| 25.02.2025 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - सर्वांना ही खुशखबर ऐकवा की भारत आता पुन्हा स्वर्ग बनत आहे, हेवनली गॉड फादर आलेले आहेत” | |
| प्रश्न:- | ज्या मुलांना स्वर्गाचा मालक बनण्याचा आनंद होतो त्यांचे लक्षण काय असेल? |
| उत्तर:- | त्यांना आतून कोणत्याही प्रकारचे दुःख वाटू शकत नाही. त्यांना नशा असेल की आम्ही तर खूप मोठी माणसे आहोत, आम्हाला बेहदचे बाबा असे (लक्ष्मी-नारायण) बनवतात. त्यांचे वर्तन अतिशय रॉयल (सभ्यतापूर्वक) असेल. ते इतरांनाही खुशखबर सांगितल्याशिवाय राहू शकणार नाहीत. |
ओम् शांती. बाबा समजावून सांगतात आणि मुले जाणतात की विशेषतः भारतामध्ये आणि सर्वसाधारणपणे दुनियेमध्ये हा संदेश पोहोचवायचा आहे. तुम्ही सर्व संदेशी आहात, अतिशय आनंदाचा संदेश सर्वांना द्यायचा आहे की, भारत आता पुन्हा स्वर्ग बनत आहे अथवा स्वर्गाची स्थापना होत आहे. भारतामध्ये बाबा, ज्यांना हेवनली गॉड फादर म्हणतात, तेच स्थापना करण्यासाठी आलेले आहेत. तुम्हा मुलांना डायरेक्शन आहे की ही खुशखबर सर्वांना व्यवस्थितपणे ऐकवा. प्रत्येकाला आपल्या धर्माची तात असते (काळजी असते). तुम्हाला देखील काळजी आहे, तुम्ही खुशखबर ऐकवता, भारताच्या सूर्यवंशी देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे अर्थात भारत पुन्हा स्वर्ग बनत आहे. हा आतून आनंद झाला पाहिजे की, आपण आता स्वर्गाचे मालक बनत आहोत. ज्यांना आतून हा आनंद आहे त्यांना तर कोणत्याही प्रकारचे दुःख होऊ शकत नाही. हे तर मुले जाणतात नवीन दुनिया स्थापन होण्यामध्ये त्रास देखील होतो. अबलांवर किती अत्याचार होतात. मुलांना कायम हे लक्षात राहिले पाहिजे की, आम्ही भारताला बेहदची खुशखबर देत आहोत. जशी बाबांनी पत्रके छापून घेतली आहेत - ‘बंधू आणि भगिनींनो, येऊन ही खुशखबर ऐका’... पूर्ण दिवस विचार चालत रहातात की, कसा हा संदेश सर्वांना ऐकवायचा. बेहदचे बाबा बेहदचा वारसा देण्यासाठी आलेले आहेत. या लक्ष्मी-नारायणाच्या चित्राला पाहून तर पूर्ण दिवस हर्षित राहिले पाहिजे. तुम्ही तर खूप मोठी माणसे आहात त्यामुळे तुमचे कोणतेही जंगली वर्तन असता कामा नये. तुम्ही जाणता आपण तर माकडांपेक्षाही वाईट होतो. आता बाबा आम्हाला असे (देवी-देवता) बनवतात. तर किती आनंद झाला पाहिजे. परंतु आश्चर्य आहे, मुलांना तो आनंदही रहात नाही आणि ना ते कधी कोणाला तेवढ्या उमंगाने सर्वांना खुशखबरी ऐकवतात. बाबांनी तुम्हाला मेसेंजर (दूत) बनवले आहे. सर्वांच्या कानावर हा संदेश घालत रहा. भारतवासींना हे माहितीच नाही आहे की आपला आदि सनातन देवी-देवता धर्म केव्हा रचला गेला? आणि मग गेला कुठे? आता तर फक्त चित्र आहे. बाकीचे सगळे धर्म आहेत फक्त आदि सनातन देवी-देवता धर्मच नाही आहे. भारतामध्येच चित्र आहे. ब्रह्मा द्वारे स्थापना करतात. तर तुम्ही सर्वांना ही खुशखबर ऐकवाल तर तुम्हाला देखील आतून आनंद वाटेल. प्रदर्शनीमध्ये तुम्ही ही खुशखबर ऐकवता ना की, इथे येऊन बेहदच्या बाबांकडून स्वर्गाचा वारसा घ्या. हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक आहेत ना. मग ते गेले कुठे? हे कोणीही समजत नाहीत म्हणून म्हटले जाते - चेहरा माणसासारखा आणि व्यवहार माकडासारखा आहे. आता तुमचा चेहरा मनुष्याचा आहे, वर्तन देवतांसारखे बनत आहे. तुम्ही जाणता आपण पुन्हा सर्वगुण संपन्न बनत आहोत. मग इतरांकडून देखील हा पुरुषार्थ करून घ्यायचा आहे. प्रदर्शनीची सेवा तर खूप चांगली आहे. ज्यांना गृहस्थ व्यवहाराचे बंधन नाही, वानप्रस्थी आहेत अथवा विधवा आहेत, कुमारी आहेत त्यांना तर सेवेचा खूप चान्स आहे. सेवेला लागले पाहिजे. यावेळी लग्न करणे बरबादी करणे आहे, लग्न न करणे आबादी आहे. बाबा म्हणतात - हा मृत्युलोक पतित दुनिया नष्ट होत आहे. तुम्हाला पावन दुनियेमध्ये जायचे असेल तर या सेवेमध्ये लागले पाहिजे. प्रदर्शनी मागून प्रदर्शनी केल्या पाहिजेत. जी सेवाभावी मुले आहेत, त्यांना सेवेची चांगली आवड आहे. काहीजण बाबांना विचारतात, आम्ही नोकरी सोडावी का? बाबा बघतात - लायक असेल तर परवानगी देतात, ठीक आहे, सेवा करा. अशी खुशखबर सर्वांना ऐकवायची आहे. बाबा म्हणतात - येऊन आपले राज्य-भाग्य घ्या. तुम्ही ५ हजार वर्षांपूर्वी राज्य-भाग्य घेतले होते, आता पुन्हा घ्या. फक्त माझ्या मतावर चाला.
बघितले पाहिजे - आपल्यामध्ये कोणते अवगुण आहेत? तुम्ही या बॅजवर तर खूप सेवा करू शकता, ही एकदम फर्स्टक्लास चीज आहे. भले आहे पाई-पैशाची चीज परंतु याद्वारे किती उच्च पद मिळवू शकता. मनुष्य शिकण्यासाठी पुस्तके इत्यादींवर किती खर्च करतात. इथे पुस्तके इत्यादीचा तर काही प्रश्नच नाही. फक्त सर्वांच्या कानामध्ये संदेश द्यायचा आहे, हा आहे बाबांचा सच्चा मंत्र. बाकी तर सर्व खोटे मंत्र देत राहतात. खोट्या वस्तूची व्हॅल्यू थोडीच असते. व्हॅल्यू तर हिऱ्यांची असते, ना की दगडांची. हे जे गायन आहे एक-एक महावाक्य लाखोंची संपत्ती आहे, हे या ज्ञानाला म्हटले जाते. बाबा म्हणतात शास्त्र तर खंडीभर आहेत. तुम्ही अर्धाकल्प वाचत आला आहात, त्यापासून तर काही मिळाले नाही. आता तुम्हाला ज्ञान रत्न देत आहेत. ती आहे शास्त्रांची ऑथॉरिटी. बाबा तर ज्ञानाचे सागर आहेत. यांचे एक-एक महावाक्य लाखों-करोडो रुपयांचे आहे. तुम्ही विश्वाचे मालक बनता. जाऊन पद्मपती बनता. या ज्ञानाचीच महिमा आहे. ती (भक्तिमार्गाची) शास्त्रे इत्यादी वाचून तर गरीब बनले आहात. तर आता या ज्ञान रत्नांचे दान सुद्धा करायचे आहे. बाबा खूप सोप्या युक्त्या सांगतात. बोला, आपल्या धर्माला विसरून तुम्ही बाहेर भटकत राहता. तुम्हा भारतवासीयांचा आदि सनातन देवी-देवता धर्म होता, तो धर्म कुठे गेला? ८४ लाख योनी म्हटल्याने कोणतीही गोष्ट बुद्धीला पटत नाही. आता बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माचे होता नंतर ८४ जन्म घेतले आहेत. हे लक्ष्मी-नारायण आदि सनातन देवी-देवता धर्मवाले आहेत ना. आता धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट बनले आहेत. बाकीचे सर्व धर्म आहेत, हा आदि सनातन धर्मच राहिलेला नाही. जेव्हा हा धर्म होता तेव्हा इतर बाकीचे धर्म नव्हते. किती सोपे आहे. हे बाबा, हे दादा. प्रजापिता ब्रह्मा आहे तर जरूर बी.के. भरपूर असणार ना. बाबा येऊन रावणाच्या जेलमधून, शोक वाटिकेतून सोडवतात. ‘शोक वाटिके’चा अर्थ देखील कोणाला समजत नाही. बाबा म्हणतात ही शोकाची, दुःखाची दुनिया आहे. ती आहे सुखाची दुनिया. तुम्ही आपल्या शांतीच्या दुनियेची आणि सुखाच्या दुनियेची आठवण करत रहा. इनकारपोरियल वर्ल्ड (निराकारी दुनिया) म्हणतात ना. इंग्रजी शब्द खूप चांगले आहेत. इंग्रजी तर चालतच येते. आता तर अनेक भाषा झाल्या आहेत. मनुष्य काहीही समजत नाहीत; आता म्हणतात - ‘निर्गुण बाल संस्था…’ ‘निर्गुण’ अर्थात कोणताही गुण नाही. अशीच संस्था बनवली आहे. निर्गुणचा देखील अर्थ समजत नाहीत. बिना अर्थाचे नाव ठेवतात. अशा भरपूर संस्था आहेत. भारतामध्ये एकच आदि सनातन देवी-देवता धर्माची संस्था होती, दुसरा कोणताही धर्म नव्हता. परंतु लोकांनी ५००० वर्षां ऐवजी कल्पाचा कालावधी लाखो वर्षे लिहिला आहे. तर तुम्ही आता सर्वांना या अज्ञान अंध:कारातून बाहेर काढायचे आहे. सेवा करायची आहे. भले हा ड्रामा तर पूर्व नियोजित आहे परंतु शिवबाबांच्या यज्ञातून खाल, प्याल आणि काहीच सेवा केली नाहीत तर धर्मराज जे राइट हॅन्ड आहेत, ते जरूर सजा देतील म्हणून चेतावणी दिली जाते. सेवा करणे तर खूप सोपे आहे. कोणालाही प्रेमाने समजावून सांगत रहा. बाबांकडे काहीजणांचा समाचार येतो की, ‘आम्ही मंदिरामध्ये गेलो, गंगेच्या घाटावर गेलो’. पहाटे उठून मंदिरामध्ये जातात, रिलिजस माईंडेड (धार्मिक वृत्ती) असणाऱ्यांना समजावून सांगणे सोपे होईल. सर्वात चांगले आहे लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये सेवा करणे. अच्छा, त्यांना असे बनविणारे शिवबाबा आहेत, तिथे जाऊन समजावून सांगा. जंगलाला (दुनियेला) आग लागेल, हे सर्व नष्ट होऊन जाईल मग तुमचा देखील पार्ट पूर्ण होतो. तुम्ही जाऊन राजाई कुळामध्ये जन्म घेता. राजाई कशी मिळणार आहे, ते तर पुढे जाऊन माहित होईल. ड्रामामध्ये सर्व अगोदर थोडेच सांगतील. तुम्हाला समजेल आपण कोणते पद प्राप्त करणार. जास्ती दान-पुण्य करणारे राजाईमध्ये येतात ना. राजांकडे पुष्कळ धन असते. आता तुम्ही अविनाशी ज्ञान रत्नांचे दान करता.
भारतवासीयांकरिताच हे ज्ञान आहे. बोला, आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे, पतितापासून पावन बनविणारे बाबा आलेले आहेत. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’; किती सोपे आहे. परंतु बुद्धी इतकी तमोप्रधान आहे ज्यामुळे काहीही धारणा होत नाही. विकारांची प्रवेशता आहे. प्राणी देखील अनेक प्रकारचे असतात, कोणामध्ये क्रोध खूप असतो, प्रत्येक प्राण्याचा स्वभाव वेगळा असतो. दुःख देण्याचे अनेक प्रकारचे स्वभाव असतात. दुःख देणारा सर्वात पहिला विकार आहे काम कटारी चालवणे. रावण राज्यामध्ये आहेच या विकारांचे राज्य. बाबा तर रोज समजावून सांगत असतात, किती चांगल्या-चांगल्या मुली आहेत, बिचाऱ्या कैदेमध्ये आहेत, ज्यांना बांधेली (बंधनात असणारी) म्हटले जाते. वास्तविक त्यांच्यामध्ये जर ज्ञानाची पराकाष्ठा (उच्च स्थिती) होईल तर मग कोणीही त्यांना अडवू शकणार नाही. परंतु मोहाची रग (आसक्ती) खूप आहे. संन्याशांना देखील घरादाराची आठवण येते, महत्प्रयासाने ती आसक्ती नष्ट होते. आता तुम्हाला तर मित्र-नातलग इत्यादींना विसरायचेच आहे कारण ही जुनी दुनियाच नष्ट होणार आहे. या शरीराला सुद्धा विसरायचे आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. पवित्र बनायचे आहे. ८४ जन्मांचा पार्ट तर बजावायचाच आहे. मधून तर कोणी परत जाऊ शकत नाही. आता नाटक संपत आहे. तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. आता आपल्याला आपल्या घरी जायचे आहे. पार्ट पूर्ण झाला, उत्कंठा वाटली पाहिजे - बाबांची खूप आठवण करावी. आठवण केल्याने विकर्म विनाश होतील. घरी जाऊन मग सुखधाममध्ये येणार. बरेचजण समजतात लवकरात लवकर या दुनियेमधून सुटावे; परंतु जाणार कुठे? पहिले तर उच्च पद प्राप्त करण्यासाठी मेहनत केली पाहिजे ना. अगोदर आपली नाडी बघायची आहे की, मी कितपत लायक बनलो आहे? स्वर्गामध्ये जाऊन काय करणार? पहिले तर लायक बनावे लागेल ना. बाबांचा सपूत मुलगा बनावे लागेल. हे लक्ष्मी-नारायण सपूत लायक आहेत ना. मुलांना पाहून भगवान देखील म्हणतात हे खूप चांगले आहेत, सेवा करण्या लायक आहेत. कोणाच्या बाबतीत म्हणतील हे लायक नाहीत. फुकटचे आपले पद सुद्धा भ्रष्ट करतात. बाबा तर खरे सांगतात ना. बोलावतात देखील - ‘पतित-पावन या, येऊन सुखधामाचा मालक बनवा’. सुख घनेरे (भरभरून सुख) मागतात ना. तर बाबा म्हणतात काहीतरी सेवा करण्यालायक बना. जे माझे भक्त आहेत, त्यांना ही खुशखबर ऐकवा की आता शिवबाबा वारसा देत आहेत. ते म्हणतात - ‘माझी आठवण करा आणि पवित्र बना तर पवित्र दुनियेचे मालक बनाल’. या जुन्या दुनियेला आग लागत आहे. समोर एम ऑब्जेक्ट (लक्ष्मी-नारायणाचे चित्र) बघितल्याने खूप आनंद होतो - आपल्याला हे बनायचे आहे. पूर्ण दिवसभर जरी बुद्धीमध्ये हेच लक्षात राहिले तरी देखील कधीही कोणते शैतानी काम (वाईट काम) होणार नाही. मी हे बनत आहे तर मग असे उलटे काम कसे करू शकतो? परंतु कोणाच्या नशिबात नसेल तर अशा प्रकारच्या काही युक्त्या सुद्धा शोधून काढत नाहीत, आपली कमाई करत नाहीत. कमाई किती चांगली आहे. घरी बसून सर्वांनी आपली कमाई करायची आहे आणि इतरांना करवायची आहे. घरी बसल्या हे स्वदर्शनचक्र फिरवा, इतरांना देखील स्वदर्शनचक्रधारी बनवायचे आहे. जितक्याजणांना बनवाल तितके तुमचे पद उच्च होईल. या लक्ष्मी-नारायणासारखे बनू शकता, एम ऑब्जेक्टच हे आहे. सर्वजण हात देखील सूर्यवंशी बनण्यामध्येच वर करतात. ही चित्रे देखील प्रदर्शनीमध्ये खूप कामी येऊ शकतात. यावर समजावून सांगायचे आहे. आम्हाला उच्च ते उच्च बाबा जे ऐकवतात, तेच आम्ही ऐकवतो. भक्तिमार्गाच्या गोष्टी ऐकणे आम्ही पसंत करत नाही. ही चित्रे तर खूप चांगली चीज आहे. यावर तुम्ही खूप सेवा करू शकता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपली नाडी बघायची आहे की, मी कितपत लायक बनलो आहे? लायक बनून सेवेचे प्रमाण द्यायचे आहे. ज्ञानाच्या पराकाष्ठेने बंधनमुक्त व्हायचे आहे.
२) एका बाबांच्या मतावर चालून अवगुणांना समूळ बाहेर काढायचे आहे. दुःखदायी स्वभावाला सोडून सुखदायी बनायचे आहे. ज्ञान रत्नांचे दान करायचे आहे.
| वरदान:- | परीक्षांनी आणि समस्यांनी हिरमुसले होण्याऐवजी मनोरंजनाचा अनुभव करणारे सदा विजयी भव या पुरुषार्थी जीवनामध्ये ड्रामा अनुसार समस्या आणि परिस्थिती तर येणारच आहेत. जन्म घेताच पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवणे अर्थात परीक्षांचे आणि समस्यांचे आव्हान करणे. जेव्हा मार्ग निश्चित करायचा आहे आणि मार्गामध्ये देखावे नसतील, हे कसे होऊ शकते. परंतु त्या देखाव्यांना पार करण्या ऐवजी जर करेक्शन (दुरुस्त) करू लागता तेव्हा बाबांच्या आठवणीचे कनेक्शन लूज होते आणि मनोरंजना ऐवजी मनाने हिरमुसले होता त्यामुळे ‘वाह देखावा वाह’ चे गाणे गात पुढे चला अर्थात सदा विजयी भवचे वरदानी बना. |
| बोधवाक्य:- | मर्यादेमध्ये चालणे अर्थात मर्यादा पुरुषोत्तम बनणे. |
अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:- एकांतवासी अर्थात अनुभवी मूर्त. वर्तमान समयानुसार आता तुम्ही वानप्रस्थ अवस्थेच्या नजदीक आहात. वानप्रस्थी कधी बाहुल्यांचा खेळ करत नाहीत. वानप्रस्थी एकांतामध्ये आणि ध्यानामध्ये राहतात. तर तुम्ही सर्व बेहदचे वानप्रस्थी सदैव एकाच्या अंतामध्ये अर्थात निरंतर एकांतमध्ये सदैव स्मृति स्वरूप रहा. ही आहे बेहदच्या वानप्रस्थीची स्थिती.