| 10.10.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - उठता-बसता बुद्धीमध्ये ज्ञान घोळत रहावे तर अपार खुशीमध्ये रहाल” | |
| प्रश्न:- | तुम्हा मुलांना कोणाच्या संगती पासून स्वतःला खूप-खूप सांभाळायचे आहे? |
| उत्तर:- | ज्यांच्या बुद्धीमध्ये बाबांची आठवण राहत नाही, बुद्धी इकडे-तिकडे भटकत राहते, त्यांच्या संगती पासून तुम्ही स्वतःला सांभाळायचे आहे. त्यांच्या शरीराचा स्पर्श देखील होता कामा नये कारण आठवणीमध्ये न राहणारे वायुमंडळाला खराब करतात. |
| प्रश्न:- | मनुष्याला पश्चाताप कधी होईल? |
| उत्तर:- | जेव्हा त्यांना माहित होईल की यांना शिकविणारे स्वयं ईश्वर आहेत तर त्यांचे चेहरे काळवंडतील आणि पश्चात्ताप करतील की आम्ही चूक केली, शिक्षण घेतले नाही. |
ओम् शांती. आता रूहानी यात्रेला तर मुले चांगल्या रीतीने समजतात. हठयोगाची कोणतीही यात्रा असत नाही. ही आहे आठवण. आठवणीसाठी कोणताही त्रास होण्याचा प्रश्नच येत नाही. बाबांची आठवण करणे - यामध्ये कोणताही त्रास नाही आहे. हा क्लास आहे त्यामुळे फक्त नियमानुसार बसायचे असते. तुम्ही बाबांची संतान बनला आहात, मुलांची पालना होत आहे. कोणती पालना? अविनाशी ज्ञान रत्नांचा खजिना मिळत आहे. बाबांची आठवण करण्यामध्ये कोणताही त्रास नाहीये. फक्त माया बुद्धीचा योग तोडते. बाकी भले तुम्हाला हवे तसे बसा, त्याच्याशी आठवणीचा काहीही संबंध नाही. बरीच मुले हठयोगामध्ये तीन-चार तास बसतात. पूर्ण रात्रभर देखील बसतात. पूर्वी तुमची तर भट्टी होती, ती गोष्ट वेगळी होती, तिथे तुम्हाला कामधंदा तर नव्हता म्हणून हे शिकवले जात होते. आता बाबा म्हणतात तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये रहा. कामधंदा देखील भले करा. कोणतेही कामकाज करत असताना बाबांची आठवण करायची आहे. असेही नाही की आता तुम्ही निरंतर आठवण करू शकता. नाही. या अवस्थेला वेळ लागतो. आता निरंतर आठवण राहिली मग तर कर्मातीत अवस्था होईल. बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, ड्रामा प्लॅन अनुसार आता फार थोडा वेळ बाकी आहे’. सर्व हिशोब देखील बुद्धीमध्ये असतो. म्हणतात क्राईस्ट पासून ३ हजार वर्षांपूर्वी भारतच होता. त्याला स्वर्ग म्हटले जात होते. आता त्यांची २ हजार वर्षे पूर्ण झाली आहेत, ५००० वर्षांचा हिशोब होतो.
पाहिले जाते तुमच्या नावाचा बोलबाला सारा विदेशातूनच होईल कारण त्यांची बुद्धी भारतीयांपेक्षा देखील तीक्ष्ण आहे. ते भारताकडे शांततेची देखील मागणी करतात. भारतवासीयांनीच लाखो वर्षे म्हणून आणि सर्वव्यापीचे ज्ञान देऊन बुद्धी बिघडवून टाकली आहे. तमोप्रधान बनले आहेत. ते (विदेशी) इतके तमोप्रधान बनलेले नाहीत, त्यांची बुद्धी तर अतिशय कुशाग्र आहे. त्यांचा जेव्हा आवाज निघेल तेव्हा भारतवासी जागे होतील कारण भारतवासी एकदम घोर निद्रेमध्ये झोपलेले आहेत. ते (विदेशातील) थोडेच झोपलेले आहेत. त्यांच्याकडून चांगला आवाज निघेल; विदेशातून काहीजण आले देखील होते कि, ‘कोणीतरी आम्हाला सांगा की शांतता कशी होऊ शकते?’ कारण बाबा देखील भारतातच येतात. ही गोष्ट तर तुम्ही मुलेच सांगू शकता - दुनियेमध्ये ती शांती पुन्हा कधी आणि कशी होईल? तुम्ही मुले तर जाणता खरोखर पॅराडाईज अथवा हेवन होता. नवीन दुनियेमध्ये भारत पॅराडाईज होता. हे इतर कोणीही जाणत नाहीत. मनुष्यांच्या बुद्धीमध्ये ही गोष्ट पक्की झाली आहे की, ईश्वर सर्वव्यापी आहे आणि कल्पाची आयु लाखो वर्षे असल्याचे म्हटले आहे. सर्वात जास्त पत्थर-बुद्धी हे भारतवासीच बनले आहेत. ही गीता शास्त्रे इत्यादी सर्व आहेत भक्ती मार्गाची. तरीही हे सर्व असेच बनेल. भले ड्रामाला जाणतात तरी देखील बाबा तर पुरुषार्थ करवून घेतात. तुम्ही मुले जाणता विनाश तर जरूर होणार आहे. बाबा आलेच आहेत नव्या दुनियेची स्थापना करण्यासाठी. ही तर आनंदाची गोष्ट आहे ना. जेव्हा कोणी मोठी परीक्षा पास होतात तर आतून आनंद होतो ना. आम्ही हे सर्व पास करून हे देवता जाऊन बनणार. सर्वकाही अभ्यासावर अवलंबून आहे.
तुम्ही मुले जाणता - खरोखर बाबा आम्हाला शिकवून असे (देवता) बनवतात. खरोखर पॅराडाईज स्वर्ग होता. बिचारे मनुष्य तर अगदीच गोंधळून गेले आहेत. बेहदच्या बाबांकडे जे ज्ञान आहे ते तुम्हा मुलांना देत आहेत. बाबांची तुम्ही महिमा करता - बाबा नॉलेजफुल आहेत तर ब्लिसफुल देखील आहेत, खजिना देखील त्यांच्याजवळ फुल आहे. तुम्हाला इतके श्रीमंत कोणी बनवतो का? इथे तुम्ही का आला आहात? वारसा प्राप्त करण्यासाठी. जर एखाद्याचे आरोग्य चांगले आहे परंतु धन नसेल तर धना शिवाय तो करणार तरी काय! वैकुंठामध्ये तर तुमच्याकडे धन असते. तिथे जे-जे श्रीमंत आहेत, त्यांना अहंकार असतो की आमच्याकडे एवढे धन आहे, हे एवढे कारखाने इत्यादी आहेत. परंतु शरीर सोडले आणि संपले. तुम्ही तर जाणता आम्हाला बाबा २१ जन्मांकरिता इतका खजिना देतात. बाबा स्वतः काही खजिन्याचे मालक बनत नाहीत. तुम्हा मुलांना मालक बनवतात. हे देखील तुम्ही जाणता विश्वामध्ये शांती तर गॉडफादर शिवाय कोणीही स्थापन करू शकत नाही. सर्वात उत्तम चित्र आहे - हे त्रिमूर्ती गोळ्याचे. या चक्रामध्येच सारे ज्ञान भरलेले आहे. तुमची अशी कोणती वंडरफुल गोष्ट असेल तर ते समजतील यामध्ये जरूर कोणते असे रहस्य आहे. मुले अशी काही छोटी-छोटी खेळणी बनवतात, ते बाबांना आवडत नाही. बाबा तर म्हणतात, मोठी चित्रे लावा जी दुरूनही कोणी वाचून समजू शकतील. लोकं मोठ्या गोष्टीवर लक्ष देतील की यामध्ये क्लिअर दाखवलेले आहे, त्या बाजूला आहे कलियुग, या बाजूला आहे सतयुग. मोठ-मोठी चित्रे असतील तर लोकांचे लक्ष वेधले जाईल. टुरिस्ट सुद्धा बघतील, ते व्यवस्थित समजतील देखील. हे देखील जाणतात क्राईस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी स्वर्ग होता. बाहेरचे तर हे जाणत नाहीत. ५ हजार वर्षांचा हिशोब तुम्ही क्लियर करून सांगता तर हे चित्र इतके मोठे बनवले पाहिजे जे दुरूनही पाहू शकतील आणि वाचतील देखील, ज्यावरून समजतील की खरोखर दुनियेचा अंत तर आहे. बॉम्ब्स तर तयार होत राहतात. नैसर्गिक आपत्ती देखील येतील. तुम्ही विनाशाचे नाव ऐकता तर आतून खूप आनंद झाला पाहिजे. परंतु ज्ञानच नसेल तर आनंद सुद्धा होऊ शकणार नाही. बाबा म्हणतात - ‘देहा सहित सर्वकाही सोडून स्वतःला आत्मा समजा, आपल्या आत्म्याचा योग मज पित्यासोबत लावा’. ही आहे मेहनतीची गोष्ट. पावन बनून मगच पावन दुनियेमध्ये यायचे आहे. तुम्ही समजता आम्हीच बादशाही घेतो, आणि मग गमावतो. हे तर खूप सोपे आहे. उठता-बसता, चालता-फिरता आतमध्ये ज्ञान टपकत राहिले पाहिजे, जसे बाबांकडे ज्ञान आहे ना. बाबा आलेच आहेत शिकवून देवता बनविण्यासाठी. तर इतका अपार आनंद मुलांना झाला पाहिजे ना. स्वतःला विचारा - इतका अपार आनंद आहे? बाबांची इतकी आठवण करतो का? चक्राचे देखील सारे ज्ञान बुद्धीमध्ये आहे, तर इतका आनंद झाला पाहिजे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा आणि अतिशय आनंदामध्ये रहा. तुम्हाला शिकविणारा पहा कोण आहे! जेव्हा सर्वांना माहीत होईल तर सर्वांचा चेहराच काळवंडून जाईल. परंतु आता त्यांना समजायला अजून थोडा वेळ आहे. अजून देवता धर्माचे इतके मेंबर्स तर बनलेले नाहीत. अजून संपूर्ण राज्य स्थापन झालेले नाहीये. किती प्रचंड प्रमाणात मनुष्यांना बाबांचा संदेश द्यायचा आहे! बेहदचे बाबा पुन्हा आपल्याला स्वर्गाची बादशाही देत आहेत. तुम्ही देखील त्या बाबांची आठवण करा. बेहदचे बाबा तर जरूर बेहदचे सुख देतील ना. मुलांना तर आतून ती अथाह ज्ञानाची खुशी व्हायला हवी आणि जितकी बाबांची आठवण करत राहतील तर आत्मा पवित्र बनत जाईल.
ड्रामाच्या प्लॅन अनुसार तुम्ही मुले जितकी सेवा करून प्रजा बनवता तर ज्यांचे कल्याण होते त्यांचे मग आशीर्वाद देखील मिळतात. गरिबांची सेवा करता. निमंत्रण देत राहा. ट्रेनमध्ये देखील तुम्ही खूप सेवा करू शकता. इतक्या छोट्या बॅजमध्येच किती नॉलेज भरलेले आहे. सर्व शिक्षणाचे सार यामध्ये आहे. बॅजेस तर खूप चांगले-चांगले पुष्कळ बनवले पाहिजेत जे कोणालाही सौगात म्हणून सुद्धा देऊ शकतो. कोणालाही समजावून सांगणे तर खूप सोपे आहे. फक्त शिवबाबांची आठवण करा. शिवबाबांकडूनच वारसा मिळतो तर बाबा आणि बाबांचा वारसा - स्वर्गाची बादशाही, कृष्णपुरीची आठवण करा. मनुष्यांचे मत तर किती गोंधळात टाकणारे आहे. काहीही समजत नाहीत. विकारासाठी किती त्रास देतात. काम वासनेच्यामागे किती मरत असतात. काहीच समजत नाहीत. सर्वांची बुद्धी अगदी भ्रष्ट झाली आहे, बाबांना जाणतच नाहीत. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. सर्वांची मानसिक शक्ती संपुष्टात आलेली आहे. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही पवित्र बना तर असे स्वर्गाचे मालक बनाल, परंतु अजिबात समजत नाहीत. आत्म्याची सर्व ताकद नष्ट झाली आहे. किती समजावून सांगतात तरी देखील पुरुषार्थ करायचा आहे आणि करून घ्यायचा आहे. पुरुषार्थामध्ये थकायचे नाही. हार्ट फेल सुद्धा व्हायचे नाही. इतकी मेहनत केली, भाषणाने एकही निघाला नाही. परंतु तुम्ही जे ऐकवले, आणि ज्यांनी कोणी ते ऐकले तर त्याच्यावर छाप (प्रभाव) तर पडली ना. मागाहून सर्व जाणतील जरूर. तुम्हा बी.कें.ची अथाह महिमा होणार आहे. परंतु कृतीवरून तर असे दिसते की जसे एकदम अडाणीच आहेत. काही रिगार्डच नाही, पूर्ण ओळख नाही. बुद्धी बाहेर भटकत राहते. बाबांची आठवण कराल तर मदत सुद्धा मिळेल. बाबांची आठवण करत नाहीत तर ते जसेकि पतित आहेत. तुम्ही बनता पावन. जे बाबांची आठवण करत नाहीत तर त्यांची बुद्धी जरूर कुठे ना कुठे भटकत राहते. तर त्याचा शरीर स्पर्श सुद्धा होता कामा नये कारण आठवणीमध्ये न राहिल्याने ते वायुमंडळाला दूषित करतात. पवित्र आणि अपवित्र एकत्र असू शकत नाहीत म्हणूनच बाबा जुन्या सृष्टीला नष्ट करतात. दिवसेंदिवस नियम देखील कडक होत जातील. बाबांची आठवण करत नाहीत तर फायद्या ऐवजी अजूनच नुकसान करतात. पवित्रतेचा संपूर्ण आधार आठवणीवर आहे. एका जागेवर बसण्याची गोष्ट नाहीये. इथे एकत्र बसण्यापेक्षा तर टेकडीवर जाऊन दूर-दूर बसा ते चांगले आहे. जे आठवण करत नाहीत ते आहेत पतित. त्यांची तर संगत सुद्धा करू नये. वर्तनावरूनच लक्षात येते. आठवणी शिवाय पावन तर बनू शकणार नाही. प्रत्येकावर जन्म-जन्मांतरीचे पापांचे ओझे भरपूर आहे. ते आठवणीच्या यात्रेशिवाय नष्ट कसे होणार. ते तर जसेकि पतितच आहेत.
बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा मुलांसाठी साऱ्या पतित दुनियेला नष्ट करून टाकतो. त्याची संगत सुद्धा असू नये. परंतु एवढी सुद्धा बुद्धी नाहीये की कोणासोबत संगत केली पाहिजे. तुम्हा पावन असणाऱ्यांचे प्रेम पावन असणाऱ्यावर असायला हवे. एवढी तरी बुद्धी पाहिजे ना. स्वीट बाबा आणि स्वीट राजधानी शिवाय इतर काहीही आठवू नये. इतके सगळे त्याग करणे काही मावशीचे घर नाहीये. बाबांचे तर मुलांवर अपार प्रेम आहे. ‘मुलांनो, पावन बना तर तुम्ही पावन दुनियेचे मालक बनाल. मी तुमच्यासाठी पावन दुनियेची स्थापना करत आहे’. या पतित दुनियेला पूर्णपणे नष्ट करतात. इथे या पतित दुनियेमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला दुःख देते. आयुष्य देखील कमी होत जाते, याला म्हटले जाते - वर्थ नॉट अ पेनी (कवडीमोल). कवडी आणि हिरा यांच्यामध्ये फरक तर असतो ना. तर तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे. गायले देखील जाते - ‘सच तो बिठो नच’. तुम्ही सतयुगामध्ये खुशीमध्ये डान्स करता. इथल्या कोणत्याही वस्तूवर मन जडता कामा नये. याला तर दिसत असताना देखील बघायचे नाहीये, डोळे उघडे असताना सुद्धा जसे की झोपेत आहेत, परंतु ती हिम्मत, ती अवस्था पाहिजे. हा तर निश्चय आहे की ही जुनी दुनिया असणारच नाही. एवढा खुशीचा पारा चढलेला असला पाहिजे. स्वतःला चिमटा काढला पाहिजे - अरे, आम्ही शिवबाबांची आठवण केली तर विश्वाची बादशाही मिळेल. हठयोगामध्ये सुद्धा बसायचे नाही आहे. खाता-पिता, काम करत असताना बाबांची आठवण करा. हे देखील जाणता राजधानी स्थापन होत आहे. बाबा थोडेच म्हणतील - दासी बना. बाबा तर म्हणतील - पावन बनण्याचा पुरुषार्थ करा. बाबा पावन बनविण्यासाठी पुरुषार्थ करून घेतात आणि तुम्ही मग पतित बनता, किती खोटी पापे करता. कायम शिवबाबांची आठवण करा तर सर्व पापे स्वाहा होतील. हा बाबांचा यज्ञ आहे ना. खूप जबरदस्त यज्ञ आहे. ते (दुनियेतील) लोक यज्ञ रचतात - लाखो रुपये खर्च करतात. तुम्ही तर जाणता यामध्ये सारी दुनिया स्वाहा होणार आहे. बाहेरून आवाज होईल, भारतामध्ये देखील पसरेल. एक तर बुद्धीचा योग बाबांसोबत असावा तर पापे नष्ट होतील आणि मग उच्च पद सुद्धा प्राप्त होऊ शकते. बाबांचे तर कर्तव्य आहे मुलांकडून पुरुषार्थ करून घेणे. लौकिक पिता तर मुलांची सेवा करतात, आणि सेवा घेतात देखील. हे बाबा तर म्हणतात मी तुम्हा मुलांना २१ जन्मांचा वारसा देतो, तर अशा बाबांची आठवण जरूर करायची आहे, ज्याने पापे नष्ट होतील. बाकी पाण्याने पापे थोडीच नष्ट होतात. पाणी तर सर्वत्र आहे. परदेशामध्ये सुद्धा नद्या आहेत तर काय इथल्या नद्या पावन बनविणाऱ्या आणि परदेशातल्या नद्या पतित बनविणाऱ्या आहेत का? मनुष्यांना तर काहीही समज नाही. बाबांना दया तर येते ना. बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, निष्काळजीपणा करू नका. बाबा एवढे गुल-गुल बनवतात तर मेहनत केली पाहिजे ना. स्वतःवर दया करायची आहे’. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- १) इथल्या कोणत्याही वस्तूमध्ये मन गुंतवायचे नाही. दिसत असताना सुद्धा बघायचे नाही. डोळे उघडे असताना सुद्धा जशी झोपेची झापड असते, असा आनंदाचा पारा चढलेला असावा.
- २) सर्वकाही पवित्रतेवर अवलंबून आहे, त्यामुळे स्वतःला सांभाळायचे आहे की पतिताच्या शरीराचा स्पर्श सुद्धा होता कामा नये. स्वीट बाबा आणि स्वीट राजधानी शिवाय दुसरे काहीही आठवू नये.
| वरदान:- |
हदच्या इच्छांना सोडून चांगले बनणारे इच्छा मात्रम् अविद्या भव मनामध्ये कोणतीही हदची इच्छा असेल तर चांगले बनू देणार नाही. जसे उन्हामध्ये चालता तर सावली पुढे जाते, तिला जर पकडण्याचा प्रयत्न केला तर पकडू शकत नाही, आणि पाठ फिरवून या तर सावली तुमच्या मागे-मागे येईल. अशाच प्रकारे इच्छा आकर्षित करून रडविणारी आहे, तिला सोडून द्या तर ती तुमच्या मागे-मागे येईल. मागणारा कधीही संपन्न बनू शकत नाही. कोणत्याही हदच्या इच्छांच्या मागे धावणे हे तर असे आहे जशी मृगतृष्णा, यापासून नेहमी सांभाळून रहा तर इच्छा मात्रम् अविद्या बनाल. |
| बोधवाक्य:- | आपल्या श्रेष्ठ कर्माद्वारे आणि श्रेष्ठ वर्तनाद्वारे आशीर्वाद जमा करा तर डोंगराएवढी गोष्ट देखील कापसा प्रमाणे वाटेल. |