| 24.12.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - अपार खुशीमध्ये आणि नशेमध्ये राहण्यासाठी देह-अभिमानाचा रोग सोडून देऊन प्रीत बुद्धी बना, स्वतःचे वर्तन सुधारा” | |
| प्रश्न:- | कोणत्या मुलांना ज्ञानाचा उलटा नशा चढू शकत नाही? |
| उत्तर:- | जे बाबांना यथार्थरित्या जाणून आठवण करतात, अंतःकरणापासून बाबांची महिमा करतात, ज्यांचे पूर्णत: अभ्यासावर लक्ष आहे त्यांना ज्ञानाचा उलटा नशा चढू शकत नाही. जे बाबांना साधारण समजतात ते बाबांची आठवण करू शकत नाहीत. आठवण करत असाल तर बाबांना आपला समाचार देखील जरूर द्याल. मुले जेव्हा आपला समाचार देत नाहीत तेव्हा बाबांना विचार येतो की, मुलगा कुठे मूर्च्छित तर झाला नाही ना? |
ओम् शांती. बाबा बसून मुलांना समजावून सांगतात - ‘मुलांनो, जेव्हा कोणी नवीन येतात तर त्यांना पहिले हद आणि बेहद, दोन पित्यांचा परिचय द्या. बेहदचे बाबा म्हणजे बेहदच्या आत्म्यांचे पिता. तो हदचा पिता तर प्रत्येक जीव आत्म्याचा वेगवेगळा आहे. हे नॉलेज देखील सर्वजण एकसारखे धारण करू शकत नाहीत. कोणी एक टक्का, कोणी ९५ टक्के धारण करतात. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे; सूर्यवंशी, चंद्रवंशी घराणे असेल ना. यथा राजा, राणी तथा प्रजा. प्रजेमध्ये सर्व प्रकारचे मनुष्य असतात. प्रजा अर्थात प्रजा. बाबा समजावून सांगत आहेत हे शिक्षण आहे, प्रत्येक जण आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसारच शिकतात. प्रत्येकाला आपापला पार्ट मिळालेला आहे. ज्यांनी कल्पापूर्वी जितका अभ्यास धारण केला आहे, तितकाच आता देखील करतात. शिक्षण कधी लपून राहू शकत नाही. शिक्षणानुसार पद देखील मिळते. बाबांनी समजावून सांगितले आहे, पुढे चालून परीक्षा होईल. परीक्षेशिवाय ट्रान्सफर होऊ शकत नाहीत. तर मागाहून सर्व काही समजून येईल. परंतु आता देखील समजू शकता की, आपण कोणत्या पदासाठी लायक आहोत? भले लाजेपोटी सर्वजण हात वर करतात परंतु समजू शकतात की, असे आपण कसे बनू शकणार! आणि तरी देखील हात वर करतात. हे देखील अज्ञानच म्हणणार. बाबांना तर ताबडतोब समजते की, यांच्यापेक्षा तर जास्त अक्कल लौकिक स्टुडंटला असते. ते समजतात की, आपण स्कॉलरशिप घेण्यालायक नाही आहोत, पास होणार नाही. ते समजतात, टीचर जे शिकवतात त्यामध्ये आपण किती मार्क घेणार? असे थोडेच म्हणतील की, आम्ही पास विथ ऑनर होणार. इथे तर बऱ्याच मुलांमध्ये एवढी देखील अक्कल नाही आहे, देह-अभिमान खूप आहे. भले आले आहेत हे (देवता) बनण्यासाठी परंतु असे वर्तन देखील पाहिजे. बाबा म्हणतात - विनाशकाले विपरीत बुद्धी कारण नियमानुसार बाबांवर प्रेम नाही आहे.
बाबा, तुम्हा मुलांना ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’चा यथार्थ अर्थ काय आहे ते समजावून सांगतात. मुलेच नीटसे समजू शकत नाहीत तर मग ते कसे काय समजणार? बाबांची आठवण करणे - ही तर झाली गुप्त गोष्ट. शिक्षण काही गुप्त नाही आहे ना. शिक्षणामध्ये नंबरवार असतात. एकसमान थोडेच शिकतील. बाबा समजतात अजून तर छोटे आहेत. अशा बेहदच्या बाबांची तीन-तीन, चार-चार महिने आठवण देखील करत नाहीत. समजणार तरी कसे की, हे आठवण करतात कि नाही? बाबांना पत्र सुद्धा लिहीत नाहीत की, ‘बाबा, मी कसा-कसा चालत आहे, काय-काय सेवा करत आहे?’ बाबांना मुलांची किती काळजी असते की, कुठे मुलगा मूर्च्छित तर झाला नाही ना, कुठे मुलगा मेला तर नाही ना? काहीजण तर बाबांना किती चांगला-चांगला सेवेचा समाचार लिहितात. बाबांना देखील समजते, मुलगा जिवंत आहे. सेवा करणारी मुले कधी लपू शकत नाहीत. बाबा तर प्रत्येक मुलाचे मन ओळखतात की, कोणता मुलगा कसा आहे? देह-अभिमानाचा रोग फार गंभीर आहे. बाबा मुरलीमध्ये समजावून सांगतात, काहींना तर ज्ञानाचा उलटा नशा चढतो, अहंकार येतो मग आठवण देखील करत नाहीत, पत्र सुद्धा लिहीत नाहीत. मग बाबा तरी कशी आठवण करणार? आठवणीला आठवण जुळून येते. आता तुम्ही मुले बाबांना यथार्थ रित्या जाणून आठवण करता, मनापासून महिमा करता. बरीच मुले बाबांना साधारण समजतात त्यामुळे आठवण करत नाहीत. बाबा कोणता थाट थोडाच दाखवणार. भगवानुवाच - ‘मी तुम्हाला विश्वाची राजाई देण्यासाठी राजयोग शिकवतो. तुम्ही असे थोडेच समजता की, आपण विश्वाची बादशाही घेण्यासाठी बेहदच्या बाबांकडून शिकत आहोत’. हा जर नशा असेल तर अपार खुशीचा पारा कायम चढलेला राहील. गीता वाचणारे भले म्हणतात - ‘श्रीकृष्ण भगवानुवाच, मी राजयोग शिकवतो, बस्स’. त्यांना राजाई प्राप्त करण्याचा आनंद थोडाच असेल. गीता वाचून पूर्ण केली आणि गेले आपापल्या काम-धंद्याला. तुमच्या बुद्धीमध्ये तर आता आहे की, आम्हाला बेहदचे बाबा शिकवत आहेत. त्यांच्या (दुनियावाल्यांच्या) बुद्धीमध्ये असे येणार नाही. तर कोणीही आले तर सर्वप्रथम त्यांना दोन पित्यांचा परिचय द्यायचा आहे. बोला - भारत स्वर्ग होता, आता नरक आहे. हे कलियुग आहे, याला स्वर्ग थोडेच म्हणणार. असे तर म्हणणार नाही ना की सतयुगामध्ये देखील आहोत आणि कलियुगामध्ये देखील आहोत. कुणाला दुःख झाले तर म्हणतील नरकामध्ये आहोत, कोणी सुखात असेल तर म्हणतील स्वर्गामध्ये आहोत. असे खूप म्हणतात - दुःखी मनुष्य नरकामध्ये आहेत, आम्ही तर खूप सुखामध्ये बसलो आहोत, गाडी-बंगले इत्यादी सर्व आहे, तर समजतात आपण तर स्वर्गामध्येच आहोत. गोल्डन एज, आयरन एज एकच गोष्ट आहे.
तर सर्वप्रथम दोन पित्यांची गोष्ट बुद्धीमध्ये पक्की करायची आहे. बाबा स्वतःच आपला परिचय देतात. ते सर्वव्यापी कसे असू शकतील? लौकिक पित्याला सर्वव्यापी म्हणणार काय? आता तुम्ही चित्रामध्ये दाखवता आत्मा आणि परमात्म्याचे रूप एकच आहे, त्यामध्ये फरक नाही आहे. आत्मा आणि परमात्मा काही लहान-मोठे नाहीत. सर्व आत्मे आहेत, ते (बाबा) देखील आत्मा आहेत. ते सदैव परमधाममध्ये राहतात म्हणून त्यांना परम-आत्मा म्हटले जाते. फक्त तुम्ही आत्मे जसे येता तसा मी काही येत नाही. मी अंतामध्ये या तनामध्ये येऊन प्रवेश करतो. बाहेरचा कोणी या गोष्टी समजू शकणार नाही. गोष्ट खूप सोपी आहे. फरक फक्त इतका आहे की बाबांच्या ऐवजी वैकुंठवासी श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. श्रीकृष्णाने वैकुंठामधून नरकामध्ये येऊन राजयोग शिकवला काय? श्रीकृष्ण कसे म्हणू शकतो की, ‘देहा सहित… मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. देहधारीच्या आठवणीने पापे कशी नष्ट होतील? श्रीकृष्ण तर एक छोटा मुलगा आहे आणि कुठे मी साधारण मनुष्याच्या वृद्ध तनामध्ये येतो. किती फरक झाला आहे. या एकाच चुकीमुळे सर्व मनुष्य पतित, कंगाल बनले आहेत. ना मी सर्वव्यापी आहे, ना श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे. प्रत्येक शरीरामध्ये आत्मा सर्वव्यापी आहे. मला तर स्वतःचे शरीर देखील नाही आहे. प्रत्येक आत्म्याला आपले-आपले शरीर आहे. प्रत्येक शरीराला वेगवेगळे नाव दिले जाते. ना मला शरीर आहे, ना माझ्या शरीराला कोणते नाव आहे. मी तर वृद्ध शरीर घेतो मग याचे नाव बदलून ‘ब्रह्मा’ ठेवले आहे. माझे नाव काही ब्रह्मा नाहीये. मला ‘सदा शिव’च म्हणतात. मीच सर्वांचा सद्गती दाता आहे. आत्म्याला काही सर्वांचा सद्गती दाता म्हणणार नाही. परमात्म्याची कधी दुर्गती होते का? आत्म्याचीच दुर्गती आणि आत्म्याचीच सद्गती होते. या सर्व गोष्टी विचार सागर मंथन करण्याच्या आहेत. नाहीतर मग इतरांना कसे समजावून सांगाल. परंतु माया अशी कठोर आहे जी मुलांच्या बुद्धीला पुढे जाऊ देत नाही. दिवसभर झरमुई-झगमुई मध्येच (व्यर्थ गोष्टीं मध्येच) वेळ वाया घालवतात. बाबांपासून दूर करण्यासाठी माया किती जोर लावते. मग काही मुले तर मोडून पडतात (हार खातात). बाबांची आठवण न केल्यामुळे अवस्था अचल-अडोल बनू शकत नाही. बाबा घडोघडी सरळ करतात (सावरतात) माया खाली पाडते. बाबा म्हणतात कधी हार खायची नाही. कल्प-कल्प असे होतेच, काही नवीन गोष्ट नाहीये. अखेरीस मायाजीत बनालच. रावण राज्य नष्ट तर होणार आहे. मग आपण नवीन दुनियेमध्ये राज्य करणार. कल्प-कल्प मायाजीत बनलो आहोत. अगणित वेळा नवीन दुनियेमध्ये राज्य केले आहे. बाबा म्हणतात - ‘बुद्धीला नेहमी बिझी ठेवा म्हणजे कायम सेफ रहाल’. यालाच स्वदर्शन चक्रधारी म्हटले जाते. बाकी यामध्ये हिंसा इत्यादीचा काही प्रश्नच नाही. ब्राह्मणच स्वदर्शन चक्रधारी आहेत. देवतांना स्वदर्शन चक्रधारी म्हणणार नाही. पतित दुनियेचे रीती-रिवाज आणि देवी-देवतांचे रीती-रिवाज यामध्ये खूप अंतर आहे. मृत्यूलोकमध्ये असणारेच पतित-पावन बाबांना बोलावतात - ‘आम्हा पतितांना येऊन पावन बनवा. पावन दुनियेमध्ये घेऊन चला’. तुमच्या बुद्धीमध्ये आहे आज पासून ५००० वर्षांपूर्वी नवीन पावन दुनिया होती, जिला ‘सतयुग’ म्हटले जाते. ‘त्रेता’ला नवीन दुनिया म्हणणार नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे - ते (सतयुग) आहे फर्स्ट क्लास, हे (त्रेता) आहे सेकंड क्लास. प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने धारण केली पाहिजे ज्यामुळे कोणी येऊन ऐकेल तर आश्चर्य वाटेल. काही-काहींना आश्चर्य देखील वाटते, परंतु फुरसत नसते जेणेकरून पुरुषार्थ करतील. मग ऐकतात - पवित्र जरूर बनायचे आहे. हा काम विकारच मनुष्याला पतित बनवतो, त्याला जिंकल्याने तुम्ही जगतजीत बनाल. परंतु काम विकार जसा काही त्यांचा ठेवा आहे, म्हणून हा शब्द बोलत नाहीत, फक्त म्हणतात - मनाला वश करा. परंतु मन अमन (शांत) तेव्हाच होईल जेव्हा शरीरामध्ये नसेल. बाकी मन अमन तर कधी होतही नाही. देह मिळतो कर्म करण्यासाठी तर मग कर्मातीत अवस्थेमध्ये कसे राहणार? कर्मातीत अवस्था म्हटले जाते शवाला, जिवंतपणीच शव अथवा शरीरापासून डिटॅच. बाबा तुम्हाला शरीरापासून न्यारे बनण्याचे शिक्षण देतात. शरीरापासून आत्मा वेगळी आहे. आत्मा परमधाममध्ये राहणारी आहे. आत्मा शरीरामध्ये येते तेव्हा त्याला मानव म्हटले जाते. शरीर मिळतेच कर्म करण्याकरिता. एक शरीर सोडून मग दुसरे शरीर कर्म करण्यासाठी घ्यायचे आहे. शांती तर तेव्हा असेल जेव्हा शरीरामध्ये नसणार. मूलवतनमध्ये कर्म असत नाही. सूक्ष्मवतनची तर गोष्टच नाही. सृष्टीचे चक्र इथेच फिरते. बाबांना आणि सृष्टी चक्राला जाणणे, यालाच नॉलेज म्हटले जाते. सूक्ष्मवतनमध्ये ना सफेद वस्त्रधारी आहेत, ना कोणी सजलेले आहेत, ना नाग-वन्यप्राण्यांची कातडी परिधान करणारे शंकर इत्यादी आहेत. बाकी ब्रह्मा आणि विष्णूचे रहस्य बाबा समजावून सांगत असत. ब्रह्मा इथे आहेत. विष्णूची दोन रूपे देखील इथेच आहेत. हा केवळ साक्षात्काराचा पार्ट ड्रामामध्ये आहे, जो दिव्य दृष्टीद्वारे पाहिला जातो. क्रिमिनल (विकारी) डोळ्यांनी पवित्र चीज दिसू शकत नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- १) नेहमी आपणच आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बुद्धीला विचार सागर मंथनामध्ये बिझी ठेवायचे आहे. स्वदर्शन चक्रधारी बनून रहायचे आहे. झरमुई-झगमुईमध्ये (व्यर्थ गोष्टींमध्ये) आपला वेळ वाया घालवायचा नाही.
- २) शरीरापासून डिटॅच राहण्याचा अभ्यास बाबा जो शिकवतात, तो शिकायचा आहे. मायेच्या फोर्स पासून वाचण्याकरिता आपली अवस्था अचल-अडोल बनवायची आहे.
| वरदान:- |
ब्रह्मा बाप समान ‘लक्ष्य’ला (ध्येयाला) ‘लक्षणा’मध्ये आणणारे प्रत्यक्ष उदाहरण बनून सर्वांचे सहयोगी भव जसे ब्रह्मा बाबांनी स्वतःला निमित्त उदाहरणमूर्त बनविले, कायम हे लक्ष्य लक्षणामध्ये आणले - जो ओटे सो अर्जुन, याद्वारेच नंबर वन बनले. तर असे फॉलो फादर करा. कर्मा द्वारे नेहमी स्वतः जीवनामध्ये गुणमूर्त बनून, प्रत्यक्ष उदाहरण बनून इतरांना सहज गुण धारण करण्याचा सहयोग द्या - याला म्हटले जाते गुणदान. दानाचा अर्थच आहे सहयोग देणे. कुठलीही आत्मा आता ऐकण्या ऐवजी प्रत्यक्ष प्रमाण बघू इच्छिते आहे. तर आधी स्वतःला गुणमूर्त बनवा. |
| बोधवाक्य:- | सर्वांमधील निराशेचा अंधार दूर करणारेच ज्ञान-दीपक आहेत. |