मराठी मुरली · Brahma Kumaris

आजची मुरली · 19 सप्टेंबर, 2026

ओम शांती · BapDada · 19 सप्टेंबर, 2026

आजची मुरली — दररोज सकाळी नवी.

18
डाउनलोड PDF
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

19.09.2026
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो, तुम्ही गॉडफादरली स्टुडंट आहात, तुम्हाला खरा-खरा रूप-बसंत बनून आपल्या मुखाद्वारे सदैव ज्ञान-रत्नेच काढायची आहेत”
प्रश्न:- बाबा मुलांना सुरजित करण्यासाठी (जागृत करण्यासाठी) कोणती संजीवनी बुटी देतात?
उत्तर:- ‘मनमनाभव’ अर्थात बाबांची आठवण करा. हा नशा राहावा की, परमात्म्याद्वारे आम्ही देवता बनण्यासाठी अथवा राज्यपद प्राप्त करण्यासाठी हे शिक्षण घेत आहोत. ही स्मृतीच संजीवनी बुटी आहे, जी सुरजीत करते (जागृत करते). त्यांची अवस्था कधीही कोमेजून जाऊ शकत नाही. ते नेहमी आपले निरीक्षण करून इतरांना देखील सावध करत राहतील.

ओम् शांती. हे कॉलेज आहे ना. जसे शाळेमध्ये विद्यार्थी बसतात तर ते समजतात की आपण टीचरच्या समोर बसलो आहोत. कोणती परीक्षा पास करण्यासाठी बसलो आहोत, ते देखील बुद्धीमध्ये आहे. सत्संग इत्यादी ठिकाणी जिथे वेद-शास्त्रे इत्यादी ऐकवतात, तिथे काही कोणते ध्येय नसते. ती शास्त्रे इत्यादी तुमच्या बुद्धीतून निघून गेली आहेत. तुम्ही जाणता की आपण भविष्य २१ जन्मांकरिता मनुष्यापासून देवता बनत आहोत. स्टुडंट घरी असेल अथवा कुठेही गेला, तरीही बुद्धीमध्ये हे असते ना की आपण अमकी परीक्षा पास करणार आहोत. तुम्ही मुले देखील क्लासमध्ये बसलेले असताना हे जाणता की आपण देवता बनत आहोत. तुम्ही देखील स्वतःला विद्यार्थी तर समजता ना. आपण रूह (आत्मा) आहोत, या शरीराद्वारे आम्ही शिकत आहोत. रुह जाणते की हे शरीर सोडून भविष्यामध्ये आपण नवीन शरीर घेणार, त्याला देवता म्हटले जाते. हे तर विकारी, पतित शरीर आहे, आपल्याला पुन्हा नवीन शरीर मिळेल. हे ज्ञान आपल्याला आता प्राप्त झाले आहे. मी आत्मा शिकत आहे, ज्ञान सागर शिकवत आहेत. इथे तुम्हाला गृहस्थ व्यवहाराची कोणतीही चिंता नाहीये. बुद्धीमध्ये हेच असते की आम्ही भविष्यासाठी मनुष्यापासून देवता बनत आहोत. देवता स्वर्गामध्ये राहतात; याचे वारंवार चिंतन केल्याने मुलांना खुशी होईल आणि पुरुषार्थ देखील करतील. मनसा-वाचा-कर्मणा पवित्र देखील राहतील. सर्वांना आनंदाचा संदेश सांगत राहतील. ब्रह्माकुमार तर भरपूर आहेत ना. सर्व स्टुडंट लाईफ मध्ये आहेत. असे नाही की काम-धंद्यामध्ये गेल्याने ते जीवन विसरून जाईल. जसे, हे हलवाई आहेत, ते समजतात ना की आपण स्टुडंट आहोत. स्टुडंटला कधी मिठाई बनवायची असते काय? इथे तर तुमची गोष्टच वेगळी आहे. शरीर निर्वाहासाठी धंदा देखील करायचा आहे. त्याचसोबत बुद्धीमध्ये हे लक्षात राहावे की आपण परमपिता परमात्म्याद्वारे शिकत आहोत. तुमच्या बुद्धीमध्ये असते की, यावेळी सारी दुनिया नरकवासी आहे. परंतु हे कोणीही समजत नाहीत की, आपण भारतवासीच नरकवासी आहोत, आपण भारतवासीच स्वर्गवासी होतो. तुम्हा मुलांना देखील पूर्ण दिवसभर हा नशा राहत नाही. वारंवार विसरायला होते. भले तुम्ही बी.के. आहात, टीचर्स आहात, ज्ञान देत आहात, मनुष्याला देवता, नरकवासीला स्वर्गवासी बनवत आहात, तरी देखील विसरायला होते. तुम्ही जाणता यावेळी सारी दुनिया आसुरी संप्रदाय आहे. आत्मा देखील पतित, तर शरीर देखील पतित आहे. आता तुम्हा मुलांना या विकारांचा तिरस्कार वाटतो. काम, क्रोध इत्यादी सर्व तिरस्कार निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. सर्वात जास्त तिरस्कार वाटणारी गोष्ट आहे - विकार. संन्याशांमध्ये देखील थोडा क्रोध असतो, परंतु जसे अन्न तसे मन, गृहस्थींकडचेच खातात. काहीजण अन्न खात नाहीत परंतु पैसे तर घेतात ना. पतितांचा त्यावर प्रभाव तर असतो ना.

पतिताचे अन्न पतितच बनवेल. तुम्ही पवित्रतेवर विशेष जोर देता. तुमचा हा प्रचार वाढत जाईल. सर्वांना वाटेल आपण पवित्र बनावे, या गोष्टी हृदयाला स्पर्श करतील, कारण पवित्र बनल्याशिवाय स्वर्गाचे मालक काही बनू शकणार नाही. हळूहळू सर्वांच्या लक्षात येत जाईल, जे स्वर्गवासी बनणार असतील तेच बनतील. म्हणतील आम्ही तर पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक जरूर बनणार. हे कल्याणकारी संगमयुग आहे जेव्हा की पतित दुनिया पावन बनत आहे, त्यामुळे याला पुरुषोत्तम युग म्हटले जाते. हे कल्याणकारी आहे. मनुष्य सृष्टीचे कल्याण होते. बाबा कल्याणकारी आहेत तर मुलांना देखील बनवतील. येऊन योग शिकवून मनुष्यापासून देवता बनवतात.

तुम्ही जाणता, हे आपले मुख्य विद्यालय आहे. इथे कोणालाही उलटे धंदे (लौकिक कामधंदे) नाहीत. बाहेर गेल्यावर कामधंद्याला लागतात तेव्हा ही आठवण राहत नाही की, आपण स्टुडंट आहोत. आपण नरकवासी पासून स्वर्गवासी बनत आहोत. हा विचार बुद्धीमध्ये तेव्हा चालेल जेव्हा फुरसत मिळेल, प्रयत्न करून वेळ काढला पाहिजे. बुद्धीमध्ये हे लक्षात राहिले पाहिजे की आपण तमोप्रधानापासून सतोप्रधान बनत आहोत. एका बाबांचीच आठवण करायची आहे. धंदा करताना देखील मोकळा वेळ मिळतो. प्रयत्न करून बुद्धीमध्ये ही स्मृती आणली पाहिजे की, आम्ही गॉडफादरली स्टुडंट आहोत. आजीविकेसाठी हा धंदा इत्यादी करतो. तो आहे मायावी धंदा, ही देखील तुमची आजीविका आहे, भविष्यासाठी खरी कमाई तर ही आहे, यामध्ये खूप चांगली बुद्धी पाहिजे. स्वतःला आत्मा समजून परमपिता परमात्म्याची आठवण करायची आहे. हे समजावून सांगायचे आहे की, आता आम्हा आत्म्यांना घरी जायचे आहे. बाबा आम्हाला नेण्यासाठी आले आहेत. संपूर्ण दिवस बुद्धीमध्ये विचार सागर मंथन चालले पाहिजे. जसे गाय रवंथ करत राहते, तसे मंथन करायचे आहे. मुलांना अविनाशी खजिना मिळत आहे. हे आहे आत्म्यांसाठी भोजन. हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपण परमपिता परमात्म्याद्वारे शिकत आहोत - देवता बनण्यासाठी अथवा राज्य पद प्राप्त करण्याकरिता, हे सतत लक्षात ठेवले पाहिजे. वारंवार विसरून जातात आणि मग आनंदाच्या ऐवजी कोमेजलेली अवस्था राहते. ही संजीवनी बुटी, सुरजित (जागृत) करण्यासाठी आहे, जी आपल्याकडेही ठेवायची आहे आणि इतरांनाही द्यायची आहे. शास्त्रांमध्ये तर लांबलचक कथा लिहिल्या आहेत. बाबा या सर्वांचे रहस्य बसून सांगतात. मनमनाभव अर्थात बाबांची आठवण करा तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. आपल्या मनाला विचारत रहा, चेक करत राहा, एकमेकांना सावध करत रहा. जर काही खिटपिट असेल तर बुद्धी त्यातच गुंतून राहते, आणि मग कोणाचेही बोलणे गोड वाटत नाही. मायेकडे बुद्धी गेल्याने मग त्याच चिंतेमध्ये मन व्यस्त राहते. मुलांना तर आनंद झाला पाहिजे. बाबांची आठवण करा, परंतु आपल्याच चिंतेमध्ये असतील तर ते औषध लागू पडणार नाही, दुःखी होत राहतील; असे करता कामा नये. स्टुडंट थोडेच शिक्षण सोडून जातात! तुम्ही मुले जाणता हे आपले शिक्षण भविष्याकरिता आहे, यामध्येच आपले कल्याण आहे. कामधंदा इत्यादी करत असताना देखील ७ दिवसांचा कोर्स केला पाहिजे. हे सृष्टीचे चक्र कसे फिरते हे ज्ञान देखील बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. संजीवनी बुटी लक्षात आहे. एकमेकांना आठवण करून दिली पाहिजे. पती-पत्नीने एकमेकांना आठवण करून देत राहावी. शिवबाबा ब्रह्मा द्वारा हे शिकवत आहेत. शिवबाबांच्या रथाचा शृंगार करत आहात, तर शिवबाबांची आठवण राहिली पाहिजे. संपूर्ण दिवस आठवण राहणे तर अवघड आहे. ती अवस्था तर शेवटी होणार आहे. जोपर्यंत कर्मातीत अवस्था होईल तोपर्यंत पैलवाना सोबत माया कुस्ती खेळत राहील. गायले देखील आहे - एकमेकांना सावधान करून उन्नतीला प्राप्त करा. ऑफिसर लोक नोकराला देखील सांगतात की, मला या गोष्टींची आठवण करून दे. तुम्ही देखील एकमेकांना आठवण करून द्या. ध्येय खूप उच्च आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण केल्याने पावन बनाल. हे बाबा काही नवीन गोष्ट सांगत नाहीत. लाखो-करोडो वेळा हे ज्ञान ऐकले आहे, पुन्हा हे ऐकाल. असे कोणत्याही सत्संगामध्ये सांगणारा नसेल की, आम्ही हे कल्प-कल्प ऐकले आहे. आता ऐकत आहोत, पुन्हा ऐकणार. कल्प-कल्प ऐकत आलो आहोत, असे कोणीही म्हणू शकणार नाही. बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्ही अर्धा कल्प भक्ती केली आहे. आता पुन्हा तुम्हाला ज्ञान मिळाले आहे, ज्याद्वारे सद्गती होते. बाबांची आठवण केल्याने पापे नष्ट होतील. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे ना. पुरुषार्थ करायचा आहे. जज अथवा मोठ्या व्यक्तीचा मुलगा जर एखादे उलटे काम करेल तर पित्याचे नाव बदनाम होईल ना. इथे तुम्ही देखील बाबांचे बनला आहात तर असे कोणतेही कर्म करायचे नाही, नाहीतर बाबांचे नाव खराब कराल. सद्गुरु के निंदक ठौर न पाये अर्थात उच्चपद प्राप्त करू शकणार नाहीत. ईश्वराची संतान आहात तर आसुरी कर्म करताना भीती वाटली पाहिजे. श्रीमतावर चालायचे असते. आपल्या मतावर चालल्याने धोका खाल, पद भ्रष्ट होईल. विचारू देखील शकता की, आम्ही तुमच्या मतावर ठीक चालत आहोत. बाबांचे सर्वात पहिले श्रीमत आहे - बाबांची आठवण करा. कोणतेही विकर्म करू नका. ‘बाबा, मी कोणते विकर्म करतो? जर तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा’. माहित असेल तर बाबा सांगतील की, तुझ्याकडून या-या चुका होतात, त्यांना विकर्म म्हटली जातात. सर्वात मोठे विकर्म आहे - काम विकाराचे, जास्ती भांडणे त्यावरून होतात. मुलांनी हिंमतीने यावर विचार केला पाहिजे. कुमारींचा एक गट तयार झाला पाहिजे, जो म्हणेल की आम्हाला लग्नच करायचे नाहीये. आता आहे कल्पाचे संगमयुग, ज्यामध्ये पुरुषोत्तम बनायचे आहे. याला लक्ष्मी-नारायणाला पुरुषोत्तम म्हटले जाते. विकारीला थोडेच पुरुषोत्तम म्हणणार. आता तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात. सर्वांना असे पुरुषोत्तम बनण्याचा अधिकार आहे. पुरुषोत्तम महिन्यावर तुम्ही किती सेवा करू शकता. खूप धमाका उडवला पाहिजे. हे पुरुषोत्तम युगच उत्तम युग आहे, जेव्हा की मनुष्य नरकवासी पासून स्वर्गवासी बनतात. ही तर कॉमन गोष्ट आहे. तुम्हा मुलांनी अतिशय चांगल्या रीतीने हे ज्ञान समजावून सांगायचे आहे. पुरुषोत्तम असतात सतयुगामध्ये. कलियुगामध्ये कोणीही उत्तम पुरुष असतच नाहीत. ही आहेच पतित दुनिया. तिथे तर पवित्रताच पवित्रता आहे. या सर्व गोष्टी बाबा मुलांना समजावून सांगतात, इतरांना सांगण्याकरिता. संधी पाहून समजावून सांगितले पाहिजे. समजता तुम्ही इथे बसला आहात, समजता की, आम्हाला निराकार बाबा परमपिता परमात्मा राजयोग शिकवत आहेत, आपण विद्यार्थी आहोत. या शिक्षणाद्वारे स्वर्गाचे देवी-देवता बनत आहोत. सर्व परीक्षांमध्ये मोठी परीक्षा आहे - हे राज्य पद प्राप्त करण्याची परीक्षा, जी परमात्म्याशिवाय इतर कोणीही शिकवू शकत नाही. बाबा स्वतः परोपकारी आहेत, स्वतः काही स्वर्गाचा मालक बनत नाहीत. स्वर्गाचा प्रिन्स श्रीकृष्णच बनतो. बाबा निष्काम सेवा करतात. म्हणतात - मी काही राजा बनत नाही. तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. या गोष्टी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत. असे पुष्कळ आहेत, भले इथे श्रीमंत आहेत, तिथे गरीब बनतील आणि जे आता गरीब आहेत, ते तिथे खूप श्रीमंत बनतात. विश्वाचा मालक बनणे - ही बेहदची गोष्ट आहे ना. गायले देखील गेले आहे - मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. स्वर्गाचा मालकच बनवतील ना. तुम्ही जाणता आपण सर्वांचे मालक बनत आहोत, तर किती अभिमान वाटला पाहिजे. आम्हाला शिकविणारे स्वयं परमपिता परमात्मा आहेत. आपण आता नरकवासी पासून देवता बनत आहोत, एवढे जरी लक्षात राहिले तरी आनंदाचा पारा चढलेला राहील. स्टुडंट लाईफ इज द बेस्ट (विद्यार्थी जीवन सर्वात उत्तम जीवन). पुरुषार्थ करून तर राजा-राणी बनले पाहिजे ना. असे सांगता कामा नये की, आम्ही राजा बनून नंतर मग रंक बनणार. असे सांगायचे नाही. विचारायचे आहे की, तुम्ही काय बनू इच्छिता? सर्व जण म्हणतील - आम्ही विश्वाचे मालक बनणार. ते तर भगवान बाबाच बनवू शकतात. म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल, किती सोपी गोष्ट आहे. कोणीही बनू शकतो. मुले कितीही गरीब असो, यामध्ये पैशाचा प्रश्नच नाही, म्हणून बाबांना ‘गरीब-निवाज’ म्हटले जाते.

बाबांची आठवण करून पापांचा घडा खाली करायचा आहे, जितकी जे मेहनत करतील ते प्राप्त करतील. शिडीच्या चित्रावरून तुम्ही बघता की किती उंच चढतात. ‘चढ़े तो चाखे राजाई रस, गिरे तो चकनाचूर’. विकारामध्ये गेला, सोडचिठ्ठी दिली, तर बाबा म्हणतात एकदम खाली कोसळतात (पतन होते). सपूत मुले तर पुरुषार्थ करून आपला जन्म हिऱ्यासमान बनवतील. मुलांना खूप पुरुषार्थ करायचा आहे. आता, जो करेल तो मिळवेल. सर्वांना म्हणतात मात-पित्याला फॉलो करा, आप समान बनवा. जितके-जितके दयाळू बनाल तितका तुमचाच फायदा आहे. वेळ वाया घालवायचा नाही, इतरांना युक्तीने सांगत राहायचे आहे. नाहीतर इतके उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. अखेरीला तुम्हाला खूप साक्षात्कार होतील मग त्यावेळी तुम्ही काहीही करू शकणार नाही. परीक्षेमध्ये नापास झाला तो झाला. असे होऊ नये की शेवटी पश्चाताप करावा लागेल. तेव्हा तर पुरुषार्थ करूही शकणार नाही, त्यामुळे जितके आपले आणि इतरांचे कल्याण करायचे आहे, तितके करा. आंधळ्यांची काठी बना. कल्प-कल्पांतर स्वर्गाची स्थापना केली आहे, जरूर करणार. ड्रामामध्ये नोंदलेले आहे, आता जो करेल तो प्राप्त करेल. बाबांची मुले लपून राहू शकत नाहीत. रूप-बसंत सारखे मुखातून रत्नेच निघावीत. धूती (कुटील) बनायचे नाही, दुसऱ्याचे नुकसान करायचे नाही. तुम्हाला कोणी उलटे-सुलटे काही ऐकवले तर समजा हा धुती आहे (कुटील आहे), त्यांच्यापासून जपून राहायचे आहे. बाबांकडून आपला बेहदचा वारसा घेण्यासाठी पूर्णतः तत्पर राहा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) आपले आणि इतरांचे कल्याण करायचे आहे. आंधळ्यांची काठी बनायचे आहे. कधी कोणी उलट्या गोष्टी ऐकवल्या तर त्यांच्यापासून सावध राहायचे आहे.

२) मनसा-वाचा-कर्मणा पवित्र बनायचे आहे. आपण स्टुडंट आहोत, भगवान आम्हाला देवता बनण्याचे शिक्षण देत आहेत, याच आनंदात राहायचे आहे.

वरदान:- ‘साथी’ आणि ‘साक्षीपणा’ या स्मृतीद्वारा सर्व बंधनांमधून मुक्त होणारे सर्व शक्ती संपन्न भव
सर्व शक्तींनी संपन्न बनून अधिनते पासून दूर राहण्यासाठी हे दोन शब्द लक्षात राहावेत - ‘साक्षी’ आणि दुसरा - ‘साथी’. यामुळे लवकरच बंधनमुक्त अवस्था होईल. सर्वशक्तिवान बाबांची साथ असेल तर सर्व शक्ती स्वतः प्राप्त होतात आणि साक्षी बनून चालल्याने कोणत्याही बंधनामध्ये अडकणार नाही. निमित्त मात्र या शरीरामध्ये राहून कर्तव्य केले आणि साक्षी झाले - आता याचा विशेष अभ्यास वाढवा.
बोधवाक्य:- अशुद्ध आणि शुद्ध दोन्हीचे युद्ध होत असेल, तर ब्राह्मणा ऐवजी क्षत्रिय आहात.

||| ओम शांती |||

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

तडफडणाऱ्या अथवा

भिकारी तहानलेल्या आत्म्यांची तहान भागविण्यासाठी स्वतःला अतींद्रिय सुख अथवा सर्व शक्तींनी भरपूर करा. जितका सर्व शक्तींचा खजिना, अतींद्रिय सुखाचा खजिना जमा होईल, तसतशी तुमची अवस्था स्थिर राहील आणि तुम्ही इतर आत्म्यांना देखील संपन्न बनवू शकाल. तुम्ही सर्वांची झोळी भरणारी दात्याची मुले आहात, तुम्हाला सर्वांना द्यायचे आहे. हे ‘देण्याचे’ दृश्य लवकरच तुमच्या समोर येईल.

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.