मराठी मुरली · Brahma Kumaris

मराठी मुरली · 25 डिसेंबर, 2024

ओम शांती · BapDada ·

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली25 डिसेंबर, 2024 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

25.12.2024
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो - पावलोपावली श्रीमतानुसार चालणे हाच सर्वात उत्तम चार्ट आहे, ज्या मुलांना श्रीमता बद्दल आदर आहे ते जरूर मुरली वाचतील”
प्रश्न:- तुम्हा ईश्वरीय मुलांना कोणीही असा कोणता प्रश्न विचारू शकत नाही?
उत्तर:- तुम्हा मुलांना कोणीही हा प्रश्न विचारू शकत नाही की, ‘तुम्ही संतुष्ट आणि आनंदी आहात का?’ कारण तुम्ही म्हणता - ‘आम्ही सदैव संतुष्ट आहोत. परवाह थी पार ब्रह्म में रहने वाले बाप की, वह मिल गया बाकी किस बात की परवाह करनी’; जरी तुम्ही आजारी असाल तरी देखील म्हणाल - आम्ही राजी-खुशी (संतुष्ट आणि आनंदी) आहोत. ईश्वराच्या मुलांना कोणत्याही गोष्टीची काळजी नाही. बाबा जेव्हा पाहतात याच्यावर मायेचा वार झाला आहे तेव्हा विचारतात - ‘बाळा, संतुष्ट आणि आनंदी आहेस?’

ओम् शांती. बाबा समजावून सांगतात की, मुलांच्या बुद्धीमध्ये हे जरूर असणार की बाबा पिता देखील आहेत, टीचर आणि सद्गुरु सुद्धा आहेत, याच आठवणीमध्ये जरूर असणार. ही अशी आठवण करणे कधी कोणी शिकवू शकत नाही. कल्प-कल्प बाबाच येऊन शिकवतात. ते ज्ञानाचा सागर पतित-पावन आहेत. हे आता यावेळीच सांगितले जाते जेव्हा ज्ञानाचा तिसरा नेत्र दिव्य-बुद्धी मिळाली आहे. मुले भले समजत तर असतील परंतु बाबांनाच विसरून जातात मग टीचर-गुरुची तरी कशी आठवण येणार. माया खूपच बलवान आहे जी बाबांच्या तिन्ही रूपांना विसरायला लावते. म्हणतात - आम्ही हरलो. असे तर पावला-पावला मध्ये पद्म आहेत परंतु हार खाल्ल्याने पद्म कसे होतील? देवतांनाच पद्माचे चिन्ह देतात. हे ईश्वरीय शिक्षण आहे. असे शिक्षण मनुष्याचे कधी असू शकत नाही. भले देवतांची महिमा केली जाते तरी देखील सर्वोच्च एक बाबाच आहेत. बाकी त्यांचा (दुनिया वाल्यांचा) मोठेपणा तो कसला. आज गधाई, उद्या राजाई. आता तुम्ही पुरुषार्थ करून हे (देवता) बनत आहात. तुम्ही जाणता या पुरुषार्थामध्ये पुष्कळजण नापास होतात. ज्ञान तर खूप सोपे आहे तरी देखील फार थोडे पास होतात. कशामुळे? माया घडोघडी विसरायला लावते. बाबा म्हणतात - आपला चार्ट ठेवा परंतु लिहू शकत नाहीत. किती म्हणून बसून लिहिणार. आणि लिहिले जरी तरी देखील स्थिती कधी अप, कधी डाऊन. सर्वोत्तम चार्ट त्यांचा असतो जे प्रत्येक पाऊल श्रीमतानुसार टाकतात. बाबा तर समजतील या बिचाऱ्यांना लाज वाटत असेल. नाहीतर श्रीमताला अंमलात आणले पाहिजे ना. फार मुश्किलीने १-२ टक्के लिहितात. श्रीमता विषयी इतका आदर नाही आहे. मुरली मिळते तरीसुद्धा वाचत नाहीत. त्यांना मनातून नक्कीच असे वाटत असेल की, बाबा सांगतात तर खरे आहेत, आम्ही मुरलीच वाचत नाही तर दुसऱ्यांना काय शिकवणार.

बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा आणि स्वर्गाचे मालक बना, यामध्ये बाबा देखील आले आणि शिकविणारे सुद्धा आले. सद्गती दाता सुद्धा आले. अगदी थोड्या शब्दांत संपूर्ण ज्ञान येते. इथे तुम्ही येताच मुळी याला रिवाईज करण्यासाठी (ज्ञानाची उजळणी करण्यासाठी). भले बाबा देखील हेच समजावून सांगतात कारण तुम्ही स्वतः म्हणता आम्ही विसरून जातो म्हणूनच तुम्ही इथे रिवाईज करण्यासाठी येता. काहीजण भले करतातही परंतु तरी देखील त्याची उजळणी काही होत नाही. नशिबातच नसेल तर पुरुषार्थ तरी काय करणार? पुरुषार्थ करवून घेणारे तर एक बाबाच आहेत, यामध्ये कोणतेही जास्तीचे मार्गदर्शन सुद्धा मिळू शकत नाही. त्या शिक्षणामध्ये (लौकिक शिक्षणामध्ये) जास्तीचे शिकवण्यासाठी शिक्षक बोलावतात. हे (बाबा) तर नशीब बनविण्यासाठी सर्वांना एकसमान शिकवतात. प्रत्येकाला वेगवेगळे कुठपर्यंत शिकवतील - कितीतरी भरपूर मुले आहेत! त्या शिक्षणामध्ये कोणी मोठ्या व्यक्तीची मुले असतात आणि खास सांगितले जाते तर त्यांना जास्तीचे शिकवतात सुद्धा. टीचर जाणतात की हा डल आहे (कच्चा आहे), म्हणून जास्ती कोचिंग देऊन स्कॉलरशिप लायक बनवतात. हे टीचर (बाबा) असे करत नाहीत. हे तर सर्वांना एकसमान शिकवतात. एक्स्ट्रा पुरुषार्थ अर्थात टीचर थोडीशी कृपा करतात. भले असे तर पैसे सुद्धा घेतात, खास वेळ देऊन शिकवतात, ज्यामुळे मुले जास्त शिकून हुशार बनतात. हे बाबा तर सर्वांना एकच महामंत्र देतात - मनमनाभव. बस्स. बाबाच एक पतित-पावन आहेत, त्यांच्या आठवणीनेच आपण पावन बनणार. ते तुम्हा मुलांच्या हातात आहे, जितकी आठवण कराल तितके पावन बनाल. सर्व काही प्रत्येकाच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे. ते (दुनियावाले) तर तीर्थ स्थानांवर यात्रा करण्यासाठी जातात. एकमेकांना पाहून सुद्धा जातात. तुम्हा मुलांनी देखील बऱ्याच यात्रा केल्या आहेत, मग काय झाले. तरीसुद्धा खालीच घसरत आले आहात (पतनच झाले आहे). यात्रा कशासाठी आहेत, याने काय मिळणार आहे! काहीही माहीत नव्हते. आता तुमची आहे आठवणीची यात्रा. एकच शब्द आहे - मनमनाभव. ही तुमची यात्रा अनादि आहे. ते (दुनियावाले) सुद्धा म्हणतात - आम्ही या यात्रा अनादि काळापासून करत आलो आहोत. आता तुम्ही ज्ञानासहीत म्हणता की, आम्ही कल्प-कल्प या यात्रा करतो. ही यात्रा स्वतः बाबा येऊन शिकवतात. त्या यात्रांमध्ये किती कष्ट घेतात. किती गोंगाट आवाज असतो. ही आपली यात्रा आहे डेड सायलेन्सची. एका बाबांचीच आठवण करायची आहे, याद्वारेच पावन बनायचे आहे. तुम्हाला बाबांनी ही खरीखुरी रुहानी यात्रा शिकविली आहे. त्या यात्रा तर तुम्ही जन्म-जन्मांतर करतच राहिलात, तरी देखील गातात - ‘चारों तरफ लगाये फेरे…’ भगवंतापासून तर दूरच राहिले. यात्रेवरून आल्यावर पुन्हा विकारामध्ये जातात तर फायदाच काय. आता तुम्ही मुले जाणता हे आहे पुरुषोत्तम संगमयुग, जेव्हा की बाबा आलेले आहेत. एक दिवस सर्व जाणतील की बाबा आले आहेत. परमेश्वर शेवटी भेटणार कसे? हे तर कोणीही जाणत नाहीत. कोणी तर समजतात कुत्र्या-मांजरामध्ये भेटेल. या सर्वांमध्ये परमेश्वर भेटणार काय? किती खोटेपणा आहे. खोटेच खाणे, खोटेच पिणे, खोटीच रात्र घालवणे म्हणूनच हा आहेच मुळी झूठ खंड. सचखंड स्वर्गाला म्हटले जाते. भारतच स्वर्ग होता. स्वर्गामध्ये सर्व भारतवासी होते, आज तेच भारतवासी नरकामध्ये आहेत. हे तर तुम्ही गोड-गोड मुलेच जाणता की, आपण बाबांकडून श्रीमत घेऊन भारताला पुन्हा स्वर्ग बनवत आहोत. त्यावेळी भारतामध्ये दुसरे कोणीही नसतात. संपूर्ण विश्व पवित्र बनते. आता तर किती अनेकानेक धर्म आहेत. बाबा संपूर्ण झाडाचे नॉलेज ऐकवतात. तुम्हाला पुन्हा आठवण करून देत आहेत. तुम्ही सो देवता होता मग वैश्य, शूद्र बनलात. आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात. असे शब्द कधी कोणी संन्यासी, उदासी, विद्वान द्वारा ऐकले आहेत का? हा ‘हम सो’ चा अर्थ बाबा किती सोपा करुन सांगतात. ‘हम सो’ अर्थात ‘मी आत्मा’, मी आत्मा असे-असे चक्र फिरतो. ते (संन्यासी) तर म्हणतात - ‘हम आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो हम आत्मा’. असा एकही नाही ज्याला ‘हम सो’ चा अर्थ माहित आहे. बाबा म्हणतात - हा जो ‘हम सो’ चा मंत्र आहे हा कायम बुद्धीमध्ये ठेवला पाहिजे. नाहीतर चक्रवर्ती राजा कसे बनणार.(?) ते (दुनियावाले) तर ८४ चा अर्थ सुद्धा समजत नाहीत. भारता विषयीच ‘उत्थान आणि पतन’ गायले गेले आहे. सतोप्रधान, सतो, रजो, तमो. सूर्यवंशी, चंद्रवंशी…

आता तुम्हा मुलांना सर्वकाही माहित झाले आहे. एका बीजरूप बाबांनाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते. ते या सृष्टी चक्रामध्ये येत नाहीत. असे नाही की, आम्ही आत्मा सो परमात्मा बनतो. नाही, बाबा ‘आप समान नॉलेजफुल’ बनवतात. ‘आप समान गॉड’ बनवत नाहीत, या गोष्टींना चांगल्या रीतीने समजून घेतले पाहिजे तेव्हाच बुद्धीमध्ये चक्र फिरू शकेल. तुम्ही बुद्धीने समजू शकता की आपण कसे ८४ च्या चक्रामध्ये येतो. यामध्ये काळ, वर्ण, वंशावळी या सर्व गोष्टी येतात. या नॉलेजद्वारेच उच्च ते उच्च बनतात. नॉलेज असेल तर इतरांनाही देतील. त्या शाळांमध्ये जेव्हा परीक्षा होते तर पेपर सोडवून घेतात. पेपर विलायत वरून येतात. जे विलायतमध्ये शिकत असतील, त्यांच्यातही कोणी मोठा एज्युकेशन मिनिस्टर असेल तर ते पेपर तपासत असतील. इथे तुमचे पेपर कोण तपासणार? तुम्ही स्वतःच कराल. स्वतः जे हवे ते बना. अभ्यास करून जे पद बाबांकडून हवे आहे ते घ्या. जितकी बाबांची आठवण कराल, इतरांची सेवा कराल, तितकेच फळ मिळेल. त्यांना सेवा करण्याची काळजी राहील की राजधानी स्थापन होत आहे तर प्रजा देखील पाहिजे ना. तिथे वजीर (मंत्री) इत्यादीची गरजच नसते. इथे तर जेव्हा अक्कल कमी होते तेव्हा मंत्र्याची गरज भासते. इथे बाबांकडे देखील सल्ला घेण्यासाठी येतात - ‘बाबा, पैसे आहेत काय करू? धंदा कसा करू?’ बाबा म्हणतात - हे दुनियेतील धंदे इत्यादीची गोष्ट इथे आणू नका. हो, कोणी निराश झाला तर थोडा-फार धीर देण्यासाठी सांगतात. परंतु हा काही माझा धंदा नाही आहे. माझा धंदा आहे तुम्हाला पतिता पासून पावन बनवून विश्वाचा मालिक बनविण्याचा. तुम्हाला सतत बाबांकडून श्रीमत घेत राहायचे आहे. आता तर सर्वांचे आहे आसुरी मत. तिथे तर सुखधाम आहे. तिथे कधी असे विचारणार नाहीत की, ‘राजी-खुशी (संतुष्ट आणि आनंदी) आहात? तब्येत ठीक आहे?’ हे असे इथेच विचारले जाते. तिथे हे शब्दच असत नाहीत. दुःखधामातील कोणतेही शब्दच तिथे नसतात. परंतु बाबा जाणतात मुलांमध्ये मायेची प्रवेशता होत असल्या कारणाने बाबा विचारू शकतात की, ‘बाकी व्यवस्थित आहात, संतुष्ट आणि आनंदी आहात?’ मनुष्य इथल्या शब्दांना तर समजू शकणार नाहीत. कोणी व्यक्तीने विचारले तर तुम्ही म्हणू शकता की, ‘आम्ही ईश्वराची मुले आहोत, आमचा कसला कुशल समाचार विचारता? काळजी होती पार ब्रह्ममध्ये राहणाऱ्या पित्याची, आता तो मिळाला, आता कसली काळजी'. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आपण कोणाची मुले आहोत - हे ज्ञान देखील बुद्धीमध्ये आहे. जेव्हा आपण पावन बनू आणि मग युद्ध सुरू होईल. तुम्हाला विचारतील जरूर. तुम्ही म्हणाल आम्ही तर सदैव आनंदात आहोत. आजारी जरी असाल तरी देखील आनंदी आहात. बाबांच्या आठवणीमध्ये असाल तर स्वर्गापेक्षाही इथे जास्त आनंदी आहात. जेव्हा की स्वर्गाची बादशाही देणारा पिता मिळाला आहे. आम्हाला किती लायक बनवतात, मग आम्हाला कसली काळजी आहे! ईश्वराच्या मुलांना कोणत्या गोष्टीची काळजी. त्या देवतांना देखील काळजी नसते. देवतांच्या वर आहे ईश्वर. तर ईश्वराच्या मुलांना काय कसली काळजी असू शकते. बाबा आम्हाला शिकवत आहेत. बाबा आमचे टीचर, सद्गुरु आहेत. बाबा आमच्यावर मुकुट ठेवतात. याला इंग्लिश मध्ये म्हणतात - ‘क्राऊन प्रिन्स (मुकुटधारी राजकुमार)’. पित्याचा मुकुट मुलगा धारण करेल. तुम्ही समजू शकता सतयुगामध्ये सुखच सुख आहे. प्रॅक्टिकलमध्ये ते सुख तेव्हा मिळवाल जेव्हा तिथे जाल. ते तर तुम्हीच जाणू शकता. सतयुगामध्ये काय असेल, हे शरीर सोडून आपण कुठे जाणार. आता तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये बाबा शिकवत आहेत. तुम्ही जाणता खरोखर आपण स्वर्गामध्ये जात आहोत. ते लोक जे म्हणतात अमका स्वर्गामध्ये गेला परंतु त्यांना माहितच नाहीये की, स्वर्ग आणि नरक कशाला म्हटले जाते. कल्पाचा कालावधीच लाखो वर्षे लिहिला आहे. जन्म-जन्मांतर हे ज्ञान ऐकता-ऐकता खालीच घसरत आलात (पतन झाले). आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, आपण कुठून कुठे येऊन पडलो आहोत. सतयुगापासून खालीच घसरत आलो आहोत. आता आम्ही या पुरुषोत्तम संगमयुगावर पोहोचलो आहोत. कल्प-कल्प बाबा येतात शिकवण्याकरिता. तुम्ही बाबांजवळ राहता ना. हेच आमचे खरेखरे सद्गुरु आहेत, जे मुक्ती-जीवनमुक्तीचा रस्ता सांगतात. जसे हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील शिकतात, तसे यांना पाहून तुम्ही मुले देखील शिकता. पावलोपावली सावधानी बाळगायची असते. मनसा-वाचा-कर्मणा अतिशय शुद्ध रहायचे आहे. आतमध्ये कोणतीही घाण (विकार) असता कामा नये. बाबांना घडोघडी मुले विसरून जातात. बाबांना विसरल्याने बाबांची शिकवण देखील विसरून जातात. आपण स्टुडंट आहोत, हे देखील विसरून जातात. आहे खूप सोपे. बाबांच्या आठवणी मध्येच चमत्कार आहे. असा चमत्कार इतर कोणताही पिता शिकवू शकणार नाही. या चमत्कारानेच तमोप्रधानापासून सतोप्रधान बनतात.

तुम्ही मुले जाणता शिवबाबांनी ब्रह्माद्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना केली आहे, जो धर्म सतयुग आणि त्रेता, अर्धा कल्प चालतो. मग दुसऱ्या धर्माचे नंतर वृद्धिला प्राप्त होतात. जसे क्राईस्ट आला, सुरुवातीला तर खूप थोडे होते. जेव्हा पुष्कळ होतात तेव्हाच राज्य करू शकतात. ख्रिश्चन धर्म अजून पर्यंत आहे. वाढ तर होत राहते. ते जाणतात की क्राईस्ट द्वारा आम्ही ख्रिश्चन बनलो आहोत. आज पासून दोन हजार वर्षांपूर्वी क्राईस्ट आला होता. आता त्यांची वृद्धी होत आहे. ख्रिश्चन म्हणतील आम्ही क्राईस्टचे आहोत. सुरुवातीला एक क्राईस्ट आला, मग त्यांचा धर्म स्थापन होतो, वृद्धी होत जाते. एकाचे दोन, दोनाचे चार… मग अशी वृद्धी होत जाते. आता पहा ख्रिश्चनांचे झाड केवढे झाले आहे. फाउंडेशन आहे देवी-देवता घराण्याचे, म्हणूनच ब्रह्माला ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हटले जाते. परंतु भारतवासी हे विसरून गेले आहेत की, आपण परमपिता परमात्मा शिव यांची डायरेक्ट संतान आहोत.

ख्रिश्चन देखील समजतात आदि देव होऊन गेले आहेत, ज्यांची ही मनुष्य वंशावळी आहे. बाकी ते मानणार तर आपल्या क्राईस्टलाच; क्राईस्टला, बुद्धाला फादर समजतात. वंशावळ आहे ना. जसे क्राईस्टचे यादगार (स्मृती रुप) ख्रिश्चन देशामध्ये आहे. तसे तुम्ही मुलांनी इथे तपस्या केली आहे म्हणून तुमचे देखील यादगार (स्मृती रुप) इथे आबूमध्ये आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. १) डेड सायलेन्सची खरीखुरी रुहानी यात्रा करायची आहे. ‘हम सो’ चा मंत्र नेहमी लक्षात ठेवायचा आहे, तेव्हाच चक्रवर्ती राजा बनाल.
  2. २) मनसा-वाचा-कर्मणा अतिशय शुद्ध रहायचे आहे. आतमध्ये कोणतीही घाण नसावी (विकार नसावा). पावलोपावली सावध रहायचे आहे. श्रीमताचा आदर ठेवायचा आहे.
वरदान:- निर्मानतेचा (नम्रतेचा) गुण धारण करून सर्वांना सुख देणारे सुख देवा, सुख स्वरूप भव
तुम्हा महान आत्म्यांची निशाणी आहे - निर्मानता (विनम्रता). जितके निर्मान बनाल तितका सर्वांद्वारे मान प्राप्त होईल. जे निर्मान आहेत ते सर्वांना सुख देतील. जिथे पण जातील, जे काही करतील ते सुखदायीच असेल. तर जे कोणी संबंध-संपर्कामध्ये येतील ते सुखाची अनुभूती करतील; म्हणून तुम्हा ब्राह्मण आत्म्यांचे गायन आहे - सुखाच्या सागराची मुले सुख स्वरूप, सुख-देवा. तर सर्वांना सुख देत रहा आणि सुख घेत चला. कोणी तुम्हाला दुःख देईल तर घेऊ नका.
बोधवाक्य:- सर्वात मोठे ज्ञानी ते आहेत जे आत्म-अभिमानी राहतात.

||| ओम शांती |||

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.