मराठी मुरली · Brahma Kumaris

मराठी मुरली · 16 ऑक्टोबर, 2024

ओम शांती · BapDada ·

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली16 ऑक्टोबर, 2024 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

16.10.2024
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो - तुम्ही मात-पित्याच्या सन्मुख आले आहात, अपार सुख मिळविण्यासाठी, बाप तुम्हाला अपार दुःखातून काढून अपार सुखामध्ये घेऊन जातात”
प्रश्न:- एक बाबाच रिझर्वमध्ये (राखीव) राहतात, पुनर्जन्म घेत नाहीत - असे का?
उत्तर:- कारण कोणीतरी तुम्हाला तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनविणारा पाहिजे. जर बाबा देखील पुनर्जन्मामध्ये आले तर तुम्हाला काळ्या पासून गोरे कोण बनविणार म्हणून बाबा रिझर्वमध्ये राहतात.
प्रश्न:- देवता सदैव सुखी का आहेत?
उत्तर:- कारण पवित्र आहेत, पवित्रतेमुळेच त्यांचे वर्तन सुधारलेले आहे. जिथे पवित्रता आहे तिथे सुख-शांती आहे. मुख्य आहे पवित्रता.

ओम् शांती. गोड-गोड खूप-खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगतात. ते बाबा देखील आहेत, माता-पिता देखील आहेत. तुम्ही गात होता ना - ‘तुम मात-पिता हम बालक तेरे…’. सर्वजण हाका मारत राहतात. कोणाला हाका मारतात? परमपिता परमात्म्याला. बाकी त्यांना हे समजत नाही की, त्यांच्या कृपेने कोणते अपार सुख मिळते आणि ते कधी मिळते? अपार सुख कशाला म्हटले जाते, हे देखील समजत नाही. आता तुम्ही इथे समोर बसले आहात, तुम्ही जाणता इथे किती अपार दुःख आहे. हे आहे दुःखधाम. ते आहे सुखधाम. कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही की आपण २१ जन्म स्वर्गामध्ये अतिशय सुखात असतो. तुम्हाला देखील या पूर्वी हा अनुभव नव्हता. आता तुम्ही समजता आपण त्या परमपिता परमात्मा, मात-पित्याच्या समोर बसलो आहोत. जाणता आपण २१ जन्मांसाठी स्वर्गाची बादशाही प्राप्त करण्यासाठीच इथे येतो. बाबांना जाणले आणि बाबांद्वारे साऱ्या सृष्टी चक्राविषयी देखील समजले आहे. आपण आधी अपार सुखामध्ये होतो आणि नंतर दुःखामध्ये आलो, हे देखील नंबरवार प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये राहते. स्टुडंटला तर हे नेहमी लक्षात राहिले पाहिजे परंतु बाबा बघतात मुले वारंवार विसरतात आणि मग उदास होतात. अवस्था छुई-मुई (नाजूक) होते. माया वार करते. तो जो आनंद झाला पाहिजे, तो राहत नाही. नंबरवार पदे तर आहेत ना. स्वर्गामध्ये तर जातात परंतु तिथे देखील राजा पासून रंका पर्यंत सर्व असतात ना. ती गरीब प्रजा, ते श्रीमंत. स्वर्गामध्ये देखील असे आहे तर नरकामध्ये देखील असे आहे. उच्च आणि नीच. आता तुम्ही मुले जाणता आपण पुरुषार्थ करत आहोत - अपार सुख मिळविण्यासाठी. या लक्ष्मी-नारायणाला अपार सुख सर्वात जास्त आहे ना. मुख्य आहे पवित्रतेची गोष्ट. पवित्रतेशिवाय पीस आणि प्रोस्पॅरिटी (शांती आणि समृद्धी) मिळू शकत नाही. यामध्ये चलन (वर्तन) खूप चांगले पाहिजे. मनुष्याचे वर्तन सुधारते पवित्रतेने. पवित्र आहेत तेव्हा त्यांना देवता म्हटले जाते. तुम्ही इथे आले आहात देवता बनण्यासाठी. देवता सदैव सुखी होते. मनुष्य काही सदैव सुखी होऊ शकत नाही. सुख असतेच देवतांना. या देवतांचीच तुम्ही पूजा करत होता ना कारण पवित्र होते. सर्वकाही पवित्रतेवर अवलंबून आहे. विघ्ने देखील यामध्येच येतात. दुनियेमध्ये शांती व्हावी अशी इच्छा असते. बाबा म्हणतात - ‘पवित्रते शिवाय कधीही शांती होऊ शकत नाही’. सर्वातआधी मुख्य आहेच पवित्रतेची गोष्ट. पवित्रतेमुळेच वर्तन सुधारते. पतित झाल्याने मग वर्तन बिघडते. समजले पाहिजे आता आम्हाला पुन्हा देवता बनायचे असेल तर पवित्रता अवश्य पाहिजे. देवता पवित्र आहेत तेव्हाच तर अपवित्र मनुष्य त्यांच्या समोर डोके टेकतात. मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची. बोलावतात देखील असेच - ‘हे पतित-पावन, येऊन आम्हाला पावन बनवा’. बाबा म्हणतात - ‘काम महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त करा. यावर विजय प्राप्त केल्यानेच तुम्ही पवित्र बनाल’. तुम्ही जेव्हा पवित्र सतोप्रधान होता तेव्हा शांती होती, सुख देखील होते. तुम्हा मुलांना आता आठवण झाली आहे, कालचीच तर गोष्ट आहे. तुम्ही पवित्र होता तर अथाह सुख-शांती सर्व काही होते. आता पुन्हा तुम्हाला हे लक्ष्मी-नारायण बनायचे आहे, यामध्ये पहिली मुख्य गोष्ट आहे संपूर्ण निर्विकारी बनणे. हे तर गायन आहे, हा आहे ज्ञानयज्ञ, यामध्ये विघ्ने तर जरूर येतील. पवित्रतेवरून किती हैराण करतात. आसुरी संप्रदाय आणि दैवी संप्रदाय यांचे देखील गायन आहे. तुमच्या बुद्धीमध्ये आहे सतयुगामध्ये हे देवता होते. भले चेहरा तर मनुष्याचा आहे परंतु त्यांना देवता म्हटले जाते. तिथे आहेत संपूर्ण सतोप्रधान. तिथे कोणताही दोष (त्रुटी) राहत नाही. प्रत्येक गोष्ट परफेक्ट असते. बाबा परफेक्ट आहे तर मुलांना देखील परफेक्ट बनवतात. योगबलाने तुम्ही किती पवित्र, सुंदर बनता. हे मुसाफीर (शिवबाबा) तर सदैव गोरे आहेत, जे येऊन तुम्हाला सावळ्या पासून गोरे बनवतात. तिथे नॅचरल ब्युटी असते. सुंदर बनवण्याची गरजच राहत नाही. सतोप्रधान असतातच सुंदर. तेच मग तमोप्रधान बनल्यामुळे काळे होतात. नावच आहे श्याम आणि सुंदर. श्रीकृष्णाला श्याम आणि सुंदर का म्हणतात? याचा अर्थ बाबांशिवाय कधी कोणी सांगू शकणार नाही. भगवान बाबा ज्या गोष्टी ऐकवतात त्या दुसरा कोणीही मनुष्य ऐकवू शकणार नाही. चित्रांमध्ये स्वदर्शनचक्र देवतांना दिले आहे.

बाबा समजावून सांगतात - गोड-गोड मुलांनो, स्वदर्शनचक्राची तर देवतांना काहीच आवश्यकता नाही. ते शंख इत्यादीचे काय करतील. स्वदर्शन चक्रधारी तुम्ही ब्राह्मण मुले आहात. शंखध्वनी देखील तुम्हाला करायचा आहे. तुम्ही जाणता आता विश्वामध्ये शांती कशी स्थापन होत आहे. त्याचसोबत चलन (वर्तन) देखील चांगले पाहिजे. भक्ती मार्गामध्ये देखील तुम्ही देवतांसमोर जाऊन आपल्या अवगुणांचे वर्णन करता ना. परंतु देवता काही तुमची चलन सुधारत नाहीत, सुधारणारा दुसरा कोणी आहे. ते शिवबाबा तर आहेत निराकार. त्यांच्यासमोर असे म्हणणार नाही की, ‘तुम्ही सर्व गुणसंपन्न आहात…’ शिवची महिमाच वेगळी आहे. देवतांची महिमा गातात. परंतु आपण असे कसे बनायचे? आत्माच पवित्र आणि अपवित्र बनते ना. आता तुमची आत्मा पवित्र बनत आहे. जेव्हा आत्मा संपूर्ण बनेल तेव्हा मग हे शरीर पतित राहणार नाही मग जाऊन पावन शरीर घ्याल. इथे तर पावन शरीर असू शकत नाही. पावन शरीर तेव्हा होईल जेव्हा प्रकृती देखील सतोप्रधान होईल. नवीन दुनियेमध्ये प्रत्येक गोष्ट सतोप्रधान असते. आता ५ तत्व तमोप्रधान आहेत त्यामुळे किती उपद्रव होत राहतात. मनुष्य कसे मृत्युमुखी पडत राहतात. तीर्थयात्रेवर जातात, ॲक्सीडेंट झाला तर मृत्युमुखी पडतात. जल, पृथ्वी इत्यादी किती नुकसान करतात. ही सर्व तत्वे तुम्हाला मदत करतात. विनाशामध्ये अचानक पूर येतो, वादळे येतात - या आहेत नैसर्गिक आपदा. ते बॉम्ब्स इत्यादी जे बनवतात, त्याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. त्यांना ईश्वरीय आपदा म्हणणार नाही. त्या तर मनुष्यांनी बनविलेल्या आहेत. भूकंप वगैरे काही मनुष्यांनी बनवलेले नाहीत. या सर्व आपदा एकाचवेळी येतात, पृथ्वीचे ओझे कमी होते. तुम्ही जाणता बाबा कसे आपल्याला नवीन दुनियेमध्ये एकदम हलके बनवून सोबत घेऊन जातात. डोके हलके झाल्यावर मग स्फूर्ती येते ना. तुम्हाला बाबा एकदम हलके करतात. सर्व दुःख दूर होतात. आता तुम्हा सर्वांचे डोके खूप जड आहे नंतर सर्व हलके, शांत, सुखी होतील. जे ज्या धर्माचे असतील, सर्वांना आनंद झाला पाहिजे, बाबा आलेले आहेत, सर्वांची सद्गती करण्यासाठी. जेव्हा पूर्ण स्थापना होते तेव्हा मग सर्व धर्मांचा विनाश होतो. आधी तुमच्या बुद्धीमध्ये हे विचार देखील नव्हते. आता समजता, गायन देखील आहे ब्रह्मा द्वारे स्थापना. इतर अनेक धर्म संपूर्ण नष्ट होतील. हे कर्तव्य एक बाबाच करतात, एका शिवबाबांशिवाय दुसरे कोणीही करू शकत नाही. असा अलौकिक जन्म आणि अलौकिक कर्तव्य कुणाचे असू शकत नाही. बाबा आहेत उच्च ते उच्च. तर त्यांचे कर्तव्य देखील खूप उच्च आहे. करनकरावनहार आहेत ना. तुम्ही नॉलेज ऐकवता - बाबा आलेले आहेत, या जगातून पाप आत्म्यांचे ओझे दूर करण्यासाठी. असे तर गायन देखील आहे ना - बाबा येतात एका धर्माची स्थापना आणि अनेक धर्मांचा विनाश करण्यासाठी. तुम्हाला आता किती उच्च महात्मा बनवत आहेत. महात्मा, देवतांशिवाय दुसरा कोणीही असत नाही. इथे तर भरपूर लोकांना महात्मा म्हणत राहतात. परंतु महात्मा म्हटले जाते - महान आत्म्याला. रामराज्य म्हटलेच जाते स्वर्गाला. तिथे रावण राज्यच नाही, तर विकाराचा प्रश्नच येऊ शकत नाही म्हणून त्याला म्हटले जाते - संपूर्ण निर्विकारी. जितके संपूर्ण बनाल तितका जास्त वेळ सुख प्राप्त कराल. अपूर्ण तर इतके सुख मिळवू शकणार नाहीत. शाळेमध्ये देखील कोणी परिपूर्ण असतात, कोणी अपूर्ण असतात. फरक दिसून येतो. डॉक्टर अर्थात डॉक्टर. परंतु कोणाचा पगार कमी असतो, कोणाचा खूप जास्त असतो. तसेच देवता तर देवताच असतात परंतु पदामुळे किती फरक पडतो. बाबा येऊन तुम्हाला उच्च शिक्षण देतात. श्रीकृष्णाला म्हणतात श्याम-सुंदर. सावळा कृष्ण देखील दाखवतात. श्रीकृष्ण सावळा थोडाच असतो. नाव-रूप तर बदलते ना. तीच आत्मा सावळी बनते, भिन्न नाव, रूप, देश, काळ असतो. आता तुम्हाला समजावून सांगितले जाते, तुम्ही समजता बरोबर आपण सुरुवातीपासून कसे पार्टमध्ये आलो आहोत. आधी देवता होतो मग देवता पासून असुर बनलो आहोत. बाबांनी ८४ जन्मांचे रहस्य सुद्धा समजावून सांगितले आहे, ज्याच्या विषयी इतर कोणालाही माहिती नाही आहे. बाबाच येऊन सर्व रहस्य समजावून सांगतात. बाबा म्हणतात - ‘माझ्या लाडक्या मुलांनो, तुम्ही घरी माझ्यासोबत राहत होता. तुम्ही भाऊ-भाऊ होता ना. सर्व आत्मे होते, शरीर नव्हते’. बाबा होते आणि तुम्ही भाऊ-भाऊ होता. आणखी दुसरे कोणतेही नाते नव्हते. बाबा तर पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. ते तर ड्रामा अनुसार रिझर्व राहतात. त्यांचा पार्टच असा आहे. तुम्ही कधीपासून बोलावले आहे, ते देखील बाबांनी सांगितले आहे. असे नाही की, तुम्ही द्वापर पासून बोलवायला सुरुवात केली आहे. नाही, बऱ्याच काळा नंतर तुम्ही बोलवायला सुरुवात केली आहे. तुम्हाला तर बाबा सुखी बनवतात अर्थात सुखाचा वारसा बाबा देत आहेत. तुम्ही देखील म्हणता - ‘बाबा, आम्ही तुमच्याकडे कल्प-कल्प अनेक वेळा आलो आहोत’. हे चक्र चालूच राहते. दर ५००० वर्षानंतर बाबा तुम्हाला भेटतात आणि हा वारसा मिळवता. जे पण सर्व देहधारी आहेत सर्व स्टुडंट आहेत, शिकवणारे आहेत विदेही. हा देह त्यांचा नाही. स्वतः विदेही आहेत, इथे येऊन देह धारण करतात. देहाशिवाय मुलांना शिकवणार कसे? सर्व आत्म्यांचे ते पिता आहेत. भक्ती मार्गामध्ये सर्वजण त्यांना हाक मारतात, बरोबर रुद्रमाळेचा जप करतात. वर आहे फूल आणि युगल मेरू. ते तर एक सारखेच आहेत. फुलाला नमस्कार का करतात, कोणाची माळा जपतात, हे देखील आता तुम्हाला माहित झाले आहे. देवतांची माळा जपतात का तुमची माळा जपतात? माळा देवतांची आहे का तुमची आहे? देवतांची म्हणणार नाही. हे ब्राह्मणच आहेत ज्यांना बाबा बसून शिकवतात. ब्राह्मणापासून मग तुम्ही देवता बनता. आता शिकता आणि मग तिथे जाऊन देवता पद प्राप्त करता. माळा तुम्हा ब्राह्मणांची आहे, जे तुम्ही बाबांकडून शिकून, मेहनत करून मग देवता बनता. बलिहारी शिकविणाऱ्याची आहे. बाबांनी मुलांची किती सेवा केली आहे. तिथे तर कोणी बाबांची आठवण देखील करत नाहीत. भक्ती मार्गामध्ये तुम्ही माळा जपत होता. आता ते फूल (शिवबाबा) येऊन तुम्हाला देखील फूल बनवतात अर्थात आपल्या माळेचा मणी बनवतात. तुम्ही गुल-गुल (फूल) बनता ना. आत्म्याचे ज्ञान देखील तुम्हाला आता मिळते. साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुमचीच महिमा आहे. तुम्ही ब्राह्मण बसून आप समान ब्राह्मण बनवून मग स्वर्गवासी देवी-देवता बनवता. देवता स्वर्गामध्ये राहतात. तुम्ही जेव्हा देवता बनता तेव्हा तिथे तुम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळाचे नॉलेज असणार नाही.

आता तुम्हा ब्राह्मण मुलांनाच भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळाचे ज्ञान मिळते, बाकी कोणालाही हे ज्ञान मिळत नाही. तुम्ही खूप-खूप भाग्यशाली आहात. परंतु माया मग विसरायला लावते. तुम्हाला काही हे बाबा (ब्रह्मा बाबा) शिकवत नाहीत, हे तर मनुष्य आहेत, हे देखील शिकत आहेत, हे तर सर्वात शेवटी होते. सर्वात नंबर वन पतित तेच मग नंबर वन पावन बनतात. किती सुखी असतात. एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. बाबा तुम्हाला किती उच्च बनवतात. ‘आयुष्यमान भव, पुत्रवान भव…’ याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. बाबा म्हणतात मी जर आशीर्वाद दिले तर मग सर्वांनाच देत राहीन. मी तर तुम्हा मुलांना शिकविण्यासाठी येतो. शिक्षणानेच तुम्हाला सर्व आशीर्वाद मिळतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. १) जसे बाबा परफेक्ट आहेत - तसे स्वतःला परफेक्ट बनवायचे आहे. पवित्रतेला धारण करून आपले वर्तन सुधारायचे आहे, खऱ्या सुख-शांतीचा अनुभव करायचा आहे.
  2. २) सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान बुद्धिमध्ये ठेवून ब्राह्मण सो देवता बनविण्याची सेवा करायची आहे. स्वतःच्या श्रेष्ठ भाग्याला कधीही विसरायचे नाही.
वरदान:- धारणा स्वरूपद्वारा सेवा करून खुशीचे प्रत्यक्ष फल प्राप्त करणारे सच्चे सेवाधारी भव
सेवेचा उमंग ठेवणे खूप चांगले आहे परंतु जर परिस्थितीनुसार सेवेची संधी तुम्हाला मिळाली नाही तर आपली अवस्था बिघडू द्यायची नाही अथवा डळमळीत होऊ द्यायची नाही. जर ज्ञान ऐकवण्याचा चान्स मिळाला नाही परंतु तुम्ही आपल्या धारणा स्वरूपाचा प्रभाव टाकता तेव्हा सेवेचे मार्क्स जमा होतात. धारणा स्वरूप मुलेच खरे सेवाधारी आहेत. त्यांना सर्वांचे आशीर्वाद आणि सेवेच्या रिटर्नमध्ये प्रत्यक्ष फळाच्या रूपात आनंदाची अनुभूती होते.
बोधवाक्य:- सच्च्या मनाने दाता, विधाता, वरदात्याला संतुष्ट करा तर रुहानी मस्तीमध्ये रहाल.

||| ओम शांती |||

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.