मराठी मुरली · Brahma Kumaris

मराठी मुरली · 31 डिसेंबर, 2024

ओम शांती · BapDada ·

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली31 डिसेंबर, 2024 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

31.12.2024
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो - बाबा दररोज तुम्हाला जो अभ्यास शिकवतात, तो अभ्यास कधीही मिस करायचा नाही, या अभ्यासानेच मनातील शंका दूर होतात”
प्रश्न:- बाबांच्या हृदयाला जिंकण्याची युक्ती काय आहे?
उत्तर:- बाबांच्या हृदयाला जिंकायचे असेल तर जोपर्यंत संगमयुग आहे तोपर्यंत बाबांपासून काहीही लपवू नका. आपल्या कॅरेक्टरवर (चारित्र्यावर) पूर्णत: लक्ष ठेवा. जर कोणते पाप कर्म होते तर अविनाशी सर्जनला ऐकवा तर हलके व्हाल. बाबा जे शिक्षण देतात हीच त्यांची दया, कृपा किंवा आशीर्वाद आहेत. तर बाबांकडे दया अथवा कृपा मागण्या ऐवजी स्वतःवर कृपा करा. असा पुरुषार्थ करून बाबांच्या हृदयाला जिंका.

ओम् शांती. आता रूहानी मुले हे तर जाणतात की, नवीन दुनियेमध्ये सुख आहे, जुन्या दुनियेमध्ये दुःख आहे. दुःखामध्ये सर्व दुःखामध्ये येतात आणि सुखामध्ये सर्व सुखामध्ये येतात. सुखाच्या दुनियेमध्ये दुःखाचे नामोनिशाण नाही, आणि जिथे दुःख आहे तिथे सुखाचे नामोनिशाण नाही. जिथे पाप आहे तिथे पुण्याचे नामोनिशाण नाही, जिथे पुण्य आहे तिथे पापाचे नामोनिशाण नाही. ते कोणते स्थान आहे? एक आहे सतयुग, दुसरे आहे कलियुग. हे तर मुलांच्या बुद्धीमध्ये नक्कीच असेल. आता दुःखाचा काळ संपला आहे आणि सतयुगासाठी तयारी होत आहे. आपण आता या पतित घाणेरड्या दुनियेमधून त्या पलीकडे सतयुग अर्थात रामराज्यामध्ये जात आहोत. नवीन दुनियेमध्ये आहे सुख, जुन्या दुनियेमध्ये आहे दुःख. असे नाही, जो सुख देतो तोच दुःखही देतो. नाही, सुख बाबा देतात, दुःख माया रावण देतो. त्या शत्रूचा पुतळा दरवर्षी जाळतात. दुःख देणाऱ्याला नेहमी जाळले जाते. मुले जाणतात जेव्हा त्यांचे राज्य संपुष्टात येते तेव्हा मग कायमसाठी नष्ट होतो. ५ विकारच सर्वांना आदि-मध्य-अंत दुःख देत आले आहेत. तुम्ही इथे बसले आहात तरी देखील तुमच्या बुद्धीमध्ये हेच रहावे की आपल्याला बाबांकडे जायचे आहे. रावणाला काही तुम्ही पिता म्हणणार नाही. कधी ऐकले आहे - रावणाला परमपिता परमात्मा कोणी म्हणता? कधीच नाही. पुष्कळ लोक असे समजतात की, लंकेमध्ये रावण होता. बाबा म्हणतात - ही संपूर्ण दुनियाच लंका आहे. म्हणतात - वास्को-द-गामाने स्टीमर किंवा आगबोटीने जगाची परिक्रमा केली. ज्यावेळी त्याने भ्रमंती केली त्यावेळी एरोप्लेन इत्यादी नव्हते. ट्रेन देखील आगीवर चालत असे. विज वेगळी गोष्ट आहे. आता बाबा म्हणतात की, दुनिया तर एकच आहे. नव्या पासून जुनी, जुन्या पासून नवीन बनते. असे म्हणता येत नाही की स्थापना, पालना, विनाश. नाही, अगोदर स्थापना नंतर विनाश, त्यानंतर पालना, हे शब्द बरोबर आहेत. नंतर मग रावणाची पालना सुरू होते. ती खोटी विकारी पतित बनण्याची पालना आहे, ज्यामुळे सर्व दुःखी होतात. बाबा तर कधी कोणाला दुःख देत नाहीत. इथे तर तमोप्रधान बनल्याकारणाने बाबांना सर्वव्यापी म्हणतात. पहा, काय बनले आहेत! हे तर तुम्हा मुलांच्या चालता-फिरता बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. आहे तर खूप सोपे. फक्त अल्फची (बाबांची) गोष्ट आहे. मुस्लिम लोक देखील म्हणतात - उठून अल्लाची आठवण करा. स्वतः देखील पहाटे उठतात. ते म्हणतात अल्लाह किंवा खुदाची आठवण करा. तुम्ही म्हणाल बाबांची आठवण करा. बाबा शब्द अतिशय गोड आहे. ‘अल्लाह’ म्हटल्याने वारसा आठवणार नाही. ‘बाबा’ म्हटल्याने वारसा आठवतो. मुस्लिम लोक ‘पिता’ म्हणत नाहीत. ते मग ‘अल्लाह-मियां’ म्हणतात. मियां-बीबी. हे सर्व शब्द भारतामध्ये आहेत. ‘परमपिता परमात्मा’ म्हटल्यानेच शिवलिंगाची आठवण येईल. युरोपवासी ‘गॉड फादर’ म्हणतात. भारतामध्ये तर दगड-धोंड्याला सुद्धा भगवान समजतात. शिवलिंग देखील दगडाचेच असते. समजतात या दगडामध्ये भगवान बसला आहे. भगवंताची आठवण करतील तर त्यांना दगडच समोर येतो. दगडाला भगवान समजून पूजा करतात. दगड कुठून येतो? डोंगरदऱ्यातील झऱ्यांमधून येणारे पाणी पडून-पडून गोल गुळगुळीत बनतो. मग कशी नैसर्गिक प्रतीक देखील बनतात. देवी-देवतांची मूर्ती अशी नसते. दगडाला तासून-तासून कान, तोंड, नाक, डोळे इत्यादी-इत्यादी किती सुंदर बनवतात. खर्च खूप करतात. शिवबाबांच्या मूर्तीवर खर्च इत्यादीचा काही प्रश्नच नाही. आता तुम्ही मुले समजता हम सो देवी-देवता चैतन्य मध्ये स्वतः बनत आहोत. चैतन्य मध्ये असाल तेव्हा पूजा इत्यादी होणार नाही. जेव्हा पत्थर-बुद्धि बनतात तेव्हा दगडाची पूजा करतात. चैतन्य आहेत तेव्हा पूज्य आहेत मग पुजारी बनतात. तिथे ना कोणी पुजारी असतात, ना काही दगडाची मूर्ती असते. गरजच नाही. जे चैतन्य होते त्यांच्या प्रतिमा स्मारक म्हणून दगडांच्या मुर्त्या ठेवतात. आता या देवतांच्या कहाणी विषयी तुम्हाला माहीत झाले आहे की या देवतांची जीवन कहाणी काय होती? पुन्हा तीच रिपीट होते. पूर्वी हा ज्ञान चक्षु नव्हता तर जसे पत्थर बुद्धी होता. आता बाबांकडून जे ज्ञान मिळाले आहे, ज्ञान एकच आहे परंतु घेणारे नंबरवार आहेत.

तुमची रुद्रमाळा देखील या धारणेच्या अनुसारच बनते. एक आहे रुद्रमाळा, दुसरी आहे रुंडमाळा. एक आहे ब्रदर्सची (आत्म्यांची), दुसरी आहे ब्रदर्स आणि सिस्टरची (ब्रह्मा कुमार-कुमारींची). हे तर बुद्धीमध्ये येते आपण आत्मे अति सूक्ष्म बिंदू प्रमाणे आहोत. गायन देखील आहे - ‘भ्रकुटी के बीच चमकता है अजब सितारा’. आता तुम्ही समजता आपण आत्मा चैतन्य आहोत. एक छोट्या ताऱ्याप्रमाणे आहोत. मग जेव्हा गर्भामध्ये येतो तेव्हा पहिले किती छोटा पिंड असतो. मग किती मोठा होतो. तीच आत्मा आपल्या शरीराद्वारे अविनाशी पार्ट बजावत राहते. मग सर्वजण या शरीराचीच आठवण करू लागतात. हे शरीरच चांगले-वाईट असल्या कारणाने सर्वांना आकर्षित करते. सतयुगामध्ये असे म्हणणार नाही की, आत्म-अभिमानी बना, स्वतःला आत्मा समजा. हे ज्ञान तुम्हाला आताच मिळते कारण तुम्ही जाणता आता आत्मा पतित बनली आहे. पतित असल्याकारणाने जे काम करते ते सर्व उलटेच होते. बाबा सुलट काम करवून घेतात, माया उलट काम करायला लावते. सर्वात उलटे काम आहे बाबांना सर्वव्यापी म्हणणे. आत्मा जो पार्ट बजावते तो अविनाशी आहे. त्याला जाळले जात नाही, त्याची तर पूजा होते. शरीराला जाळले जाते. आत्मा जेव्हा शरीर सोडते तेव्हा शरीराला जाळतात. आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करते. आत्म्याशिवाय शरीर दोन-चार दिवस सुद्धा ठेवू शकत नाही. अनेकजण तर मग शरीराला औषधे इत्यादी लावून ठेवतात देखील. परंतु फायदा काय? ख्रिश्चनांचा एक सेंट जेवीयर आहे, म्हणतात त्यांचे शरीर आजही जपून ठेवलेले आहे. त्यांचे देखील जसे मंदिर बनवले आहे. कोणाला दाखवत नाहीत फक्त त्यांचे पाय दाखवतात. म्हणतात - कोणी पायाला स्पर्श केला तर आजारी पडत नाही. पायाला स्पर्श केल्याने आजारा पासून मुक्त होतात तर समजतात त्यांची कृपा. बाबा म्हणतात - भावनेचे भाडे मिळते. निश्चयबुद्धी असल्याने थोडा फायदा होतो. बाकी असे असेल तर लोंढेच्या लोंढे तिथे जातील, जत्रा भरेल. बाबा देखील इथे आले आहेत तरी देखील इतकी गर्दी नसते. गर्दी होण्या इतकी जागा देखील नाहीये. जेव्हा गर्दी होण्याची वेळ येते तेव्हा विनाश होतो. हा देखील ड्रामा बनलेला आहे. याचा आदि अथवा अंत नाही आहे. हां, झाडाची (मनुष्य सृष्टीरुपी झाडाची) जड-जडीभूत अवस्था होते अर्थात तमोप्रधान बनते तेव्हा हे झाड चेंज होते. किती हे बेहदचे मोठे झाड आहे. पहिले ते येतील ज्यांना पहिल्या नंबरमध्ये जायचे आहे. नंबरवार येतील ना? सर्व सूर्यवंशी काही एकत्र तर येणार नाहीत. चंद्रवंशी देखील सर्व एकत्र येत नाहीत. नंबरवार माळे अनुसारच येतील. सर्व पार्टधारी एकत्र कसे येतील. खेळच बिघडून जाईल. हा खेळ अगदी अचूक बनलेला आहे, यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही.

गोड-गोड मुले जेव्हा इथे बसतात तर बुद्धीमध्ये हेच लक्षात राहिले पाहिजे. इतर सत्संगांमध्ये तर इतर अनेक गोष्टी बुद्धीमध्ये येतात. हे तर एकच शिक्षण आहे, ज्याद्वारे तुमची कमाई होते. ती शास्त्रे इत्यादी वाचल्याने कमाई होत नाही. हो, काही ना काही गुण चांगले असतात. ग्रंथ वाचण्यासाठी बसतात तर असे नाही सर्व निर्विकारी असतात. बाबा म्हणतात या दुनियेमध्ये सर्व भ्रष्टाचारातून जन्म घेतात. तुम्हा मुलांना बरेचजण विचारतात तिथे जन्म कसा होईल? बोला, तिथे तर ५ विकारच नाहीत, योगबलाने मुले जन्म घेतात. आधीच साक्षात्कार होतो की बाळ येणार आहे. तिथे विकाराची गोष्ट नाही. इथे तर मुलांना देखील माया खाली पाडते. काहीजण मग बाबांना येऊन सांगतात देखील. सांगितले नाही तर शंभर पटीने सजा होईल. बाबा तर सर्व मुलांना म्हणतात की, कोणतेही पाप कर्म झाले तर लगेच बाबांना सांगितले पाहिजे. बाबा अविनाशी वैद्य आहेत. सर्जनला सांगितल्याने तुम्ही हलके व्हाल. जोपर्यंत संगमयुग आहे तोपर्यंत बाबांपासून काहीही लपवायचे नाही. कोणी लपवतात तर बाबांचे मन जिंकू शकत नाहीत. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. शाळेमध्ये आलाच नाहीत तर कॅरॅक्टर (चारित्र्य) कसे सुधारेल? यावेळी सर्वांचे चारित्र्य खराब आहे. विकारच एक नंबरचे खराब चारित्र्य आहे; म्हणूनच बाबा म्हणतात - मुलांनो, काम विकार तुमचा महाशत्रू आहे. अगोदर देखील हे गीतेचे ज्ञान ऐकले होते तेव्हा या सर्व गोष्टी लक्षात येत नव्हत्या. आता बाबा डायरेक्ट गीता ऐकवतात. आता बाबांनी तुम्हा मुलांना दिव्य बुद्धी दिली आहे, तर भक्तीचे नाव ऐकताच हसू येते की, आपण काय-काय करत होतो! आता तर बाबा शिकवण देतात, यामध्ये दया, कृपा किंवा आशीर्वादाचा प्रश्नच येत नाही. स्वतःवरच दया, कृपा, आशीर्वाद करायचा आहे. बाबा तर प्रत्येक मुलाला पुरुषार्थ करायला लावतात. काही मग पुरुषार्थ करून बाबांचे मन जिंकतात, काही मग पुरुषार्थ करता-करता मरून सुद्धा जातात. बाबा तर प्रत्येक मुलाला एकसमानच शिकवतात मग काही वेळेला अशा गूढ गोष्टी निघतात ज्यामुळे जुना संशयच नाहीसा होतो, मग पुन्हा सावरतात म्हणून बाबांची शिकवणी कधीही मिस करता कामा नये. मुख्य आहे बाबांची आठवण. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. कोणी काही वाईट बोलले तर ऐकून न ऐकल्यासारखे केले पाहिजे. ‘हियर नो ईविल…’ उच्च पद प्राप्त करायचे असेल तर मान-अपमान, सुख-दुःख, हार-जीत सर्वकाही जरूर सहन करायचे आहे. बाबा किती युक्त्या सांगतात. तरी देखील मुले बाबांचे सुद्धा ऐकून न ऐकल्या सारखे करतात तर ते काय पद प्राप्त करतील? बाबा म्हणतात जोपर्यंत अशरीरी बनत नाही तोपर्यंत मायेचा काही ना काही त्रास होतच राहणार. बाबांचे म्हणणे मानत नाहीत तर बाबांचा डिस रिगार्ड (अनादर) करतात. तरी देखील बाबा म्हणतात मुलांनो, नेहमी जिवंत रहा, जागे रहा; आणि बाबांची आठवण करून उच्च पद प्राप्त करा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. २) बाबा जे सांगतात ते कधीही ऐकून न ऐकल्यासारखे करून बाबांचा डिस रिगार्ड करायचा नाही. मायेच्या वारा पासून वाचण्यासाठी अशरीरी होऊन राहण्याचा अभ्यास जरूर करायचा आहे.
वरदान:- बाप समान दयाळू बनून सर्वांना क्षमा करून स्नेह देणारे मास्टर दाता भव ज्याप्रमाणे बाबांना दयाळू, मर्सीफुल म्हणतात, तसेच तुम्ही मुले देखील मास्टर दयाळू आहात. जे दयाळू आहेत तेच कल्याण करू शकतात, अकल्याण करणाऱ्यांना देखील क्षमा करू शकतात. ते मास्टर स्नेहाचे सागर असतात, त्यांच्याकडे स्नेहाव्यतिरिक्त इतर काहीच नसते. वर्तमान समयी संपत्ती पेक्षा देखील जास्त स्नेहाची गरज आहे, म्हणून मास्टर दाता बनून सर्वांना स्नेह देत जा. कोणीही रिकाम्या हाताने जाऊ नये.
बोधवाक्य:- तीव्र पुरुषार्थी बनण्याची इच्छा असेल तर जिथे इच्छा असेल तिथे मार्ग सापडेल.

||| ओम शांती |||

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.