| 21.10.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - सच्च्या बाबांसोबत सच्चाईने रहा, सच्चा चार्ट ठेवा, ज्ञानाचा अहंकार सोडून आठवणीमध्ये राहण्याचा पूर्णतः पुरुषार्थ करा’’ | |
| प्रश्न:- | महावीर मुलांचे मुख्य लक्षण कोणते असेल? |
| उत्तर:- | महावीर मुले ती ज्यांच्या बुद्धीमध्ये निरंतर बाबांची आठवण असेल. महावीर अर्थात शक्तिमान. महावीर ते ज्यांना निरंतर खुशी असेल, जे आत्म-अभिमानी असतील, जराही देहाचा अहंकार नसेल. अशा महावीर मुलांच्या बुद्धीमध्ये असते की, आपण आत्मा आहोत, बाबा आम्हाला शिकवत आहेत. |
ओम् शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांना विचारत आहेत - ‘स्वतःला रुह किंवा आत्मा समजून बसले आहात?’ कारण बाबा जाणतात, हे थोडे अवघड आहे, यामध्येच मेहनत आहे. जे आत्म-अभिमानी होऊन बसले आहेत त्यांनाच महावीर म्हटले जाते. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे - याला महावीर म्हटले जाते. नेहमी स्वतःला विचारत रहा की, मी आत्म-अभिमानी आहे? आठवणीद्वारेच महावीर बनता, जणूकाही सुप्रीम बनता. बाकीचे जे पण धर्मवाले येतात ते इतके सुप्रीम बनत नाहीत. ते तर येतात देखील उशिराने. तुम्ही नंबरवार सुप्रीम बनता. सुप्रीम अर्थात शक्तिमान किंवा महावीर. तर आतून हा आनंद होतो की, आपण आत्मा आहोत. आम्हा सर्व आत्म्यांचे बाबा आम्हाला शिकवतात. बाबा हे देखील जाणतात - कोणी आपला चार्ट २५ टक्केच दाखवतात, कोणी १०० टक्के दाखवतात. कोणी म्हणतात २४ तासामध्ये अर्धा तास आठवण राहते तर किती टक्के झाले? आपली खूप काळजी घ्यायची आहे. हळू-हळू महावीर बनायचे आहे. लगेच बनू शकत नाही, मेहनत आहे. ते जे ब्रह्मज्ञानी, तत्वज्ञानी आहेत त्यांच्या बाबतीत असे समजू नका की ते स्वतःला काही आत्मा समजतात. ते तर ब्रह्म घराला परमात्मा समजतात आणि स्वतःला म्हणतात अहम् ब्रह्मास्मि. आता योग घरासोबत थोडाच लावला जातो. आता तुम्ही मुले स्वतःला आत्मा समजता. हा आपला चार्ट पहायचा आहे की, २४ तासांमध्ये मी किती वेळ स्वतःला आत्मा समजतो? आता तुम्ही मुले जाणता आपण ईश्वरीय सेवेवर आहोत, ऑन गॉडली सर्व्हिस. हेच सर्वांना सांगायचे आहे की, बाबा फक्त एवढेच म्हणतात - ‘मनमनाभव अर्थात स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा’. ही आहे तुमची सेवा. जितकी तुम्ही सेवा कराल तितके त्याचे फळ देखील मिळेल. या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. चांगली-चांगली महारथी मुले देखील या गोष्टींना पूर्णपणे समजत नाहीत. यामध्ये खूप मेहनत आहे. मेहनती शिवाय फळ थोडेच मिळू शकणार.
बाबा पाहतात - कोणी चार्ट बनवून पाठवतात, कोणाला तर चार्ट लिहिणे माहित सुद्धा नाही. ज्ञानाचा अहंकार आहे. आठवणीमध्ये बसण्याची मेहनतच घेतली जात नाही. बाबा म्हणतात - ‘मूळ गोष्ट आहे आठवणीची’. स्वतःवर नजर ठेवायची आहे की, माझा चार्ट कसा असतो? ते नोट करायचे आहे. बरेचजण म्हणतात चार्ट लिहिण्यासाठी वेळ नाही. मुख्य गोष्ट तर बाबा सांगतात - स्वतःला आत्मा समजून अल्फची (बाबांची) आठवण करा. इथे जितका वेळ बसता तर मध्ये-मध्ये आपल्या मनाला विचारा की, मी किती वेळ आठवणीमध्ये बसलो? इथे जेव्हा बसता तेव्हा तुम्हाला आठवणीमध्येच रहायचे आहे आणि चक्र फिरवले तरी देखील हरकत नाही. आपल्याला बाबांकडे जायचे आहे. पवित्र सतोप्रधान होऊन जायचे आहे. या गोष्टीला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. बरेचजण तर लगेच विसरून जातात. आपला खरा-खरा चार्ट सांगत नाहीत. असे खूप महारथी आहेत, खरे काय ते कधीच सांगणार नाहीत. अर्धा कल्प खोटी दुनिया चालली आहे तर खोटे जसे आतमध्ये बिंबले आहे. यामध्ये देखील जे साधारण आहेत ते लगेच चार्ट लिहितील. बाबा म्हणतात - तुम्ही पापांना भस्म करून पावन बनाल, आठवणीच्या यात्रेद्वारे. केवळ ज्ञानाने काही पावन बनणार नाही. बाकी फायदा काय. बोलावताच मुळी पावन बनण्याकरिता. त्यासाठी पाहिजे आठवण. प्रत्येकाने सच्चाईने आपला चार्ट सांगितला पाहिजे. इथे तुम्ही पाऊण तास बसले आहात तर पहायचे आहे की, पाऊण तासामध्ये आपण किती वेळ स्वतःला आत्मा समजून बाबांच्या आठवणीमध्ये होतो? कितीतरी जणांना तर खरे सांगण्यामध्ये लाज वाटते. बाबांना खरे सांगत नाहीत. ते फक्त समाचार देतील की, ही सेवा केली, इतक्या जणांना ज्ञान समजावून सांगितले, असे केले. परंतु आठवणीच्या यात्रेचा चार्ट लिहीत नाहीत. बाबा म्हणतात - आठवणीच्या यात्रेमध्ये न राहिल्या कारणामुळेच तुमचा कोणाला तीर लागत नाही. ज्ञान तलवारीला धार येत नाही (शक्ती भरत नाही). ज्ञान तर ऐकवतात, बाकी योगाचा तीर लागणे खूप कठीण आहे. बाबा तर म्हणतात, पाऊण तासामध्ये पाच मिनिटे सुद्धा आठवणीच्या यात्रेमध्ये बसत नसतील. समजतच नाहीत की कसे स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करावी. बरेचजण तर म्हणतात की, आम्ही निरंतर आठवणीमध्ये राहतो. बाबा म्हणतात - ‘ही अवस्था आता एवढ्यात होऊ शकत नाही’. जर निरंतर आठवण करत असाल मग तर कर्मातीत अवस्था येईल, ज्ञानाची पराकाष्ठा होईल. मग तर कोणाला थोडेसे जरी समजावून सांगाल तरी देखील खूप तीर लागेल (ज्ञान काळजाला भिडेल). मेहनत आहे ना. विश्वाचा मालक कोणी असाच थोडाच बनेल. माया तुमच्या बुद्धीचा योग कुठे ना कुठे घेऊन जाईल. मित्र-नातेवाईक इत्यादी आठवत राहतील. कोणाला परदेशात जायचे असते तर तेव्हा त्याला सर्व मित्र-नातलग, आगबोट, एरोप्लेन याचीच आठवण येत राहील. परदेशी जाण्याची जी प्रॅक्टिकल इच्छा आहे ती आकर्षित करते. बुद्धीचा योग एकदम तुटून जातो. दुसरीकडे कुठे बुद्धी जाऊ नये, यासाठी खूप मेहनतीची गरज आहे. केवळ बाबांचीच आठवण रहावी. हा देह सुद्धा आठवता कामा नये. ही अवस्था तुमची शेवटी होईल.
यामध्ये दिवसेंदिवस जितकी आठवणीची यात्रा वाढवाल, तितके तुमचेच कल्याण आहे. जितके आठवणीमध्ये रहाल तितकी तुमची कमाई होईल. जर शरीर सुटले तर मग ही कमाई काही करू शकणार नाही. जाऊन छोटे बाळ बनाल, तर कमाई काय करू शकणार. भले आत्मा हे संस्कार घेऊन जाईल परंतु टीचर तर पाहिजे ना जी पुन्हा आठवण करून देईल. बाबा देखील आठवण करून देतात ना की, बाबांची आठवण करा. हे तुमच्या शिवाय इतर कोणालाही माहित नाहीये की, बाबांची आठवण केल्यानेच पावन बनणार. ते (दुनियावाले) तर गंगा स्नानाला श्रेष्ठ मानतात म्हणून गंगा स्नानच करत राहतात. बाबा (ब्रह्मा बाबा) तर या सर्व गोष्टींचे अनुभवी आहेत ना. यांनी तर खूप गुरू केले आहेत. ते गंगाजलाने स्नान करण्यासाठी जातात. इथे तुमचे स्नान होते आठवणीच्या यात्रेने. बाबांच्या आठवणी शिवाय तुमची आत्मा पावन बनूच शकत नाही. याचे नावच आहे - ‘योग’ अर्थात ‘आठवणीची यात्रा’. ज्ञानाला स्नान समजायचे नाही, योगाचे स्नान आहे. ज्ञान तर ‘अभ्यास’ आहे, योगाचे ‘स्नान’ आहे, ज्याद्वारे पापे नष्ट होतात. ज्ञान आणि योग दोन गोष्टी आहेत. आठवणीद्वारेच जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतात. बाबा म्हणतात - या आठवणीच्या यात्रेनेच तुम्ही पावन बनून सतोप्रधान बनाल. बाबा तर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात - ‘गोड-गोड मुलांनो, या गोष्टींना चांगल्या रीतीने समजून घ्या. या गोष्टी विसरू नका’. आठवणीच्या यात्रेनेच जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील, बाकी ज्ञान तर आहे कमाई. आठवण आणि शिक्षण दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. ज्ञान आणि विज्ञान - ज्ञान अर्थात शिक्षण, विज्ञान अर्थात योग अथवा आठवण. कोणाला प्राधान्य द्याल - ज्ञान की योग? आठवणीची यात्रा खूप मोठी आहे. यामध्येच मेहनत आहे. स्वर्गामध्ये तर सर्वजण जातील. सतयुग आहे - स्वर्ग, त्रेता आहे - सेमी स्वर्ग. तिथे तर इथे केलेल्या या अभ्यासानुसार जाऊन विराजमान व्हाल. बाकी मुख्य आहे योगाची गोष्ट. प्रदर्शनी किंवा म्युझियम इत्यादी ठिकाणी तुम्ही ज्ञान समजावून सांगता; योग थोडाच समजावून सांगू शकाल. केवळ इतकेच म्हणाल - ‘स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा’. बाकी ज्ञान तर खूप देता. बाबा म्हणतात - सर्वप्रथम हीच गोष्ट सांगा की, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. हे ज्ञान देण्यासाठीच तुम्ही इतकी चित्रे इत्यादी बनवता. योगासाठी काही चित्राची गरज नाही. चित्रे तर सारी ज्ञानाला स्पष्ट करून सांगण्यासाठी बनविली जातात. स्वतःला आत्मा समजल्याने देहाचा अहंकार एकदम नष्ट होतो. ज्ञानामध्ये तर वर्णन करण्यासाठी जरूर मुख पाहिजे. योगाची तर एकच गोष्ट आहे - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे. शिक्षणामध्ये तर देहाची गरज आहे. शरीरा शिवाय शिकाल कसे आणि शिकवाल तरी कसे.
पतित-पावन बाबा आहेत तर त्यांच्यासोबत योग लावावा लागेल ना. परंतु कोणी जाणत नाही. बाबा स्वतः येऊन शिकवतात, मनुष्य मनुष्यांना कधी शिकवू शकत नाही. बाबाच म्हणतात माझी आठवण करा, याला म्हटले जाते परमात्म्याचे ज्ञान. परमात्माच ज्ञानाचे सागर आहेत. या खूप समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. सर्वांना हेच सांगा की, बेहदच्या बाबांची आठवण करा. ते बाबा नवीन दुनिया स्थापन करतात. त्यांना हे समजत नाही की नवीन दुनिया स्थापन होणार आहे, ज्यासाठी भगवंताची आठवण करावी. आठवणच राहिलेली नाही आहे तर विचार तरी कशाला करतील? हे देखील तुम्ही जाणता. परमपिता परमात्मा शिव भगवान एकच आहेत. म्हणतात देखील, ब्रह्मा देवताए नमः आणि मग शेवटी म्हणतात शिव परमात्माए नमः. ते पिता आहेतच उच्च ते उच्च. परंतु ते कसे आहेत हे देखील समजत नाहीत. जर दगड-धोंड्यामध्ये आहेत मग ‘नम:’ कोणासाठी? निरर्थक बोलत राहतात. इथे तर तुम्हाला आवाजापासून परे जायचे आहे अर्थात निर्वाणधाम, शांतीधाममध्ये जायचे आहे. शांतीधाम, सुखधाम म्हटले जाते. ते आहे स्वर्गधाम. नरकाला धाम म्हणता येणार नाही. शब्द खूप सोपे आहेत. क्राइस्टचा धर्म कधीपर्यंत चालेल? हे देखील त्या लोकांना काहीच माहित नाही आहे. म्हणतात देखील क्राईस्ट पासून ३ हजार वर्षांपूर्वी पॅराडाईज होता अर्थात देवी-देवतांचे राज्य होते तर मग २ हजार वर्षे ख्रिश्चनांची झाली, आता पुन्हा देवता धर्म असायला हवा ना. मनुष्यांची बुद्धी काहीच काम करत नाही. ड्रामाच्या रहस्याला न जाणल्याकारणाने किती प्लॅन बनवत राहतात. या मोठ्या गोष्टी वृद्ध माता तर समजू शकत नाहीत. बाबा समजावून सांगत आहेत की आता तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. वाणी पासून परे जायचे आहे. ते भले म्हणतात - ‘निर्वाणधाममध्ये गेला’, परंतु जात कोणीच नाही. तरीही पुनर्जन्म घेतात नक्कीच. परत कोणीही जात नाही. वानप्रस्थमध्ये जाण्यासाठी गुरुचा संग करतात. खूप वानप्रस्थ आश्रम आहेत. माता देखील खूप आहेत. तिथे देखील तुम्ही सेवा करू शकता. वानप्रस्थचा अर्थ काय आहे, तो तुम्हाला बाबा बसून समजावून सांगतात. आता तुम्ही सर्व वानप्रस्थी आहात. सारी दुनिया वानप्रस्थी आहे. जे काही मनुष्य मात्र पाहता ते सर्व वानप्रस्थी आहेत. सर्वांचा सद्गती दाता एकच सद्गुरु आहे. सर्वांना जायचेच आहे. जे चांगल्या रीतीने पुरुषार्थ करतात ते आपले उच्च पद प्राप्त करतात. याला म्हटलेच जाते - कयामत (महाविनाशाची) वेळ. महाविनाशाचा अर्थ देखील ते लोक समजत नाहीत. तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार समजतात. खूप उच्च ध्येय आहे. सर्वांनी हे लक्षात घ्यायचे आहे - आता आपल्याला घरी जायचे आहे जरूर. आत्म्यांना वाणी पासून परे जायचे आहे नंतर मग पार्ट रिपीट करणार. परंतु बाबांची आठवण करता-करता जाल तर उच्च पद प्राप्त कराल. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. कोणते घाणेरडे काम चोरी इत्यादी करता कामा नये. तुम्ही पुण्य आत्मा बनणारच मुळी योगाद्वारे; ज्ञानाद्वारे नाही. आत्मा पवित्र पाहिजे. शांतीधाममध्ये पवित्र आत्मेच जाऊ शकतात. सर्व आत्मे तिथे राहतात. अजूनही येत राहतात. आता बाकी जे काही आहेत ते इथे येत राहतील.
तुम्हा मुलांना खूप आठवणीच्या यात्रेमध्ये रहायचे आहे. इथे (मधुबनमध्ये) तुम्हाला चांगली मदत मिळेल. एकमेकांचे बळ मिळते ना. तुम्हा थोड्याशा मुलांचीच ताकद काम करते. गोवर्धन पर्वत दाखवतात ना, बोटावरती उचलला. तुम्ही गोप-गोपिका आहात ना. सतयुगी देवी-देवतांना गोप-गोपिका म्हटले जात नाही. बोट तुम्ही लावता. आयरन एजला गोल्डन एज किंवा नरकाला स्वर्ग बनविण्यासाठी तुम्ही एका बाबांसोबत बुद्धीचा योग लावता. योगाद्वारेच पवित्र बनायचे आहे, या गोष्टींना विसरायचे नाहीये. ही ताकद तुम्हाला इथे मिळते. बाहेर तर आसुरी मनुष्यांचा संग असतो. तिथे आठवणीमध्ये राहणे खूप अवघड आहे. तुम्ही इतके स्थिर तिथे (आपल्या घरी) राहू शकत नाही. संघटन पाहिजे ना. इथे सर्व एकरस एकत्रित बसतात तर मदत मिळेल. इथे धंदा इत्यादी काहीच असत नाही. बुद्धी कुठे जाईल! बाहेर राहिल्याने घर-कामधंदा इत्यादी आकर्षित जरूर करेल. इथे (मधुबनमध्ये) तर यातले काहीच नाही आहे. इथले वायुमंडळ चांगले शुद्ध असते. ड्रामा अनुसार किती दूर पर्वतावर येऊन तुम्ही बसले आहात. समोर यादगार (स्मृतिस्थळ) देखील अचूक उभे आहे. वरती स्वर्ग दाखवला आहे. नाही तर कुठे बनवणार. तर बाबा म्हणतात - इथे येऊन बसता तर स्वतःवर लक्ष ठेवा - आपण बाबांच्या आठवणीमध्ये बसतो का? स्वदर्शन चक्र फिरत रहावे. अच्छा.
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- १) आपल्या आठवणीच्या चार्टवर पूर्ण लक्ष ठेवायचे आहे, पहायचे आहे - मी बाबांची किती वेळ आठवण करतो. आठवणीच्या वेळी बुद्धी कुठे-कुठे भटकते?
- या महाविनाशाच्या समयी वाणी पासून परे जाण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. बाबांच्या आठवणी सोबतच दैवी गुण देखील जरूर धारण करायचे आहेत. कोणतेही घाणेरडे काम चोरी इत्यादी करायची नाही.
| वरदान:- |
व्यर्थ आणि डिस्टर्ब करणाऱ्या बोला पासून मुक्त, डबल लाईट अव्यक्त फरिश्ता भव अव्यक्त फरिश्ता बनायचे असेल तर व्यर्थ बोल जे कोणालाही चांगले वाटत नाहीत त्यांना नेहमीसाठी समाप्त करा. गोष्ट असते दोन शब्दांची परंतु त्याला लांबलचक करून बोलत राहणे, हे देखील व्यर्थ आहे. जे चार शब्दांमध्ये काम होऊ शकते ते बारा-पंधरा शब्दांमध्ये बोलू नका. ‘कमी बोला, हळू बोला…’. हे स्लोगन गळ्यामध्ये अडकवून ठेवा. व्यर्थ आणि डिस्टर्ब करणाऱ्या बोला पासून मुक्त बना तर अव्यक्त फरिश्ता बनण्यामध्ये खूप मदत मिळेल. |
| बोधवाक्य:- | जे स्वतःला परमात्म प्रेमाच्या मागे अर्पण करतात, सफलता त्यांच्या गळ्यातील हार बनतो. |