मराठी मुरली · Brahma Kumaris

आजची मुरली · 18 सप्टेंबर, 2026

ओम शांती · BapDada · 18 सप्टेंबर, 2026

आजची मुरली — दररोज सकाळी नवी.

18
डाउनलोड PDF
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

18.09.2026
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो, पतित-पावन बाबांच्या श्रीमतावर तुम्ही पावन बनता म्हणून तुम्हाला पावन दुनियेची बादशाही मिळते, स्वतःच्या मतावर पावन बनणाऱ्यांना कोणतीही प्राप्ती होत नाही”
प्रश्न:- मुलांना सेवेमध्ये विशेष कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे?
उत्तर:- जेव्हा सेवेसाठी जाता तेव्हा कधीही छोट्या-मोठ्या गोष्टींच्या बाबतीत एकमेकांवर रुसू नका अर्थात नाराज होऊ नका. जर आपसामध्ये लूनपाणी होता (कटुता येते), बोलत नाही, तर नुकसान करण्यासाठी निमित्त बनता. बरीच मुले तर बाबांवरही रुसून बसतात. उलटी कामे करु लागतात. मग अशा मुलांची ॲडॉप्शनच (दत्तक प्रक्रियाच) रद्द होते.

ओम् शांती. जी मुले पावन बनतात त्यांना पतित-पावन बाबा बसून समजावून सांगत आहेत. पतित मुलेच पावन बनविणाऱ्या बाबांना हाका मारतात. ड्रामाचा प्लॅन देखील म्हणतात, रावण राज्य असल्यामुळे सर्व मनुष्य पतित आहेत. पतित त्यांना म्हटले जाते जे विकारामध्ये जातात. असे पुष्कळ आहेत जे विकारामध्ये जात नाहीत, ब्रह्मचारी राहतात. समजतात की, आम्ही निर्विकारी आहोत, जसे पादरी लोक आहेत, मुल्लेकाजी आहेत, बौद्ध देखील असतात जे पवित्र राहतात. त्यांना पवित्र कोणी बनवले? ते स्वतः बनले आहेत. दुनियेमध्ये बऱ्याच धर्मांमध्ये असे आहेत, जे विकारामध्ये जात नाहीत. परंतु त्यांना काही पतित-पावन बाबा पवित्र बनवत नाहीत ना त्यामुळे ते पावन दुनियेचे मालक बनू शकत नाहीत. पावन दुनियेमध्ये जाऊ शकत नाहीत. संन्यासी देखील ५ विकारांचा त्याग करतात. परंतु त्यांना संन्यास घेण्याची प्रेरणा कोणी दिली? परमपिता परमात्म्याने तर संन्यास करायला लावलेला नाही ना. पतित-पावन बाबांशिवाय यामध्ये सफलता मिळू शकत नाही. पावन दुनिया शांतीधाम मध्ये जाऊ शकत नाहीत. इथे तर बाबा येऊन तुम्हाला पावन बनण्याचे श्रीमत देतात. सतयुगाला म्हटले जाते - वाइसलेस दुनिया (निर्विकारी दुनिया). याच्यावरून हे सिद्ध होते की, सतयुगामध्ये येणारे जरूर पवित्र असतील. सतयुगामध्ये देखील पवित्र होते, शांतीधाम मध्ये देखील आत्मे पवित्र असतात. या रावणराज्यामध्येच सर्व पतित आहेत. पुनर्जन्म तर घ्यायचाच आहे. सतयुगामध्ये देखील पुनर्जन्म घेतात, परंतु विकारातून नाही. ती आहेच संपूर्ण निर्विकारी दुनिया. भले त्रेतामध्ये २ कला कमी होतात, परंतु त्यांना विकारी म्हणणार नाही. भगवान श्री राम, भगवती श्री सीता म्हणतात ना. १६ कला, मग १४ कला असे म्हटले जाते. चंद्राचे देखील असेच असते ना. तर यावरून सिद्ध होते की, जोपर्यंत पतित-पावन बाबा येऊन पावन बनवणार नाहीत, तोपर्यंत कोणीही मुक्ती-जीवनमुक्ती मध्ये जाऊ शकत नाहीत. बाबाच गाईड आहेत. या दुनियेमध्ये पवित्र तर बरेच आहेत. संन्याशांची देखील पवित्रतेमुळे मान्यता आहे. परंतु ते काही बाबांद्वारे पवित्र बनत नाहीत. आता तुम्ही मुले जाणता आपल्याला पावन बनविणारे निराकार परमपिता परमात्मा आहेत. ते तर स्वतःच आपल्या मतावर पवित्र बनतात. तुम्ही बाबांद्वारे पवित्र बनता. पतित-पावन बाबांद्वारेच पावन दुनियेचा वारसा मिळतो.

बाबा म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, काम-विकार तुमचा महाशत्रू आहे, याच्यावर विजय मिळवा, घसरतात देखील याच्यामुळेच. असे कधी लिहिणार नाहीत की, ‘मी क्रोध केला, तर तोंड काळे केले’. काम विकारासाठीच लिहितात - ‘मी तोंड काळे केले, घसरलो’. या गोष्टी तुम्ही मुलेच जाणता, दुनिया जाणत नाही. ड्रामा अनुसार ज्यांना येऊन ब्राह्मण बनायचे आहे, ते येत जातील. बाकी सत्संगांमध्ये तर कोणते एम ऑब्जेक्टच नसते. शिवानंद इत्यादींचे फॉलोअर्स तर भरपूर आहेत परंतु त्यांच्यामध्ये देखील फारच थोडे संन्यास घेत असतील. गृहस्थी तर घेतच नाहीत. बाकी घरदार सोडणारे फार थोडे निघतात. संन्यासी बनतात तरी देखील पुनर्जन्म घ्यावा लागतो. शिवानंदासाठी थोडेच असे म्हणू की, ज्योती ज्योत मध्ये विलीन झाली. तुम्ही तर समजता, सर्वांचे सद्गती दाता बाबाच आहेत, तेच गाईड आहेत. गाईड शिवाय कोणीही जाऊ शकत नाहीत. तुम्ही मुले जाणता आमचे बाबा, पिता देखील आहेत, नॉलेजफुल देखील आहेत. मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. सर्व मनुष्य सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज तर बीजामध्येच असेल ना. त्याना फादर तर सर्वजण म्हणतात ना! मुले तर जाणतात - आमचे गॉडफादर एकच आहेत त्यामुळे सर्वांसाठी दया देखील त्या गॉडफादरलाच येईल ना. किती प्रचंड लोकसंख्या आहे, कित्येक जीव-जंतू आहेत. तिथे मनुष्य फार थोडे असतात तसेच जीव-जंतू देखील थोडे असतात. सतयुगामध्ये अशी कीचडपट्टी (घाण) नसते. इथे तर अनेक प्रकारचे रोग इत्यादी किती उद्भवत असतात, ज्यांच्यासाठी मग नवीन औषधे विकसित केली जात असतात. ड्रामा प्लॅन अनुसार अनेक प्रकारच्या कला-कौशल्यांचे शोध लावत असतात. ती सर्व आहेत मानवी कौशल्ये. पारलौकिक बाबांचे कौशल्य कोणते आहे? बाबांसाठी म्हणतात - ‘हे पतित-पावन, येऊन आमच्या आत्म्याला पावन बनवा, शरीर देखील पावन बनवा. पतित-पावन, दुःख हर्ता, सुख कर्ता असे म्हणत त्या एकालाच हाक मारतात ना. आपल्या-आपल्या भाषेमध्ये आठवण जरूर करतात. मनुष्य मृत्युपंथावर असतात तेव्हा देखील भगवंताची आठवण करतात, समजतात, त्यांच्याशिवाय इतर कोणीही आधार देणार नाही; त्यामुळे म्हणतात - गॉडफादरची आठवण करा. ख्रिश्चन देखील म्हणतील - गॉडफादरची आठवण करा. असे म्हणणार नाहीत की, क्राईस्टची आठवण करा. जाणतात क्राईस्टच्याही वरती गॉड आहे. गॉड तर सर्वांचा एकच असेल ना. आता तुम्ही मुले जाणता मृत्यूलोक म्हणजे काय, आणि अमरलोक म्हणजे काय. दुनियेमध्ये तर हे कोणीही जाणत नाहीत. ते तर म्हणतात स्वर्ग-नरक सर्व इथेच आहे. काहीजण समजतात - सतयुग होते, देवतांचे राज्य होते. आतापर्यंत देखील किती नव-नवीन मंदिरे बांधत राहतात. तुम्ही मुले जाणता - एका बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही आम्हाला पावन बनवून घरी परत घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही आमच्या स्वीट होममध्ये जात आहोत. बाबा आम्हाला परत नेण्यासाठी लायक बनवत आहेत. हे लक्षात राहिले पाहिजे.

बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो, तुम्ही इतके-इतके जन्म घेतले आहेत. आता आपण येऊन शूद्रापासून ब्राह्मण बनलो आहोत. नंतर मग ब्राह्मणापासून देवता बनायचे आहे, स्वर्गामध्ये जायचे आहे. आता आहे - संगम. विराट रूपामध्ये ब्राह्मणांची चोटी (शेंडी) प्रसिद्ध आहे. हिंदूंसाठी देखील शेंडी ही एक खूण आहे. मनुष्य तर मनुष्यच आहेत. खालसा (शीख), मुस्लिम इत्यादींमध्ये इतके साम्य असते की तुम्हाला कळतही नाही की हे नक्की कोण आहेत? बाकी चिनी आहेत, आफ्रिकन आहेत, त्यांना ओळखणे शक्य असते. त्यांची चेहरेपट्टीच वेगळी आहे. ख्रिश्चनांचे भारताशी कनेक्शन आहे त्यामुळे हे शिकले आहेत. धर्मांची किती व्हरायटी आहे! त्यांचे रीती-रिवाज, पेहराव सर्वच वेगळे आहेत. आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे, आपण सतयुगाची स्थापना करत आहोत. तिथे दुसरा कोणताही धर्म नव्हता. आता तर व्हरायटी धर्मांचे सर्व इथे उपस्थित आहेत. आता अंतामध्ये अजून कोणता धर्म स्थापन करतील! हां, नवीन आत्मे पावन असतात त्यामुळे जी नवीन आत्मा येते तेव्हा त्या आत्म्याची थोडीफार महिमा होत राहील. विवेक सांगतो, जे शेवटी येतात त्यांना सुरुवातीला सुख जरूर मिळेल; महिमा होईल, शेवटी मग दुःख देखील होईल, त्यांचा आहेच मुळी एक जन्म. जसे तुम्ही सुखधाम मध्ये जास्त काळ राहता तसे ते (शेवटी पार्टमध्ये येणारे आत्मे) मग शांतीधाम मध्ये जास्त काळ राहतात. शेवटपर्यंत खूप वृद्धी होते. झाड मोठे आहे ना! यावेळी लोकसंख्येची किती वृद्धी होत आहे, त्यामुळे त्या वृद्धीला आळा घालण्यासाठी उपाययोजना शोधून काढत असतात. परंतु याने काहीही होऊ शकणार नाही. तुम्ही जाणता ड्रामा प्लॅन अनुसार वृद्धी तर जरूर होणार आहे. नवीन पाने (आत्मे) येत राहतील, मग शाखा-उपशाखा इत्यादी उत्पन्न होत राहतील. किती व्हरायटी आहे! आता मुले जाणतात आम्ही इतर कोणाच्याही कनेक्शन मध्ये नाही; बाबाच आम्हाला पावन बनवतात आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचा समाचार ऐकवतात. तुम्ही देखील त्यांनाच बोलावता - ‘हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा’; तर जरूर पतित दुनियेचा विनाश होईल. हा देखील हिशोब आहे. सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतात. कलियुगामध्ये किती खंडीभर मनुष्य आहेत. तुम्हा मुलांना याचे स्पष्टीकरण देखील द्यायचे आहे. बाबा आम्हाला शिकवतात की, या जुन्या दुनियेचा आता विनाश होणार आहे. नवीन दुनियेची स्थापना तर बाबाच करतील. भगवानुवाच - ‘मी, स्थापना करवितो. विनाश तर ड्रामा अनुसार होतो’. भारतामध्येच चित्रे देखील आहेत. ब्रह्माद्वारा ब्राह्मण, ब्रह्मामुखवंशावली बघा किती आहेत. ते (या दुनियेतील ब्राह्मण) आहेत कुखवंशावली ब्राह्मण. ते तर बाबांना जाणतही नाहीत. तुम्हाला आता हिंमत आली आहे. तुम्ही जाणता आता कलियुगाचा विनाश होऊन सतयुग येणार आहे. हा आहेच राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ. याच्यामध्ये जुन्या दुनियेची आहुती पडणार आहे. बाकी दुसरी कोणती आहुती तर नाहीये. बाबा म्हणतात - मी संपूर्ण सृष्टीवर हा राजस्व अश्वमेध यज्ञ रचला आहे. संपूर्ण पृथ्वीवर याची स्थापना करण्यात आली आहे. यज्ञ-कुंड असतात ना. याच्यामध्ये सारी दुनिया स्वाहा होईल. यज्ञ-कुंड बनवतात. ही सारी सृष्टी यज्ञ-कुंड बनलेली आहे. या यज्ञ-कुंडामध्ये काय होईल? सर्वजण याच्यामध्ये नष्ट होतील. हे कुंड पवित्र, नवीन होईल, आणि याच्यामध्ये मग देवता येतील. चोहो बाजूने समुद्र आहेच, सारी दुनिया नवी होईल. उलथा-पालथ तर खूप होईल. अशी कोणती जागा नसेल जी कोणाची नाही. सगळेच म्हणतात की, ही माझी आहे. आता माझी-माझी म्हणणारे सर्व मनुष्य नष्ट होतील. बाकी संपूर्ण दुनियेमध्ये मी ज्यांना पवित्र बनवितो तेवढेच थोडेसे राहतील. सर्वप्रथम आदि सनातन देवी-देवता धर्म असेल. त्यांचे यमुनेच्या तीरावर राज्य असेल. या सर्व गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये पक्क्या झाल्या पाहिजेत. आनंद झाला पाहिजे. मनुष्य बसून एकमेकांना कथा ऐकवत राहतात ना. ही देखील सत्य-नारायणाची कहाणी आहे, ही आहे बेहदची. तुमच्याच बुद्धीमध्ये या गोष्टी आहेत. त्यातूनही जे चांगले-चांगले सेवाभावी आहेत, त्यांच्या बुद्धीमध्ये धारणा होते, झोळी भरेल, दान देत राहतील. म्हणून म्हणतात - ‘धन दिये धन ना खुटे (धन कितीही दिले, धन कमी पडत नाही)’. दान दिल्यामुळे भरभराट होईल असे समजतात. तुमचे तर अविनाशी धन आहे. आता ‘धन दिये धन ना खुटे’, जितके दान द्याल, तितकाच आनंद होईल. ऐकत असताना काहीजणांची मान हलत राहील. कोणी तर वेड्या सारखे बसून राहतात. बाबा इतके चांगले-चांगले पॉइंट्स ऐकवत असतात, तर ऐकतेवेळी आपोआप मान हलेल.

इथे मुले येतातच खास बाबांकडून रिफ्रेश होण्यासाठी. बाबा बसून कसे युक्तीने पॉइंट्स सांगतात.

तुम्ही जाणता भारतामध्ये देवी-देवतांचे राज्य होते. भारताला स्वर्ग म्हटले जाते. आता तर नरक आहे. आता नरक बदलून स्वर्ग होईल, बाकी इतक्या सर्वांचा विनाश होईल. तुमच्यासाठी तर स्वर्ग जणू कालचीच गोष्ट आहे. काल राज्य करत होतो, दुसरे कोणीही असे म्हणू शकत नाही. म्हणतात देखील क्राईस्टच्या इतकी वर्षे आधी पॅराडाईज होता, तेव्हा दुसरा कोणता धर्म नव्हता. द्वापर पासून बाकीचे सर्व धर्म येतात. खूप सोपी गोष्ट आहे. परंतु याकडे मनुष्यांची बुद्धी नाहीये ज्यामुळे ते समजू शकतील. बोलावतात देखील - ‘पतित-पावन या’, तर जरूर येऊन पतितापासून पावन बनवतील ना! इथे काही कोणी पावन असू शकत नाही. सतयुगाला वाइसलेस वर्ल्ड म्हटले जाते. आता तर आहे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया). मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची. याच्यासाठी तुम्हाला किती मेहनत करावी लागते. तुम्ही जाणता आजच्या दिवसापर्यंत जे काही घडून गेले ते ड्रामा अनुसारच म्हणू. त्यासाठी आपण कोणालाही दोष देऊ शकत नाही. जे काही घडते, ते ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बाबा पुढच्यासाठी समजावून सांगतात की सेवेमध्ये अशी कर्मे करू नका; नाहीतर डिससर्विस (नुकसान) होते. बाबाच तर सांगतील ना. तुम्ही आपसामध्ये लूनपाणी झाला आहात. समजता की आपण लूनपाणी बनलो आहोत, एकमेकांना भेटल्यावर बोलत नाही; आणि मग कोणाला काही सांगितले तर एकदम चिडतात. शिवबाबांना विसरून जातात. म्हणून समजावून सांगितले जाते की नेहमी शिवबाबांची आठवण करा. बाबा मुलांना सतर्क करतात. अशा प्रकारची कामे केल्यामुळे दुर्गती होते. परंतु नशिबात नसेल तर समजतच नाहीत. शिवबाबा, ज्यांच्याकडून वारसा मिळतो, त्यांच्यावर सुद्धा रुसतात. ब्राह्मणीवर देखील रुसतात, यांच्यावर (ब्रह्मा बाबांवर) देखील रुसतात आणि मग कधीच मुरली क्लासला येत नाहीत. शिवबाबांवर तर कधी रुसायला नको ना. त्यांच्या मुरलीचा तर अभ्यास करायचा आहे. आठवण देखील त्यांची करायची आहे. बाबा म्हणतात ना - मुलांनो, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा तर सद्गती होईल. देह-अभिमानामध्ये आल्यामुळे देहधारींवर रुसून बसतात. वारसा तर आजोबांकडून मिळेल. बाबांचे बनतील तेव्हाच तर आजोबांचा वारसा मिळेल. बाबांनाच सोडचिठ्ठी द्याल तर वारसा कसा मिळेल? ब्राह्मण कुळातून बाहेर पडून शूद्र कुळामध्ये निघून गेले तर वारसाच संपला. दत्तक विधान रद्द झाले. तरीही समजत नाहीत. माया अशी आहे की एकदम वेडे बनवते. बाबांची तर किती प्रेमाने आठवण केली पाहिजे, परंतु आठवणच करत नाहीत. शिवबाबाचा मुलगा आहे, जे आम्हाला विश्वाचे मालक बनवतात. जरूर भारतातच जन्म घेतात. शिवजयंती साजरी करतात ना. जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होईल तेव्हा सर्वात पहिले शिवबाबाच येऊन स्वर्ग रचतील. तुम्ही जाणता की आम्हाला स्वर्गाची बादशाही मिळत आहे. बाबाच येऊन स्वर्गवासी बनवतात. नव्या दुनियेसाठी राजयोग शिकवत आहेत. तुम्ही जाऊन नवीन दुनियेमध्ये राज्य करता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) बुद्धीरुपी झोळीमध्ये अविनाशी ज्ञान-रत्न भरपूर भरून मग दान करायचे आहे. दान केल्यामुळेच आनंद होईल. ज्ञान-धन वाढत जाईल.

२) कधीही आपसामध्ये नाराज होऊन लूनपाणी व्हायचे नाही. अतिशय प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे आणि मुरली ऐकायची आहे. तवाई (वेडा) बनायचे नाही.

वरदान:- एका बाबांशी योग ठेवून सर्वांचा सहयोग प्राप्त करणारे सच्चे योगी आणि सहयोगी भव
जो जितका योगी असतो तितका त्याला सर्वांचा सहयोग अवश्य प्राप्त होतो. योगीचे कनेक्शन अथवा प्रेम बीजा सोबत (शिवबाबांसोबत) असल्यामुळे प्रेमाचे रिटर्न म्हणून सर्वांचा सहयोग प्राप्त होतो. तर बीजासोबत योग लावणारा, बीजाला स्नेहाचे पाणी देणारा, सर्व आत्म्यांद्वारे सहयोग रुपी फळ प्राप्त करतो; कारण बीजासोबत योग असल्याकारणाने संपूर्ण वृक्षासोबत कनेक्शन जोडले जाते.
बोधवाक्य:- जुन्या संस्कारांना ‘माझे’ म्हणणे अर्थात पुरुषार्थाला ढिले करणे (कमजोर करणे) आहे.

||| ओम शांती |||

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

एखाद्याला कधीही कोणत्याही प्रकारचा सहयोग हवा असेल तर दात्याच्या मुलांनो, त्यांना सहयोग द्या. परंतु सर्वांचे सहयोगी तेव्हाच बनाल, जेव्हा सर्वांचे स्नेही बनाल. स्नेही नसाल तर सर्वांचे सहयोगी देखील बनू शकणार नाही, त्यामुळे मनसा, वाचा, कर्मणा आणि संबंधामध्ये देखील सहयोगी आणि सफलतामूर्त बना.

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.