मराठी मुरली · Brahma Kumaris

मराठी मुरली · 15 ऑक्टोबर, 2024

ओम शांती · BapDada ·

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली15 ऑक्टोबर, 2024 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

15.10.2024
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“ गोड मुलांनो - तुम्हा सर्वांचे आपसामध्ये एक मत आहे, तुम्ही स्वतःला आत्मा समजून एका बाबांची आठवण करता तेव्हा सर्व भूते पळून जातात’’
प्रश्न:- पद्मा-पदम भाग्यशाली बनण्याचा मुख्य आधार काय आहे?
उत्तर:- जे बाबा ऐकवतात त्या प्रत्येक गोष्टीला धारण करणारे पद्मा-पदम भाग्यशाली बनतात. चेक करा की बाबा काय म्हणतात आणि रावण संप्रदायवाले काय म्हणतात! बाबा जे ज्ञान देतात त्याला बुद्धीमध्ये ठेवणे, स्वदर्शन चक्रधारी बनणे हेच पद्मा-पदम भाग्यशाली बनणे आहे. या नॉलेजद्वारेच तुम्ही गुणवान बनता.

ओम् शांती. आत्मिक पिता, इंग्रजीमध्ये म्हटले जाते - स्पिरिच्युअल फादर. सतयुगामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तिथे इंग्रजी इत्यादी दुसरी कोणतीही भाषा तर नसणार. तुम्ही जाणता सतयुगामध्ये आपले राज्य असते, त्यामध्ये आपली जी भाषा असेल तीच चालेल. नंतर मग ती भाषा बदलत जाते. आता तर अनेकानेक भाषा आहेत. जसा राजा त्याच्याप्रमाणे त्यांची भाषा चालते. आता हे तर सर्व मुले जाणतात, सर्व सेंटर्सवर देखील जी मुले आहेत त्यांचे आहे एक मत. स्वतःला आत्मा समजायचे आहे आणि एका बाबांची आठवण करायची आहे म्हणजे सर्व भूते पळून जातील. बाबा आहेत पतित-पावन. ५ भूतांची तर सर्वांमध्ये प्रवेशता आहे. आत्म्यामध्येच भूतांची प्रवेशता होते मग या भूतांना किंवा विकारांना नावे देखील दिली जातात - देह-अभिमान, काम, क्रोध इत्यादी. असे काही नाही की ईश्वर सर्वव्यापी आहे. कधीही कोणी जर म्हटले की, ‘ईश्वर सर्वव्यापी आहे’, तर तुम्ही सांगा - ‘सर्वव्यापी तर आत्मे आहेत आणि या आत्म्यांमध्ये ५ विकार सर्वव्यापी आहेत’. बाकी असे नाही की परमात्मा सर्वांमध्ये विराजमान आहे. मग परमात्म्यामध्ये ५ भूतांची प्रवेशता कशी होईल! प्रत्येक गोष्टीला चांगल्या रीतीने धारण केल्याने तुम्ही पद्मा-पदम भाग्यशाली बनता. दुनियावाले रावण संप्रदायवाले काय म्हणतात आणि बाबा काय म्हणतात, ते तुम्हीच ठरवा. प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे. त्या आत्म्यामध्ये ५ विकार प्रवेश आहेत शरीरामध्ये नाही; ५ विकारांचा अथवा भुतांचा प्रवेश आत्म्यामध्ये होतो. सतयुगामध्ये ही ५ भूते नाहीत. नावच आहे डीटी वर्ल्ड (दैवी दुनिया). हे आहे डेव्हिल वर्ल्ड (आसुरी दुनिया). डेव्हिल म्हटले जाते असुराला. किती दिवस आणि रात्रीचा फरक आहे. आता तुम्ही चेंज होता. तिथे तुमच्यामध्ये कोणताही विकार, कोणताही अवगुण राहत नाही. तुमच्यामध्ये संपूर्ण गुण असतात. तुम्ही १६ कला संपूर्ण बनता, सुरुवातीला असता आणि नंतर मग खाली उतरता. या चक्रा विषयी आता माहीत झाले आहे. ८४ चे चक्र कसे फिरते. मज आत्म्याला स्व-दर्शन झाले आहे अर्थात या चक्राचे ज्ञान झाले आहे. उठता-बसता, चालता-फिरता तुम्हाला हे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. बाबा नॉलेज शिकवतात. हे रूहानी नॉलेज बाबा भारतामध्येच येऊन देतात. म्हणतात ना - ‘आमचा भारत’. खरेतर हिंदुस्थान म्हणणे तर चुकीचे आहे. तुम्ही जाणता भारत जेव्हा स्वर्ग होता तेव्हा तर केवळ आपलेच राज्य होते इतर कोणताही धर्म नव्हता. नवीन दुनिया होती. नवी दिल्ली म्हणतात ना. दिल्लीचे खरे नाव दिल्ली नव्हते, परिस्तान म्हटले जात होते. आता तर नवी दिल्ली आणि जुनी दिल्ली म्हणतात नंतर मग ना जुनी दिल्ली असणार, ना नवी दिल्ली असणार, परिस्तान म्हटले जाईल. दिल्लीला राजधानी म्हणतात. तिथे या लक्ष्मी-नारायणाचे राज्य असेल, इतर काहीही नसेल, आपलेच राज्य असेल. आता तर राज्यच नाहीये म्हणून फक्त म्हणतात - आमचा भारत देश आहे. राजा तर नाही आहेत. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान घोळत राहते. खरोखर सर्वात पहिले या विश्वामध्ये देवी-देवतांचे राज्य होते बाकी कोणाचेही राज्य नव्हते. यमुनेचा किनारा होता, त्याला परिस्तान म्हटले जात होते. देवतांची राजधानी दिल्लीच राहिली आहे, त्यामुळे सर्वांना आकर्षण होते. सर्वात मोठी देखील आहे. एकदम मध्यभागी आहे.

गोड-गोड मुले जाणतात - पापे तर जरूर झालेली आहेत, पाप-आत्मा बनले आहेत. सतयुगामध्ये असतात पुण्य-आत्मे. बाबाच येऊन पावन बनवितात ज्यांची तुम्ही ‘शिवजयंती’ सुद्धा साजरी करता. आता ‘जयंती’ शब्द तर सर्वांना लागू होतो म्हणून याला मग ‘शिवरात्री’ म्हणतात. ‘रात्री’ याचा अर्थ तर तुमच्या शिवाय इतर कोणीही समजू शकणार नाही. चांगले-चांगले विद्वान इत्यादी कोणीही जाणत नाहीत की, शिवरात्री काय आहे तर साजरी तरी काय करणार! रात्रीचा अर्थ काय आहे, तो बाबांनी समजावून सांगितला आहे. हे तर ५ हजार वर्षांचे चक्र आहे त्यामध्ये सुख आणि दुःखाचा खेळ आहे, सुखाला म्हटले जाते दिवस, दुःखाला म्हटले जाते रात्र. तर दिवस आणि रात्र यांच्यामध्ये संगम येतो. अर्धा कल्प आहे - प्रकाश, अर्धा कल्प आहे - अंधार. भक्तीमध्ये तर खूप बडबड करतात. इथे आहे सेकंदाची गोष्ट. अतिशय सोपा आहे, सहज योग. तुम्हाला पहिले जायचे आहे मुक्तिधाम. मग तुम्ही जीवनमुक्ती आणि जीवनबंधमध्ये किती वेळ राहिला आहात ते तर तुम्हा मुलांच्या लक्षात आहे, तरीही वारंवार विसरता. बाबा समजावून सांगतात ‘योग’ शब्द अगदी बरोबर आहे परंतु त्यांचा आहे भौतिक योग. हा आहे आत्म्यांचा परमात्म्या सोबत योग. संन्यासी लोक तर अनेक प्रकारचे हठयोग इत्यादी शिकवतात तर मनुष्य गोंधळून जातात. तुम्हा मुलांचे पिता देखील आहेत तर टिचर देखील आहेत, तर त्यांच्यासोबत योग लावावा लागेल ना. टिचरकडून शिकायचे असते. बाळ जन्म घेते तर त्याचा पहिला योग पित्यासोबत असतो, मग ५ वर्षानंतर टिचरसोबत योग लावावा लागतो. आणि मग वानप्रस्थ अवस्थेमध्ये गुरुसोबत योग लावावा लागतो. मुख्य हे तिघे लक्षात राहतात. ते तर वेगवेगळे असतात. इथे हे बाबा एकदाच येऊन पिता देखील बनतात, टीचर देखील बनतात. वंडरफुल आहे ना. अशा बाबांची जरूर आठवण केली पाहिजे. जन्म-जन्मांतर तिघांचीही वेग-वेगळी आठवण करत आले आहात. सतयुगामध्ये देखील पित्यासोबत योग असतो मग टीचर सोबत असतो. शिकायला तर जातात ना. बाकी गुरुची तिथे गरजच राहत नाही कारण सर्व सद्गतीमध्ये आहेत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय अडचण आहे! अगदी सोपे तर आहे. याला म्हटले जाते - सहज योग. परंतु हा आहे अनकॉमन (असामान्य). बाबा म्हणतात - ‘मी हे टेंपररी लोन घेतो, ते देखील किती थोड्या काळासाठी घेतो’. वयाच्या साठाव्या वर्षी वानप्रस्थ अवस्था येते. म्हणतात - ‘साठी हाती आली काठी’. यावेळी सर्वांनी काठी घेतलेली आहे. सर्व वानप्रस्थ निर्वाणधाममध्ये जातील. ते आहे स्वीट होम, स्वीटेस्ट होम. त्याच्यासाठीच किती अथाह भक्ती केली आहे. आता चक्र फिरून आले आहात. मनुष्यांना हे काहीच माहित नाही, अशाच थापा मारल्या आहेत की चक्र लाखो वर्षांचे आहे. लाखो वर्षांची गोष्ट असेल तर मग रेस्ट (विश्रांतीच) मिळू शकणार नाही. विश्रांती मिळणेच अवघड होईल. तुम्हाला विश्रांती मिळते, त्याला म्हटले जाते सायलेन्स होम, इनकार्पोरियल वर्ल्ड. हे आहे स्थूल स्वीट-होम. ते आहे मूळ स्वीट-होम. आत्मा अति सूक्ष्म रॉकेट आहे, याच्यापेक्षा तीव्रगतीने पळणारे कोणीच नाही. हे तर सर्वात वेगवान आहे. एका सेकंदामध्ये शरीर सुटले आणि हा पळाला. दुसरे शरीर तर तयारच असते. ड्रामा अनुसार आपल्या वेळेवर त्याला (आत्म्याला) जावेच लागते. ड्रामा किती ॲक्युरेट (अचूक) आहे, यामध्ये अयोग्य असे काहीच नाही आहे, हे तुम्ही जाणता. बाबा देखील ड्रामा अनुसार एकदम अचूक वेळेवर येतात. एका सेकंदाचा देखील फरक पडू शकत नाही. कसे समजते की, यांच्यामध्ये बाबा ईश्वर आले आहेत. जेव्हा ज्ञान देतात, मुलांना बसून समजावून सांगतात. शिवरात्री देखील साजरी करतात ना. मी शिव, कधी आणि कसा येतो, ते तुम्हाला तर माहित नाही आहे. शिवरात्री, कृष्ण-रात्री साजरी करतात. रामाची रात्र साजरी करत नाहीत कारण फरक पडला आहे ना. शिवरात्री सोबत श्रीकृष्णाची सुद्धा रात्री साजरी करतात. परंतु जाणत काहीच नाहीत. इथे आहेच आसुरी रावण राज्य. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. हे तर आहेत बाबा, वृद्धालाच बाबा म्हणणार, छोट्या मुलांना बाबा थोडेच म्हणतील. काहीजण मुलांना सुद्धा प्रेमाने ‘बाबा’ म्हणतात. तर त्यांनी देखील श्रीकृष्णाला प्रेमाने म्हटले आहे. ‘बाबा’, तर तेव्हा म्हटले जाते जेव्हा तुम्ही मोठे होऊन मग मुलांना जन्म देता. श्रीकृष्ण स्वतःच प्रिन्स आहे, त्याला मुले कुठून आली. बाबा नेहमी म्हणतात की, मी वृद्धाच्या शरीरामध्ये येतो. शास्त्रांमध्ये देखील आहे परंतु शास्त्रांमधील सर्वच गोष्टी काही अचूक नाही आहेत, काही-काही गोष्टी बरोबर आहेत. ब्रह्माचे आयुर्मान म्हणजे प्रजापिता ब्रह्माचे आयुष्य. ते तर जरूर या वेळीच असेल. ब्रह्माचे आयुष्य मृत्यूलोकमध्येच संपते. हा काही अमरलोक नाही आहे. याला म्हटले जाते पुरुषोत्तम संगमयुग. हे तुम्हा मुलांशिवाय इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये असू शकत नाही.

बाबा बसून समजावून सांगतात - ‘गोड-गोड मुलांनो, तुम्ही तुमच्या जन्मांना जाणत नाही, मी सांगतो की तुम्ही ८४ जन्म घेता. कसे घेता? ते देखील तुम्हाला माहीत झाले आहे. प्रत्येक युगाचा कालावधी १२५० वर्षे आहे आणि इतके-इतके जन्म घेतले आहेत’. ८४ जन्मांचा हिशोब आहे ना. ८४ लाखाचा हिशोब तर सांगताही येणार नाही. याला म्हटले जाते ८४ चे चक्र, ८४ लाखाची गोष्ट तर आठवणार देखील नाही. इथे किती अपार दुःख आहे. कशी दुःख देणारी मुले जन्म घेत राहतात. याला म्हटला जातो घोर नरक, एकदम घाणेरडी दुनिया आहे. तुम्ही मुले जाणता आता आपण नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी तयारी करत आहोत. पापे नष्ट होतील तेव्हा आम्ही पुण्य-आत्मा बनणार. आता कोणतेही पाप करायचे नाही. एकमेकांवर काम कटारी चालविणे - हे आदि-मध्य-अंत दुःख देणे आहे. आता हे रावण राज्य संपुष्टात येते. आता आहे कलियुगाचा अंत. ही अंतिम महाभारी लढाई आहे. त्यानंतर कोणतीही लढाई इत्यादी होणारही नाही. तिथे (स्वर्गामध्ये) कोणतेही यज्ञ केले जात नाहीत. जेव्हा यज्ञ करतात तेव्हा त्यामध्ये हवन करतात. बाबांनी देखील हा जो रुद्र यज्ञ रचला आहे यामध्ये मुले आपली सर्व जुनी सामग्री स्वाहा करतात. आता बाबांनी समजावून सांगितले आहे हा आहे रुद्र ज्ञान यज्ञ. रुद्र, ‘शिव’ना म्हटले जाते. रुद्रमाळा म्हणतात ना. निवृत्ती मार्गवाल्यांना प्रवृत्ती मार्गाच्या रीती-रिवाजाविषयी काहीच माहिती नाही आहे. ते तर घरदार सोडून जंगलामध्ये जातात. नावच पडले आहे - संन्यास. कशाचा संन्यास? घरादाराचा. रिकाम्या हाताने निघून जातात. सुरुवातीला गुरुलोक खूप परीक्षा घेतात, काम करून घेतात. अगोदर भिक्षेमध्ये फक्त पीठ घेत असत, जेवण घेत नसत. त्यांना जंगलामध्येच रहायचे असते, तिथे कंदमुळे-फळे मिळतात. हे देखील गायन आहे, जेव्हा सतोप्रधान संन्याशी होते तेव्हा हे खातात. आता तर विचारू नका, काय-काय करत असतात. याचे नावच आहे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया). ते आहे व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया). तर स्वतःला विशश (विकारी) समजले पाहिजे ना. बाबा म्हणतात - सतयुगाला म्हटले जाते शिवालय, व्हाईसलेस वर्ल्ड. इथे तर सर्व आहेत पतित मनुष्य म्हणून देवी-देवतांच्या ऐवजी नावच हिंदू ठेवले आहे. बाबा तर सर्व गोष्टी समजावून सांगत राहतात. तुम्ही मुळात आहातच बेहद बाबांची मुले. ते तर तुम्हाला २१ जन्मांचा वारसा देतात. तर बाबा गोड-गोड मुलांना समजावून सांगत आहेत - ‘जन्म-जन्मांतरीची पापे तुमच्या डोक्यावर आहेत. पापांपासून मुक्त होण्याकरिताच तुम्ही मला बोलावता’. साधू-संत इत्यादी सर्व बोलावतात - ‘हे पतित-पावन…’. अर्थ काहीच समजत नाहीत, असेच गात राहतात, टाळ्या वाजवत राहतात. त्यांना कोणी विचारले की, परमात्म्यासोबत योग कसा लावावा? त्यांना कसे भेटावे? तर म्हणतील, ‘ते तर सर्वव्यापी आहेत’. हाच रस्ता सांगतात काय! म्हणतात, वेद-शास्त्रे वाचल्याने भगवान भेटेल. परंतु बाबा म्हणतात - ‘मी दर ५ हजार वर्षानंतर ड्रामा प्लॅन नुसार येतो’. हे ड्रामाचे रहस्य बाबांशिवाय इतर कोणीही जाणत नाही. लाखो वर्षांचा ड्रामा तर असूच शकत नाही. आता बाबा समजावून सांगतात - ही ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. कल्पापूर्वी देखील बाबांनी सांगितले होते की, ‘मनमनाभव’. हा आहे महामंत्र. मायेवर विजय प्राप्त करण्याचा मंत्र आहे. बाबाच बसून अर्थ समजावून सांगतात. इतर कोणीही याचा अर्थ सांगत नाहीत. गायले देखील जाते ना - ‘सर्वांचा सद्गती दाता एक’. कोणी मनुष्य तर असू शकत नाही. देवतांचा देखील प्रश्न नाही. तिथे तर सुखच सुख आहे, तिथे काही भक्ती करत नाहीत. भक्ती केली जाते भगवंताला भेटण्यासाठी. सतयुगामध्ये भक्ती असत नाही कारण २१ जन्मांचा वारसा मिळालेला आहे. म्हणूनच गायले जाते - ‘दुःख में सिमरण…’. इथे तर अथाह दुःख आहे. वारंवार म्हणतात - ‘भगवान दया करा’. ही कलियुगी दुःखी दुनिया कायमची राहत नाही. सतयुग-त्रेता होऊन गेले आहे, पुन्हा होईल. लाखो वर्षांची गोष्ट तर लक्षातही राहू शकणार नाही. आता बाबा तर संपूर्ण नॉलेज देतात, आपला परिचय सुद्धा देतात आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य देखील समजावून सांगतात. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. तुम्हा मुलांना लक्षात आले आहे. आता तर परक्या राज्यामध्ये आहात. तुम्हाला तुमचे राज्य होते. इथे (या दुनियेमध्ये) तर युद्ध करून आपले राज्य घेतात, शस्त्रांद्वारे, मारामारी करून आपले राज्य घेतात. तुम्ही मुले तर योगबलाने आपले राज्य स्थापन करत आहात. तुम्हाला सतोप्रधान दुनिया पाहिजे. जुनी दुनिया नष्ट होऊन नवीन दुनिया बनते. याला म्हटले जाते कलियुगी जुनी दुनिया, सतयुग आहे नवीन दुनिया. हे देखील कोणाला माहित नाहीये. संन्याशी म्हणतात - ‘ही तुमची कल्पना आहे’. इथेच सतयुग आहे, इथेच कलियुग आहे. आता बाबा बसून समजावून सांगत आहेत - एकही असा नाही जो बाबांना जाणत असेल. जर कोणी जाणले असते तर परिचय दिला असता. सतयुग-त्रेता काय चीज आहे, कोणाला लक्षात थोडेच येते. तुम्हा मुलांना बाबा चांगल्या रीतीने समजावत राहतात. बाबाच सर्व काही जाणतात, जानी-जाननहार अर्थात नॉलेजफुल आहेत; मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहेत; ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर आहेत. त्यांच्याद्वारेच आपल्याला वारसा मिळणार आहे. बाबा नॉलेजमध्ये आप समान बनवतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. १) ही पापांपासून मुक्त होण्याची वेळ आहे त्यामुळे आता कोणतेही पाप करायचे नाही. सर्व जुनी सामग्री या रुद्र यज्ञामध्ये स्वाहा करायची आहे.
  2. २) आता वानप्रस्थ अवस्था आहे त्यामुळे बाबा, टीचर यांच्या सोबत सद्गुरुची देखील आठवण करायची आहे. स्वीट होममध्ये जाण्याकरिता आत्म्याला सतोप्रधान (पावन) बनवायचे आहे.
वरदान:- आपल्या सूक्ष्म कमजोरींचे चिंतन करून परिवर्तन करणारे स्व-चिंतक भव
फक्त ज्ञानाचे पॉईंट्स रिपीट करणे, ऐकणे किंवा ऐकविणे हे काही स्व-चिंतन नाहीये परंतु स्व-चिंतन अर्थात आपल्या सूक्ष्म कमजोरींना, आपल्या छोट्या-छोट्या चुकांना चिंतन करून नष्ट करणे, परिवर्तन करणे - हेच आहे ‘स्व-चिंतक’ बनणे. सर्व मुले ज्ञानाचे मनन तर खूप चांगले करतात परंतु ज्ञानाला स्वयंप्रति युज करून धारणा स्वरूप बनणे, स्वतःचे परिवर्तन करणे, याचेच मार्क्स फायनल रिझल्टमध्ये मिळतात.
बोधवाक्य:- निरंतर करनकरावनहार बाबांची आठवण राहिली तर ‘मी’पणाचा अभिमान येऊ शकणार नाही.

||| ओम शांती |||

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.