| 23.10.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - तुमची यात्रा बुद्धीची आहे, यालाच रूहानी यात्रा म्हटले जाते, तुम्ही स्वतःला आत्मा समजता, शरीर नाही, शरीर समजणे अर्थात् उलटे लटकणे” | |
| प्रश्न:- | मायेच्या भपक्यामध्ये मनुष्यांना कोणती इज्जत (पत) मिळते? |
| उत्तर:- | आसुरी इज्जत मिळते. मनुष्य कोणालाही आज थोडी इज्जत देतात, आणि उद्या त्याला बेइज्जत करतात, शिव्या देतात. मायेने सर्वांना बेइज्जत केले आहे, पतित बनवले आहे. बाबा आले आहेत तुम्हाला दैवी इज्जतवाले बनविण्यासाठी. |
ओम् शांती. रुहानी बाबा आत्म्यांना विचारत आहेत - ‘कुठे बसला आहात?’ तुम्ही म्हणाल - ‘विश्वाच्या रूहानी विद्यापीठामध्ये’. त्या लोकांना तर ‘रूहानी’ हा शब्दसुद्धा माहीती नाही. ‘विश्वविद्यालये’ तर जगात अनेक आहेत. हे आहे संपूर्ण जगातील एकच ‘रूहानी विद्यालय’. शिकवणारा एकच आहे. काय शिकवतात? रूहानी नॉलेज. तर हे आहे ‘अध्यात्मिक विद्यालय’ अर्थात् रूहानी पाठशाळा. अध्यात्मिक अर्थात् रूहानी नॉलेज शिकवणारे कोण आहेत? हे देखील आता तुम्ही मुलेच जाणता. रूहानी बाबाच रूहानी नॉलेज शिकवतात, म्हणून त्यांना शिक्षकसुद्धा म्हणतात, स्पिरिच्युअल फादर (अध्यात्मिक पिता) शिकवत आहेत. अच्छा, मग त्याने काय होईल? तुम्ही मुले जाणता या रूहानी नॉलेजद्वारे आपण आपला आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन करतो. एका धर्माची स्थापना आणि बाकी इतके सारे जे धर्म आहेत, त्यांचा विनाश होईल. या अध्यात्मिक ज्ञानाचा सर्व धर्मांशी काय संबंध आहे हे देखील आता तुम्ही जाणता. एका धर्माची स्थापना या रूहानी नॉलेजद्वारे होते. हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते ना! त्याला म्हणणार रूहानी दुनिया (स्पिरिच्युअल वर्ल्ड). या स्पिरिच्युअल नॉलेजमध्ये तुम्ही राजयोग शिकता. राज्य स्थापन होते. अच्छा, मग इतर धर्मांशी काय संबंध आहे? इतर सर्व धर्म विनाश होतील कारण तुम्ही पावन बनता तर तुम्हाला नवीन दुनिया पाहिजे. इतके अनेक धर्म सर्व नष्ट होतात, एकच धर्म राहतो. त्याला म्हटले जाते - विश्वामध्ये शांतीचे राज्य. आता आहे पतित अशांतीचे राज्य, नंतर होईल पावन शांतीचे राज्य. आता तर अनेक धर्म आहेत. किती अशांती आहे. सर्व पतितच पतित आहेत. रावणाचे राज्य आहे ना. आता मुले जाणतात ५ विकारांना जरूर सोडायचे आहे. यांना सोबत घेऊन जायचे नाही आहे. आत्मा चांगले किंवा वाईट संस्कार घेऊन जाते ना. आता बाबा तुम्हा मुलांना पवित्र बनण्याची गोष्ट सांगत आहेत. त्या पावन दुनियेमध्ये कोणतेही दुःख असत नाही. हे स्पिरिच्युअल नॉलेज शिकवणारे कोण आहेत? स्पिरिच्युअल फादर. सर्व आत्म्यांचे पिता. स्पिरिच्युअल फादर काय शिकवतील? स्पिरिच्युअल नॉलेज, यामध्ये कोणत्याही पुस्तक इत्यादीची आवश्यकता नाही. फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. पावन बनायचे आहे. बाबांची आठवण करता-करता अंत मती सो गती होईल. ही आहे आठवणीची यात्रा. ‘यात्रा’ शब्द चांगला आहे. त्या आहेत ‘भौतिक यात्रा’, ही आहे ‘रूहानी यात्रा’. त्या यात्रेला तर पायी चालत जावे लागते, हात-पाय चालवतात, या यात्रेमध्ये मात्र असे काहीच नाही. फक्त आठवण करायची आहे. भले कुठेही हिंडा-फिरा, उठा, बसा, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. काही अवघड गोष्ट नाहीये, फक्त आठवण करायची आहे. ही तर वास्तविकता आहे ना. पूर्वी तुम्ही उलटे चालत होता. स्वतःला आत्मा समजण्या ऐवजी शरीर समजणे याला म्हटले जाते उलटे लटकणे. स्वतःला आत्मा समजणे आहे सुलटे. अल्ला (भगवान) जेव्हा येतात तेव्हा पावन बनवतात. अल्लाची आहे पावन दुनिया, रावणाची आहे पतित दुनिया. देह-अभिमानामध्ये सर्व उलटे झाले आहेत. आता एकदाच देही-अभिमानी बनायचे आहे. तर तुम्ही अल्लाची मुले आहात. आता तुम्ही स्वतःला, ‘मी अल्ला आहे’, असे म्हणणार नाही. बोटाने नेहमी वरच्या दिशेने संकेत करतात, यावरून हे सिद्ध होते की अल्ला तो आहे. म्हणजे इथे नक्कीच दुसरी कोणती चीज आहे. मी त्या अल्ला पित्याची संतान आहे. आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. मी अल्ला आहे म्हटल्यामुळे मग उलटे होईल की आपण सर्व पिता आहोत. परंतु नाही, पिता एकच आहे. त्यांची आठवण करायची आहे. अल्ला सदा पावन आहेत. अल्ला स्वतः बसून शिकवतात. छोट्याशा गोष्टीने मनुष्य किती गोंधळतात. शिवजयंती सुद्धा साजरी करतात.
श्रीकृष्ण स्वर्गातील पहिला राजकुमार आहे, हे बेहदचे बाबा याला राज्य-भाग्य देतात. बाबा जी नवीन दुनिया स्थापन करतात त्यामध्ये श्रीकृष्ण पहिल्या नंबरचा राजकुमार आहे. बाबा बसून मुलांना पावन बनण्याची युक्ती सांगतात. मुले जाणतात स्वर्ग, ज्याला वैकुंठ, विष्णूपुरी म्हणतात, तो भूतकाळात होऊन गेला आहे मग भविष्यात होईल. चक्र फिरत राहते ना. हे ज्ञान आता तुम्हा मुलांना मिळत आहे. हे धारण करून मग इतरांकडून धारण करून घ्यायचे आहे. प्रत्येकाने टीचर बनायचे आहे. असे देखील नाही की टीचर बनल्यामुळे लक्ष्मी-नारायण बनाल. नाही. टीचर बनल्यामुळे तुम्ही प्रजा बनवाल, जितके अनेकांचे कल्याण कराल तेवढे उच्च पद प्राप्त कराल. आठवण राहील. बाबा म्हणतात - ‘ट्रेनमधून येता तेव्हा देखील बॅजवरून समजावून सांगा’. बाबा पतित-पावन, लिबरेटर (मुक्तिदाता) आहेत. पावन बनविणारे आहेत. खूप जणांची आठवण करावी लागते. प्राणी, हत्ती, घोडा, कच्छ, मच्छ इत्यादींना सुद्धा अवतार म्हणतात. त्यांची देखील पूजा करत राहतात. समजतात भगवान सर्वव्यापी आहे अर्थात् सर्वांमध्ये आहे, सर्वांना खाऊ घाला; अच्छा, कणा-कणामध्ये भगवान आहे असे म्हणतात तर मग त्यांना कसे खाऊ घालणार? एकदम जणूकाही समजण्याच्या पलीकडे आहेत. लक्ष्मी-नारायण इत्यादी देवी-देवता हे काम थोडेच करतील. मुंग्यांना अन्न देतील, अमक्याला देतील. तर बाबा समजावून सांगत आहेत तुम्ही आहात धार्मिक-राजकारणी. तुम्ही जाणता, आपण धर्म स्थापन करत आहोत. राज्य स्थापन करण्यासाठी सैन्य असते. परंतु तुम्ही आहात गुप्त. तुमची आहे स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी (अध्यात्मिक विद्यापीठ). साऱ्या दुनियेतील जेपण मनुष्य मात्र आहेत ते सर्व या धर्मांमधून बाहेर पडून आपल्या घरी जातील. आत्मे निघून जातील. ते आहे आत्म्यांचे राहण्याचे घर. आता तुम्ही संगमयुगामध्ये शिकत आहात आणि मग सतयुगामध्ये येऊन राज्य कराल, दुसरा कोणताही धर्म नसेल. एका गाण्यामध्ये सुद्धा आहे ना - ‘बाबा, तुम्ही जे देता ते दुसरे कोणीही देऊ शकत नाही’. पूर्ण आकाश, सारी जमीनच तुमची असते. साऱ्या विश्वाचे मालक तुम्ही बनता. आता तुम्ही हे देखील समजता की, नवीन दुनियेमध्ये या सर्व गोष्टींचा विसर पडेल. याला म्हटले जाते रूहानी स्पिरिच्युअल नॉलेज. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे आहे की आम्ही दर ५ हजार वर्षानंतर राज्य मिळवतो आणि नंतर गमावतो. हे ८४ चे चक्र फिरतच राहते. अभ्यास करावा लागेल तेव्हाच जाऊ शकणार ना! शिकला नाहीत तर नव्या दुनियेमध्ये जाऊ शकणार नाही. तिथे तर मर्यादित संख्या आहे. नंबरवार पुरुषार्था नुसार तिथे जाऊन पद मिळवाल. इतके सर्व तर शिकणार नाहीत. जर सगळेच शिकले तर मग दुसऱ्या जन्मामध्ये राज्य सुद्धा मिळवतील. शिकणाऱ्यांची मर्यादीत संख्या आहे. सतयुग-त्रेतामध्ये येणारेच शिकतील. तुमची प्रजा खूप बनत राहते. उशिरा येणारे तर पापे भस्म करू शकणार नाहीत. पाप-आत्मे असतील तर मग शिक्षा भोगून अगदी कमी दर्जाचे पद मिळवतील. अपमान होईल. जे आता मायेचा खूप आदर करणारे आहेत, त्यांचा अनादर होईल. ही आहे ईश्वरीय इज्जत (पत). ती आहे आसुरी पत. ईश्वरीय किंवा दैवी पत आणि आसुरी पत यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. आम्ही आसुरी पत असणारे होतो, आता पुन्हा दैवी पतवाले बनत आहोत. आसुरी प्रतिष्ठे पासून एकदम भिकारी बनता. ही आहे काट्यांची दुनिया तर अनादर झाला ना. नंतर मग किती सन्माननीय बनता. यथा राजा-राणी तथा प्रजा. बेहदचे बाबा तुमची पत खूप उच्च कोटीची बनवतात तर मग इतका पुरुषार्थ देखील करायचा आहे. सर्वजण म्हणतात - आपण आपल्याला असे सन्माननीय बनवावे की नराचा नारायण, नारीची लक्ष्मी बनावे. यांच्यापेक्षा उच्च कोटीचा सन्मान इतर कोणालाच नाही. कथा देखील नरापासून नारायण बनण्याचीच ऐकतात. अमरकथा, तिजरीची कथा या एकच आहेत. या कथा आताच तुम्ही ऐकता.
तुम्ही मुले विश्वाचे मालक होता मग ८४ जन्म घेत-घेत खाली उतरत आला आहात. आता मग पहिल्या नंबरचा जन्म होईल. पहिल्या जन्मामध्ये तुम्ही खूप उच्च पद प्राप्त करता. राम सन्माननीय बनवतो, रावण अपमानित (तुच्छ) बनवतो. या नॉलेजद्वारेच तुम्ही मुक्ती-जीवनमुक्ती प्राप्त करता. अर्धा कल्प रावणाचे नाव सुद्धा राहत नाही. या गोष्टी आता तुम्हा मुलांच्या बुद्धीत येतात त्या सुद्धा नंबरवार. कल्प-कल्प असेच तुम्ही नंबरवार पुरुषार्था नुसार हुशार बनता. माया चूक करायला लावते. बेहदच्या बाबांची आठवण करणेच विसरून जाता. भगवान शिकवतात, ते आमचे टीचर बनले आहेत. तरी देखील गैरहजर राहतात, शिकत नाहीत. त्रासून दारोदार भटकण्याची सवय लागली आहे. अभ्यासावर ज्यांचे लक्ष नसते तर त्यांना मग नोकरीला लावावे लागते. धोबी इत्यादीचे काम करतात. त्यामध्ये शिक्षणाची काय गरज आहे. व्यापारामध्ये मनुष्य करोडपती बनतात, नोकरी करून इतके बनत नाहीत; त्यामध्ये तर ठराविक पगार मिळणार. आता तुमचे शिक्षण आहे विश्वाच्या बादशाहीकरिता. इथे म्हणतात ना आम्ही भारतवासी आहोत. नंतर मग तुम्हाला विश्वाचे मालक म्हणतील. तिथे देवी-देवता धर्माशिवाय दुसरा कोणता धर्म नसतो. बाबा तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात तर त्यांच्या मतावर चालले पाहिजे. कोणत्याही विकाराचे भूत असता कामा नये. ही भुते फार वाईट आहेत. कामी व्यक्तीचे आरोग्य बिघडत राहते. शक्ती कमी होते. या काम विकाराने तर तुमची शक्ती एकदम संपवून टाकली आहे. परिणाम हा झाला आहे की आयुष्य कमी होत गेले आहे. भोगी बनले आहात. कामी, भोगी, रोगी सर्व बनता. तिथे (स्वर्गामध्ये) विकार असत नाही. तर योगी नेहमी तंदुरुस्त असतात आणि आयुष्य देखील १५० वर्षे असते. तिथे काळ खात नाही. यावरून एक कथासुद्धा सांगतात - कोणाला विचारले गेले - ‘आधी सुख पाहिजे की आधी दुःख पाहिजे?’ तर त्याला कोणीतरी इशारा केला, सांग की, ‘अगोदर सुख पाहिजे’; कारण सुखात गेल्यावर तिथे कोणता काळ येणार नाही. आत घुसू शकत नाही. एक कथा बनवून ठेवली आहे. बाबा समजावून सांगतात तुम्ही सुखधाममध्ये असता तेव्हा तिथे कोणी काळ असत नाही. रावण राज्यच नाही. आणि जेव्हा विकारी बनता तेव्हा काळ येतो. कथा किती बनवून ठेवल्या आहेत, काळ घेऊन गेला… मग असे झाले. ना काळ दिसून येतो, ना आत्मा बघता येते, यांना म्हटले जाते दंतकथा. ऐकायला चांगल्या वाटणाऱ्या खूप कथा-कहाण्या आहेत. आता बाबा समजावून सांगतात की, तिथे कधी अकाली मृत्यू होत नाही. आयुष्य मोठे असते आणि पवित्र असतात. १६ कला, आणि मग कला कमी होत-होत एकदम शून्य कला होतात. ‘मैं निर्गुण हारे में कोई गुण नाही’. मुलांची एक निर्गुण संस्था देखील आहे. म्हणतात आमच्यात काहीही गुण नाहीत. आम्हाला गुणवान बनवा. सर्वगुणसंपन्न बनवा. आता बाबा म्हणतात - पवित्र बनायचे आहे. सर्वांना मरायचे सुद्धा आहे. इतके भरपूर मनुष्य सतयुगामध्ये असत नाहीत. आता तर किती पुष्कळ आहेत. तिथे मुले देखील योगबलाने होतात. इथे तर बघा किती मुले जन्माला घालत रहातात. बाबा तरी देखील म्हणतात - ‘बाबांची आठवण करा’. ते बाबाच शिकवतात, शिकवणाऱ्या शिक्षकाची आठवण असते. तुम्ही जाणता शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. काय शिकवतात ते देखील तुम्हाला माहीत आहे. तर बाबा अथवा टिचर सोबत योग लावायचा आहे. नॉलेज खूप श्रेष्ठ आहे. आता तुम्हा सर्वांची विद्यार्थी दशा आहे. अशी युनिव्हर्सिटी कधी बघितली आहे, जिथे लहान मुले, वृद्ध, तरूण सर्व एकत्र शिकतात. एकच शाळा, एकच शिकवणारा शिक्षक आहे आणि ज्यामध्ये स्वतः ब्रह्मा देखील शिकत आहेत. आश्चर्य आहे ना. शिवबाबा तुम्हाला शिकवतात. हे ब्रह्मा सुद्धा ऐकतात. छोटा असो नाही तर वृद्ध असो कोणीही शिकू शकतात. तुम्ही देखील हे नॉलेज शिकत आहात ना. आता शिकवायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस वेळ कमी होत जातो. आता तुम्ही बेहदमध्ये निघून गेले आहात. जाणता की हे ५ हजार वर्षांचे चक्र कसे पूर्ण झाले. पहिल्यांदा एक धर्म होता. आता किती भरपूर धर्म आहेत. आता साम्राज्य म्हणणार नाही. याला म्हटले जाते प्रजेचे प्रजेवर राज्य. सर्वात पहिले खूप शक्तिशाली धर्म होता. साऱ्या विश्वाचे मालक होते. आता अधर्मी बनले आहेत. कोणताच धर्म राहिला नाही. सर्वांमधे ५ विकार आहेत. बेहदचे बाबा म्हणतात - मुलांनो आता धीर धरा, फार थोडा काळ तुम्ही या रावण राज्यामध्ये आहात. चांगल्या प्रकारे शिकाल तर मग सुखधाममध्ये जाल. हे आहे दुःख धाम. तुम्ही आपल्या शांतीधाम आणि सुखधामाची आठवण करा, या दुःखधामला विसरत चला. आत्म्यांचे पिता डायरेक्शन देतात - ‘माझ्या रूहानी मुलांनो!’ रूहानी मुलांनी या इंद्रियांद्वारे ऐकले. तुम्ही आत्मे जेव्हा सुखधाममध्ये सतोप्रधान होता तेव्हा तुमचे शरीर देखील फर्स्ट क्लास सतोप्रधान होते. तुम्ही अतिशय श्रीमंत होता नंतर मग पुनर्जन्म घेत-घेत काय बनले आहात! रात्रं-दिवसाचा फरक आहे. दिवसा आपण स्वर्गामध्ये होतो, रात्रीचे आपण नरकामध्ये आहोत. याला म्हटले जाते - ब्रह्माचा सो ब्राह्मणांचा दिवस आणि रात्र. ६३ जन्म त्रास सहन करत राहतात, अंधःकारमय रात्र आहे ना. भटकत राहतात. भगवान कोणाला भेटतच नाही. याला म्हटले जाते चक्रव्यूहाचा खेळ. तर बाबा तुम्हा मुलांना साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचा समाचार ऐकवत आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- १) दारोदार भटकण्याची सवय सोडून भगवंताने जे शिकवले आहे त्याचा लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे. कधीही गैरहजर रहायचे नाही. बाप समान टीचर देखील जरूर बनायचे आहे. शिकून मग इतरांना शिकवायचे आहे.
- २) सत्य नारायणाची सत्य कथा ऐकून नरापासून नारायण बनायचे आहे, असे आपणच आपल्याला सन्माननीय बनवायचे आहे. कधीही भुतांच्या (विकारांच्या) आहारी जाऊन इज्जत (पत) गमवायची नाही.
| वरदान:- |
नाते आणि प्राप्तीं च्या स्मृतीद्वारे सदैव आनंदामध्ये राहणारे सहजयोगी भव सहजयोगाचा आधार आहे - नाते आणि प्राप्ती. नात्याच्या आधारावर प्रेम निर्माण होते आणि जिथे प्राप्ती होते तिथे मन-बुद्धी सहजच जाते. त्यामुळे नात्याला आपलेपणाच्या अधिकाराने आठवण करा, मनापासून म्हणा - ‘मेरा बाबा’ आणि बाबांकडून जो शक्तींचा, ज्ञानाचा, गुणांचा, सुख-शांतीचा, आनंदाचा, प्रेमाचा खजिना मिळाला आहे त्याला स्मृतीमध्ये इमर्ज करा, यामुळे अपार आनंद होईल आणि सहजयोगी सुद्धा बनाल. |
| बोधवाक्य:- | देह-भानापासून मुक्त बना तेव्हाच सर्व बंधने आपोआप नष्ट होतील. |