| 16.10.2026 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो, या जुन्या दुनियेपासून बेहदचे वैरागी बना, कारण बाबा तुमच्यासाठी स्वर्गरुपी नवीन घर बनवत आहेत” | |
| प्रश्न:- | या अविनाशी रुद्र यज्ञामध्ये कोण-कोणत्या गोष्टींमुळे विघ्ने येतात? |
| उत्तर:- | हा शिवबाबाने रचलेला अविनाशी रुद्र-यज्ञ आहे, याच्यामध्ये तुम्ही मनुष्यापासून देवता बनण्यासाठी पवित्र बनता, भक्ती इत्यादी सोडता या कारणाने विघ्ने येतात. लोक म्हणतात - शांती स्थापित व्हावी, विनाश होता कामा नये आणि बाबांनी हा रुद्र ज्ञान यज्ञ, जुन्या दुनियेच्या विनाशासाठीच रचला आहे. याच्यानंतरच शांतीची दुनिया येईल. |
ओम् शांती. ‘ओम् शांती’चा अर्थ बाबांनी मुलांना समजावून सांगितला आहे. मज आत्म्याचा स्वधर्म आहे - शांती. शांतीधाममध्ये जाण्यासाठी काही पुरुषार्थ करावा लागत नाही. आत्मा स्वतः शांत स्वरूप, शांतीधाममध्ये राहणारी आहे. इथे थोड्या वेळासाठी शांत राहू शकतात. आत्मा म्हणते - माझ्या कर्मेंद्रियांचा बाजा आता थकला आहे. मी माझ्या स्वधर्मामध्ये स्थित होतो, शरीरापासून स्वतःला अलिप्त करतो. परंतु कर्म तर करायचेच आहे.
शांतीमध्ये किती वेळ बसून राहणार? आत्मा म्हणते - मी शांती-देशाची रहिवासी आहे. फक्त इथे शरीरामध्ये आल्यामुळे टॉकी (बोलणारी) बनली आहे. मी आत्मा आहे, माझे शरीर आहे. आत्माच पतित आणि पावन बनते. आत्मा पतित बनते तेव्हा मग शरीर देखील पतित बनते कारण सतयुगामध्ये ५ तत्वे देखील सतोप्रधान असतात. इथे ५ तत्वे तमोप्रधान आहेत. सोन्यामध्ये अशुद्धता पडल्यामुळे सोने पतित बनते. मग त्याला स्वच्छ करण्यासाठी आगीत टाकले जाते. त्याला योग-अग्नी म्हटले जात नाही. योग एक अग्नी देखील आहे, ज्याच्यामुळे पापे जळून जातात. आत्म्याला पतितापासून पावन बनवणारे परमात्मा आहेत. नाव एकाचेच आहे. बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. ड्रामा प्लॅन अनुसार सर्वांना पतित तमोप्रधान बनायचेच असते. हे झाड आहे ना. त्या झाडाचे (भौतिक झाडाचे) बीज खाली असते, याचे बीज वरती आहे. बाबांना जेव्हा बोलवतात तेव्हा बुद्धी वरती निघून जाते. ज्यांच्याकडून तुम्ही वारसा घेत आहात ते आता खाली आलेले आहेत. म्हणतात - मला यावे लागते. माझे हे जे मनुष्य सृष्टीचे झाड आहे, हे अनेक व्हरायटी धर्मांचे आहे. ते आता तमोप्रधान पतित जडजडीभूत अवस्थेत पोहोचले आहे.
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत - सतयुगामध्ये सर्वात पहिले असतात - देवी-देवता. आता कलियुगामध्ये आहेत - असुर. बाकी असुर आणि देवतांचे काही युद्ध झालेले नाहीये. तुम्ही या ५ आसुरी विकारांवर योगबलाद्वारे विजय प्राप्त करता. बाकी कोणत्या हिंसक युद्धाची गोष्ट नाहीये. तुम्ही कोणत्याही प्रकारची हिंसा करत नाही. तुम्ही कोणाला हात देखील लावणार नाही. तुम्ही डबल अहिंसक आहात. काम-कटारी चालवणे, हे तर सर्वात मोठे पाप आहे. बाबा म्हणतात - ही काम-कटारी आदि-मध्य-अंत दुःखच देते. विकारामध्ये जायचे नाही. देवतांच्या पुढे महिमा गातात - ‘तुम्ही सर्व गुणसंपन्न, संपूर्ण निर्विकारी’. आत्मा या कर्मेंद्रियांच्या द्वारे जाणते. म्हणतात की, आम्ही पतित बनलो आहोत, तर जरूर कधीतरी पावन होतो, ज्यामुळे म्हणतात - आम्ही पतित बनलो आहोत. बोलावतात देखील - ‘हे पतित पावन या’. जेव्हा पावन असतात तेव्हा त्यांना कोणी बोलवत सुद्धा नाही. त्याला स्वर्ग म्हटले जाते. इथे तर साधू संत इत्यादी किती तल्लीन होऊन गात असतात - ‘पतित पावन सीताराम…’ कुठेही जा, हेच गात असतात. बाबा म्हणतात की, सारी दुनिया पतित आहे. रावण राज्य आहे ना, रावणाला जाळतात. परंतु त्याचे राज्य केव्हापासून सुरु झाले हे मात्र कोणालाच माहीत नाहीये. प्रचंड प्रमाणात भक्तीची सामुग्री आहे. कोणी काय करतात, कोणी काय करतात. संन्यासी देखील कित्येक प्रकारचे योग शिकवतात. खरेतर ‘योग’ कशाला म्हटले जाते, हेच कोणाला माहीत नाहीये. यात देखील कोणाचा दोष नाहीये. हा ड्रामा पूर्वनियोजित आहे. जोपर्यंत मी येत नही, यांना स्वतःचा पार्ट बजावायचा आहे. ज्ञान आणि भक्ती; ज्ञान आहे - दिवस, सतयुग-त्रेता आणि भक्ती आहे - रात्र, द्वापर-कलियुग त्यानंतर आहे वैराग्य. जुन्या दुनियेपासून वैराग्य. हे बेहदचे वैराग्य आहे. त्यांचे आहे हदचे वैराग्य. तुम्ही जाणता की ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. नवीन घर बनल्यावर जुन्या घराविषयी विरक्ती निर्माण होते.
बेहदचे बाबा बघा कसे आहेत! तुम्हाला स्वर्गरुपी घर बनवून देत आहेत. स्वर्ग आहे - नवीन दुनिया. नरक आहे - जुनी दुनिया. नवी तीच जुनी ती पुन्हा नवीन बनते. नव्या दुनियेचे आयुष्य किती आहे हे कोणालाच ठाऊक नाही आहे. आता जुन्या दुनियेमध्ये राहून आम्ही नवीन बनवत आहोत. जुन्या कब्रस्तानावर आम्ही परिस्तान बनवत आहोत. हाच यमुनेचा काठ असेल, याच्यावर महाल बनतील. हीच दिल्ली यमुना नदीवर असेल. बाकी हे जे दाखवतात - पांडवांचे किल्ले होते हे, सर्व ड्रामा प्लॅन अनुसार जरूर तरीही बनतील. जसे तुम्ही यज्ञ, तप, दान इत्यादी केले असेल, ते सर्व पुन्हा तसेच करावे लागेल. सुरुवातीला शिवची भक्ती करता. त्यांचे फर्स्ट क्लास मंदिर बांधता, त्याला अव्यभिचारी भक्ती म्हटले जाते. आता तुम्ही ज्ञानमार्गामध्ये आहात. हे आहे अव्यभिचारी ज्ञान. एका शिवबाबांकडूनच तुम्ही ऐकता, ज्याची तुम्ही सुरुवातीला भक्ती केली आहे, त्यावेळी दुसरे कोणतेही धर्म नसतात. त्यावेळी तुम्ही खूप सुखात असता. देवता धर्म खूप सुख देणारा आहे. नाव घेतल्यानेच तोंड गोड होते. तुम्ही एका बाबांकडूनच ज्ञान ऐकता. बाबा म्हणतात - इतर कोणाकडून तुम्ही ऐकू नका. हे तुमचे अव्यभिचारी ज्ञान आहे. तुम्ही बेहदच्या बाबांचे बनले आहात. बाबांकडूनच नंबरवार पुरुषार्था अनुसार वारसा मिळेल. बाबा थोड्या काळासाठी साकारमध्ये आलेले आहेत. म्हणतात - मला तुम्हा मुलांनाच ज्ञान द्यायचे आहे. हे माझे स्थायी (कायमस्वरूपी) शरीर नाहीये, मी यांच्यामध्ये प्रवेश करतो. शिवजयंती नंतर लगेचच गीता जयंती येते. त्याच्यापासून ज्ञान सुरू करतात. ही रुहानी विद्या सुप्रीम रुह देत आहेत. कोणत्या पाण्याची गोष्ट नाहीये. पाण्याला थोडेच ज्ञान म्हणणार. ज्ञानाद्वारेच पतितापासून पावन बनणार. पाण्याने थोडेच तुम्ही पावन बनणार. नद्या तर पूर्ण दुनियेमध्ये आहेतच. हे तर ज्ञानसागर बाबा येतात, यांच्यामध्ये (ब्रह्माबाबांमध्ये) प्रवेश करून नॉलेज देतात. इथे (या दुनियेमध्ये) गोमुखावर जातात. खरेतर गोमुख तर तुम्ही चैतन्यामध्ये आहात. तुमच्या मुखातून ज्ञान अमृत निघते. गाईपासून तर दूध मिळते. पाण्याची तर गोष्टच नाही. हे सर्व काही बाबा बसून समजावून सांगतात, जे सर्वांचे सद्गती दाता आहेत. आता सर्व दुर्गतीमध्ये पडलेले आहेत. पूर्वी तुम्ही हे जाणत नव्हता की, रावणाला कशासाठी जाळतात. आता तुम्ही जाणता, बेहदचा दसरा होणार आहे. ही सर्व दुनिया एक बेट आहे. रावणाचे राज्य साऱ्या सृष्टीवर आहे. जे शास्त्रांमध्ये आहे - वानरसेना होती, वानरांनी पूल बनवला… या सर्व दंतकथा आहेत. भक्ती इत्यादी चालते, सुरुवातीला असते अव्यभिचारी भक्ती, नंतर मग व्यभिचारी भक्ती सुरू होते. दसरा, रक्षाबंधन सर्व आत्ताचेच सण आहेत. शिवजयंतीच्या नंतर असते श्रीकृष्ण जयंती. आता कृष्णपुरी स्थापन होत आहे. आज आहे कंसपुरी, उद्या कृष्णपुरी बनेल. आसुरी संप्रदायाला कंस म्हटले जाते. पांडव आणि कौरवांचे युद्ध काही नाहीये. श्रीकृष्णाचा जन्म सतयुगामध्ये आहे, तो आहे पहिला राजकुमार. शाळेत शिकण्यासाठी जातो. जेव्हा मोठा होतो तेव्हा राज्य-सिंहासनावर आरूढ होतो. महिमा सारी शिवबाबांची आहे, जे पतितांना पावन बनविणारे आहेत. बाकी ही रासलीला इत्यादी हे तर आपसात आनंद साजरा करत असतील. बाकी श्रीकृष्ण कोणाला ज्ञान ऐकवेल, हे कसे बरे होऊ शकते? बाबा म्हणतात - कोणालाही ‘भक्ती करू नका’, अशी मनाई करायची नाही. आपोआप सुटते. भक्ती सोडतात, विकार सोडतात याच्यावरूनच गदारोळ माजतो. बाबांनी सांगितले आहे की, ‘मी रुद्र-यज्ञ रचतो, याच्यामध्ये आसुरी संप्रदायाची विघ्ने पडतात’. हा आहे शिवबाबांचा बेहदचा यज्ञ, ज्याद्वारे मनुष्यापासून देवता बनतात. गायले गेले आहे - ज्ञान-यज्ञामधून विनाश ज्वाळा प्रकट झाली. जेव्हा जुन्या दुनियेचा विनाश होईल तेव्हाच तुम्ही नवीन दुनियेमध्ये राज्य कराल. लोक म्हणतात - ‘आम्ही म्हणतो शांती व्हावी आणि हे बी.के. म्हणतात विनाश व्हावा’. ज्ञान समजत नसल्यामुळे असे बोलतात. बाबा म्हणतात - ही सारी जुनी दुनिया या ज्ञान-यज्ञामध्ये स्वाहा होईल. जुन्या दुनियेला आग लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती येतील. मोहरी सारखे भरडून नष्ट होतील. काही थोडे आत्मे वाचतील. आत्मा तर अविनाशी आहे. आता बेहदची होलिका (वाईट गोष्टींचे दहन) होणार आहे, ज्याच्यामध्ये सर्व शरीरे नष्ट होतील. बाकी आत्मे पवित्र बनून घरी निघून जातील. अग्नीमध्ये वस्तू शुद्ध होते. हवन शुद्धतेसाठी करतात. त्या सर्व आहेत भौतिक गोष्टी. आता सारी दुनिया स्वाहा होणार आहे. विनाशाच्या अगोदर जरूर स्थापना झाली पाहिजे. कोणालाही समजावून सांगा - अगोदर स्थापना, नंतर मग विनाश. ब्रह्माद्वारे स्थापना. प्रजापिता प्रसिद्ध आहे. आदि देव, आदि देवी… जगत-अंबेची लाखो मंदिरे आहेत. किती जत्रा भरतात. तुम्ही जगत-अंबेची मुले ज्ञान-ज्ञानेश्वरी आहात, नंतर मग राज-राजेश्वरी बनाल. तुम्ही अत्यंत श्रीमंत बनता. मग भक्तीमार्गामध्ये लक्ष्मीकडे दिवाळीमध्ये विनाशी धन मागता. इथे तुम्हाला सर्व काही मिळते. आयुष्मान भव, पुत्रवान भव. जिथे १५० वर्षे आयुष्य असते. इथे तुम्ही जितका योग लावाल तितके आयुष्य वाढत जाईल. तुम्ही ईश्वराशी योग लावून योगेश्वर बनता.
बाबा म्हणतात - मी धोबी आहे. सर्व मूत पलीती आत्म्यांना (पतित आत्म्यांना) साफ करतो. आणि मग शरीर देखील शुद्ध मिळेल. मी सेकंदामध्ये दुनियेचे कपडे स्वच्छ करून टाकतो. फक्त मनमनाभव झाल्याने आत्मा आणि शरीर पवित्र बनतील. छू मंत्र झाला ना. सेकंदामध्ये जीवनमुक्ती, किती सोपा उपाय आहे. चालता-फिरता फक्त बाबांची आठवण करा, मी अजून कोणताही थोडा सुद्धा त्रास देत नाही. आता तुमची एका सेकंदामध्ये चढती कला होते. बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांचा सेवक बनून आलो आहे. तुम्ही बोलावले आहे - हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा, तर सेवक झालो ना. जेव्हा तुम्ही खूपच पतित बनता तेव्हा जोराने ओरडता. आता मी आलो आहे.
मी कल्प-कल्प येऊन मुलांना मंत्र देतो की, माझी आठवण करा. ‘मनमनाभव’चा अर्थ देखील हा आहे. मग विष्णुपुरीचे मालक बनाल. तुम्ही आला आहात विष्णुपुरीचे राज्य घेण्याकरिता; रावणपुरी नंतर आहे विष्णुपुरी. कंसपुरी नंतर कृष्णपुरी. किती सोपे करून सांगितले जाते. बाबा म्हणतात - फक्त या जुन्या दुनियेमधून ममत्व नष्ट करा. आता आपण ८४ जन्म पूर्ण केले आहेत. हे जुने शरीर सोडून आम्ही नवीन दुनियेमध्ये जाणार. आठवणीद्वारेच तुमची पापे नष्ट होतील, इतकी हिंमत केली पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मुखातून सदैव ज्ञान-अमृत काढायचे आहे. ज्ञानाद्वारेच सर्वांची सद्गती करायची आहे. एका बाबांकडूनच ज्ञान ऐकायचे आहे, दुसऱ्या कोणाकडूनही नाही.
२) चढत्या कलेमध्ये जाण्याकरिता चालता-फिरता बाबांची आठवण करण्याचा अभ्यास करायचा आहे. या जुन्या दुनियेमधून, जुन्या शरीरातून ममत्व नष्ट करायचे आहे.
| वरदान:- |
बुद्धी रुपी पायाद्वारे या ५ तत्त्वांच्या आकर्षणापासून अलिप्त राहणारे फरिश्ता स्वरूप भव फरिश्त्यांना नेहमी प्रकाशाची काया दाखवतात. प्रकाशाची काया असणारे या देहाच्या स्मृती पासून सुद्धा अलिप्त रहातात. त्यांचे बुद्धी रुपी पाय या ५ तत्त्वांच्या आकर्षणापासून वर अर्थात अलिप्त असतात. अशा फरिश्त्यांना माया आणि कोणतीही मायावी गोष्ट स्पर्श करू शकत नाही. परंतु हे तेव्हा होईल जेव्हा कधीही कोणाच्या अधीन होणार नाही. शरीराचे देखील अधिकारी बनून चाला, मायेचे सुद्धा अधिकारी बना, लौकिक अथवा अलौकिक नात्यांच्या देखील प्रभावामध्ये येऊ नका. |
| बोधवाक्य:- | शरीराला बघण्याची सवय असेल तर लाईटचे शरीर बघा, लाईट रूपामध्ये स्थित राहा. |
मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये -
“निरंतर ईश्वरीय आठवणीची बैठक”
आता परमात्म्याच्या आठवणीमध्ये जेव्हा बसता तेव्हा बसण्याचा अर्थ काय आहे? आम्हाला फक्त परमात्म्याच्या आठवणीमध्ये बसायचे नाहीये, परंतु आपली ईश्वरीय आठवण तर निरंतर चालता-फिरता प्रत्येक क्षणी करायची आहे; आणि आठवण देखील अशा वस्तूची राहते जिचा आपल्याला परिचय असतो अर्थात तिचे नाव-रूप काय आहे हे ठाऊक असते. जर आपण म्हटले की, ईश्वर नावा-रूपापासून न्यारा आहे तर मग कोणत्या रूपाची आठवण करणार? जर म्हटले ईश्वर सर्वव्यापी आहे तर मग त्यांची व्यापकता तर सर्वत्र झाली, मग आठवण तरी कोणाची करायची; जर ‘आठवण’ शब्द आहे तर अवश्य आठवणीचे रूप देखील असेल. आठवणीचा अर्थ आहे - एक म्हणजे आठवण करणारा, आणि दुसरा आहे ज्याची आठवण करता तो. तर जरूर आठवण करणारा हा त्याच्यापेक्षा वेगळा आहे, तर मग ईश्वर सर्वव्यापी होऊ शकत नाही. जर कोणी म्हणेल की, आम्ही आत्मे परमात्म्याचा अंश आहोत तर काय परमात्म्याचे सुद्धा तुकडे-तुकडे होतात का? मग तर परमात्मा विनाशी झाला! त्याची आठवण देखील विनाशी झाली. आता ही गोष्ट लोक जाणत नाहीत, परमात्मा सुद्धा अविनाशी आहे, आम्ही त्या अविनाशी परमपिता परमात्म्याची संतान आत्मे देखील अविनाशी आहोत. तर आपण ‘वंश’ झालो, ‘अंश’ नाही. आता हे नॉलेज पाहिजे जे परमात्मा स्वतः येऊन आम्हा मुलांना देतात. परमात्म्याची आम्हा मुलांप्रति महावाक्ये आहेत - ‘मुलांनो, मी जो आहे, जसा आहे त्या रूपाची आठवण केल्यामुळे तुम्ही मला अवश्य प्राप्त कराल’. जर मी सुख-दुःखापासून न्यारा पिता सर्वव्यापी असतो तर मग खेळामध्ये कधी सुख-दुःख नसते. तर मी सर्वव्यापी नाही, मी देखील आत्म्या सारखाच आत्मा आहे, परंतु सर्व आत्म्यांपेक्षा माझे गुण परम आहेत म्हणून मला परम-आत्मा अर्थात ‘परमात्मा’ म्हणतात. अच्छा, ओम् शांती.
हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
मनसा सेवा करण्यासाठी सर्वांच्या प्रति सदैव श्रेष्ठ आणि नि:स्वार्थ संकल्प असावा. सदैव परोपकाराची भावना असावी. अपकारीवर सुद्धा उपकाराची श्रेष्ठ शक्ती असावी. सदैव दातापणाची (दातृत्वाची) भावना असावी. सदैव स्व-परिवर्तन आणि स्वतःच्या श्रेष्ठ कर्मांद्वारे इतरांना श्रेष्ठ कर्म करण्याची प्रेरणा देणारे बना.