| 15.10.2026 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो, आत्मा आणि शरीर जे पतित आणि काळे बनले आहेत, त्यांना बाबांच्या आठवणीद्वारे पावन बनवा, कारण आता पावन दुनियेमध्ये जायचे आहे” | |
| प्रश्न:- | भगवान कोणत्या मुलांना भेटतो, बाबांनी कोणता हिशोब सांगितला आहे? |
| उत्तर:- | ज्यांनी सुरुवातीपासून भक्ती केली आहे त्यांनाच भगवान भेटतात. बाबांनी हा हिशोब सांगितला आहे की सर्वात आधी तुम्ही भक्ती करता, म्हणून तुम्हालाच सर्वात प्रथम भगवंताद्वारे ज्ञान मिळते, ज्यामुळे मग तुम्ही नवीन दुनियेमध्ये राज्य करता. बाबा म्हणतात - तुम्ही अर्धा कल्प माझी आठवण केली आहे, आता तुम्हाला भक्तीचे फळ देण्याकरिता मी आलो आहे. |
| गीत:- | मरना तेरी गली में… |
ओम् शांती. मुलांनी गाणे ऐकले. जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तर जाऊन दुसऱ्या पित्याकडे जन्म घेतात. तुम्ही जाणता आपण आत्मे आहोत. ती झाली शरीराची गोष्ट. एक शरीर सोडून मग दुसऱ्या पित्याकडे जातात. तुम्हाला किती साकार पिता मिळाले आहेत. वास्तविक तुम्ही आहात निराकारी पित्याची मुले. तुम्ही आत्मे, परमपिता परमात्म्याची संतान आहात, राहणारे देखील तिथलेच आहात, ज्याला निर्वाणधाम अथवा शांतीधाम म्हटले जाते. बाबा देखील तिथे राहतात. तुम्ही इथे येऊन लौकिक पित्याची मुले बनता, तेव्हा मग त्या पित्याला विसरून जाता. सतयुगामध्ये तुम्ही सुखी बनता, तर त्या पारलौकिक पित्याला विसरून जाता. सुखामध्ये त्या पित्याची तुम्ही आठवण करत नाही. दुःखामध्ये आठवण करता आणि आत्मा आठवण करते. जेव्हा लौकिक पित्याची आठवण करते तेव्हा बुद्धी शरीराकडे जाते. त्या पित्याची आठवण कराल तर म्हणाल - ‘ओ बाबा’, आहेत दोन्ही बाबाच. राईट शब्द ‘बाबा’ हाच आहे. ते देखील फादर, हे देखील फादर. आत्मा रुहानी पित्याची आठवण करते तर बुद्धी तिथे निघून जाते. हे बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. आता तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत, आम्हाला आपले बनविले आहे. बाबा म्हणतात - सर्वप्रथम मी तुम्हाला स्वर्गात पाठविले होते. तुम्ही अतिशय श्रीमंत होतात, आणि मग ८४ जन्म घेऊन ड्रामा प्लॅन अनुसार आता तुम्ही दुःखी झाला आहात. ड्रामा अनुसार ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. तुमची आत्मा आणि हे शरीररुपी वस्त्र सतोप्रधान होते, नंतर मग गोल्डन एज्ड पासून आत्मा सिल्व्हर एज्डमध्ये आली तर शरीर देखील सिल्व्हर मध्ये आले, त्यानंतर मग कॉपर एज्डमध्ये आले. आता तर तुमची आत्मा पूर्णपणे पतित बनली आहे, त्यामुळे शरीर देखील पतित आहे. जसे १४ कॅरेटचे सोने कोणीही पसंत करत नाही, ते काळे पडते. तुम्ही तर आता काळे आयर्न एज्ड बनला आहात. आता आत्मा आणि शरीर दोन्ही इतकी काळी (अशुद्ध) बनली आहेत तर ती मग पवित्र कशी बनणार. आत्मा पवित्र बनेल तेव्हाच तर शरीर देखील पवित्र मिळेल. ते कसे होणार? गंगा स्नान केल्याने होईल का? नाही, बोलावतातच मुळी की, ‘हे पतित-पावन या…’ हे आत्मा म्हणते; तर बुद्धी पारलौकिक पित्याकडे जाते. ‘ओ बाबा’, बघा ‘बाबा’ शब्दच किती गोड आहे. भारतामध्येच ‘बाबा-बाबा’ असे म्हणतात. आता तुम्ही आत्म-अभिमानी बनून बाबांचे बनला आहात. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला स्वर्गामध्ये पाठवले होते, तुम्ही नवीन शरीर धारण केले होते. आता तुम्ही काय बनले आहात.’ या गोष्टी नेहमी लक्षात राहिल्या पाहिजेत. बाबांचीच आठवण केली पाहिजे. आठवण सर्वजण करतात ना - ‘ओ बाबा, आम्ही आत्मे पतित बनलो आहोत, आता या, येऊन पावन बनवा’. ड्रामामध्ये हा देखील पार्ट आहे, तेव्हाच तर बोलावतात. ड्रामाप्लॅन अनुसार येतील देखील तेव्हाच जेव्हा दुनिया जुन्या पासून नवीन बनते. तर जरूर संगमावरच येतील. तुम्हा मुलांना निश्चय आहे - बिलवेड मोस्ट बाबा आहेत. म्हणतात देखील - ‘स्वीट, स्वीटेस्ट…’ आता स्वीट कोण आहे? लौकिक नात्यामध्ये पहिले वडील आहेत, जे जन्म देतात. नंतर मग आहेत टीचर. टीचर कडून शिकून तुम्ही पद प्राप्त करता. ‘नॉलेज इज सोर्स ऑफ इन्कम’ म्हटले जाते ना. ज्ञान आहे - नॉलेज आणि योग आहे - आठवण. तर बेहद विषयी कोणालाच ठाऊक नाहीये. चित्रांमध्ये क्लिअर दाखवले देखील आहे की, ब्रह्मा द्वारा शिव-बाबा स्थापना करवून घेतात. श्रीकृष्ण कसा राजयोग शिकवेल. राजयोग शिकवतातच मुळी सतयुगासाठी. तर जरूर संगमावरच बाबांनी शिकवले असेल. सतयुगाची स्थापना करणारे आहेत - बाबा. ब्रह्मा द्वारा करवून घेतात, करनकरावनहार आहेत ना. ते लोक (दुनियावाले) तर ‘त्रिमूर्ती ब्रह्मा’ असे म्हणतात. परंतु उच्च ते उच्च शिव आहेत ना. ते साकार आहेत, हे निराकार आहेत. सृष्टी देखील हीच आहे. या सृष्टीचेच चक्र फिरते, रिपीट होत राहते. सूक्ष्मवतनच्या सृष्टीचे चक्र गायले जात नाही. जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होतो. गातात देखील सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग. मध्यभागी जरूर संगमयुग पाहिजे. नाहीतर कलियुगाला सतयुग कोण बनवेल! नरकवासियांना स्वर्गवासी बनविण्याकरिता बाबा संगमावरच येतात. जितकी जुनी दुनिया तितके दुःख जास्त. जितकी आत्मा तमोप्रधान बनत जाते, तितकीच दुःखी होते. देवता आहेत सतोप्रधान. ही तर हायेस्ट ऑथॉरिटी गॉडफादरली गव्हर्मेंट आहे. सोबत धर्मराज देखील आहे. बाबा म्हणतात - तुम्ही शिवालयामध्ये राहणारे होतात, आता हे आहे वेश्यालय. तुम्ही पावन होतात आता पतित बनले आहात, तर म्हणता - ‘आम्ही तर पापी आहोत’. आत्मा म्हणते - ‘मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाही.’ कोणत्याही देवतांच्या मंदिरामध्ये जातात तर त्यांच्या समोर असे म्हणतात. खरेतर हे म्हटले पाहिजे बाबांसमोर; परंतु त्यांना सोडून ब्रदर्सना (भावांना) म्हणू लागतात, हे देवता भाऊ झाले ना. भावांकडून तर काहीच मिळत नाही. भावांची पूजा करता-करता खाली घसरत आले आहेत. आता तुम्ही मुले जाणता - बाबा आलेले आहेत, त्यांच्याकडून आपल्याला वारसा मिळतो. बाकी मनुष्य तर बाबांना जाणतच नाहीत. सर्वव्यापी म्हणतात. कोणी मग म्हणतात, अखंड ज्योती तत्त्व आहे. कोणी म्हणतात, ते नावारूपापासून न्यारे आहेत. अरे तुम्ही म्हणता अखंड ज्योती स्वरूप आहेत, मग नावारूपापासून न्यारे कसे काय म्हणता? बाबांना न जाणल्याकारणानेच पतित बनले आहेत. तमोप्रधान देखील बनायचेच आहे. मग जेव्हा बाबा येतील तेव्हाच सर्वांना पावन बनवतील. निराकारी दुनियेमध्ये सर्व आत्मे बाबांसोबत राहतात. मग इथे येऊन सतो, रजो, तमोचा पार्ट बजावतात. आत्माच बाबांची आठवण करते. बाबा येतात देखील, आणि म्हणतात - ‘ब्रह्मातनाचा आधार घेतो, हा आहे भाग्यशाली रथ’. आत्म्याशिवाय रथ थोडाच असतो. म्हणतात की, ‘भागीरथाने गंगा आणली’. आता अशी गोष्ट तर होऊ शकत नाही. परंतु काहीच समजत नाहीत की, आपण काय बोलत आहोत!
आता तुम्हा मुलांना समजाविले आहे - ही आहे ज्ञान-वर्षा. यामुळे काय होते? पतितापासून पावन बनतात. गंगा-यमुना तर सतयुगामध्ये देखील असतात. म्हणतात की, श्रीकृष्ण यमुनेच्या काठावर खेळ खेळतात; परंतु तसे काहीही नाहीये. तो तर सतयुगाचा प्रिन्स आहे, त्याचे अतिशय काळजीपूर्वक संगोपन केले जाते; कारण ते फूल आहेत ना. फुले किती मनमोहक आणि सुंदर असतात. फुलांकडून सर्वजण येऊन सुगंध घेतात. काट्यांकडून थोडाच सुगंध घेतील. आता तर आहेच काट्यांची दुनिया. बाबा येऊन जंगलाला गार्डन ऑफ फ्लॉवर्स बनवतात, कारण त्यांचे नाव बाबुलनाथ देखील ठेवले आहे. काट्यांपासून फूल बनवतात, म्हणून महिमा गातात - ‘काटों को फूल बनाने वाला बाबा’. आता तुम्हा मुलांचे बाबांवर किती प्रेम असले पाहिजे. आता तुम्ही जाणता, आपण बेहदच्या बाबांचे बनलो आहोत. आता तुमचा संबंध त्यांच्यासोबत देखील आहे, तर लौकिक पित्यासोबत देखील आहे. पारलौकिक पित्याची आठवण केल्याने तुम्ही पावन बनाल. आत्मा जाणते, ते आमचे लौकिक बाबा आहेत आणि हे पारलौकिक बाबा आहेत. भक्तिमार्गामध्ये देखील आत्मा जाणते, ते आमचे लौकिक पिता आहेत आणि हे गॉड फादर आहेत. अविनाशी बाबांची आठवण करतात. ते बाबा कधी येऊन हेवन स्थापन करतात, हे कोणालाच माहिती नाही. बाबा येतातच पतितांना पावन बनविण्याकरिता. तर जरूर संगमावरच येतील. शास्त्रांमध्ये तर कल्पाची आयु लाखो वर्षे लिहून मनुष्यांना एकदम घोर अंधारामध्ये टाकले आहे. म्हणतात की, जे खूप भक्ती करतात त्यांना भगवान भेटतो. तर सर्वात जास्त भक्ती करणाऱ्यांना जरूर आधी भेटला पाहिजे. बाबांनी हिशोब देखील सांगितला आहे. सर्वात अगोदर तुम्ही भक्ती करता, सर्वात पहिले तुम्हालाच भगवंताद्वारे ज्ञान मिळाले पाहिजे, ज्यामुळे मग तुम्हीच नवीन दुनियेमध्ये राज्य कराल. बेहदचे बाबा तुम्हा मुलांना ज्ञान देत आहेत, यामध्ये त्रासाची कोणतीच गोष्ट नाही. बाबा म्हणतात - तुम्ही अर्धा कल्प आठवण केली आहे. सुखामध्ये तर कोणी आठवणच करत नाहीत. अंताला जेव्हा दुःखी होता, तेव्हा मी येऊन तुम्हाला सुखी बनवतो. आता तुम्ही खूप मोठी हस्ती बनत आहात. चीफ मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर इत्यादींचे बंगले किती फर्स्ट क्लास असतात. सारे फर्निचर एकदम फर्स्ट क्लास असते. तुम्ही तर किती मोठी हस्ती (देवता) बनता. दैवी गुणवाले देवता स्वर्गाचे मालक बनता. तिथे तुमच्यासाठी महाल देखील हिऱ्यामाणकांचे असतात. तिथे तुमचे फर्निचर सुवर्णजडीत फर्स्ट क्लास असेल.
हा आहे - ‘रुद्र ज्ञान यज्ञ’. ‘शिव’ला रुद्र देखील म्हणतात. जेव्हा भक्ती पूर्ण होते तर भगवान रुद्र-यज्ञ रचतात. सतयुगामध्ये यज्ञ अथवा भक्तीची गोष्टच नाही. यावेळीच बाबा हा अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ रचतात, ज्याचे नंतर मग गायन होत राहते. भक्ती काही कायमचीच चालत राहणार नाही. भक्ती आणि ज्ञान; भक्ती आहे - रात्र, ज्ञान आहे - दिवस. बाबा येऊन दिवस बनवतात, तर मुलांचे देखील बाबांवर किती प्रेम असले पाहिजे. बाबा आम्हाला विश्वाचा मालक बनवत आहेत. मोस्ट बिलवेड बाबा आहेत ना. त्यांच्यापेक्षा गोड दुसरी कोणती वस्तू असूच शकत नाही. अर्ध्याकल्पापासून आठवण करत आले आहेत - ‘बाबा, येऊन आमचे दुःख हरण करा’. आता बाबा आले आहेत, समजावून सांगत आहेत - मुलांनो, तुम्हाला आपल्या गृहस्थ व्यवहारामध्येच राहायचे आहे. इथे बाबांकडे किती दिवस बसून राहाल. एकत्र तर परमधाममध्येच राहू शकतो, इथे काही राहू शकत नाही. इथे तर नॉलेज शिकायचे आहे. नॉलेज शिकणारे फार थोडे असतात. लाऊडस्पीकर वर कधी शिकवले जाते का? टीचर प्रश्न कसे विचारतील? लाऊडस्पीकरवर प्रतिसाद (उत्तरे) कसा देऊ शकाल? म्हणून थोड्या-थोड्या स्टुडंट्सना शिकवतात. कॉलेजेस तर भरपूर असतात, मग सर्वांची परीक्षा होते. रिझल्ट निघतो. इथे तर एक बाबाच शिकवतात. हे देखील समजावून सांगायचे आहे की, दोन पिता आहेत - लौकिक आणि पारलौकिक. दुःखामध्ये त्या पारलौकिक पित्याची आठवण करतात. आता ते बाबा आलेले आहेत. महाभारत लढाई देखील समोर उभी आहे. ते समजतात की, महाभारताच्या लढाईमध्ये श्रीकृष्ण आले, असे तर होऊ शकत नाही. परंतु ते तर आहेत निराकार, हे आहेत साकार. निराकार बाबा सर्व आत्म्यांचे पिता आहेत. आहेत दोघेही मोस्ट बिलवेड. श्रीकृष्ण देखील विश्वाचा मालक आहे ना. आता तुम्हीच ठरवा की, कोण अधिक प्रिय आहे? शिवबाबाच असे लायक बनवतात ना. श्रीकृष्ण काय करतात? बाबाच तर त्यांना असे बनवतात ना. तर जास्त गायन देखील त्या बाबांचे झाले पाहिजे ना. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही सर्व पार्वती आहात. हे ‘शिव अमरनाथ’ तुम्हाला कथा ऐकवत आहेत. तुम्हीच सर्व अर्जुन आहात, तुम्हीच सर्व द्रौपदी आहात. या विशश दुनियेला (विकारी दुनियेला) रावण राज्य म्हटले जाते. ते आहे वाइसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया). विकाराची तर गोष्टच नाही. निराकार बाबा, विकारी दुनिया रचतील तरी का? विकारामध्येच दुःख आहे. संन्याशांचा आहेच मुळी हठयोग, निवृत्ती मार्ग. कर्म संन्यास तर कधी असतच नाही. तो तेव्हा होईल जेव्हा आत्मा शरीरापासून वेगळी होईल. गर्भ-जेलमध्ये मग कर्मांचा हिशोब सुरू होतो. बाकी ‘कर्म संन्यास’ म्हणणे चुकीचे आहे. हठयोग इत्यादी खूप शिकतात, गुहेमध्ये जाऊन बसतात, आगीवरून देखील चालत जातात. रिद्धी-सिद्धी देखील मोठ्या प्रमाणात आहे. जादूने बऱ्याच वस्तू देखील काढून दाखवतात. भगवंताला देखील जादूगर, रत्नागर, सौदागर म्हणतात; परंतु त्यामुळे काही कोणाला गति-सद्गती मिळू शकत नाही. ते तर एकच सच्चे सद्गुरू येऊन सर्वांची गति सद्गती करतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) काट्यांपासून फूल बनविणारे मोस्ट बिलवेड (अति प्रिय) एक बाबाच आहेत, त्यांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे. सुगंधित पवित्र फूल बनून सर्वांना सुख द्यायचे आहे.
२) इथे नॉलेज हे सोर्स ऑफ इन्कम आहे, याद्वारे तुम्ही २१ जन्मांसाठी खूप मोठी हस्ती बनता, त्यामुळे तुम्ही याचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि इतरांनाही शिकवायचे आहे. आत्म-अभिमानी बनायचे आहे.
| वरदान:- |
जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही आकारी आणि निराकारी स्थितीच्या अभ्यासाद्वारे साक्षात्कारमूर्त भव ब्रह्मा बाबा जसे साकार रूपामध्ये इतकी मोठी जबाबदारी सांभाळत असताना देखील आकारी आणि निराकारी स्थितीचा अनुभव करवत राहिले, असे फॉलो फादर करा. साकार रूपामध्ये फरिश्तेपणाची अनुभूती करवा. कोणी कीतीही अशांत अथवा बेचैन घाबरलेला तुमच्या समोर येईल परंतु तुमची एक दृष्टी, वृत्ती आणि स्मृतीची शक्ती त्यांना पूर्णपणे शांत करेल. व्यक्त भावामध्ये येतील आणि अव्यक्त स्थितीचा अनुभव करून जातील, तेव्हा म्हणणार साक्षात्कारमूर्त. |
| बोधवाक्य:- | जी मुले खरी दयाळू आहेत त्यांना देह अथवा देह-अभिमानाचे आकर्षण असू शकत नाही. |
हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
ज्ञानी तू आत्मा सदैव प्रत्येकासाठी मास्टर प्रेमाचा सागर असतात. त्यांच्याकडे प्रेमाशिवाय दुसरे काहीही नसते. कोणीही आला तरी त्याला प्रेमच देतील. आजकाल धना पेक्षा प्रेमाची जास्त गरज आहे. प्रेमाच्या शक्तीने शत्रूला देखील मित्र बनवू शकता. अपकारींवर देखील उपकार करू शकता.