाणतात. स्वतः ८४ च्या चक्रामध्ये येत नाहीत. परंतु तुम्हाला सर्वकाही समजावून सांगतात, हे देखील केवढे आश्चर्य आहे. असे देखील नाही की, बाबा कोणते शास्त्र इत्यादी शिकले आहेत. म्हटले जाते - ड्रामा अनुसार त्यांच्यामध्ये हे नॉलेज नोंदलेले आहे जे तुम्हाला ऐकवतात. तर वंडरफुल टीचर आहेत ना. आश्चर्य वाटले पाहिजे ना म्हणून यांना मोठी-मोठी नावे दिली गेली आहेत. ईश्वर, प्रभू, अंतर्यामी इत्यादी इत्यादी. तुम्हाला आश्चर्य वाटते की, ईश्वरामध्ये कसे सर्व नॉलेज भरलेले आहे! त्यांच्यामध्ये आले कुठून जे तुम्हाला समजावून सांगतात? त्यांचा तर कोणी पिता देखील नाही, ज्यांच्यापासून जन्म घेतला असेल किंवा समजले असेल. तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात. ते एकच कसे तुमचे पिता आहेत, बिजरूप आहेत. केवढे नॉलेज बसून मुलांना ऐकवतात. ते म्हणतात ८४ जन्म मी घेत नाही, तुम्ही घेता. तर जरूर प्रश्न निर्माण होईल ना - बाबा तुम्हाला कसे माहित झाले. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, अनादी ड्रामा अनुसार माझ्यामध्ये आधीपासूनच हे नॉलेज आहे, जे तुम्हाला शिकवतो म्हणूनच मला उच्च ते उच्च भगवान म्हटले जाते’. स्वतः चक्रामध्ये येत नाहीत परंतु त्यांच्यामध्ये साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज आहे. तर तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे. त्यांना ८४ च्या चक्राचे नॉलेज कुठून मिळाले? तुम्हाला तर मिळाले बाबांकडून. बाबांमध्ये मुळातच नॉलेज आहे. त्यांना म्हटलेच जाते नॉलेजफुल. कोणाकडून शिकले देखील नाही आहेत. तरी देखील त्यांना मूळ ज्ञान (सत्य ज्ञान) आहे म्हणूनच त्यांना नॉलेजफुल म्हटले जाते. हे अद्भुत आहे ना म्हणून याचे ‘सर्वश्रेष्ठ शिक्षण’ असे गायन आहे. मुलांना बाबांचे आश्चर्य वाटते. त्यांना नॉलेजफुल का म्हटले जाते - एक तर ही समजून घेण्याची गोष्ट आहे, दुसरी मग कोणती गोष्ट आहे? हे चित्र तुम्ही दाखवता तर कोणी विचारेल की, ब्रह्मामध्ये देखील त्यांची स्वतःची आत्मा असेल आणि हे जे नारायण बनतात त्यांच्यामध्ये देखील त्यांची स्वतःची आत्मा असेल. दोन आत्मे आहेत ना. एक ब्रह्माची, एक नारायणाची. परंतु विचार केला तर हे काही दोन आत्मे नाहीत. आत्मा एकच आहे. हे एक देवतांचे सॅम्पल दाखवले जाते. हे ब्रह्मा सो विष्णू अर्थात नारायण बनतात, याला म्हटले जाते गूढ गोष्टी. बाबा अतिशय गूढ नॉलेज ऐकवितात जे बाबांशिवाय इतर कोणीही शिकवू शकणार नाही. तर ब्रह्मा आणि विष्णूचे काही दोन आत्मे नाही आहेत. तसेच सरस्वती आणि लक्ष्मी - या दोघींचे दोन आत्मे आहेत का एक? आत्मा एक आहे, शरीरे दोन आहेत. ही सरस्वतीच मग लक्ष्मी बनते म्हणून एक आत्मा गणली जाईल. ८४ जन्म एकच आत्मा घेते. ही नीट समजून घेण्याची गोष्ट आहे. ब्राह्मण सो देवता, देवता सो क्षत्रिय बनतात. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. आत्मा एकच आहे, हे एक सॅम्पल दाखवले जाते की, कसे ब्राह्मण सो देवता बनतात. ‘हम सो’ चा अर्थ किती सुंदर आहे. याला म्हटले जाते अति गूढ गोष्टी. यामध्ये देखील सर्वप्रथम तर हे समजून घेतले पाहिजे की आपण सर्व एकाच पित्याची मुले आहोत. सर्व आत्मे खरेतर परमधाममध्ये राहणारे आहेत. इथे पार्ट बजावण्यासाठी आले आहेत. हा खेळ आहे. बाबा तुम्हाला या खेळाचा समाचार बसून ऐकवतात. बाबा तर सत्य जाणतातच. त्यांना कोणीही शिकवलेले नाही आहे. या ८४ च्या चक्राला तेच जाणतात जे या वेळी तुम्हाला ऐकवतात. परत तुम्ही विसरता. मग त्याचे शास्त्र कसे बनू शकते. बाबा तर काही शास्त्र शिकलेले नाहीत. मग कसे येऊन नवीन-नवीन गोष्टी ऐकवतात; अर्धा कल्प आहे भक्तीमार्ग, ही गोष्ट देखील शास्त्रांमध्ये नाही आहे. ही शास्त्रे देखील ड्रामा अनुसार भक्तीमार्गामध्ये बनली आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये या ड्रामाचे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती मोठे नॉलेज आहे. त्यांना जरूर मनुष्य तनाचा आधार घ्यावा लागेल. शिवबाबा या ब्रह्मा तनामध्ये बसून या सृष्टी चक्राचे नॉलेज ऐकवतात. मनुष्यांनी तर थापा मारून सृष्टीचा कालावधीच किती मोठा केला आहे. नवीन दुनिया तीच जुनी दुनिया बनते. नवीन दुनियेला म्हटले जाते - स्वर्ग, जुन्या दुनियेला म्हटले जाते - नरक. दुनिया तर एकच आहे. नवीन दुनियेमध्ये राहतात देवी-देवता. तिथे अपार सुख आहे. सारी सृष्टी नवीन होते. आता तिला जुनी म्हटली जाते. नावच आहे आयरन एजड वर्ल्ड (कलियुगी दुनिया). जसे ‘ओल्ड दिल्ली’ आणि ‘न्यू दिल्ली’ म्हटले जाते. बाबा समजावून सांगतात - ‘गोड-गोड मुलांनो, नवीन दुनियेमध्ये नवीन दिल्ली असणार. हे (दुनियावाले) तर जुन्या दुनियेमध्येच म्हणतात - न्यू दिल्ली. याला नवीन कसे म्हणणार! बाबा समजावून सांगत आहेत - नवीन दुनियेमध्ये नवीन दिल्ली असणार. तिथे हे लक्ष्मी-नारायण राज्य करतील. त्याला म्हटले जाईल - सतयुग. तुम्ही या साऱ्या भारतावर राज्य कराल. तुमची राजधानी यमुनेच्या काठावर असेल. शेवटी रावण राज्याची राजधानी देखील इथेच आहे. राम राज्याची राजधानी देखील इथेच असणार. ‘दिल्ली’, हे नाव असणार नाही. त्याला ‘परिस्तान’ म्हटले जाते. मग जो जसा राजा असेल तो आपल्या राजधानीचे असे नाव ठेवतो. यावेळी तुम्ही सर्व जुन्या दुनियेमध्ये आहात. नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी तुम्ही शिकत आहात. पुन्हा मनुष्यापासून देवता बनत आहात. शिकवणारे आहेत बाबा.
तुम्ही जाणता - उच्च ते उच्च बाबांनी खाली येऊन राजयोग शिकवला आहे. आता तुम्ही आहात संगमावर जेव्हा कलियुगी जुनी दुनिया नष्ट होणार आहे. बाबांनी याचा हिशोब देखील सांगितला आहे, ‘मी ब्रह्मातनामध्ये येतो’. मनुष्यांना माहितच नाही आहे की कोणता ब्रह्मा? प्रजापिता ब्रह्मा ऐकले आहे. तुम्ही ब्रह्माची प्रजा आहात ना म्हणून स्वतःला बी.के. संबोधता. खरेतर शिवबाबांची मुले शिववंशी आहात जेव्हा निराकार आत्मे आहात; मग साकारमध्ये प्रजापिता ब्रह्माची मुले भाऊ-बहीणी आहात दुसरे कोणतेही नाते नाही. यावेळी तुम्ही त्या कलियुगी नात्याला विसरता कारण त्यामध्ये बंधन आहे. तुम्ही जाता नवीन दुनियेमध्ये. ब्राह्मणांची शेंडी असते ना. शेंडी ब्राह्मणांची निशाणी आहे. तुम्हा ब्राह्मणांचे हे कुळ आहे. ते (या दुनियेतील) आहेत कलियुगी ब्राह्मण. ब्राह्मण जास्त करून पंडे (मार्गदर्शक) असतात. एक आहेत ते धामा खातात (श्राद्धाचे भोजन खातात), दुसरे ब्राह्मण गीता ऐकवतात. आता तुम्ही ब्राह्मण ही गीता ऐकवता; ते देखील गीता ऐकवतात, तुम्ही देखील गीता ऐकवता. फरक बघा किती आहे! तुम्ही म्हणता - कृष्णाला भगवान म्हणू शकत नाही. कृष्णाला तर देवता म्हटले जाते. त्याच्यामध्ये दैवी गुण आहेत. त्याला तर या दोन डोळ्यांनी पाहू शकतो. शिवाच्या मंदिरामध्ये बघाल तर शिवला स्वतःचे शरीर नाही आहे. ते आहेत परम-आत्मा अर्थात परमात्मा. ईश्वर, प्रभू, भगवान इत्यादी शब्दांचा कोणताही अर्थ निघत नाही. परमात्माच सुप्रीम आत्मा आहेत. तुम्ही नॉन-सुप्रीम आहात. तुमच्या आत्म्यामध्ये आणि त्यांच्या आत्म्यामध्ये फरक बघा किती आहे. तुम्ही आत्मे आता परमात्म्याकडून शिकत आहात. ते कोणाकडूनही शिकलेले नाहीत. ते तर पिता आहेत ना. त्या परमपिता परमात्म्याला तुम्ही पिता देखील म्हणता, शिक्षक देखील म्हणता आणि गुरु देखील म्हणता. आहेत एकच. आणखी कोणतीही आत्मा पिता, टीचर, गुरु बनू शकत नाही. एकच परम-आत्मा आहे त्यांना म्हटले जाते सुप्रीम. प्रत्येकाला आधी पिता पाहिजे, नंतर टीचर पाहिजे आणि शेवटी पाहिजे गुरु. बाबा देखील म्हणतात - मी तुमचा पिता देखील बनतो, मग टीचर बनतो आणि मग मीच तुमचा सद्गती दाता सद्गुरु सुद्धा बनतो. सद्गती देणारा गुरु आहेच एक. बाकी गुरु तर अनेक आहेत. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा सर्वांना सद्गती देतो, तुम्ही सर्व सतयुगामध्ये जाणार बाकीचे सर्व जातील शांतीधामला, ज्याला परमधाम म्हणतात’. सतयुगामध्ये आदि सनातन देवी-देवता धर्म होता. दुसरा कोणताही धर्म नाही, बाकी सर्व आत्मे निघून जातात मुक्तीधामला. सद्गती म्हटले जाते सतयुगाला, पार्ट बजावता-बजावता मग दुर्गतीमध्ये येतात. तुम्हीच सद्गती मधून मग दुर्गतीमध्ये येता. तुम्हीच पूर्ण ८४ जन्म घेता. यथा राजा-राणी तथा प्रजा जे त्यावेळेस असतील. नऊ लाख तर आधी येणार. ८४ जन्म, नऊ लाख तर घेतील ना नंतर मग बाकीचे येत राहतील - हा हिशोब केला जातो. जो बाबा समजावून सांगतात. सर्वच काही ८४ जन्म घेत नाहीत, सर्वात आधी येणारेच ८४ जन्म घेतात नंतरचे कमी-कमी जन्म घेत जातात. जास्तीत-जास्त जन्म आहेत ८४, या ज्या गोष्टी आहेत त्या दुसरा कोणताही मनुष्य जाणत नाही. बाबाच बसून समजावून सांगतात. गीतेमध्ये आहे - भगवानुवाच. आता तुम्हाला समजले आहे - आदि सनातन देवी-देवता धर्म काही कृष्णाने रचलेला (स्थापन केलेला) नाही. तो तर बाबाच स्थापन करतात. कृष्णाच्या आत्म्याने ८४ जन्मांच्या अंतीम जन्मामध्ये हे ज्ञान ऐकले आहे जो पहिल्या नंबरमध्ये आला. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. रोजचा अभ्यास करायचा आहे, तुम्ही भगवंताचे स्टुडंट आहात. भगवानुवाच आहे ना - ‘मी तुम्हाला राजांचाही राजा बनवितो’. ही आहे जुनी दुनिया, नवीन दुनिया अर्थात सतयुग. आता आहे कलियुग. बाबा येऊन ‘कलियुगी पतिता’ पासून ‘सतयुगी पावन’ देवता बनवितात म्हणून कलियुगी मनुष्य बोलावतात - ‘बाबा, येऊन आम्हाला पावन बनवा. कलियुगी पतिता पासून सतयुगी पावन बनवा’. फरक बघा किती आहे. कलियुगामध्ये आहे अपार दुःख. बाळ जन्मले की आनंद होईल, उद्या मृत्यू झाला तर मग दुःखी होणार. पूर्ण आयुष्यभर किती दुःख होते. ही आहेच दुःखाची दुनिया. आता बाबा सुखाची दुनिया स्थापन करत आहेत. तुम्हाला स्वर्गवासी देवता बनवितात. आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर आहात. उत्तम ते उत्तम पुरुष अथवा नारी बनता. तुम्ही येताच हे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी. स्टुडंट टीचरची आठवण ठेवतात कारण समजतात यांच्याद्वारे आपण शिकून अमके बनणार. इथे तुम्ही योग लावता परमपिता परमात्मा शिव सोबत, जे तुम्हाला देवता बनवितात. म्हणतात - ‘मज आपल्या पित्याची आठवण करा, ज्यांची तुम्ही शाळीग्राम मुले आहात. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तेच नॉलेजफुल आहेत’. बाबा तुम्हाला खरी गीता ऐकवतात परंतु स्वतः शिकलेले नाहीत. असे म्हणतात - ‘मी कोणाची संतान नाही, कोणाकडून शिकलेलो नाहीये. माझा कोणता गुरु नाही. आणि मग मी तुम्हा मुलांचा पिता, शिक्षक, सद्गुरु आहे’. त्यांना म्हटले जाते परम-आत्मा. या साऱ्या सृष्टीच्या आदि, मध्य, अंताला जाणतात, जोपर्यंत ते ऐकवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही आदि, मध्य अंताला समजू शकत नाही. या चक्राला जाणल्याने तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. तुम्हाला हे बाबा (ब्रह्मा बाबा) शिकवत नाही, यांच्यामध्ये शिवबाबा प्रवेश करून आत्म्यांना शिकवितात. ही नवीन गोष्ट आहे ना. हे असतातच संगमावर. जुनी दुनिया नष्ट होणार, ‘किसकी दबी रही धूल में, किसकी राजा खाए…’. मुलांना म्हणतात - अनेकांचे कल्याण करण्यासाठी, पुन्हा देवता बनविण्यासाठी ही पाठशाळा म्युझियम उघडा. जिथे खूपजण येऊन सुखाचा वारसा प्राप्त करतील. आता रावण राज्य आहे ना. राम राज्यामध्ये होते - सुख, रावण राज्यामध्ये आहे - दुःख कारण सर्व विकारी बनले आहेत. ती आहेच निर्विकारी दुनिया. मुले तर या लक्ष्मी-नारायणाला देखील आहेत ना. परंतु तिथे आहे योगबल. बाबा तुम्हाला योगबल शिकवतात. योगबलाद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनता, बाहुबलाने काही विश्वाचा मालक बनू शकत नाही. लॉ म्हणत नाही. तुम्ही मुले आठवणीच्या बळाने साऱ्या विश्वाची बादशाही घेत आहात. किती उच्च शिक्षण आहे. बाबा म्हणतात - सर्वप्रथम पवित्रतेची प्रतिज्ञा करा. पवित्र बनल्यानेच तुम्ही मग पवित्र दुनियेचे मालक बनणार. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- १) कलियुगी नाती जी यावेळी बंधन आहेत, त्यांना विसरून स्वतःला संगमयुगी ब्राह्मण समजायचे आहे. खरी गीता ऐकायची आणि ऐकवायची आहे.
- २) जुनी दुनिया नष्ट होणार आहे त्यामुळे आपले सर्वकाही सफल करायचे आहे. अनेकांच्या कल्याणासाठी, मनुष्यांना देवता बनविण्यासाठी ही पाठशाळा अथवा म्युझियम उघडायची आहेत.
| वरदान:- |
बाबांची आज्ञा समजून प्रत्येक गोष्टीला प्रेमापोटी सहन करणारे सहनशील भव बरीच मुले म्हणतात आम्ही बरोबर आहोत तरी देखील आम्हालाच सहन करावे लागते, मरावे लागते परंतु हे सहन करणे अथवा मरणे हेच धारणेच्या सब्जेक्टमध्ये नंबर घेणे आहे, त्यामुळे सहन करण्यामध्ये घाबरू नका. बरीच मुले सहन करतात परंतु नाईलाजाने सहन करणे आणि प्रेमापोटी सहन करणे - यामध्ये अंतर आहे. गोष्टींमुळे सहन करत नाही परंतु बाबांची आज्ञा आहे सहनशील बना. तर आज्ञा समजून प्रेमापोटी सहन करणे अर्थात स्वतःमध्ये परिवर्तन करणे याचेच मार्क्स आहेत. |
| बोधवाक्य:- | जे सदैव खुशीचा खुराक खातात, ते तंदुरुस्त (निरोगी) राहतात. |