मराठी मुरली · Brahma Kumaris

आजची मुरली · 24 नोव्हेंबर, 2026

ओम शांती · BapDada · 24 नोव्हेंबर, 2026

आजची मुरली — दररोज सकाळी नवी.

18
मुरली24 नोव्हेंबर, 2026 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

24.11.2026
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो, ज्ञान-धनाचे दान करण्यासाठी विचार सागर मंथन करा, दान करण्याची आवड ठेवा म्हणजे मग मंथन चालत राहील”
प्रश्न:- ज्ञानमार्गामध्ये स्वतःला सदैव तंदुरुस्त (निरोगी) ठेवण्याचे साधन कोणते आहे?
उत्तर:- आपणच आपल्याला सदैव निरोगी ठेवण्याकरिता बाबांद्वारे जो काही ज्ञानरुपी चारा (मुरली) मिळतो, तो खाऊन मग रवंथ केले पाहिजे अर्थात मंथन केले पाहिजे. ज्या मुलांना मंथन करण्याची अर्थात पचवण्याची सवय असते ते आजारी पडू शकत नाहीत. कायमचे निरोगी ते आहेत ज्यांच्यामध्ये विकारांचा आजार नसतो.
गीत:- तू प्यार का सागर है…

ओम् शांती. मुलांनी गाणे ऐकले. मनुष्य जी काही गाणी इत्यादी बनवतात, शास्त्र इत्यादी ऐकवतात, परंतु समजत काहीच नाहीत. जे काही वाचत आले आहेत त्याने कोणाचेही कल्याण झालेले नाही, उलट अजूनच अकल्याण होत आले आहे. सर्वांचे कल्याणकारी केवळ एक ईश्वरच आहेत. तुम्ही समजता, आमचे कल्याण करणारे आलेले आहेत. कल्याणाचा मार्ग सांगत आहेत. खास तुम्हा भारतवासीयांना, साऱ्या सामान्य दुनियेचे कल्याण करणारे एक बाबाच आहेत. सतयुगामध्ये सर्वांचे कल्याण झाले होते, तुम्ही सर्व सुखधाममध्ये होता आणि बाकीचे सर्व शांतीधाममध्ये होते. हे मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. परंतु पॉईंट निसटून जातो, पूर्णपणे धारणा करत नाहीत. जर एकाच पॉईंटवर विचार सागर मंथन करत राहतील तर असे होणार नाही. जनावरांमध्ये जेवढी अक्कल आहे, तेवढी सुद्धा आजकालच्या मनुष्यांमध्ये अक्कल नाहीये. जनावरे (गायी) जेव्हा चारा खातात तेव्हा ते रवंथ करत राहतात. तुम्हाला देखील भोजन मिळते. परंतु तुम्ही मग पूर्ण दिवसभर रवंथ करत नाही (मंथन करत नाही). ती जनावरे तर पूर्ण दिवसभर रवंथ करतच राहतात. हा तुम्हाला ज्ञानरुपी चारा मिळतो आहे. योग आणि ज्ञान. यावर दिवसभर विचार सागर मंथन करत राहिले पाहिजे. ज्यांना सेवेची आवड नाही, ते विचार सागर मंथन करून काय करणार. आवडच नसेल तर करणार देखील नाहीत. काहीजणांना ज्ञान-धन देण्याची आवड असते. माणसे गोशाळेमध्ये जाऊन गाईंना चारा इत्यादी देतात. ते देखील पुण्य समजतात. बाबा तुम्हाला हा ज्ञानाचा चारा खाऊ घालतात. यावर विचार सागर मंथन करत रहाल तर आनंदात रहाल आणि सेवेची आवड देखील असेल. कोणी लोटाभर घेतात किंवा थेंबभर घेतात, ते देखील स्वर्गामध्ये जातील. स्वर्गाचे दरवाजे तर उघडणारच आहेत. तसे तर ज्ञान-सागराला हप करायचे आहे (एवढे अफाट ज्ञान स्वतःमध्ये सामावून घ्यायचे आहे). काही जण तर संपूर्ण हप करतात, कोणी तर थेंबभर घेतात, तरी देखील स्वर्गामध्ये तर जातीलच. बाकी जितकी-जितकी धारणा करतील तितके उच्च पद प्राप्त करतील. बाकी स्वर्गामध्ये तर एक थेंबभर ज्ञानाने देखील निघून जातील. मनुष्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या मुखामध्ये गंगेचा एक थेंब घालतात. काही-काही घरामध्ये तर कायम गंगाजलच पितात. किती पीत असतील. गंगा तर वाहतच राहते. तिला काही कोणी हप करू शकत नाही. तुमच्यासाठी तर गायले गेले आहे - सागरला हप केले. जे ज्ञानसागराच्या समीप येतात, जास्त सेवा करतात तेच विजयी माळेमध्ये ओवले जातात. जितके-जितके जे हप करतात (आत्मसात करतात) आणि दुसऱ्यांचे कल्याण करतात ते पद देखील प्राप्त करतात, जितकी धारणा करतील तितका आनंद देखील होईल. श्रीमंत माणसाला आनंद होत असतो ना. ज्यांच्याकडे अमाप धन असते, दान करतात, कॉलेज, धर्मशाळा, मंदिरे, इत्यादी बांधतात तर त्यांना तेवढा आनंद देखील होत असतो. इथे तर तुम्हाला अविनाशी ज्ञान-रत्ने मिळतात. २१ जन्मांकरिता अविनाशी खजिना मिळतो. जे चांगल्या प्रकारे धारण करून मग दान देखील करतात, त्यांना चांगले पद मिळते. काही-काही मुले लिहितात - ‘बाबा, आम्हाला नोकरी सोडून या रूहानी सेवेमध्ये लागावे अशी इच्छा होत आहे. प्रोजेक्टर, प्रदर्शनी घेऊन फिरत रहावे. एक थेंब जरी कोणाला मिळाला तरी कल्याण होईल. सेवेची खूप आवड आहे’. बाकी प्रत्येकाच्या अवस्थेला बाबा जाणतात. सेवे सोबतच मग गुण देखील पाहिजेत. क्रोध असता कामा नये आणि कोणता उलटा-सुलटा विचार येता कामा नये. विकारांचा कोणताही आजार असता कामा नये. आरोग्य चांगले पाहिजे. ज्यांच्यामध्ये विकार कमी आहेत, तर बाबा म्हणतील - हा निरोगी आहे. बाबा महिमा करतील ना. गायले देखील आहे - काही-काही चांगले महारथी देखील आहेत. त्यांनी (दुनियावाल्यांनी) मग असूर आणि देवतांचे युद्ध दाखवले आहे. देवतांचा विजय झाला. आता आमचे युद्ध ५ विकार रुपी असुरांसोबत आहे. बाकी कोणी वेगळ्या प्रकारचे मनुष्य असूर नसतात, ज्यांचा आसुरी स्वभाव आहे, त्यांनाच असूर म्हटले जाते. एक नंबरचा आसुरी स्वभाव आहे - काम विकाराचा, म्हणून संन्याशी देखील त्याला सोडून पळून जातात. या आसुरी गुणांना सोडण्यासाठी मेहनत करावी लागते. राहायचे देखील गृहस्थीमध्येच आहे परंतु आसुरी स्वभाव सोडून द्यायचा आहे. पवित्र बनल्यामुळे मुक्ती-जीवनमुक्ती मिळते. किती जबरदस्त प्राप्ती आहे. ते तर घरदार सोडून पळून जातात, प्राप्ती काहीच नाही. या चित्रांमध्ये किती चांगल्या-चांगल्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. ते लोक (दुनियावाले) तर फक्त चित्रांचे प्रदर्शन लावतात. फक्त चित्रे बघण्यासाठी कित्येक लोक जातात. फायदा काहीच नाही. इथे या चित्रांमध्ये किती ज्ञान भरलेले आहे, यांने भरपूर फायदा होतो. यामध्ये आर्ट (कला) इत्यादीची कोणती गोष्ट नाही. आणि ना कोणा बनविणाऱ्याची हुशारी इत्यादी आहे. त्यांच्या चित्रांवर त्यांची (चित्रकारांची) नावे लिहिलेली असतात. त्या आर्टिस्टला बक्षीस देखील मिळते. बरेच जण ही प्रदर्शनीतील चित्रे पाहून इतके जरी समजले की, ‘होय, बाबांची तर जरूर आठवण केली पाहिजे’. इतके म्हटले तरी देखील ती प्रजा बनली. प्रजा तर पुष्कळ बनणार आहे. मी तर आहे ज्ञानाचा सागर. एक थेंब देखील कोणाला मिळाल्याने स्वर्गामध्ये येतीलच.

तुम्ही समजता प्रदर्शनी, मेळे यांच्याद्वारे अनेकांचे कल्याण होते. ईश्वर कल्याणकारी आहेत ना. तुमचे देखील कल्याण होत आहे. परंतु यामध्ये मग आपले विचार सागर मंथन करत राहावे. मुद्दे आठवत राहाल तर खूप फायदा होईल. उलट्या-सुलट्या गोष्टी तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने काढून टाकल्या पाहिजेत. बाबा म्हणतात - मी तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी ऐकवतो. एक नंबरची मुख्य गोष्ट ही एकच आहे की, कोणालाही बाबांचा परिचय द्या. बस्स, एका बाबांची आठवण करा, तेच सर्व काही आहेत. भक्तिमार्गामध्ये असे भरपूर जण आहेत. तर त्यांना बोला - ‘तुम्ही जे करत आहात ते खूप चांगले आहे. तुम्ही बोटाने इशारा करता की, सर्व काही परमात्माच करवून घेत आहेत. ते सर्वांचे कल्याणकारी वर (परमधाममध्ये) राहतात’. राहता तर तुम्ही देखील तिथेच आहात. या साऱ्या ज्ञानाच्या गोष्टी तुम्ही आता समजत आहात.

बाबा म्हणतात - आता तुमचा हा कपडा (शरीर) सडला आहे. सतयुग त्रेतामध्ये किती सुंदर वस्त्र (सुंदर शरीर) होते. आता सडलेले वस्त्र (पतित शरीर) कधीपर्यंत वापरणार. परंतु हे कोणीही समजत नाहीत. बाबा येऊन जेव्हा समजावून सांगतील तेव्हा समजतील. आता तुम्ही मुले समजता - ज्ञान देणारे आहेतच मुळी एक बाबा. ते सागर आहेत. जे सागर हप करतात - तेच विजयी माळेचे मणी बनतात. ते सदैव सेवेवरच तत्पर राहतात. बाबा आलेलेच आहेत मुलांना पावन बनविण्याकरिता, पावन बनून मग घरी परत जायचे आहे. जिथून आलो आहोत पुन्हा तिथेच नंबरवार जाणार. मागून-पुढून जाऊ शकत नाही. नाटकामध्ये ॲक्टरचा ॲक्ट आपल्या ठरलेल्या वेळेवर असतो ना. यामध्ये देखील जे ॲक्टर्स आहेत ते नंबरवार आपापल्या वेळेवर येत जातील. हे बेहदचे नाटक पूर्वनियोजित आहे. ‘ब्रह्म’मध्ये आपण आत्मे बिंदू रूपामध्ये राहतो. तिथे अजून कुठे काय असेल. कुठे एक आत्मा बिंदू आणि कुठे इतके मोठे शरीर. आत्मा अगदी थोडीशी जागा घेईल. ब्रह्म महत्तत्व किती मोठे आहे. जसे पोलारचा (पोकळीचा) अंत नाही, तसा ब्रह्म तत्वाचा देखील अंत नसतो. अंत शोधून काढण्याचा किती प्रयत्न करत असतात, परंतु मिळवू शकत नाहीत, डोकेफोड करत असतात. परंतु ती अशी काही वस्तू नाहीये जिला पकडले जाऊ शकेल किंवा पलीकडे जाऊ शकू. विज्ञानाचा अहंकार किती आहे. काहीही फायदा नाही. ऐकले आहे ना - आकाशच आकाश आहे, पाताळच पाताळ आहे. त्यांना वाटते की, चंद्रावर दुनिया असेल. तो देखील ड्रामामध्ये त्यांचा पार्ट आहे, फायदा काहीच नाही. बाबा तर येऊन आम्हाला विश्वाचा मालक बनवतात; किती फायदा आहे. बाकी चंद्रावर जा, छू मंत्राने विभूती इत्यादी काढा… याने काय फायदा होणार. आता तर आपण बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेत आहोत. कल्प-कल्प घेत आलो आहोत. जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होतो. हे चक्र फिरत राहते. दुनियेमध्ये सुरुवातीला फक्त भारतच होता. भारतवासीच विश्वाचे मालक होते. तिथे देवतांना काही कोणत्या खंडाविषयी माहिती नसते. ही तर नंतर वृद्धी होते. नवीन-नवीन धर्म स्थापक येऊन आपला-आपला धर्म स्थापन करतात. बाकी ते काही सद्गती करत नाहीत, फक्त धर्म स्थापन करतात. त्यांचे कसले गायन होणार! मुक्तीधामवरून पार्ट बजावण्यासाठी येतात. मनुष्य म्हणतात - मोक्षमध्ये बसून राहावे. या अवागमनाच्या चक्रामध्ये यायचेच कशाला! परंतु यामध्ये तर यायचेच आहे. पुनर्जन्म घ्यायचाच आहे, आणि मग परत जायचे आहे. हे पूर्व नियोजित ड्रामाचे चक्र आहे. लाखो वर्षांचा ड्रामा तर कोणता असतच नाही. हा तर नैसर्गिक अनादि ड्रामा आहे, याला म्हटले जाते - ईश्वरीय चमत्कार. रचता आणि रचनेचा जो चमत्कार आहे - त्याला जाणून घ्यायचे असते. असा कोणीही मनुष्य नाही जो सृष्टी चक्राला जाणून घेण्याचा पुरुषार्थ करेल. हे सृष्टीचे चक्र कसे फिरते हा विचारच करता येणार नाही. सर्वात जुन्यात जुने चित्र आहे शिवलिंगाचे. खुदा आलेले आहेत, मग त्यांचे यादगार बनवतात. सुरुवातीला जेव्हा ‘शिव’ची पूजा सुरू होते तेव्हा हिऱ्याचे लिंग बनवतात. मग जेव्हा भक्ती रजो, तमो बनते तेव्हा मग पाषाणाचे देखील शिवलिंग बनवतात. शिवबाबा काही हिऱ्यांचा तर नाहीये. ते तर एक बिंदू आहेत, पूजेसाठी मोठा आकार बनवतात. त्यांना वाटते - आपण हिऱ्याचे शिवलिंग बनवावे. सोमनाथाच्या एवढ्या मोठ्या मंदिरामध्ये एक बिंदू ठेवला तर समजू देखील शकणार नाही. बाबा, भक्तिमार्गामध्ये काय-काय होते ते समजावून सांगतात. वैज्ञानिक संशोधन करत राहतात. चांगल्या-चांगल्या वस्तूंचा शोध लावतात. विनाशासाठी देखील विनाशकारी वस्तूंचा शोध लावून बनवत राहतात. पूर्वीच्या काळात वीज थोडीच होती. तेलाचे दिवे पेटवत असत.

बाबा समजावून सांगत आहेत - गोड-गोड मुलांनो, थोड्याशा ज्ञानाने संतुष्ट होऊ नका. चांगल्या रीतीने धारण करून सागराला हप करा. चांगली सेवा करतील ते पद देखील चांगले प्राप्त करतील. संपूर्ण दिवस आनंदाचा पारा चढलेला राहिला पाहिजे. ही तर छी-छी पतित दुनिया आहे. आता इथून निघून जाणार आहोत. जुनी दुनिया तर नष्ट होणारच आहे. तयारी तर चालू आहे. आता थोडे दिवस बाकी आहेत, एवढ्या वेळात देखील कितीतरी सेवा करायची आहे. संपूर्ण भारतामध्येच काय परदेशामध्ये देखील सर्वत्र फेरी मारायची आहे. वर्तमानपत्रांद्वारे परदेशातील काना-कोपऱ्यापर्यंत सुद्धा हे ज्ञान सर्वांना समजणार आहे. या शिडीच्या चित्रावरून लगेचच समजतील. बाबा येतातच मुळी मुलांना पुन्हा स्वर्गवासी बनविण्याकरिता. खरोखर, लक्ष्मी-नारायण भारतामध्येच राज्य करून गेले आहेत. महिमा तर खूप करतात की, भारत प्राचीन देश आहे. खूप महिमा करतात - भारत असा होता, भारतामध्ये अशा पवित्र देवता होत्या. तुम्ही जाणता आम्ही बाबांकडून २१ जन्मांचे प्रारब्ध प्राप्त करत आहोत. बाबा अतिशय सोप्या पद्धतीने शिकवतात. असे दाखवतात की, द्रौपदीचे पाय चेपले, तसे देखील काही नाहीये. हे तर बाबा म्हणतात - मुलांनो, भक्तिमार्गामध्ये धक्के खाऊन थकला आहात. आता मी तुमचा थकवा दूर करतो, तुम्ही धक्के खाऊन-खाऊन पतित बनला आहात. बाबा म्हणतात - मी तुमचा थकवा दूर करत आहे. त्यानंतर मग तुम्ही कधीही दुःख बघणार नाही. दुःखाचे जरा सुद्धा नाव नसेल. बाकी पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करायचे आहे. चांगले प्राप्त करतील, तर म्हणतील ना - याने मागील जन्मामध्ये चांगली कर्म केली आहेत. गायन तर होते ना. परंतु कोणीही जाणत नाही की, यांनी कधी पुरुषार्थ करून हे पद प्राप्त केले! आता बाबा तुम्हाला अशी कर्म करायला शिकवतात. तुम्हाला देखील म्हणतात - चांगली कर्म करून उच्च पद प्राप्त करा. इथे मनुष्यांची कर्म, विकर्म बनतात. तिथे तर आहेच स्वर्ग. कर्म, अकर्म बनतात. तिथे हे ज्ञान राहत नाही. बाबा म्हणतात - कर्मांची गति मीच जाणतो. यावेळी जे चांगले कर्म करतील ते फळ देखील चांगले प्राप्त करतील. हे कर्म-क्षेत्र आहे. काही जण खूप चांगली कर्म करतात. कोणी तर असेही आहेत ज्यांना सेवेचीच तात लागून राहते (सेवेचेच विचार चालत राहतात). विचारतात - बाबा, माझ्यामध्ये कोणती खामी (दोष) आहे का? नाही, सेवा तर जितकी करू शकाल तितकी कराल. सेवेची वृद्धी होत राहील. सेवा करणारे देखील येत जातील. मनामध्ये आथत आहे (हिंमत आहे) - आता थोडे दिवस बाकी आहेत. आता असा पुरुषार्थ करावा जेणेकरून तिथे देखील उच्चपद प्राप्त करावे. बाबा हा ज्ञानाचा चारा खाऊ घालत आहेत, म्हणतात रवंथ करत रहा म्हणजे मग धारणा पक्की होईल. आनंदाचा पारा देखील चढेल. सेवा करायची आहे, अनेकांना पैगाम द्यायचा आहे. तुम्ही पैगंबराची मुले पैगंबर आहात. एके दिवशी मोठ्या वृत्तपत्रांमध्ये देखील तुमची चित्रे छापली जातील. परदेशापर्यंत वर्तमानपत्रे जातात ना. चित्रांवरून समजतील, हे नॉलेज तर गॉडफादरचे आहे. बाकी मेहनत आहे मनमनाभव होण्याची. ती मेहनत भारतवासीच करतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) बाबा ज्या चांगल्या-चांगल्या गोष्टी ऐकवतात, त्यावर विचार सागर मंथन करून अनेकांचे कल्याणकारी बनायचे आहे. उलट्या-सुलट्या गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने काढून टाकायच्या आहेत.

२) कोणताही आसुरी स्वभाव असेल तर त्याला काढून टाकायचे आहे. बाबा जो ज्ञानाचा चारा खाऊ घालतात, त्याला रवंथ करत राहायचे आहे.

वरदान:- सर्व खजिन्यांना विश्वकल्याणाप्रती युज करणारे सिद्धी स्वरूप भव
जसे आपल्या हदच्या प्रवृत्तीमध्ये, आपल्या हदच्या स्वभाव-संस्कारांच्या प्रवृत्तीमध्ये खूप वेळ देता, परंतु आपापल्या प्रवृत्ती पासून दूर अर्थात उपराम राहा आणि प्रत्येक संकल्प, बोल, कर्म आणि संबंध-संपर्कामध्ये बॅलन्स ठेवा तेव्हाच सर्व खजिन्यांच्या इकॉनॉमी द्वारे (बचतीद्वारे) ‘कम खर्च बाला नशीन’ बनाल (कमी खर्चात जास्त प्रभाव टाकणारे बनाल). आता समय रुपी खजिना, एनर्जीचा खजिना (शक्तींचा खजिना) आणि स्थूल खजिन्यांमध्ये ‘कम खर्च बाला नशीन’ बना, यांना स्वतःसाठी वापरण्याऐवजी विश्वकल्याणा प्रति युज करा तर सिद्धी स्वरूप बनाल.
बोधवाक्य:- एकाच्याच ध्यासामध्ये सदैव मग्न रहा म्हणजे मग निर्विघ्न बनाल.

||| ओम शांती |||

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

आता सेवेच्या अथवा कर्माच्या देखील बंधनामध्ये येऊ नका. माझे स्थान, माझी सेवा, माझे स्टुडंट, माझे सहयोगी आत्मे, हे देखील सेवेच्या कर्माचे बंधन आहे; या कर्मबंधनापासून न्यारे अर्थात कर्मातीत. जसे ब्रह्माबाबांनी नेहमीच न्यारे आणि प्यारेपणाचा (अलिप्तपणा आणि प्रेमळपणाचा) बॅलन्स ठेवला. सर्वांना आपलेपणाची अनुभूती करवत असताना देखील प्रत्येकाचे नाते त्या एकाशी (निराकार बाबांशी) जोडले, तसे तुम्हा मुलांनी देखील सर्वांना आपलेपणाची जाणीव करून देत आत्म्यांना समीप ठिकाणापर्यंत (अंतिम ध्येयापर्यंत) पोहोचविणारे बना, तेव्हा म्हणणार - पित्या समान.

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.