| 30.12.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो- आत्मा रुपी बॅटरीला ज्ञान आणि योगाने भरपूर करून सतोप्रधान बनवायचे आहे, पाण्याच्या स्नानाने नाही” | |
| प्रश्न:- | यावेळी सर्व मनुष्य आत्म्यांना भटकवणारा कोण आहे? तो कशासाठी भटकवतो? |
| उत्तर:- | सर्वांना भटकवणारा रावण आहे कारण तो स्वतः देखील भटकत असतो. त्याला स्वतःचे कोणते घर नाही आहे. रावणाला कोणी बाबा म्हणणार नाही. बाबा तर घरून परमधामवरून येतात आपल्या मुलांना ठिकाणा (आश्रय स्थान) देण्यासाठी. आता तुम्हाला घराची माहिती झाली आहे म्हणून तुम्ही भटकत नाही. तुम्ही म्हणता सर्वात पहिले आम्ही बाबांपासून दुरावलो आता परत सर्वात पहिले घरी जाणार. |
ओम् शांती. गोड-गोड मुले इथे बसून समजतात, यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) जे शिवबाबा आलेले आहेत, ते कसेही करून आम्हाला सोबत घरी घेऊन जाणार. ते आत्म्यांचे घर आहे ना. तर मुलांना जरूर आनंद होत असणार, बेहदचे बाबा येऊन आम्हाला गुल-गुल (फूल) बनवतात. ते काही कोणते कपडे इत्यादी आपल्याला घालत नाहीत. याला म्हटले जाते योगबल, आठवणीचे बळ. जितका टिचरचा मर्तबा (दर्जा) आहे तितका अजूनच मुलांना देखील मर्तबा (दर्जा) मिळवून देतात. शिक्षणाने स्टुडंट्स जाणतात की आपण असे बनणार. तुम्ही देखील समजता आपले बाबा शिक्षक देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. ही आहे नवीन गोष्ट. आपले बाबा शिक्षक आहेत, त्यांची आपण आठवण करतो. ते आम्हाला शिकवून असे बनवत आहेत. आमचे बेहदचे बाबा आलेले आहेत - आम्हाला परत घरी घेऊन जाण्यासाठी. रावणाचे काही कोणते घर नसते, घर रामाचे असते. शिवबाबा कुठे राहतात? तुम्ही लगेच सांगाल परमधाम मध्ये. रावणाला काही बाबा म्हणणार नाही. रावण कुठे राहतो? माहित नाही. असे म्हणणार नाही की रावण परमधाम मध्ये राहतो. नाही, त्याचा तर जसा काही ठिकाणाच नाही आहे. भटकत राहतो, तुम्हाला देखील भटकवतो. तुम्ही रावणाची आठवण करता का? नाही. किती तुम्हाला भटकवतो. शास्त्र वाचा, भक्ती करा, असे करा. बाबा म्हणतात - याला म्हटले जाते भक्ती मार्ग, रावण राज्य. गांधीजी देखील म्हणत होते राम-राज्य पाहिजे. या रथामध्ये आपले शिवबाबा आलेले आहेत. मोठे बाबा आहेत ना. ते आत्म्यांशी ‘बाळांनो-बाळांनो’ म्हणत गोष्टी करतात. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहेत रूहानी बाबा आणि रूहानी बाबांच्या बुद्धीमध्ये आहात तुम्ही रूहानी मुले, कारण तुमचे कनेक्शन आहेच मूल वतन सोबत. ‘आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल…’ तिथे तर आत्मे बाबांसोबत एकत्र राहतात. मग आपला-आपला पार्ट बजावण्याकरिता वेगळे होतात. ‘बहुकाल’ या खूप काळाचा हिशोब तर पाहिजे ना. तो बाबा बसून सांगतात. तुम्ही आता शिक्षण शिकत आहात. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत जे चांगल्या रीतीने शिकतात. तेच सर्वप्रथम माझ्यापासून वेगळे झाले आहेत. तेच मग माझी खूप आठवण करतील आणि मग पुन्हा सर्वात अगोदर येतील.
बाबा मुलांना बसून साऱ्या सृष्टीचे गूढ रहस्य समजावून सांगतात, जे इतर कोणीही जाणत नाहीत. गुह्य देखील म्हटले जाते, गुह्यतम् देखील म्हटले जाते. हे तुम्ही जाणता बाबा काही वर (परमधाम मध्ये) बसून समजावून सांगत नाहीत, इथे येऊन समजावून सांगतात - मी या कल्पवृक्षाचे बीज रूप आहे. या मनुष्य सृष्टी रुपी झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते. दुनियेतील मनुष्य तर अजिबात काहीच जाणत नाहीत. कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपलेले आहेत मग बाबा येऊन जागे करतात. आता तुम्हा मुलांना जागे केले आहे बाकी सारे झोपलेले आहेत. तुम्ही देखील कुंभकर्णाच्या आसुरी निद्रेमध्ये झोपला होता. बाबांनी येऊन जागे केले आहे, मुलांनो जागे व्हा. तुम्ही गाफील होऊन झोपून गेले आहात, याला म्हटले जाते अज्ञान निद्रा. ती निद्रा तर सर्वच घेतात. सतयुगामध्ये देखील घेतात. आता सर्व आहेत अज्ञानाच्या निद्रेमध्ये. बाबा येऊन ज्ञान देऊन सर्वांना जागे करतात. आता तुम्ही मुले जागे झाले आहात, जाणता बाबा आलेले आहेत, आपल्याला घेऊन जातील. आता तर ना हे शरीर कामाचे राहिले आहे, ना आत्मा. दोन्ही पतित बनले आहेत, एकदम भेसळ असलेले आहे. ९ कॅरेट म्हणावे अर्थात खूप थोडे सोने, खरे सोने २४ कॅरेटचे असते. आता बाबा तुम्हा मुलांना २४ कॅरेटमध्ये घेऊन जाऊ इच्छितात. तुमच्या आत्म्याला खरे-खरे गोल्डन एजेड बनवितात. भारताला सोन्याची चिडिया म्हणत होते. आता तर लोखंडाची, दगड-मातीची चिडिया म्हणता येईल. आहे तर चैतन्य ना. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जसे आत्म्याला समजता तसेच बाबांना देखील समजू शकता. म्हणतात देखील - ‘चमकता है सितारा’. अतिशय छोटासा तारा आहे. डॉक्टर इत्यादींनी पाहण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत परंतु दिव्य दृष्टी शिवाय पाहू शकत नाही. अति सूक्ष्म आहे. कोणी म्हणतात डोळ्यातून आत्मा निघून गेली, कोणी म्हणतात मुखातून निघून गेली. आत्मा निघून जाते कुठे? दुसऱ्या शरीरामध्ये जाऊन प्रवेश करते. आता तुमची आत्मा वर शांतीधामला निघून जाईल. हे पक्के माहित आहे बाबा येऊन आपल्याला घरी घेऊन जातील. एकीकडे आहे कलियुग, दुसरीकडे आहे सतयुग. आता आम्ही संगमावर उभे आहोत. आश्चर्य आहे. इथे करोडोंनी मनुष्य आहेत आणि सतयुगामध्ये केवळ ९ लाख! बाकी सर्वांचे काय झाले? विनाश होतो. बाबा येतातच मुळी नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी. ब्रह्मा द्वारे स्थापना होते. मग दोन रूपामध्ये पालना देखील होते. असे काही नाही की चारभुजावाले कोणी मनुष्य असतील. तर मग ते सौंदर्यच राहणार नाही. मुलांना देखील समजावून सांगतात - चतुर्भुज हे श्री लक्ष्मी, श्री नारायणाचे कम्बाइंड रूप आहे. श्री अर्थात श्रेष्ठ. त्रेतामध्ये दोन कला कमी होतात. तर मुलांना हे जे नॉलेज आता मिळते याच्या स्मृती मध्ये रहायचे आहे. मुख्य आहेच दोन शब्द, बाबांची आठवण करा. इतर कोणालाही समजणार नाही. बाबाच पतित-पावन सर्वशक्तिमान आहेत. गातात देखील बाबा, तुम्ही आम्हाला सारे आकाश-धरती सर्व काही दिले. अशी कोणती वस्तू नाही जी दिली नसेल. संपूर्ण विश्वाचे राज्य दिले आहे.
तुम्ही जाणता हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते. मग ड्रामाचे चक्र फिरते. संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. नंबरवार पुरुषार्थानुसार. हे देखील जाणता विकारी पासून निर्विकारी, निर्विकारी पासून विकारी, हा ८४ जन्मांचा पार्ट अगणित वेळा बजावला आहे. त्याचे मोजमाप करू शकत नाही. जनगणना भले करतात. बाकी हे जे तुम्ही तमोप्रधाना पासून सतोप्रधान, सतोप्रधाना पासून तमोप्रधान बनता, याचा हिशोब काढू शकत नाहीत की किती वेळा बनले आहात. बाबा म्हणतात ५ हजार वर्षांचे हे चक्र आहे. हे योग्य आहे. लाखो वर्षांची गोष्ट तर लक्षात सुद्धा राहू शकणार नाही. आता तुमच्यामध्ये गुणांची धारणा होते. ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो. या डोळ्यांनी तुम्ही जुन्या दुनियेला पाहता. तिसरा नेत्र जो मिळतो, त्याच्या द्वारे नवीन दुनियेला पहायचे आहे. ही दुनिया तर काही कामाची नाही. जुनी दुनिया आहे. नवीन आणि जुन्या दुनियेमध्ये फरक पहा किती आहे. तुम्ही जाणता आपणच नवीन दुनियेचे मालक होतो मग ८४ जन्म घेत-घेत हे बनलो आहोत. हे नीट लक्षात ठेवले पाहिजे आणि मग इतरांना देखील समजावून सांगायचे आहे - कसे आपण हे (लक्ष्मी-नारायण) बनतो? ब्रह्मा, सो विष्णु, मग विष्णु सो ब्रह्मा बनतात. ब्रह्मा आणि विष्णु मधील फरक पाहता ना. विष्णू कसा सुशोभित होऊन बसला आहे आणि हा ब्रह्मा कसा साधारण वेषात बसला आहे. तुम्ही जाणता हा ब्रह्मा, तो विष्णू बनणार आहे. हे कोणाला समजावून सांगणे देखील खूप सोपे आहे. ब्रह्मा, विष्णु, शंकराचा आपसामध्ये काय संबंध आहे? तुम्ही जाणता ही विष्णूची दोन रूपे लक्ष्मी-नारायण आहेत. हेच विष्णू देवता सो मग हे मनुष्य ब्रह्मा बनतात. तो विष्णू सतयुगातील आहे, ब्रह्मा इथले आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे ब्रह्मा पासून विष्णू सेकंदामध्ये बनतात, मग विष्णू पासून ब्रह्मा बनण्यामध्ये ५ हजार वर्षे लागतात. ततत्त्वम्. केवळ एक ब्रह्माच तर बनत नाहीत ना. या गोष्टी बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही सांगू शकत नाही. इथे कोणत्या मानवी गुरुची गोष्ट नाहीये. यांचे देखील गुरू शिवबाबा, तुम्हा ब्राह्मणांचे देखील गुरु शिवबाबा आहेत. त्यांना सद्गुरु म्हटले जाते. तर मुलांनी शिवबाबांचीच आठवण करायची आहे. कोणालाही हे समजावून सांगणे तर खूप सोपे आहे - शिवबाबांची आठवण करा. शिवबाबा स्वर्ग नवीन दुनिया रचतात. उच्च ते उच्च भगवान शिव आहेत. ते आम्हा आत्म्यांचे पिता आहेत. तर भगवान मुलांना म्हणतात - ‘मज पित्याची आठवण करा’. आठवण करणे किती सोपे आहे. बाळ जन्माला येते आणि लगेच त्याच्या मुखातून स्वतःच आई-आई निघते. आई-बाबांशिवाय दुसऱ्या कोणाकडेच जाणार नाही. आईचा मृत्यू होतो, तर ती मग वेगळी गोष्ट आहे. पहिले आई आणि बाबा त्यानंतर मग इतर मित्र-नातेवाईक इत्यादी असतात. त्यामध्ये देखील जोडी-जोडी असेल. काका-काकी दोघे आहेत ना. कुमारी असेल आणि मग मोठी होताच कोणी काकी म्हणेल, कोणी मामी म्हणेल.
आता तुम्हाला बाबा समजावून सांगतात तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात. बस्स, बाकीची सर्व नाती कॅन्सल करतात. भाऊ-भाऊ समजाल तर एका बाबांची आठवण कराल. बाबा देखील म्हणतात - ‘मुलांनो, मज एका पित्याची आठवण करा’. किती मोठे बेहदचे पिता आहेत. ते मोठे बाबा तुम्हाला बेहदचा वारसा देण्यासाठी आले आहेत. वारंवार सांगतात - मनमनाभव. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, ही गोष्ट विसरू नका. देह-अभिमानामध्ये आल्यानेच विसरून जाता. सर्वात पहिले तर स्वतःला आत्मा समजायचे आहे - आपण आत्मे शाळिग्राम आहोत आणि एका बाबांचीच आठवण करायची आहे. बाबांनी सांगितले आहे - ‘मी पतित-पावन आहे, माझी आठवण केल्याने तुमची बॅटरी जी रिकामी झाली आहे ती भरपूर होईल, तुम्ही सतोप्रधान बनाल’. पाण्याच्या गंगेमध्ये तर जन्म-जन्मांतर गटांगळ्या खाल्ल्या आहेत परंतु पावन बनू शकला नाहीत. पाणी पतित-पावन कसे असू शकते? ज्ञानानेच सद्गती होते. यावेळी आहेच पाप आत्म्यांची खोटी दुनिया. देवाण-घेवाण देखील पाप आत्म्यांशीच होते. मन्सा-वाचा-कर्मणा पाप-आत्माच बनतात. आता तुम्हा मुलांना समज मिळाली आहे. तुम्ही म्हणता - आम्ही असे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी पुरुषार्थ करतो. आता तुमची भक्ती करणे बंद झाले आहे. ज्ञानाने सद्गती होते. हे देवी-देवता सद्गतीमध्ये आहेत ना. बाबांनी समजावून सांगितले आहे - हे (ब्रह्मा बाबा) अनेक जन्मांच्या अंतामध्ये आहेत. बाबा किती सोपे करून सांगतात. तुम्ही मुले किती मेहनत करता. कल्प-कल्प करता. जुन्या दुनियेला बदलून नवीन दुनिया बनवायची आहे. म्हणतात ना भगवान जादूगार आहे, रत्नागर आहे, सौदागर आहे. जादूगार तर आहे ना. जुन्या दुनियेला हेल पासून बदलून हेवन (स्वर्ग) बनवतात. केवढी जादू आहे आता तुम्ही स्वर्गाचे रहिवासी बनत आहात. तुम्ही जाणता आता आपण हेलचे (नरकाचे) रहिवासी आहोत. हेल आणि हेवन वेगवेगळे आहे. ५ हजार वर्षांचे चक्र आहे. लाखो वर्षांची तर गोष्टच नाही. या गोष्टी विसरायच्या नाहीत. भगवानुवाच आहे ना - कोणीतरी आहे जरूर जे पुनर्जन्म रहीत आहे. श्रीकृष्णाला तर शरीर आहे. ‘शिव’ला आपले शरीर नाहीये. त्यांना मुख तर जरूर पाहिजे. तुम्हाला ऐकविण्यासाठी येऊन शिकवतात. ड्रामा अनुसार संपूर्ण नॉलेजच त्यांच्या जवळ आहे. ते संपूर्ण कल्पामध्ये एकदाच येतात दुःखधामला सुखधाम बनविण्यासाठी. सुख-शांतीचा वारसा जरूर बाबांकडून मिळाला आहे तेव्हाच तर मनुष्यांना वाटते ना, बाबांची आठवण करतात.
बाबा, ज्ञान पहा किती सोप्या पद्धतीने देतात. इथे बसले असताना देखील बाबांची आठवण करा, बाजोलीची आठवण करा तरी देखील मनमनाभवच आहे. हे संपूर्ण ज्ञान देणारे बाबाच आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही बेहदच्या बाबांकडे जातो. बाबा आम्हाला शांतिधाम-सुखधामला घेऊन जाण्याचा रस्ता सांगतात. इथे बसले असताना घराची (परमधामची) आठवण करायची आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे, घराची आठवण करायची आहे आणि नवीन दुनियेची आठवण करायची आहे. ही जुनी दुनिया तर नष्ट होणारच आहे. पुढे चालून तुम्ही वैकुंठाची देखील खूप आठवण कराल. वारंवार वैकुंठाला जात रहाल. सुरुवातीला मुली वारंवार आपसामध्ये बसून वैकुंठामध्ये निघून जात होत्या. हे पाहून मोठ्या घरचे आपल्या मुलांना पाठवून देत होते. नावच ठेवले होते - ओम निवास. पुष्कळ मुले आली मग हंगामा झाला. मुलांना शिकवत होते. सहजच ध्यानामध्ये जात होते. आता हा साक्षात्काराचा पार्ट बंद केला आहे. इथे देखील स्मशान बनवत होते. सर्वांना झोपवत होते, म्हणत होते आता शिवबाबांची आठवण करा, आणि ध्यानामध्ये जात होते. आता तुम्ही मुले देखील जादूगार आहात. कोणालाही दृष्टी द्याल तर ते लगेच ध्यानामध्ये जातील. ही जादू किती चांगली आहे. नौधा भक्तीमध्ये तर जेव्हा एकदम प्राण देण्यासाठी तयार होतात तेव्हा त्यांना साक्षात्कार होतो. इथे तर बाबा स्वतः आले आहेत, तुम्हा मुलांना शिकवून उच्च पद प्राप्त करून देतात. पुढे चालून तुम्ही मुले खूप साक्षात्कार करत रहाल. बाबांना आता देखील कोणी विचारेल तर सांगू शकतात की कोण गुलाबाचे फूल आहे, कोण चंपाचे फूल आहे, कोण तगरीचे आहे? अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- १) देहाची सर्व नाती कॅन्सल करून आत्मा भाऊ-भाऊ आहोत, हा निश्चय करायचा आहे आणि बाबांची आठवण करून पूर्ण वारशाचे अधिकारी बनायचे आहे.
- २) आता पाप-आत्म्यांसोबत देवाण-घेवाण करायची नाही. अज्ञान निद्रेतून सर्वांना जागे करायचे आहे, शांतीधाम-सुखधामला जाण्याचा रस्ता सांगायचा आहे.
| वरदान:- |
मन-बुद्धीच्या एकाग्रतेद्वारे सर्व सिद्धी प्राप्त करणारे सदा समर्थ आत्मा भव सर्व सिद्धींना प्राप्त करण्यासाठी एकाग्रतेच्या शक्तीला वाढवा. ही एकाग्रतेची शक्ती सहजच निर्विघ्न बनवते, मेहनत करण्याची आवश्यकता राहत नाही. ‘एक बाप दुसरा न कोई’ - याचा सहज अनुभव होतो, सहजच एकरस स्थिती बनते, सर्वांप्रती कल्याणाची वृत्ती, भावा-भावाची दृष्टी असते. परंतु एकाग्र होण्यासाठी इतके समर्थ बना जे मन-बुद्धी नेहमी तुमच्या ऑर्डर अनुसार चालेल. स्वप्नामध्ये देखील सेकंदाची देखील हलचल नसावी. |
| बोधवाक्य:- | कमलपुष्प समान न्यारे रहा तर प्रभूच्या प्रेमाचे पात्र बनाल. |