| 17.10.2026 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो, हियर नो ईविल, एका बाबांकडूनच ऐकायचे आहे, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान राहायचे आहे” | |
| प्रश्न:- | कोणत्या एका खेळाला यथार्थ रीतीने जाणणारी मुले कधीही गोंधळून जाऊ शकत नाहीत? |
| उत्तर:- | दुःख आणि सुख, भक्ती आणि ज्ञानाचा जो खेळ चालतो, याला यथार्थ रीतीने जाणणारी मुले कधीही गोंधळून जात नाहीत. तुम्ही जाणता की भगवान कोणालाही दुःख देत नाहीत, ते दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत. जेव्हा सर्वजण दुःखी होतात, तेव्हा दुःखातून लिबरेट करण्यासाठी ते येतात. |
| गीत:- | यह कौन आज आया सवेरे-सवेरे… |
ओम् शांती. मुलांनी काय ऐकले? भक्तीचे गाणे. भक्तीला इंग्रजीमध्ये फिलासॉफी म्हटले जाते. ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ अशा टायटल (उपाधी) मिळतात. आता फिलासॉफी (भक्ती) तर लहान-थोर सर्व मनुष्य जाणतात. कोणालाही विचारा ईश्वर कुठे राहतात, तर म्हणतील सर्वव्यापी आहेत. ही देखील फिलासॉफी झाली ना. आता बाबा, कोणती शास्त्रांमधली गोष्ट सांगत नाहीत. कोणत्याही भक्ताला ‘ज्ञान-सागर’ म्हणता येणार नाही. ना त्यांच्यामध्ये ज्ञान आहे, ना ते ज्ञान सागराची मुले आहेत. ज्ञान सागर बाबांना कोणीही जाणत नाही. ना ते स्वतःला त्यांची संतान समजतात. ते सर्व भक्ती करतात भगवंताला भेटण्यासाठी. परंतु भगवंतालाच जर जाणत नाहीत तर अशा भक्तीने फायदा तो काय होणार? पुष्कळ लोकांना ‘डॉक्टर ऑफ फिलासॉफी’ हे टायटल मिळत असेल, परंतु त्यांच्या बुद्धीमध्ये तर एकच गोष्ट आहे की, ईश्वर सर्वव्यापी आहे. त्यालाच फिलासॉफी समजतात, यामुळेच घसरत आले आहेत (अधोगती होत गेली आहे), यालाच धर्मग्लानी म्हटले जाते. आपण कोणत्याही मनुष्यासोबत शास्त्रां विषयी वाद-विवाद करू शकत नाही. आपण कोणत्याही मनुष्याकडून शिकलेलो नाही; बाकी सर्व मनुष्य, मनुष्याकडून शिकलेले असतात. वेद-शास्त्रे इत्यादी सर्व मनुष्यांकडूनच शिकतात. बनवली देखील मनुष्यांनीच आहेत. तुम्हाला हे ज्ञान ऐकविणारे एकमेव रुहानी बाबाच आहेत. ते एकदाच येऊन समजावून सांगतात. आता आपल्याला कोणत्याही मनुष्याकडून काहीही शिकायचे नाहीये. तुम्हाला आता स्पिरिच्युअल बाबांकडूनच ऐकायचे आहे. ऐकणारी आहेत रुहानी मुले, आत्मे. ते सर्व मनुष्य, मनुष्यांना ऐकवतात. हे आहे रुहानी बाबांचे ज्ञान. ते आहे मनुष्यांचे ज्ञान. हे बाबा (साकार ब्रह्मा) देखील मनुष्य आहेत ना. तुम्ही बोला - रुहानी बाबा यांच्या द्वारे ऐकवत आहेत आणि आम्ही आत्मे ऐकत आहोत. आम्ही आत्मे मग शरीराद्वारे इतरांना ऐकवतो. हे आहे रुहानी ज्ञान. बाकी सर्व आहे भौतिक. भक्तीमध्ये शरीराची पूजा करतात. बाबा म्हणतात - तुम्ही स्वतःला मनुष्य अथवा भक्त समजू नका. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. तुम्ही आत्मे भाऊ-भाऊ आहात. गायले देखील आहे आत्मा-परमात्मा अलग रहे बहुकाल… तर आपल्याला कोणत्याही मनुष्याकडून ऐकायचे नाहीये. कोणी प्रश्न विचारला तर बोला - आमचे काही शास्त्रांमधले ज्ञान नाही आहे, त्याला आम्ही फिलासॉफी म्हणतो अर्थात भक्तिमार्गाचे ज्ञान. सद्गती देणारे ज्ञान फक्त एक बाबाच देतात. सर्वांचा सद्गती दाता केवळ एकच गायला गेला आहे. म्हणून तुम्हा मुलांनी कोणाशीही डिबेट करायची नाही (वादविवाद करायचा नाही).
बाबा म्हणतात - ज्ञानाची ऑथॉरिटी, ज्ञान सागर मी आहे. मी तुम्हाला कोणते शास्त्र इत्यादी ऐकवत नाही. आपले हे आहे रुहानी ज्ञान. बाकी सर्व आहे जिस्मानी ज्ञान. ते सत्संग इत्यादी सर्व भक्तिमार्गाकरिता आहेत. हे रुहानी बाबा बसून आत्म्यांना समजावून सांगतात, म्हणून देही-अभिमानी बनणे मुलांना अवघड वाटते. आपण आत्मे बाबांकडून वारसा घेतो. बाबांची मुले जरूर बाबांच्या गादीचे वारस बनतील ना. लक्ष्मी-नारायण देखील देहधारी आहेत. त्यांची मुले आपल्या भौतिक पित्याकडून वारसा घेतात. ही गोष्टच वेगळी आहे. सतयुगामध्ये देखील भौतिक गोष्ट बनते. तिथे असे म्हणणार नाहीत की, रुहानी बाबांकडून वारसा मिळतो. देह-अभिमानाला तोडायचे आहे. आपण आत्मा आहोत आणि बाबांची आठवण करायची आहे. हाच भारताचा प्राचीन योग गायला गेला आहे. ‘याद’ हा शब्द हिंदीचा आहे. तर हे नॉलेज तुम्हाला आता कोण देत आहेत? हे काही मनुष्य जाणत नाहीत. जन्म-जन्मांतर मनुष्य, मनुष्यांसोबत बोलत आले आहेत. आता रुहानी बाबा रुहानी मुलांसोबत बोलत आहेत. रुह ऐकवतात म्हणून याला रुहानी स्पिरिच्युअल नॉलेज म्हटले जाते. गीतेला देखील ते (दुनियावाले) स्पिरिच्युअल नॉलेज समजतात, परंतु त्यामध्ये देहधारी श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. बाबा म्हणतात की, कोणत्याही मनुष्यामध्ये हे नॉलेज असू शकत नाही. कधीही कोणी तुमच्याशी डिबेट करत असेल तर बोला - हे तुमचे भक्तीचे ज्ञान आहे. मनुष्यांनी बनवलेल्या शास्त्रांचे ज्ञान आहे. सत्य ज्ञान तर केवळ एका ज्ञान सागर बाबांकडेच आहे, तेच स्वतः नॉलेज देत आहेत. त्यांना ‘सुप्रीम पिता’ म्हटले जाते. पूजा देखील त्या निराकाराची होते. जर इतर निराकार आत्म्यांची पूजा होत असेल तर ते देखील त्यांची मुलेच आहेत. मातीचे शाळिग्राम बनवून पूजा करतात. रुद्र यज्ञ रचतात.
तुम्ही जाणता ते परमपिता परमात्मा निराकारी दुनियेमध्ये राहतात. आपण आत्मे देखील तिथे राहतो. ते ज्ञान-सागर येऊन ज्ञान ऐकवून सर्वांची सद्गती करतात. ते आहेत परे ते परे राहणारे परमपिता परमात्मा. सर्व ब्रदर्स-आत्म्यांना पार्ट मिळालेला आहे, ते मग शरीर धारण करून भाऊ-बहीण बनतात. सर्व आत्मे, एकाच पित्याची संतान आहेत. आत्मा जेव्हा शरीर धारण करते तेव्हा स्वर्गामध्ये सुख आणि नरकामध्ये दुःख प्राप्त करते. हे असे का होते? तर समजावून सांगितले जाते - ज्ञान आणि भक्ती. तो आहे - दिवस, ती आहे - रात्र. ज्ञानाद्वारे सुख, भक्तीद्वारे दुःख, हा खेळ पूर्व-नियोजित आहे. असे नाही की सुख-दुःख सर्व काही भगवानच रचतात. भगवंताला बोलावतातच तेव्हा जेव्हा दुःखी होतात. समजतात की, ते सुख देणारे आहेत. मग जेव्हा सुखाचा कालावधी संपतो तेव्हा मग ५ विकाररुपी रावणामुळे दुःख सुरू होते. हाच खेळ आहे, ज्याला यथार्थ रितीने समजून घ्यायचे आहे. यालाच रुहानी ज्ञान म्हटले जाते. बाकी सर्व आहे भौतिक ज्ञान, ते आपण ऐकू इच्छित नाही. आम्हाला आदेश मिळालेला आहे - फक्त मज निराकार पित्याकडूनच ऐका. बाबा म्हणतात - ‘हियर नो ईविल…’ आपण एका भगवंताकडूनच ऐकतो. तुम्ही मनुष्यांकडून ऐकता. रात्रं-दिवसाचा फरक आहे. मोठे-मोठे विद्वान, शास्त्रं इत्यादी वाचतात. ती तर आम्ही देखील खूप वाचली आहेत. आता भगवान म्हणतात - तुम्ही खूप गुरू केले आहेत, आता त्यांना सोडा, मी जे ऐकवतो ते ऐका. भगवान आहेतच निराकार, त्यांचे नाव आहे - शिव. आता आम्ही त्यांच्याकडून ऐकत आहोत. बाबा स्वतः आपला परिचय देतात आणि आपल्या रचनेच्या आदि-मध्य-अंताचा परिचय
देतात. मग आम्ही तुमच्याकडून शास्त्र इत्यादींच्या गोष्टी ऐकाव्याच का!
आम्ही तुम्हाला रुहानी नॉलेज ऐकवतो. ऐकायचे असेल तर ऐका. गोंधळून जाण्याचा तर प्रश्नच नाही. सारी दुनिया आहे एका बाजूला आणि तुम्ही किती थोडे आहात. आता बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुमच्यावर जे पापांचे ओझे आहे ते उतरेल आणि तुम्ही पवित्र बनाल. जे पवित्र बनतील तेच पवित्र दुनियेचे मालक बनतील. आता जुनी दुनिया बदलणार आहे. कलियुगा नंतर सतयुग येणार आहे. सतयुग आहे पावन दुनिया. कलियुगामध्येच मला बोलावतात की, येऊन पावन दुनिया बनवा. तर मी आता आलो आहे, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आता दुनिया बदलत आहे. हा अंतिम जन्म आहे. या जुन्या दुनियेमध्ये आसुरी राज्य नष्ट होऊन रामराज्य स्थापन होत आहे; म्हणून आता या अंतिम जन्मामध्ये गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान पवित्र बना. हा विषय सागर आहे ना. कमळाचे फूल पाण्याच्या वर राहते. तर आता तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बना. तुम्ही मुले जाणता आपण राजाई स्थापन करत आहोत. आता संपूर्ण दुनिया परिवर्तित होणार आहे. ते धर्म स्थापक फक्त आपला-आपला धर्म स्थापन करतात. सुरुवातीला ते पावन असतात, नंतर मग पतित बनतात. सद्गुरु तर एकच सद्गती दाता आहेत. मनुष्य गुरू करतातच तेव्हा जेव्हा सद्गती मध्ये जाऊ इच्छितात. जेव्हा पापाची अति होते तेव्हा रुहानी बाबा ज्ञान ऐकवतात. तुम्हाला भक्तीचे फळ - ज्ञान भगवंताकडून मिळते. भगवान काही भक्ती शिकवत नाहीत. ते तर ज्ञान देतात. म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील; पावन बनण्याचा दुसरा कोणताही मार्गच नाहीये. नवीन दुनियेमध्ये सर्व स्वर्गवासी होते. आता जुन्या दुनियेमध्ये सर्व नरकवासी आहेत म्हणून बाबा म्हणतात की, मी सर्वांचा उद्धार करण्यासाठी येतो. मीच येऊन रुहानी ज्ञान देतो. बाबा स्वतःचा परिचय देत आहेत. मी तुमचा पिता आहे. आता हा आहे नरक. नवीन दुनियेला स्वर्ग म्हटले जाते. असे कसे म्हणता येईल की इथेच स्वर्ग आणि नरक आहे, ज्यांच्याकडे पुष्कळ संपत्ती आहे ते स्वर्गामध्ये आहेत. स्वर्ग तर असतोच मुळी नवीन दुनियेमध्ये. इथे स्वर्ग कुठून आला; म्हणून आम्ही कोणत्याही मनुष्याच्या गोष्टी ऐकत नाही. बाबा म्हणतात - तुम्हाला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे असेल तर मामेकम् (मज एकाची) आठवण करा. संपूर्ण दिवस बुद्धीमध्ये हे नॉलेज राहिले पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांकडूनच रुहानी गोष्टी ऐकायच्या आहेत. इतर गोष्टींवर कोणाशीही वाद-विवाद करायचा नाही.
२) देही-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. सतोप्रधान बनण्यासाठी एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे.
| वरदान:- |
कर्मा द्वारे गुणांचे दान करणारे डबल लाइट फरिश्ता मूर्त भव जी मुले कर्मणा द्वारे गुणांचे दान करतात, त्यांचे वर्तन आणि चेहरा दोन्ही फरिश्त्या प्रमाणे दिसून येतात. ते डबल लाइट अर्थात प्रकाशमय आणि हलकेपणाचा अनुभव करतात. त्यांना कोणतेही ओझे जाणवत नाही. प्रत्येक कर्मामध्ये मदतीचा अनुभव होतो. जणू कोणती शक्ती त्यांना चालवत आहे. प्रत्येक कर्माद्वारे महादानी बनल्यामुळे त्यांना सर्वांच्या आशीर्वादांचा अथवा सर्वांच्या वरदानांची प्राप्ती होत असल्याचा अनुभव होत असतो. |
| बोधवाक्य:- | सेवेमध्ये सफलतेचा सितारा बना, कमजोर बनू नका. |
मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये:-
१) ज्ञान, योग आणि दैवी गुणांची धारणा हाच जीवनाचा खरा आधार आहे -
आपल्याला हा तर निश्चय आहे की, परमपिता परमात्माद्वारे आपल्याला नॉलेज मिळत
आहे, या नॉलेजमध्ये मुख्य तीन पॉइंट्स आहेत ज्याकरिता आपल्याला पूर्ण पुरुषार्थ करण्याकडे लक्ष द्यायचे आहे. यामध्ये पहिला आहे - योग अथवा निरंतर ईश्वरीय आठवण, ज्यामुळे विकर्मांचा विनाश होतो. दुसरे आहे - ज्ञान अर्थात या संपूर्ण ब्रह्मांडाचा, सृष्टीचा आदि-मध्य-अंत कसा होतो. जेव्हा हे नॉलेज असेल तेव्हाच या जीवनामध्ये प्रत्यक्षरित्या परिवर्तन घडून येऊ शकते आणि आपण भविष्य प्रारब्ध चांगल्या प्रकारे बनवू शकतो. तिसरा पॉइंट आहे - क्वालिफिकेशन; तर आपल्याला सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण जरूर बनायचे आहे, तेव्हाच तर देवता बनू शकतो. त्यामुळे चालता-फिरता, खाता-पिता या तिन्ही पॉइंट्सवर आपल्याला स्वतःलाच लक्ष देणे आवश्यक आहे. या एकाच जन्मामध्ये ज्ञान बल, योग बल आणि दैवी गुणांची धारणा केली जाते. तिन्हींचे आपसामध्ये कनेक्शन आहे. ज्ञाना शिवाय योग लागू शकत नाही आणि योग लावल्याशिवाय दैवी गुणांची धारणा होऊ शकत नाही. या तिन्ही पॉइंट्सवर संपूर्ण जीवनाचा आधार आहे, तेव्हाच विकर्मांचे खाते समाप्त होऊन चांगली कर्म बनतात. यालाच ईश्वरीय जीवन म्हटले जाते.
२) भारताचा प्राचीन योग परमात्म्याद्वारे शिकवला गेला आहे -
आपला हा ईश्वरीय योग भारतामध्ये ‘प्राचीन योग’ या नावाने प्रसिद्ध आहे. या ‘योग’लाच ‘अविनाशी योग’ असे का म्हटले जाते? कारण तो अविनाशी परमपिता परमात्म्याद्वारे शिकवला गेला आहे. भले योग इतर मनुष्य आत्मे देखील शिकवतात, त्यासाठी योगाश्रम इत्यादी उघडत राहतात. परंतु ते लोक ‘प्राचीन योग’ शिकवू शकत नाहीत. जर असा योग असता तर मग ते बल आहे कुठे! भारत तर दिवसेंदिवस दुबळा होत चालला आहे, यावरून हे सिद्ध होते की, तो योग अविनाशी योग नाहीये; ज्यांच्या सोबत योग लावायचा आहे ते स्वतःच तो शिकवू शकतात. बाकी इतर कोणाशीही योग लावायचाच नाहीये, तर मग ते शिकवतील तरी कसे! हे कार्य तर स्वयं परमात्माच करू शकतात, तेच आम्हाला संपूर्ण रहस्य सांगू शकतात. बाकी सर्वत्र फक्त म्हणत राहतात की, आम्ही योग शिकवतो. परंतु हे तर आम्हीच जाणतो की, खरा योग तर स्वयं परमात्माच शिकवून सूर्यवंशी-चंद्रवंशी घराणे आणि दैवी राज्य स्थापन करतात. आता तो प्राचीन योग परमात्मा येऊन कल्प-कल्प आम्हाला शिकवत आहेत. म्हणतात - ‘हे आत्मा, मज परमात्म्या सोबत निरंतर योग लाव, तर तुझी पापे नष्ट होतील’. अच्छा, ओम् शांती.
हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
कोणी कशीही आत्मा संपर्कामध्ये येवो - सतोगुणी असो अथवा तमोगुणी, सर्वांप्रती शुभचिंतक बना अर्थात अपकारीवर देखील उपकार करणारे बना. कधीही कोणत्याही आत्म्याप्रति घृणेची दृष्टी ठेवू नका कारण तुम्ही जाणता की, ही आत्मा अज्ञानाच्या वशीभूत आहे अर्थात अजाण बालकाप्रमाणे आहे. अजाण बालकाच्या कोणत्याही कृत्याची घृणा वाटत नाही, उलट अजूनच त्या मुलाप्रति दया अथवा प्रेम उत्पन्न होईल.