| 24.10.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - बेहदच्या अपार खुशीचा अनुभव करण्यासाठी प्रत्येक क्षण बाबांसोबत रहा” | |
| प्रश्न:- | बाबांकडून कोणत्या मुलांना खूप-खूप ताकद मिळते? |
| उत्तर:- | ज्यांना निश्चय आहे की आम्ही बेहद विश्वाचे परिवर्तन करणारे आहोत, आम्हाला बेहद विश्वाचा मालक बनायचे आहे. आम्हाला शिकवणारे स्वयं विश्वाचे मालक बाबा आहेत. अशा मुलांना खूप ताकद मिळते. |
ओम् शांती. गोड-गोड रुहानी मुलांना अथवा आत्म्यांना रूहानी बाबा परमपिता परमात्मा बसून शिकवत आहेत आणि समजावून सांगत आहेत कारण मुलेच पावन बनून मग स्वर्गाचे मालक बनणार आहेत. साऱ्या विश्वाचे पिता तर एकच आहेत. हा निश्चय मुलांना होतो. साऱ्या विश्वाचा पिता, सर्व आत्म्यांचे पिता तुम्हा मुलांना शिकवत आहेत, एवढे तरी लक्षात येते का? कारण बुद्धी आहे तमोप्रधान, लोखंडाचे भांडे, आयरन एजड (कलियुग). बुद्धी आत्म्यामध्ये असते. तर एवढे लक्षात येते का? समजून घेण्याची इतकी ताकद मिळते की खरोखर बेहदचे बाबा आम्हाला शिकवतात आणि आम्ही बेहद विश्वाला परिवर्तित करतो. यावेळी बेहद सृष्टीला नरक म्हटले जाते. हे जाणता किंवा समजता का की गरीब नरकामध्ये आहेत; बाकी संन्यासी, श्रीमंत, मोठे पदाधिकारी बहिश्तमध्ये (स्वर्गामध्ये) आहेत? बाबा समजावून सांगत आहेत - यावेळी जे कोणी मनुष्यमात्र आहेत सर्व नरकामध्ये आहेत. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत की आत्मा किती छोटी आहे. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये सर्व नॉलेज राहत नाही की विसरून जाता? विश्वाच्या सर्व आत्म्यांचे पिता तुमच्या सन्मुख बसून तुम्हाला शिकवत आहे. पूर्ण दिवस बुद्धीमध्ये याची आठवण राहते का की खरोखर बाबा आमच्या सोबत इथे आहेत? किती वेळ सोबत राहतात? एक तास, अर्धा तास का पूर्ण दिवस? हे लक्षात ठेवण्यासाठी देखील ताकद पाहिजे. ईश्वर परमपिता परमात्मा तुम्हाला शिकवत आहेत. बाहेर जेव्हा तुम्ही आपल्या घरी राहता तर तिथे सोबत नाही आहेत. इथे प्रॅक्टिकलमध्ये तुमच्या सोबत आहेत. जसे कोणाचा पती बाहेर गावी आहे, पत्नी इथे आहे तर ती असे थोडेच म्हणणार की, ‘पती माझ्या सोबत आहे’. बेहदचे बाबा तर एकच आहेत. बाबा सर्वांमध्ये तर नाहीत ना. बाबा जरूर एका ठिकाणी बसत असतील. तर हे लक्षात येते आहे का की बेहदचे बाबा आपल्याला नवीन दुनियेचा मालक बनविण्यासाठी लायक बनवत आहेत? मनामध्ये इतके स्वतःला लायक समजता का की आपण साऱ्या विश्वाचे मालक बनणार आहोत? ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. याहून जास्त आनंदाचा खजिना तर कोणालाच मिळत नाही. आता तुम्हाला माहित झाले आहे की आपण हे बनणार आहोत. हे देवता कुठले मालक आहेत, हे देखील समजता. भारतामधेच देवता होऊन गेले आहेत. हे तर साऱ्या विश्वाचे मालक बनणारे आहेत. एवढे लक्षात आहे? तसे वर्तन आहे? तशी बातचीत करण्याची पद्धती आहे? ती बुद्धी आहे? कोणत्या गोष्टीवरून पटकन राग आला, कुणाला इजा केली, कोणाची निंदा केली, असे वर्तन तर करत नाही ना? सतयुगामध्ये हे (देवी-देवता) कधी कोणाची निंदा थोडीच करतात. तिथे निंदात्मक घाणेरडे विचार करणारे असणारच नाहीत. बाबा तर मुलांना किती जोमाने पुढे नेतात. तुम्ही बाबांची आठवण करा तर पापे नष्ट होतील. तुम्ही हात वर करता परंतु तुमचे तसे वर्तन आहे? बाबा बसून शिकवतात, हे बुद्धीमध्ये ठामपणे बसते का? बाबा जाणतात बऱ्याचजणांचा नशा सोडावॉटर होतो. सर्वांनाच काही इतका खुशीचा पारा चढत नाही. जेव्हा पक्का निश्चय होईल तेव्हा नशा चढेल. विश्वाचा मालक बनविण्यासाठी बाबाच शिकवतात.
इथे (कलियुगामध्ये) तर सर्व पतित आहेत, रावण संप्रदाय आहे. कथा आहे ना - रामाने वानर सेना मदतीला घेतली आणि मग असे-असे केले. आता तुम्ही जाणता, बाबा आम्हाला रावणावर विजय प्राप्त करवून लक्ष्मी-नारायण बनवतात. इथे तुम्हा मुलांना कोणी विचारले, तर तुम्ही लगेच म्हणाल - ‘आम्हाला स्वयं भगवान शिकवतात’. भगवानुवाच - जसे टीचर म्हणतील - मी तुम्हाला बॅरिस्टर अथवा अमका बनवतो. ते निश्चयाने शिकवतात आणि ते बनतात. शिकणारे देखील नंबरवार असतात ना. मग पद देखील नंबरवार प्राप्त करतात; तर हे देखील शिक्षण आहे. बाबा एम ऑब्जेक्ट समोर दाखवत आहेत. तुम्ही समजता या शिक्षणाने आम्ही असे बनणार. आनंदाची गोष्ट आहे ना. आय. सी. एस. शिकणारे देखील समजतील - आपण हे शिकून मग हे-हे करणार, घर बांधणार, असे करणार... बुद्धीमध्ये हे चालते. इथे मग तुम्हा मुलांना बाबा बसून शिकवतात. सर्वांना शिकायचे आहे, पवित्र बनायचे आहे. बाबांसमोर प्रतिज्ञा करायची आहे की, ‘आम्ही कोणतेही अपवित्र कर्म करणार नाही’. बाबा म्हणतात - ‘जर कोणते उलटे काम केलेत तर केलेली कमाई नष्ट होईल’. हा मृत्युलोक जुनी दुनिया आहे. आपण शिकतो नवीन दुनियेसाठी. ही जुनी दुनिया तर नष्ट होणार आहे. परिस्थिती देखील अशीच आहे. बाबा आपल्याला शिकवतातच मुळी अमरलोकसाठी. साऱ्या दुनियेचे चक्र (सृष्टी चक्राविषयी) बाबा समजावून सांगतात. हातामध्ये कोणते पुस्तक नाही आहे, बाबा तोंडीच समजावून सांगतात. सर्वात पहिली गोष्ट बाबा समजावून सांगतात - स्वतःला आत्मा निश्चय करा. आत्मा, भगवान पित्याचे संतान आहे. परमपिता परमात्मा परमधाममध्ये राहतात. आपण आत्मे देखील तिथे राहतो. मग तिथून पार्ट बजावण्यासाठी नंबरवार इथे येत राहतो. हे खूप मोठे बेहदचे स्टेज आहे. या स्टेजवर सर्वप्रथम भारतामध्येच ॲक्टर्स पार्ट बजावण्यासाठी, नवीन दुनियेमध्ये येतात. ही त्यांची ॲक्टिव्हिटी (उपक्रम) आहे. तुम्ही त्यांची महिमा देखील गाता. तुम्ही त्यांना लक्षाधीश म्हणाल काय? त्या लोकांकडे तर अगणित संपत्ती असते. बाबा तर असेच म्हणणार ना - ‘हे लोक’, कारण बाबा तर आहेत बेहदचे. हा देखील ड्रामा पूर्व नियोजित आहे. तर जसे शिवबाबांनी यांना असे श्रीमंत बनविले तर भक्ती मार्गामध्ये मग त्यांचे (‘शिव’चे) पूजा करण्यासाठी मंदिर बनवतात. सर्वात पहिली त्यांची पूजा करतात ज्यांनी पूज्य बनविले. बाबा दररोज समजावून तर खूप सांगतात, नशा चढविण्यासाठी. परंतु नंबरवार पुरुषार्था अनुसार जे समजतात, ते सेवेमध्ये व्यस्त राहतात त्यामुळे ताजेतवाने राहतात. नाहीतर शिळे होऊन जातात. मुले जाणतात, खरोखर हे भारतामध्ये राज्य करत होते तेव्हा इतर कोणताही धर्म नव्हता. डीटीज्म (देवी-देवता धर्मच) होता. नंतर मग दुसरे-दुसरे धर्म आले. आता तुम्ही समजता हे सृष्टीचे चक्र कसे फिरते. शाळेमध्ये एम ऑब्जेक्ट तर पाहिजे ना. सतयुग आदिमध्ये हे राज्य करत होते मग ८४ च्या फेऱ्यामध्ये आले आहेत. मुले जाणतात, हे आहे बेहदचे शिक्षण. जन्म-जन्मांतर हदचे शिक्षण शिकत आले आहात, यामध्ये खूप मोठा निश्चय पाहिजे. साऱ्या सृष्टीला परिवर्तन करणारे, नवजीवन देणारे अर्थात नरकाला स्वर्ग बनविणारे बाबा आम्हाला शिकवत आहेत. हे तर नक्की आहे की, मुक्तिधाममध्ये तर सर्वजण जाऊ शकतात. स्वर्गामध्ये मात्र सर्वजण येणार नाहीत. हे आता तुम्ही जाणता की, बाबा आपल्याला या विषय सागर वेश्यालयातून बाहेर काढतात. आता खरोखर वेश्यालय आहे. याची केव्हापासून सुरुवात होते, हे देखील तुम्ही जाणले आहे. २५०० वर्षे झाली आहेत जेव्हा हे रावण राज्य सुरु झाले आहे. भक्ती सुरु झाली आहे. त्यावेळी देवी-देवता धर्मवालेच आहेत, ते वाममार्गामध्ये गेले. भक्तीसाठीच मंदिर बनवतात. सोमनाथाचे मंदिर किती मोठे बनविले आहे. मंदिराचा इतिहास तर ऐकला आहे ना. मंदिरामध्ये काय होते! तर त्यावेळी किती धनवान असतील! फक्त एकच मंदिर तर असणार नाही ना. इतिहासामध्ये फार-फार तर एकाचे नाव घातले आहे. बरीचशी मंदिरे तर राजे लोक बनवतात. एकमेकांना पाहून पूजा तर सर्व करतील ना. पुष्कळ मंदिरे असतील. फक्त एकालाच तर लुटले नसेल. आसपास दूसरी मंदिरे देखील असतील. तिथे सतयुगामध्ये गावे काही दूर-दूर नसतात. एकमेकांपासून जवळच असतात कारण तिथे ट्रेन वगैरे तर नसणार ना. एकमेकांच्या खूप जवळ राहत असतील; नंतर मग हळू-हळू सृष्टीचा विस्तार होत जातो.
आता तुम्ही मुले शिकत आहात. मोठ्यात-मोठे बाबा तुम्हाला शिकवत आहेत. एवढा तर नशा असला पाहिजे ना. घरामध्ये कधी रडायचे किंवा कुणाला मारायचे नाही. इथे तुम्हाला दैवी गुण धारण करायचे आहेत. या पुरुषोत्तम संगमयुगामध्ये तुम्हा मुलांना शिकवले जाते. हा आहे मधला काळ जेव्हा की तुम्ही चेंज होता (परिवर्तित होता). जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर शिकत आहात. भगवान तुम्हाला शिकवत आहेत. साऱ्या दुनियेला परिवर्तित करतात. जुन्या दुनियेला नवीन बनवतात, ज्या नवीन दुनियेचा मग तुम्हाला मालक बनायचे आहे. बाबा तुम्हाला युक्ती सांगण्यासाठी बांधील आहेत. तर मग तुम्हा मुलांनी देखील त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. तुम्ही हे तर समजता की आपण इथले (साकारी दुनियेमध्ये) राहणारे नाही आहोत. तुम्ही हे थोडेच जाणत होता की, आपली राजधानी होती. आता बाबांनी समजावून सांगितले आहे - रावणाच्या राज्यामध्ये तुम्ही खूप दुःखी आहात. याला म्हटलेच जाते विकारी दुनिया. हे देवता आहेत संपूर्ण निर्विकारी. स्वतःला विकारी म्हणतात. आता हे रावण राज्य केव्हापासून सुरु झाले, काय झाले जरासुद्धा कोणाला माहित नाही आहे. बुद्धी एकदम तमोप्रधान आहे. पारस-बुद्धी सतयुगामध्ये होते, तर विश्वाचे मालक होते, अपार सुखात होते. त्याचे नावच आहे सुखधाम. इथे तर अथाह दुःख आहे. सुखाची दुनिया आणि दुःखाची दुनिया कशी आहे - हे देखील बाबा समजावून सांगतात. सुख किती काळ असते, दुःख किती काळ असते, मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार समजतात. समजावून सांगणारे तर आहेत बेहदचे बाबा. श्रीकृष्णाला बेहदचा पिता थोडेच म्हणणार, काळजाला भिडतच नाही. परंतु यांना (या दुनियावाल्यांना) कोणाला पिता म्हणावे - काही कळतच नाही. भगवान समजावून सांगतात - माझी निंदा करतात, मी तुम्हाला देवता बनवतो, माझी किती निंदा केली आहे आणि मग देवतांची देखील निंदा केली आहे, मनुष्य इतके मंद-बुद्धी बनले आहेत. म्हणतात - ‘भज गोविन्द…’. बाबा म्हणतात - ‘हे मंद-बुद्धी, गोविंद-गोविंद, राम-राम म्हटल्याने काहीच डोक्यात येत नाही की कोणाला पुजत आहेत’. पत्थर-बुद्धीवाल्याला मंद-बुद्धीच म्हणणार. बाबा म्हणतात आता मी तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो. बाबा सर्वांचे सद्गती दाता आहेत.
बाबा समजावून सांगत आहेत - ‘तुम्ही आपला परिवार इत्यादीमध्ये किती अडकून पडले आहात! भगवान जे सांगतात ते तर ध्यानात घेतले पाहिजे; परंतु आसुरी मताची सवय पडली आहे त्यामुळे ईश्वरीय मतावर चालणार तरी कसे!’ गोविंद कोण आहे, काय चीज आहे, हे देखील जाणत नाहीत. बाबा समजावून सांगतात, तुम्ही म्हणाल - बाबा, तुम्ही आम्हाला अनेकदा समजावून सांगितले आहे. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे, बाबा आम्ही तुमच्याकडून पुन्हा हा वारसा घेत आहोत. आम्ही नरापासून नारायण जरूर बनणार. स्टुडंटला शिक्षणाचा नशा जरूर असतो की, मी असा बनणार. निश्चय असतो. आता बाबा म्हणतात - ‘तुम्हाला सर्वगुणसंपन्न बनायचे आहे. कोणावर क्रोध इत्यादी करायचा नाही. देवतांमध्ये ५ विकार असत नाहीत. श्रीमतावर चालले पाहिजे. श्रीमत सर्वात आधी असे म्हणते की, ‘स्वतःला आत्मा समजा. तू आत्मा परमधामवरून इथे आली आहेस पार्ट बजावण्याकरिता, हे तुझे शरीर विनाशी आहे. आत्मा तर अविनाशी आहे.’ तर तुम्ही स्वतःला आत्मा समजा - मी आत्मा परमधामवरून इथे आली आहे पार्ट बजावण्याकरिता. आता इथे दुःखी होता तेव्हा म्हणता मुक्तिधाममध्ये जावे. परंतु तुम्हाला पावन कोण बनवणार? बोलवता देखील एकालाच, तर ते बाबा येऊन म्हणतात - ‘माझ्या गोड-गोड मुलांनो स्वतःला आत्मा समजा, देह समजू नका.’ मी आत्म्यांना बसून समजावून सांगतो. आत्मेच बोलावतात - हे पतित-पावन येऊन पावन बनवा. भारतामध्येच पावन होते. आता पुन्हा बोलावत आहेत - ‘पतिता पासून पावन बनवून सुखधाममध्ये घेऊन चला’. श्रीकृष्णावर तुमचे प्रेम तर आहे ना. श्रीकृष्णासाठी सर्वात जास्त व्रत-वैकल्ये इत्यादी कुमारी, माता करतात. निर्जल राहतात. कृष्णपुरी अर्थात सतयुगामध्ये जावे. परंतु ज्ञान नाही आहे त्यामुळे खूप हठयोग इत्यादी करतात. तुम्ही देखील इतके करता, कुणाला ऐकविण्यासाठी नाही, स्वतः कृष्णपुरीमध्ये जाण्यासाठी. तुम्हाला कोणी अडवत नाही. ते लोक गव्हर्मेंट समोर उपोषण वगैरे करतात, जिद्द करतात त्यांना हैराण करण्यासाठी. तुम्हाला कोणासमोर धरणे धरून बसायचे नाहीये. ना कोणी तुम्हाला शिकवले आहे.
श्रीकृष्ण तर आहे सतयुगाचा फर्स्ट प्रिन्स. परंतु हे कोणालाही कळून येत नाही. श्रीकृष्णाला ते द्वापरमध्ये घेऊन गेले आहेत. बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, भक्ती आणि ज्ञान दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्ञान आहे दिवस, भक्ती आहे रात्र. कोणाची? ब्रह्माची रात्र आणि दिवस’. परंतु याचा अर्थ ना गुरूंना समजत आणि ना त्यांच्या चेल्यांना समजत. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याचे रहस्य बाबांनी तुम्हा मुलांना समजावून सांगितले आहे. ज्ञान दिवस, भक्ती रात्र आणि त्यानंतर आहे वैराग्य. हे जाणत नाहीत. ज्ञान, भक्ती, वैराग्य शब्द ॲक्युरेट आहेत, परंतु अर्थ जाणत नाहीत. आता तुम्हा मुलांना समजले आहे, बाबा ज्ञान देतात तर त्यामुळे दिवस होतो. भक्तीची सुरुवात होते तर रात्र म्हटले जाते कारण त्रास सहन करावा लागतो. ब्रह्माची रात्र सो ब्राह्मणांची रात्र, नंतर होतो दिवस. ज्ञानामुळे दिवस आणि भक्तीमुळे रात्र होते. रात्रीमध्ये तुम्ही वनवासामध्ये बसले आहात मग दिवसामध्ये तुम्ही किती श्रीमंत बनता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- स्वतःच्या मनाला विचारायचे आहे -
- १) बाबांकडून जो इतका खुशीचा खजिना मिळतो तो लक्षात राहतो का?
- २) बाबा आपल्याला विश्वाचा मालक बनविण्यासाठी आले आहेत तर असे माझे वर्तन आहे का? बातचीत करण्याची पद्धत कशी आहे? कधी कुणाची निंदा तर करत नाही ना?
- ३) बाबांसमोर प्रतिज्ञा केल्यानंतर कोणते अपवित्र कर्म तर होत नाही ना?
| वरदान:- |
साक्षी स्थितीमध्ये स्थित होऊन परिस्थितींचे खेळ बघणारे संतोषी आत्मा भव कशीही हादरवून टाकणारी परिस्थिती असेल परंतु साक्षी स्थितीमध्ये स्थित व्हाल तर असा अनुभव कराल जसा काही पपेट शो (कठपुतळीचा खेळ) आहे. वास्तवात नाही आहे. स्वतःच्या शानमध्ये राहून खेळाला पहा. संगमयुगाची श्रेष्ठ शान आहे - संतुष्टमणी बनणे आणि संतोषी होऊन राहणे. या शानमध्ये राहणारी आत्मा परेशान (त्रस्त) होऊ शकत नाही. संगमयुगावर बाप-दादांची ही विशेष भेट आहे - संतुष्टता. |
| बोधवाक्य:- | इतके आनंदी रहा की मनातील आनंद चेहऱ्यावरून स्पष्ट दिसेल. |