| 20.10.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
“अव्यक्त बापदादा”
|
“या वर्षाला निर्मान, निर्मल वर्ष आणि व्यर्थ पासून मुक्त होण्याचे मुक्ति वर्ष म्हणून साजरे करा”
आज बापदादा आपल्या चोहोबाजूंच्या मुलांच्या मस्तकामध्ये चमकत असलेल्या तीन रेषा बघत आहेत. एक रेषा आहे - प्रभू पालनेची, दुसरी रेषा आहे - श्रेष्ठ शिक्षणाची आणि तिसरी रेषा आहे - श्रेष्ठ मताची. तीनही रेषा चमकत आहेत. या तीनही रेषा सर्वांच्या भाग्याच्या रेषा आहेत. तुम्ही देखील सर्वजण आपल्या तीनही रेषा बघत आहात ना! प्रभू पालनेचे भाग्य तुम्हा ब्राह्मण आत्म्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्राप्त होत नाही. परमात्म पालना ज्या पालनेमुळे किती श्रेष्ठ पुज्यनीय बनता. कधी स्वप्नात तरी असा विचार केला होता का की, मज आत्म्याला परमात्म शिक्षणाचा अधिकार प्राप्त होणार आहे. परंतु आता साकारमध्ये अनुभव करत आहात. स्वतः सद्गुरू अमृतवेलेपासून रात्री पर्यंत प्रत्येक कर्मासाठी श्रेष्ठ मत देऊन कर्म बंधनाच्या परिवर्तनामध्ये, कर्म संबंधामध्ये येण्याचे श्रीमत देण्यासाठी निमित्त बनवतील - हे देखील स्वप्नामध्ये नव्हते. परंतु आता अनुभवाने म्हणता आमचे प्रत्येक कर्म श्रीमतावर चालत आहे. असा अनुभव आहे का? बापदादा देखील प्रत्येक मुलाचे असे श्रेष्ठ भाग्य पाहून हर्षित होत असतात. ‘वाह मेरे श्रेष्ठ भाग्यवान वाह!’ मुले म्हणतात - ‘वाह बाबा वाह!’ आणि बाबा म्हणतात - ‘वाह मुलांनो वाह!’
आज अमृतवेलेपासून बापदादांकडे मुलांच्या दोन संकल्पांद्वारे आठवण पोहोचली. एक तर खूप मुलांना आपले अकाउंट (पोतामेल) देण्याची आठवण होती. आणि दुसरी - बाबांच्या संगाच्या रंगाच्या होळीची आठवण होती. तर सर्वजण होळी साजरी करण्यासाठी आला आहात ना! ब्राह्मणांच्या भाषेमध्ये, ‘साजरे करणे’ अर्थात ‘बनणे’. होळी साजरी करतात अर्थात ‘होली’ (पवित्र) बनतात. बापदादा बघत होते ब्राह्मण मुलांचे होलीएस्ट बनणे सर्वांपासून किती न्यारे आणि प्यारे (वेगळे आणि सुंदर) आहे. तसे तर द्वापरच्या सुरुवातीचे महान आत्मे आणि वेळोवेळी आलेले धर्म पिता सुद्धा पवित्र, होली बनले आहेत. परंतु तुमची पवित्रता सर्वांपेक्षा श्रेष्ठ देखील आहे, आणि वेगळी देखील आहे. कोणीही साऱ्या कल्पामध्ये भले महात्मा असो, किंवा धर्म आत्मा असो, धर्म पिता असो परंतु तुमची आत्मा सुद्धा पवित्र, शरीर सुद्धा पवित्र, प्रकृति सुद्धा सतोप्रधान पवित्र, असा होलीएस्ट कोणी ना बनला आहे, ना बनू शकणार. आपले भविष्य स्वरूप समोर आणा. सर्वांच्या समोर आपले भविष्य रूप आले का? का माहितीच नाही की, बनणार का नाही बनणार! कोण बनणार! काहीही बनलात परंतु असणार तर पवित्र ना! शरीर देखील पवित्र, आत्मा देखील पवित्र आणि प्रकृति सुद्धा पवित्र पावन, सुखदाई… निश्चयाच्या लेखणीद्वारे आपले भविष्य चित्र समोर आणू शकता. निश्चय आहे ना! टीचर्सना निश्चय आहे? अच्छा एका सेकंदामध्ये आपले भविष्य चित्र समोर आणू शकता का? चला कृष्ण नाही बनणार, परंतु सोबती तर बनणार ना! किती गोड वाटते. आर्टिस्ट बनायला येते कि नाही येत? बस समोर बघा. आत्ता साधारण आहे, उद्या (ड्रामाचा उद्या, हा उद्या नाही जो उद्या येणार आहे) तर उद्या असे पवित्र शरीरधारी बनायचेच आहे. पांडव काय समजता? पक्के आहे ना, शंका तर नाही ना - माहित नाही बनणार का नाही बनणार? शंका आहे? नाही ना! पक्के आहे. जर राजयोगी आहात तर राज्य अधिकारी बनायचेच आहे. बापदादा बरेचदा आठवण करून देतात की, बाबा तुमच्यासाठी सौगात (भेट) घेऊन आले आहेत तर काय सौगात आणली आहे? सोनेरी दुनिया, सतोप्रधान दुनियेची सौगात आणली आहे. तर निश्चय आहे, निश्चयाची निशाणी आहे आत्मिक नशा. जितके आपल्या राज्याच्या जवळ येत आहात, घराच्या सुद्धा जवळ येत आहात आणि आपल्या राज्याच्या देखील जवळ येत आहात, तर वारंवार आपल्या स्वीट होम आणि आपल्या स्वीट राज्याची स्मृति अगदी स्पष्टपणे आली पाहिजे. ही जवळ येण्याची निशाणी आहे. आपले घर, आपले राज्य असेच स्पष्ट स्मृतिमध्ये येऊ दे, तिसऱ्या नेत्राद्वारे स्पष्ट दिसायला हवे. अनुभव व्हावा आज हे, उद्या ते. किती वेळा पार्ट पूर्ण करून आपल्या घरी आणि आपल्या राज्यामध्ये गेले आहात, आठवते आहे ना! आणि आता पुन्हा जायचे आहे.
बापदादांनी सर्वांचा वर्तमान समयाचा रिझल्ट पाहिला. मग डबल फॉरेनर्स असोत, किंवा भारतवासी, सर्व मुलांच्या रिझल्टमध्ये पाहिले की वर्तमान समयी निष्काळजीपणाचे खूप नवीन-नवीन प्रकार मुलांमध्ये आहेत. अनेक प्रकारचा निष्काळजीपणा आहे. मनातल्या मनात विचार करतात, ‘सगळे चालते…’ आजकालचे सर्वच गोष्टींमध्ये हे विशेष स्लोगन आहे - “सगळे काही चालते”- हा निष्काळजीपणा आहे. त्यासोबत थोडा-थोडा वेगवेगळ्या प्रकारचा पुरुषार्थ किंवा स्व-परिवर्तनामध्ये निष्काळजीपणासोबत काही प्रमाणात आळस सुद्धा आहे. ‘होऊन जाईल, करूच…’ बापदादांनी नवीन-नवीन प्रकारच्या निष्काळजीपणाच्या गोष्टी बघितल्या आहेत त्यामुळे आपले खरे, सच्चाईने निष्काळजीपणाने नाही, आपले अकाउंट (चार्ट) जरूर ठेवा.
तर बापदादा आज रिझल्ट ऐकवत आहेत. ऐकवू ना! की नको, फक्त प्रेम करू? हे देखील प्रेम आहे. प्रत्येकावर बापदादांचे इतके प्रेम आहे कि सर्व मुले ब्रह्मा बाबांसोबत आपल्या घरी यावीत. मागाहून येऊ नयेत, सोबती बनून यावीत. तर मग समान बनावे लागेल ना! समान बनल्याशिवाय सोबती बनून येऊ शकणार नाहीत आणि मग आपल्या राज्यातील पहिला जन्म, पहिला जन्म तर पहिलाच असणार ना! जर दुसऱ्या तिसऱ्या जन्मामध्ये आलात देखील, अच्छा राजा सुद्धा बनलात, परंतु म्हणणार तर दुसरा तिसरा ना! सोबत चला आणि ब्रह्मा बाबांसोबत पहिल्या जन्माचे अधिकारी बना - हे आहे नंबरवन पास विद ऑनरवाले. तर पास विद ऑनर बनायचे आहे की पास मार्क्स असले तरी चालेल? कधीही असा विचार करू नका की, जे आम्ही करत आहोत, जे होत आहे ते बापदादा बघत नाहीत. याबाबतीत कधी निष्काळजी बनू नका. जर कोणताही मुलगा आपला खरा चार्ट विचारेल तर बापदादा त्याला सांगू शकतात परंतु तो आता सांगणार नाही. बापदादा प्रत्येक महारथी, घोडेस्वार… सर्वांचा चार्ट बघत आहेत. अनेकदा तर बापदादांना कीव येते, आहेत कोण आणि करत काय आहेत? परंतु जसे ब्रह्माबाबा म्हणायचे ना - आठवते का काय म्हणायचे? ‘गुड़ जाने गुड़ की गोथरी जाने’. शिवबाबा जाणे आणि ब्रह्माबाबा जाणे कारण बापदादांना खूप दया येते परंतु अशी मुले बापदादांच्या दयेच्या संकल्पाला टच करू शकत नाहीत, कॅच करू शकत नाहीत, म्हणून बापदादांनी म्हटले - वेगवेगळ्या प्रकारचा रॉयल निष्काळजीपणा बाबा बघत असतात. आज बापदादा सांगूनच टाकतात की खूप तळमळ वाटते. बरीच मुले असे समजतात की, सतयुगामध्ये तर कळणारही नाही कोण काय होता, आता तर मजा करूया, आता जे काही करायचे आहे ते करा, कोणी अडवणारा नाही, कोणी पाहणारा नाही. परंतु हे चुकीचे आहे. बापदादा फक्त नावे सांगत नाहीत, नावे ऐकवतील तर उद्या ठीक होतील.
तर समजले काय करायचे आहे, पांडव समजले की नाही समजले! चालून जाईल? चालणार नाही; कारण बापदादांकडे प्रत्येकाचा प्रत्येक दिवसाचा रिपोर्ट येतो. बाप-दादा आपसामध्ये सुद्धा रुहरिहान (आत्मिक बातचीत) करतात. तर बापदादा सर्व मुलांना पुन्हा ताकीद देत आहेत की, सगळ्याच बाबतीत वेळ अतिमध्ये जात आहे. माया देखील आपला अतिचा पार्ट (टोकाची भूमिका) बजावत आहे, प्रकृती देखील आपली टोकाची भूमिका बजावत आहे. अशा वेळी ब्राह्मण मुलांचे स्वतःवरील लक्ष सुद्धा अति जास्त अर्थात मन-वचन-कर्मामध्ये अति जास्त असायला हवे. साधारण पुरुषार्थ नाही. तसे तर बापदादांनी पाहिले आहे की सेवेची आवड चांगली आहे. सेवेसाठी एव्हररेडी आहेत, चान्स मिळाला तर प्रेमाने सेवेसाठी एव्हररेडी आहेत. परंतु आता सेवेमध्ये ही भर घाला - वाणी सोबतच मनसा, आपल्या आत्म्याला विशेष कोणत्या ना कोणत्या प्राप्तीच्या स्वरूपामध्ये स्थित करून वाणीने सेवा करा. समजा भाषण करत आहात तर वाणीने तर भाषण चांगले करताच परंतु त्यावेळी आपल्या आत्मिक स्थितीमध्ये विशेष करून शक्तीची, किंवा शांतीची, किंवा परमात्म प्रेमाची, कोणत्या ना कोणत्या विशेष अनुभूतीच्या स्थितीमध्ये स्वतःला स्थित करून मनसाद्वारा आत्मिक स्थितीचा प्रभाव वातावरणामध्ये पसरवा आणि त्याचसोबत वाणीने संदेश द्या. वाणीद्वारे संदेश द्या, मनसा आत्मिक स्थितीद्वारे अनुभूती करवा. भाषणाच्या वेळी तुमच्या मस्तकातून, डोळ्यातून, चेहेऱ्यातून तुमच्या बोलाची अनुभूती प्रतिबिंबित व्हावी की आज भाषण तर ऐकले परंतु परमात्म प्रेमाची खूप छान अनुभूती होत होती. जसे भाषणाच्या रिझल्टमध्ये म्हणतात ना - खूप छान बोललात, खूप छान, खूप छान गोष्टी ऐकवल्यात, असेच तुमच्या आत्मिक स्वरूपाच्या अनुभूतीचे सुद्धा वर्णन करावे. मनुष्य आत्म्यांना व्हायब्रेशन पोचावे, वातावरण बनावे. जेव्हा विज्ञानाची साधने वातावरण थंड करू शकतात, सर्वांना अनुभव होतो गारवा खूप छान येत आहे. गरम वातावरणाचा अनुभव करवू शकतात. विज्ञान थंडीमध्ये गरमीचा अनुभव करवू शकते, गरमीमध्ये थंडीचा अनुभव करवू शकते, तर तुमचे विज्ञान काय प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, शांत स्वरूप वातावरणाचा अनुभव करवू शकत नाही! यावर संशोधन करा. केवळ चांगले-चांगले म्हटले एवढेच नाही, परंतु चांगले बनतील, तेव्हा समाप्तीच्या वेळेला समाप्त करून आपले राज्य आणाल. का, तुम्हाला तुमच्या राज्याची आठवण येत नाही काय? संगमयुग श्रेष्ठ आहे ते ठीक आहे, हिरेतुल्य आहे. परंतु माझ्या दयाळू, विश्व कल्याणी मुलांनो, आपल्या दुःखी अशांत भाऊ-बहिणींवर दया येत नाही काय? उमंग येत नाही, दुःखमय संसाराला सुखमय बनवूया, असा उमंग येत नाही का? दुःख पाहू इच्छिता, दुसऱ्यांचे दुःख पाहून सुद्धा दया येत नाही का? तुमचेच बांधव आहेत, तुमच्याच बहिणी आहेत तर दुःख पाहायला चांगले वाटते? आपले दयाळू, कृपाळू स्वरूप इमर्ज करा. फक्त सेवेमध्ये व्यस्त राहू नका, हा प्रोग्राम केला, हा प्रोग्राम केला… चला वर्ष पूर्ण झाले. आता मर्सीफुल बना. मग दृष्टीने असो, किंवा अनुभूतीने, नाहीतर आत्मिक स्थितीच्या प्रभावाने असो परंतु मर्सीफुल बना. दयाळू बना. अच्छा.
बापदादांनी आणखी एक गोष्ट पाहिली, सांगताना चांगले वाटत नाही. कधी-कधी काही-काही मुले, चांगली-चांगली मुलेसुद्धा दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये खूप रस घेतात. दुसऱ्यांच्या गोष्टी पाहणे, दुसऱ्यांच्या गोष्टींचे वर्णन करणे… आणि पाहतात सुद्धा व्यर्थ गोष्टी. एक-दोघांच्या विशेषतेचे वर्णन करणे, ते कमी आहे. प्रत्येकाची विशेषता पाहणे, विशेषतेचे वर्णन करणे, त्यांच्या विशेषतेद्वारे त्यांना उमंग-उत्साह देणे, हे कमी आहे. परंतु व्यर्थ गोष्टी ज्या गोष्टींना, बापदादा सांगतात - सोडून द्या; आपली गोष्ट तर सोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु दुसऱ्यांचे बघण्याची सुद्धा सवय आहे. त्यामध्ये वेळ खूप जातो. बापदादा एक विशेष श्रीमत देत आहेत - आहे साधारण गोष्ट परंतु वेळ खूप वेस्ट जातो. बोलण्यामध्ये निर्मान (नम्र) बना. बोलण्यामध्ये निर्मानता (विनम्रता) कमी असता कामा नये. जरी साधारण शब्द बोलता, तुम्ही समजता की, या ठिकाणी तर बोलावेच लागेल ना! परंतु विनम्रते ऐवजी जर कोणी अधिकारवाणीने बोलत असतील, निर्मान (नम्रतेचे) बोल बोलत नसतील तर थोडासा कार्याचा, खुर्चीचा, ५ परसेंट अभिमान दिसून येतो. निर्मानता (विनम्रता) ब्राह्मण जीवनाचा विशेष शृंगार आहे. मनामध्ये, वाणीमध्ये, बोलामध्ये, संबंध-संपर्कामध्ये… निर्मानता (विनम्रता) असावी. असे नाही तीन गोष्टींमध्ये तर मी निर्मान आहे, एकामध्ये कमी आहे तर काय झाले! परंतु ती एक कमी पास विद ऑनर होऊ देणार नाही. निर्मानताच (विनम्रताच) महानता आहे. हे नमणे नाही नमवणे आहे. बरीच मुले मस्करीमध्ये असे म्हणतात - ‘मलाच नमते घ्यायचे आहे काय, याने देखील थोडे नमते घ्यावे ना’. परंतु हे नमणे नाही आहे वास्तविक परमात्म्याला सुद्धा आपल्यावर नमवणे आहे, आत्म्याची तर गोष्टच सोडा. निर्मानता आपोआपच निरहंकारी बनवते. निरहंकारी बनण्यासाठी वेगळा पुरुषार्थ करावा लागत नाही. तुमच्यातील निर्मानता (विनम्रता) प्रत्येकाच्या मनामध्ये, तुमच्यासाठी प्रेमाचे स्थान बनविते. निर्मानता प्रत्येकाच्या मनामध्ये तुमच्या प्रति आशीर्वादाची भावना निर्माण करेल. खूप आशीर्वाद मिळतील. आशीर्वाद, पुरुषार्थामध्ये लिफ्ट पेक्षा रॉकेट बनेल. निर्मानता ही एक अशी चीज आहे - कसाही कोणी असेल, बिझी असो, किंवा कठोर ह्रदयाचा असो, रागीट असो, परंतु निर्मानता तुम्हाला सर्वांकडून सहयोग मिळण्यासाठी निमित्त बनेल. निर्मान असणारा प्रत्येकाच्या संस्कारा सोबत स्वतःला चालवू शकतो. रियल गोल्ड असल्याकारणाने स्वतःला मोल्ड करण्याची विशेषता असते. तर बापदादांनी पाहिले आहे की, बोलण्या-चालण्यामध्ये देखील, संबंध-संपर्कामध्ये देखील, सेवेमध्ये देखील एकमेकांप्रती निर्मान स्वभाव विजय प्राप्त करून देतो, म्हणून या वर्षामध्ये विशेष बापदादा या वर्षाला ‘निर्मान, निर्मल वर्ष’ असे नाव देत आहेत. वर्ष साजरे करणार ना.
बापदादा प्रत्येक मुलाला या वर्षामध्ये व्यर्थ पासून मुक्त पाहू इच्छितात. मुक्त वर्ष साजरे करा. जी काही कमी-कमजोरी असेल, त्या कमीला मुक्ती द्या, कारण जोपर्यंत मुक्ती देणार नाही ना, तोपर्यंत बाबांसोबत मुक्तीधाममध्ये जाऊ शकणार नाही. तर मुक्ती देणार? मुक्ती वर्ष साजरे करणार? जे साजरे करणार त्यांनी असा हात करा. साजरे करणार ना? एकमेकांना पाहिले ना, साजरे करणार ना! चांगले आहे. जर मुक्ती वर्ष साजरे केले तर बापदादा हिरे-माणकांनी जडलेल्या ताटांमधून खूप-खूप मुबारक, ग्रीटिंग्स, शुभेच्छा देतील. चांगले आहे, स्वतःला सुद्धा मुक्त करा. आपल्या भाऊ-बहिणींना सुद्धा दुःखातून दूर करा. त्या बिचाऱ्यांच्या मनातून एवढा तर आनंदाचा आवाज निघू दे - ‘हमारा बाबा आ गया’. ठीक आहे. अच्छा.
चोहो बाजूच्या सर्व होलिएस्ट आत्म्यांना, सदैव निर्मान बनून निर्माण करणाऱ्या बापदादांच्या समीप आत्म्यांना, सदैव आपल्या पुरुषार्थाच्या विधीला फास्ट, तीव्र करून संपन्न बनणाऱ्या स्नेही आत्म्यांना, सदैव आपले बचतीचे खाते वाढविणाऱ्या तीव्र पुरुषार्थी, तीव्र बुद्धी असणाऱ्या मुलांना विशाल बुद्धीची मुबारक असो, प्रेमपूर्वक आठवणी सोबत सर्व मुलांना नमस्ते.
| वरदान:- |
‘एक बल एक भरोसा’, या आधारावर मायेला सरेंडर करायला लावणारे शक्तिशाली आत्मा भव एक बल एक भरोसा अर्थात सदैव शक्तिशाली. जिथे एक बल एक भरोसा असतो तिथे कोणीही हलवू शकत नाही. त्यांच्या समोर माया बेशुद्ध पडते, सरेंडर होते. माया सरेंडर झाली तर सदैव विजयी आहातच. तर हाच नशा रहावा की विजय आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मनामध्ये ही स्मृती इमर्ज राहावी की आम्हीच कल्प-कल्पाचे शक्ती आणि पांडव विजयी बनलो होतो, आहोत आणि पुन्हा बनणार आहोत. |
| सुविचार:- | नवीन दुनियेच्या स्मृतीद्वारे सर्व गुणांचे आवाहन करा आणि तीव्र गतीने पुढे जा. |
सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, सर्व ब्रह्मावत्स संघटित रूपामध्ये सायंकाळी ६:३० ते ७:३० वाजेपर्यंत विशेष दयाळू कृपाळू बाबांसोबत प्रत्येक आत्म्यावर दयेची, कृपेची दृष्टी टाका. सर्वांना दुवा द्या आणि दुवा घ्या.