| 24.02.2025 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - हे रूहानी हॉस्पिटल तुम्हाला अर्ध्या कल्पासाठी एव्हर हेल्दी बनविणारे आहे, इथे तुम्ही देही-अभिमानी होऊन बसा” | |
| प्रश्न:- | धंदा इत्यादी करत असताना देखील कोणते डायरेक्शन बुद्धीमध्ये आठवणीत राहिले पाहिजे? |
| उत्तर:- | बाबांचे डायरेक्शन आहे - तुम्ही कोणत्याही साकारची अथवा आकारीची आठवण करायची नाही, एका बाबांची आठवण रहावी तर विकर्म विनाश होतील. यामध्ये कोणीही असे म्हणू शकत नाहीत की, सवड नाही. सर्व काही करत असताना देखील आठवणीमध्ये राहू शकता. |
ओम् शांती. गोड-गोड रुहानी मुलांप्रती बाबांची गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हटल्या नंतर मुलांना सांगितले जाते बाबांची आठवण करा. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन येऊन पावन बनवा तर बाबा अगोदरच म्हणतात रूहानी बाबांची आठवण करा. रूहानी पिता तर सर्वांचा एकच आहे. फादरला कधी सर्वव्यापी मानले जात नाही. तर जितके होऊ शकेल मुलांनो सर्वात आधी बाबांची आठवण करा, एका बाबांव्यतिरिक्त इतर कोणत्याही साकारीची किंवा आकारीची आठवण करू नका. हे तर एकदम सोपे आहे ना. मनुष्य म्हणतात आम्ही बिझी असतो, सवड नाही. परंतु यामध्ये तर कायमच सवड आहे. बाबा युक्ती सांगतात, हे देखील जाणता बाबांची आठवण केल्याने आपली पापे भस्म होतील. मुख्य गोष्ट आहे हीच. धंदा इत्यादीची काही मनाई नाहीये. हे सर्व करत असताना फक्त बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. हे तर समजतात की, आपण पतित आहोत, साधु-संत ऋषी-मुनी इत्यादी सर्व साधना करतात. साधना केली जाते भगवंताला भेटण्याकरिता. अर्थात जोपर्यंत त्यांचा परिचय मिळत नाही तोपर्यंत भेटू शकत नाहीत. तुम्ही जाणता बाबांचा परिचय दुनियेमध्ये कोणालाच नाहीये. देहाचा परिचय तर सर्वांना आहे. मोठ्या वस्तूचा परिचय लगेच होतो. आत्म्याचा परिचय तर जेव्हा बाबा येतील तेव्हाच समजावतील. आत्मा आणि शरीर दोन गोष्टी आहेत. आत्मा एक स्टार आहे आणि अति सूक्ष्म आहे. तिला कोणीही पाहू शकत नाही. तर इथे जेव्हा येऊन बसता तर देही-अभिमानी होऊन बसायचे आहे. हे देखील एक हॉस्पिटल आहे ना - अर्ध्या कल्पासाठी एव्हर हेल्दी बनण्याचे. आत्मा तर आहे अविनाशी, तिचा कधीही विनाश होत नाही. सारा पार्ट आत्म्याचाच आहे. आत्मा म्हणते - माझा कधीही विनाश होत नाही. इतके सारे आत्मे अविनाशी आहेत. शरीर आहे विनाशी. आता तुमच्या बुद्धीमध्ये हे पक्के झाले आहे की, आपण आत्मे अविनाशी आहोत. आपण ८४ जन्म घेतो, हा ड्रामा आहे. यामध्ये कोण-कोण धर्म स्थापक कधी येतात, किती जन्म घेत असतील हे तर जाणता. ८४ जन्म जे गायले जातात जरूर कोणत्या एकाच धर्माचे असतील. सर्व धर्मांचे तर असू शकणार नाहीत. सर्व धर्म तर एकत्र येतही नाहीत. आपण बाकीच्यांचा हिशेब कशासाठी काढत बसायचा? जाणता अमक्या-अमक्या वेळी धर्म स्थापन करण्यासाठी येतात. त्यांची मग वृद्धी होते. सर्व सतोप्रधानापासून तमोप्रधान तर होणारच आहेत. दुनिया जेव्हा तमोप्रधान होते तेव्हा मग बाबा येऊन सतोप्रधान सतयुग बनवितात. आता तुम्ही मुले जाणता की आपण भारतवासीच मग नवीन दुनियेमध्ये येऊन राज्य करु, दुसरा कोणताही धर्म असणार नाही. तुम्हा मुलांमध्ये देखील ज्यांना उच्च पद प्राप्त करायचे आहे ते जास्त आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करतात आणि समाचार देखील लिहितात की, ‘बाबा, आम्ही इतका वेळ आठवणीमध्ये राहतो’. बरेचजण तर लाजेपोटी पूर्ण समाचारच देत नाहीत. समजतात, बाबा काय म्हणतील. परंतु माहित तर होतेच ना. शाळेमध्ये टीचर स्टुडंटला म्हणतील ना की, तुम्ही जर अभ्यास केला नाहीत तर नापास व्हाल. लौकिक आई-वडील सुद्धा मुलांच्या अभ्यासावरून समजतात; हे तर खूप मोठे स्कूल आहे. इथे तर नंबरवार बसवले जात नाही. बुद्धीने समजले जाते, नंबरवार तर असतातच ना. आता बाबा चांगल्या-चांगल्या मुलांना सेवेला कुठे पाठवतात, तर ते मग जातात तर दुसरे लिहितात - ‘आम्हाला महारथी पाहिजे’; याचा अर्थ जरूर ते समजतात की हे आपल्या पेक्षा हुशार प्रसिद्ध आहेत. नंबरवार तर असतात ना. प्रदर्शनीमध्ये देखील अनेक प्रकारचे येतात तर गाईड्सनी देखील चेक करण्यासाठी उभे राहिले पाहिजे. रिसीव्ह करणारे तर जाणतात ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे. तर त्यांना मग इशारा केला पाहिजे की यांना तुम्ही समजावून सांगा. तुम्ही देखील समजू शकता फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड सर्व आहेत. इथे तर सर्वांची सेवा करायचीच आहे. कोणी मोठी व्यक्ती असेल तर जरूर मोठ्या व्यक्तीचे आदरातिथ्य तर सर्व करतातच. हा नियम आहे. बाबा किंवा टिचर क्लासमध्ये मुलांची महिमा करतात, तर ही देखील सर्वात मोठी खातिरी आहे. नाव कमावणाऱ्या मुलांची महिमा किंवा खातिरी केली जाते. हा अमका श्रीमंत आहे, रिलीजियस माइंडेड (धार्मिक वृत्तीचा) आहे, ही देखील खातिरी आहे ना. आता तुम्ही हे जाणता - उच्च ते उच्च भगवान आहेत. म्हणतात देखील खरोखर उच्च ते उच्च आहेत, परंतु मग तुम्ही विचाराल की, त्यांची बायोग्राफी (जीवन चरित्र) सांगा, तर म्हणतील - सर्वव्यापी आहे. बस्स एकदम खालीच आणतात. आता तुम्ही समजावून सांगू शकता सर्वात उच्च ते उच्च आहेत भगवान, ते आहेत मूलवतनवासी. सूक्ष्मवतन मध्ये आहेत देवता. इथे राहतात मनुष्य. तर उच्च ते उच्च भगवान ते निराकार झाले.
आता तुम्ही जाणता आपण जे हिऱ्या समान होतो ते आता कवडी समान बनलो आहोत आणि मग भगवंताला आपल्या पेक्षाही जास्त खाली घेऊन गेले आहेत. ओळखतच नाहीत. तुम्हा भारतवासीयांनाच ओळख मिळते आणि नंतर मग ओळख कमी होत जाते. आता तुम्ही सर्वांना बाबांची ओळख देत जाता. पुष्कळजणांना बाबांची ओळख मिळेल. तुमची मुख्य चित्रे आहेतच ही त्रिमूर्ती, गोळा, झाड. यामध्ये किती प्रकाश (ज्ञान) आहे. हे तर कोणीही सांगतील की, हे लक्ष्मी-नारायण सतयुगाचे मालक होते. अच्छा सतयुगाच्या नंतर काय होते? हे देखील आता तुम्ही जाणता. आता आहे कलियुगाचा अंत आणि आहे देखील प्रजेचे प्रजेवर राज्य. आता राजाई काही नाही आहे, किती फरक आहे. सतयुगाच्या सुरुवातीला राजे होते आणि आता कलियुगामध्ये देखील राजे आहेत. भले ते काही पावन नाही आहेत परंतु कोणी पैसे देऊन सुद्धा टायटल (उपाधी) लावून घेतात. महाराजा तर कोणीच नाही आहे, उपाधी खरेदी करतात. ज्याप्रमाणे पटियालाचा महाराजा, जोधपूर, बिकानेरचा महाराजा… नाव तर घेतात ना. हे नाव अविनाशी चालत राहते. अगोदर पवित्र महाराजे होते, आता आहेत अपवित्र महाराजे. शब्द चालत राहतो. या लक्ष्मी-नारायणासाठी म्हणतील - हे सतयुगाचे मालक होते, मग राज्य घेतले कोणी? आता तुम्ही जाणता - राजाईची स्थापना कशी होते. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला शिकवतो २१ जन्मांसाठी’. ते (दुनियावाले) तर शिकून याच जन्मामध्ये बॅरिस्टर इत्यादी बनतात. तुम्ही आता शिकून भविष्य महाराजा-महाराणी बनता. ड्रामा प्लॅन अनुसार नवीन दुनियेची स्थापना होत आहे. आता आहे जुनी दुनिया. भले कितीही मोठ-मोठे महाल आहेत परंतु हिरे-माणकांचे महाल बनविण्याची ताकद तर कोणामध्येच नाही आहे. हे सर्व हिरे-माणकांचे महाल तर सतयुगामध्ये बनवतात ना. बनविण्यासाठी काही उशीर थोडाच लागतो. इथे देखील भूकंप इत्यादी होतात तर खूप कामगार कामाला लावतात, एक-दोन वर्षांमध्ये सारे शहर उभे करतात. नवीन दिल्ली बनविण्यामध्ये फारफार तर ८-१० वर्षे लागली परंतु इथले लेबर आणि तिथल्या लेबर्स मध्ये फरक तर असतोच ना. आजकाल तर नवीन-नवीन शोध देखील लावत असतात. घर बांधण्यामध्ये देखील विज्ञान खूप प्रगत झाले आहे, सर्व काही तयार मिळते, फ्लॅट लगेच तयार होतो. अतिशय वेगाने बनतात तर हे सर्व तिथे कार्यामध्ये तर येतेच ना. हे सर्व सोबत येणार आहे. संस्कार तर राहतात ना. हे विज्ञानाचे संस्कार देखील सोबत येतील. तर आता बाबा मुलांना समजावून सांगत राहतात - ‘पावन बनायचे असेल तर बाबांची आठवण करा’. बाबा देखील गुड मॉर्निंग करून मग शिकवण देतात. मुलांनो, बाबांच्या आठवणीमध्ये बसले आहात? चालता-फिरता बाबांची आठवण करा, कारण जन्म-जन्मांतरीचे ओझे डोक्यावर आहे. शिडी उतरता-उतरता ८४ जन्म घेता. आता पुन्हा एका जन्मामध्ये चढती कला होते. जितकी बाबांची आठवण करत रहाल तितका आनंद सुद्धा होईल, ताकद मिळेल. अशी बरीच मुले आहेत ज्यांना पुढच्या नंबरमध्ये ठेवले जाते परंतु आठवणीमध्ये अजिबात राहत नाहीत. भले ज्ञानामध्ये हुशार आहेत परंतु आठवणीची यात्रा नाहीये. बाबा तर मुलांची महिमा करतात. हे (ब्रह्मा बाबा) देखील नंबर वन मध्ये आहेत तर जरूर मेहनत देखील करत असतील ना. तुम्ही नेहमी समजा की शिवबाबा समजावून सांगत आहेत तर बुद्धीयोग तिथे लागून राहील. हे देखील शिकत तर असतील ना. तरीही म्हणतात - बाबांची आठवण करा. कोणालाही समजावून सांगण्याकरिता ही चित्रे आहेत. भगवान म्हटलेच जाते निराकारला. ते येऊन शरीर धारण करतात. एका भगवंताची मुले सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. आता या शरीरामध्ये विराजमान आहेत. सर्व अकालमूर्त आहेत. हे अकालमूर्तचे (आत्म्याचे) तख्त आहे. अकाल तख्त काही वेगळी कोणती खास वस्तू नाहीये. हे तख्त आहे अकालमूर्तचे. भृकुटीच्या मध्यभागी आत्मा विराजमान असते, याला म्हटले जाते अकालतख्त. अकालतख्त, अकालमूर्तचे. सर्व आत्मे अकाल आहेत, किती अति सूक्ष्म आहेत. बाबा तर आहेत निराकार. ते आपले तख्त कोठून आणतील. बाबा म्हणतात - ‘माझे देखील हे तख्त आहे. मी येऊन या तख्ताचा आधार घेतो. ब्रह्माच्या साधारण वृद्ध तनामध्ये येऊन अकाल तख्तावर बसतो’. आता तुम्हाला माहित झाले आहे की, सर्व आत्म्यांचा हा (भृकुटीमध्य) तख्त आहे. मानवाचीच गोष्ट केली जाते, पशूंची काही गोष्ट नाहीये. पहिले तर मनुष्य जे पशूपेक्षाही वाईट झाले आहेत, ते तर सुधारले पाहिजेत. कोणी पशूंच्या बाबतीत विचारले, तर बोला - पहिले स्वतःला तर सुधारा. सतयुगामध्ये तर पशू देखील खूप चांगले फर्स्टक्लास असतील. त्यांची घाण इत्यादी काहीच होणार नाही. राजाच्या महालामध्ये कबुतर इत्यादींनी घाण केली तर दंड भरायला लावतात. जरा सुद्धा घाण नसते. तिथे खूप खबरदारी घेतली जाते. पहारा देतात, कधी कोणता पशू इत्यादी आत घुसू शकणार नाही. खूप स्वच्छता असते. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये देखील किती स्वच्छता असते. शंकर-पार्वतीच्या मंदिरामध्ये कबूतरे सुद्धा दाखवतात. तर जरूर मंदिर सुद्धा खराब करत असतील. शास्त्रांमध्ये तर अनेक दंतकथा लिहिलेल्या आहेत.
आता बाबा मुलांना समजावून सांगतात, त्यामध्ये देखील फार थोडे आहेत जे धारण करू शकतात. बाकीचे तर काहीच समजत नाहीत. बाबा मुलांना किती प्रेमाने समजावून सांगतात - मुलांनो, अतिशय मधुर बना. मुखावाटे सदैव रत्ने निघत रहावीत. तुम्ही आहात - रूप-बसंत . तुमच्या मुखावाटे दगड (कटू वचन) निघता कामा नयेत. आत्म्याचीच महिमा होते. आत्मा म्हणते - मी प्रेसिडेंट आहे, अमका आहे… माझ्या शरीराचे नाव हे आहे. अच्छा, आत्मे कोणाची मुले आहेत? एका परमात्म्याची. तर जरूर त्यांच्याकडून वारसा मिळत असेल. मग ते सर्वव्यापी कसे असू शकतील! तुम्ही समजता आपणही अगोदर काहीच जाणत नव्हतो. आता बुद्धी किती विशाल झाली आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाल तर समजाल की, ही तर सगळी खोटी चित्रे आहेत. १० भुजांवाला, हत्तीच्या सोंडवाला असे कोणते चित्र असते काय! ही सर्व आहे भक्तिमार्गाची सामग्री. वास्तविक भक्ती केली पाहिजे एका शिवबाबांची, जे सर्वांचे सद्गती दाता आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे - हे लक्ष्मी-नारायण देखील ८४ जन्म घेतात. मग उच्च ते उच्च बाबाच येऊन सर्वांना सद्गती देतात. त्यांच्यापेक्षा मोठा अजून कोणीच नाही. या ज्ञानाच्या गोष्टी तुमच्यामध्ये देखील नंबरवार धारण करू शकतात. धारण करू शकत नाहीत तर बाकी काय कामाचे राहिले. बरेचजण तर आंधळ्यांची काठी बनण्याच्या ऐवजी आपणच आंधळे बनतात. जी गाय दूध देत नाही तर तिला पिंजरपूरमध्ये (पिंजऱ्यामध्ये) ठेवतात. इथे देखील ज्ञानाचे दूध देऊ शकत नाहीत. असे खूप आहेत, जे काहीच पुरुषार्थ करत नाहीत. समजत नाहीत की आपण थोडेतरी कोणाचे कल्याण करावे. आपल्या भाग्याचा विचारच करत नाहीत. जे काही मिळाले ते चांगले. तर बाबा म्हणतील यांच्या नशिबातच नाहीये. आपली सद्गती करण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. देही-अभिमानी बनायचे आहे. बाबा किती उच्च ते उच्च आहेत आणि येतात पहा कसे पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये आहेत. त्यांना बोलावतातच मुळी पतित दुनियेमध्ये. जेव्हा रावण दुःख देतो तर एकदम भ्रष्ट करतो, तेव्हा बाबा येऊन श्रेष्ठ बनवतात. जे चांगला पुरुषार्थ करतात ते राजा-राणी बनतात, जे पुरुषार्थ करत नाहीत ते गरीब बनतात. भाग्यामध्ये नाही तर पुरुषार्थ करू शकत नाहीत. काहीजण तर खूप चांगले भाग्य बनवतात. प्रत्येकजण स्वतःला पाहू शकतो की आपण काय सेवा करतो. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रूप-बसंत बनून मुखावाटे सदैव रत्नेच काढायची आहेत, अतिशय गोड बनायचे आहे. कधीही दगड (कटू वचन) काढायचे नाहीत.
२) ज्ञान आणि योगामध्ये हुशार बनून आपले आणि इतरांचे कल्याण करायचे आहे. आपले उच्च भाग्य बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आंधळ्यांची काठी बनायचे आहे.
| वरदान:- | संतुष्टतेद्वारे सर्वांकडून प्रशंसा प्राप्त करणारे सदा प्रसन्नचित्त भव संतुष्टतेची निशाणी प्रत्यक्ष रूपामध्ये प्रसन्नता दिसून येईल आणि जे सदैव संतुष्ट किंवा प्रसन्न राहतात त्यांची प्रत्येकजण प्रशंसा अवश्य करतात. तर प्रशंसा, प्रसन्नते द्वारेच प्राप्त करू शकता म्हणून ‘सदा संतुष्ट’ आणि ‘प्रसन्न’ राहण्याचे विशेष वरदान स्वतः देखील घ्या आणि इतरांना देखील द्या कारण या यज्ञाची अंतिम आहुती - सर्व ब्राह्मणांची सदैव प्रसन्नता आहे. जेव्हा सर्व सदैव प्रसन्न रहाल तेव्हा प्रत्यक्षतेचा आवाज घुमेल अर्थात विजयाचा झेंडा फडकेल. |
| बोधवाक्य:- | डायमंड बनून डायमंड बनण्याचा संदेश देणे हीच डायमंड ज्युबली साजरी करणे आहे. |
अव्यक्त इशारे - एकांत प्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:- एकांतवासी बनणे अर्थात चारही बाजूंच्या व्हायब्रेशन पासून दूर निघून जाणे. बरेचजण असे असतात ज्यांना एकांत आवडत नाही, संघटनमध्ये राहणे, हसणे, बोलणे जास्त पसंत करतात, परंतु हे झाले बाह्यमुखतेमध्ये येणे. आता स्वतःला एकांतवासी बनवा अर्थात सर्व आकर्षणांच्या व्हायब्रेशन पासून अंतर्मुखी बना. आता असा काळ येत आहे जो हाच अभ्यास उपयोगात येईल. जर बाहेरील आकर्षणाच्या वशीभूत होण्याचा अभ्यास असेल तर तो ऐनवेळी धोका देईल.