मराठी मुरली · Brahma Kumaris

आजची मुरली

ओम शांती · BapDada · 25 नोव्हेंबर, 2026

आजची मुरली — दररोज सकाळी नवी.

18
मुरली25 नोव्हेंबर, 2026 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

25.11.2026
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो, शिवबाबांचे बनून कोणतीही चूक करायची नाही, चूक केल्यामुळे बाबांचे नाव बदनाम कराल”
प्रश्न:- सर्वात मोठी प्रवृत्ती (कुटुंब) कोणाची आहे आणि कशी?
उत्तर:- शिवबाबांची सर्वात मोठी प्रवृत्ती आहे. भक्तीमध्ये सर्व ‘त्वमेव माताश्च पिता…’ असे म्हणून बोलावतात, तर प्रवृत्तीवाले झाले ना. परंतु जोपर्यंत ते साकारमध्ये येत नाहीत, तोपर्यंत त्यांची कोणतीही प्रवृत्ती नसते, कारण वरती तर आत्मे बाबांसोबत निराकारी रूपामध्ये राहतात. जेव्हा साकारमध्ये येऊन यांच्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा सर्वात मोठी प्रवृत्ती (कुटुंब) होते.

ओम् शांती. भारत खास आणि समस्त दुनिया हे जाणत नाही की बेहदचे बाबा निवृत्ती वाले आहेत की प्रवृत्ती वाले आहेत. जेव्हा बाबा येतात तेव्हा ‘मुलांनो-मुलांनो’ असे म्हणून बोलवतात कारण त्यांना बोलावले देखील जाते - ‘त्वमेव माताश्च पिता त्वमेव…’ तर गृहस्थी बनतात. तिथे तर सर्व जाणतात - शिव निराकार आहेत. भले ‘शिव’ला आकार आहे परंतु मुले-बाळे तर नाही आहेत. जरी असली तरी सर्व आत्मे मुले आहेत. सर्व मुले एकसारखी आहेत, म्हणून

सगळेच परमात्मा आहेत असे समजतात. आत्मा देखील बिंदू सारखी आहे. परमात्म्याचे देखील रूप बिंदू सारखे आहे. गृहस्थी लोकच गातात - ‘त्वमेव माताश्च पिता…’ निवृत्ती मार्गवाले संन्यासी म्हणतात - परमात्मा ब्रह्म आहे. ते ‘त्वमेव माताश्च पिता…’ असे म्हणणार नाहीत. त्यांचा मार्ग वेगळा आहे. चुकून अशी देखील लक्ष्मी-नारायणाच्या पुढे जाऊन महिमा गातात – ‘त्वमेव माताश्च पिता…’ किंवा म्हणतात - ‘अच्युतम् केशवम्…’ भक्तिमार्गामध्ये स्तुती तर भरपूर गातात. वास्तविक पाहता परमात्मा हे पिता आहेत, त्यांच्याकडून वारसा कसा आणि कोणता मिळणार आहे. तुम्ही मुले जाणता ते पिता देखील आहेत, आजोबा देखील आहेत आणि हे (ब्रह्मा) मोठी आई देखील आहेत, प्रजापिता देखील आहेत. यांच्याद्वारे म्हणतात - ‘मुलांनो, मी तुमचा पिता देखील आहे, आणि मग मला देखील प्रवृत्ती मार्गामध्ये यावे लागते. ही माझी युगल (पत्नी) देखील आहे, मुलगा देखील आहे. जेव्हा मी यांच्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा प्रवृत्ती वाला बनतो. मलाच सुप्रीम पिता, सुप्रीम टीचर, सुप्रीम गुरू देखील म्हणतात. गुरु मुक्तीसाठी गाईड करतात (मार्गदर्शन करतात). ते तर सर्व खोटे आहेत. हे सत्य आहेत. इंग्रजीमध्ये परमात्म्याला ट्रुथ (सत्य) म्हणतात. तर ट्रुथ येऊन काय सत्य सांगतात, हे कोणालाच माहीत नाहीये. मला आणि तुम्हाला देखील माहीत नव्हते. तर, ही जशी नवीन गोष्ट झाली ना. ते ज्ञानाचा सागर, सचखंड स्थापन करणारे आहेत. जरूर कधीतरी सत्य सांगून गेले आहेत तेव्हाच तर गायन आहे. सच खंडला हेवन (स्वर्ग) म्हणतात. तिथे डीटी सावरंटी (दैवी साम्राज्य) दाखवतात. आता आहे जुनी दुनिया, मग नवी दुनिया होणार आहे. जुन्या दुनियेला आग लागणार आहे. स्थापनेच्या वेळी विनाश देखील प्रसिद्ध आहे. करन-करावनहार परमात्मा गायला गेला आहे. ब्रह्मा द्वारे स्थापन करतात. कसे करवून घेतात? ते तर स्वतःच येऊन सांगतील. मनुष्य काहीही जाणत नाहीत. म्हणतात - परमात्मा करन-करावनहार आहेत; आणि मग ड्रामाविषयी देखील माहीत झाले. कलियुग अंत, सतयुग आदि... या संगमालाच सर्वोच्च मानले पाहिजे. कलियुगाच्या नंतर सतयुग येते. आणि मग खाली उतरावे लागते. स्वर्ग, नरक गायले गेले आहेत. व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर म्हणतात - स्वर्गवासी झाला. जरूर कोणत्या तरी वेळी स्वर्गवासी झाले आहेत. हे खास भारतवासीच म्हणतात; कारण जाणतात की, भारत सर्वात प्राचीन आहे. तर जरूर इथेच स्वर्ग असेल. गोष्टी किती सोप्या आहेत परंतु ड्रामा अनुसार समजत नाहीत, म्हणून तर बाबा हे सांगण्यासाठी येतात. बोलावतात देखील - ‘बाबा या, तुम्हाला जे ज्ञान आहे ते येऊन आम्हाला द्या. पतितांना पावन बनविण्यासाठी या’. आणि मग म्हणतात - आमची दुःखे हरण करून सुख द्या. परंतु हे माहिती नाही की कोणते नॉलेज देतील! कोणते सुख देतील! आता तुम्ही मुले जाणता - ते पिता आहेत तर जरूर पित्याकडून रचना झाली असेल. फादर अर्थात रचयिता. मुलांनी ‘फादर’ म्हटले तर क्रिएशन (रचना) झाली. रचना देखील कुठून तरी जन्मली असेल. मग मुलांना संपत्ती देखील दिली असेल. ही तर कॉमन गोष्ट आहे, म्हणूनच मला ‘त्वमेव माताश्च पिता…’ म्हणतात. तर बाबा मोठे गृहस्थी झाले ना. बोलवतात देखील - ‘ओ मात पिता या, येऊन पावन बनवा’. आता फादर तर आहेत, परंतु मदर शिवाय रचना कशी होऊ शकेल? ही रचना मग बाबा इथे कशी काय रचतात, ही एकदम नवीन गोष्ट आहे. इथे (ज्ञानी मुलांना) देखील खूप जणांच्या बुद्धीमध्ये जातच नाही. बाकी सर्व ठिकाणी फक्त परमात्म्याला फादर म्हणून बोलवतात. इथे दोघेही आहेत मदर आणि फादर, तर प्रवृत्ती मार्ग झाला ना. तिथे (दुनियेमध्ये) केवळ ‘फादर’ म्हटल्याने त्यांना मुक्तीचा वारसा मिळतो. ते येतात देखील पाठीमागून. हे तर सर्व जाणतात की, ख्रिश्चन धर्माच्या पूर्वी बौद्ध धर्म होता, त्यांच्या पूर्वी इस्लाम धर्म होता. या शिडीच्या चित्रामध्ये इतर धर्म तर नाही आहेत म्हणून या चित्राला गोळ्याच्या चित्राच्या बाजूला ठेवले पाहिजे. ही पाठशाळा आहे. आता पाठशाळेमध्ये फक्त एकच पुस्तक थोडेच असेल. पाठशाळेमध्ये तर नकाशे (चित्रे) देखील पाहिजेत. ती भौतिक विद्या तर उपयोगात येणार नाही. चित्रांवरून मनुष्य पटकन समजतील. हे तुमचे मुख्य नकाशे (चित्रे) आहेत. किती सविस्तरपणे समजावून सांगितले जाते, तरी देखील पत्थर-बुद्धी समजत नाहीत.

बाबांनी समजावून सांगितले आहे - प्रदर्शनीमध्ये सर्वात पहिले त्रिमूर्तीच्याच चित्रावर समजावून सांगायचे आहे. हे तुमचे बाबा आहेत, ते दादा आहेत. ज्ञान कसे द्यायचे? वारसा कसा द्यायचा? भारतवासीयांनाच वारसा मिळणार आहे. परमपिता परमात्मा ब्राह्मण, देवता, क्षत्रिय या ३ धर्मांची स्थापना करतात. ब्रह्माद्वारे ब्राह्मणच रचतात, हा यज्ञ आहे, याला म्हटले जाते - रुद्र ज्ञान यज्ञ. बाकीचे भक्तिमार्गाचे जे यज्ञ आहेत - ते उशिरा सुरू होतात कारण सर्वात पहिली पूजा सुरु होते ‘शिव’ची, नंतर मग देवतांची पूजा. त्यावेळी कोणता यज्ञ होत नाही. नंतर हे यज्ञ करायला सुरूवात करतात. पहिली देवतांची पूजा करतात, फुले वाहतात. आता तुम्ही पूजा लायक नाही आहात. लोक जाऊन शिवलिंगावर रुई-धोतरा का वाहतात? बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही सर्व काटे होतात. त्यांच्यापासून मग कोणी सदा गुलाब, कोणी गुलाब, कोणी मोगरा बनतात. कोणी मग रुईचे फूल देखील बनतात. नीट अभ्यास करत नाहीत तर रुई बनतात. काहीच कामाचे राहत नाहीत. शिवबाबांवर सर्व काटे वाहतात, मग बाबा त्यांना फूल बनवतात, परंतु फुलांची देखील व्हरायटी (विविधता) बनते. बागेमध्ये व्हरायटी फुले असतात ना. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. कोणी तख्तनशीन (सिंहासनाधीश) बनतील, कोण काय बनतील - या सर्व गोष्टी बाबाच समजावून सांगतात, इतर कोणीही सांगू शकणार नाही. भक्तीमार्ग किती लांब-रूंद आहे, परंतु त्यामध्ये ज्ञान जरा सुद्धा नाहीये. सतयुगामध्ये देवी-देवता होते. कलियुगामध्ये एकही देवता नाहीये. तर जरूर परमात्म्याने मनुष्यांना देवता बनवले असेल. तर बाबा येऊन अशी कर्मे शिकवतात जी मनुष्य शिकून दैवी गुण धारण करून देवी-देवता बनतात. बाकीच्या धर्माचे काय शिकवणार? कारण त्यांना तर वरून यांच्या नंतर यायचे आहे. तर ते फक्त पवित्रतेचे ज्ञान देतात. क्राईस्ट जेव्हा येतो तेव्हा ख्रिश्चन तर कोणीच नसतात. वरून त्यांच्यानंतर येतात. बाबांनी समजावून सांगितले आहे - मुख्य ४ धर्म आहेत, जे धर्म स्थापन करतात, त्यांचे जे शास्त्र आहे त्याला धर्मशास्त्र म्हटले जाते. तर मुख्य ४ धर्म आहेत. बाकी सर्व छोटे-छोटे धर्म आहेत, ज्यांची मग वृद्धी होत राहील. इस्लामी धर्माचे आपले शास्त्र, बौद्धांचे आपले शास्त्र; तर धर्मशास्त्रे फक्त हीच आहेत. ब्राह्मण धर्म तर आत्ताचा आहे. ते लोक गातात - ब्राह्मण देवताय नमः…’ तर त्या ब्राह्मणांना समजावून सांगायचे आहे की, ‘परमात्मा जेव्हा येऊन ब्रह्माद्वारे ब्रह्मामुखवंशावली रचतात, तेच खरे ब्राह्मण आहेत. तुम्ही (ते दुनियेतील ब्राह्मण) काही प्रजापिता ब्रह्माची मुले नाहीच आहात. तुम्ही फक्त स्वतःला ब्राह्मण म्हणवता, परंतु अर्थ जाणत नाही’. ब्रह्मा भोजन जेव्हा खातात तेव्हा संस्कृतमध्ये श्लोक म्हणून ब्रह्मा भोजनाची महिमा गातात. ती सर्व महिमा निरर्थक पणे करतात. त्यांना विचारायला हवे की तुम्ही ब्राह्मण कसे काय असू शकता? पहिले तर ब्रह्मा पाहिजे, ज्याच्याद्वारे परमात्मा सृष्टी रचतील. तर सच्चे ब्राह्मण तुम्ही आहात. ब्राह्मणांना तर शेंडी दाखवतात ना. आणि विराट रूपामध्ये मग ब्राह्मणांना दाखवतच नाहीत. तर मग ब्राह्मण आले कोठून. तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणवता तर परमात्मा जेव्हा येऊन ब्रह्माद्वारे नवीन रचना रचतात, तेव्हा ब्राह्मण बनतात, आणि मग ब्राह्मणच देवता बनतात. ब्राह्मण संगमावरच असतात. कलियुगामध्ये सर्व शूद्र आहेत. ब्राह्मणांची खूप महिमा करतात. या सर्व गोष्टी बाबा समजावून सांगतात. अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही) विषयी सांगतात, त्यानंतर बाकी डिटेलमध्ये माहिती देतात. भक्तीबद्दल देखील समजावून सांगावे लागेल. बाबा म्हणतात - तुम्ही काही भक्त आहात काय! बाकी बाबा कधी रागावत नाहीत. बाबा समज तर देतील ना, कारण मुलांनी जर चूक केली तर नाव कोणाचे बदनाम होईल? शिवबाबांचे. म्हणून बाबा मुलांच्या कल्याणासाठी शिक्षा देतात. समजा यांच्याकडून (ब्रह्माकडून) कोणती चूक झाली तरी देखील त्यांना सुधारण्यासाठी ड्रामामध्ये लिहिलेले आहे. त्यातूनही फायदाच होईल कारण हा मोठा मुलगा आहे ना. सर्व मदार (भिस्त) याच्यावर आहे. याच्यामुळे काहीही नुकसान होणार नाही. हे म्हणाले - असे करा, तर तसे केले पाहिजे, तर नुकसानामधून देखील झाला तर फायदाच होईल, नुकसान होण्याचा काही प्रश्नच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याणच कल्याण आहे. अकल्याण देखील ड्रामामध्ये होते. चुका तर सर्वांकडून होत राहतील. परंतु शेवटी कल्याण तर कोणत्याही परिस्थितीत होणार आहे, कारण बाबा कल्याणकारी आहेत. सर्वांचे कल्याण करायचे आहे. सर्वांना सद्गती देतात. आता सर्वांची कयामतची वेळ (सर्वनाशाची वेळ) आहे. पापांचे ओझे सर्वांच्या डोक्यावर आहे तर सर्वांचा हिशोब चुकता होईल. सजा मिळण्यामध्ये वेळ लागत नाही. सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते, तर मग सेकंदामध्ये केलेल्या पापांची सजा भोगू शकत नाहीत काय! जसे काशी-कलवटमध्ये होते. शरीर सुटते. परंतु असे नाही की ते जाऊन शिवबाबांना भेटतात. नाही. फक्त मागील सर्व पापांचा हिशोब चुकता होऊन मग पुन्हा नव्याने हिशोब सुरू होतो. मधूनच कोणी परत जाऊ शकत नाही. भले ज्ञान सेकंदाचे आहे, परंतु अभ्यास तर करायचाच आहे. दररोज शिवबाबाची आत्मा, जे ज्ञानाचा सागर आहेत; तेच येऊन शिकवतात. श्रीकृष्ण तर देहधारी आहे. पुनर्जन्मामध्ये येतात. बाबा तर अजन्मा आहेत. ज्यांना शिकायचे नाहीये ते तर जरूर विघ्ने आणतील. यज्ञामध्ये विघ्ने तर येतीलच. अबलांवर अत्याचार होतील. ते सर्व काही कल्पापूर्वीप्रमाणे होत आहे. असूर कसे गोंधळ घालतात, चित्रे फाडतात, काही वेळा तर आग लावायला सुद्धा मागे-पुढे बघणार नाहीत. त्याला आम्ही तरी काय करणार. आतून समजतात भावी (नियती), बाहेरून मात्र आपल्याला पोलीस इत्यादींकडे तक्रार नोंदवावी लागेल. आतून आपण जाणतो की, कल्पापूर्वी जे झाले होते तेच होईल. यामध्ये दुःख होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जसे एखादे नुकसान झाले, एखादी वस्तू जशी धोब्याकडे दिल्यावर हरवून जावी, तशीच ती गोष्ट निघून गेली आहे; परंतु मग तिच्या जागी दुसरी एखादी गोष्ट निर्माण होईल.

बाबांनी सांगितले आहे - जिथेपण प्रदर्शनी इत्यादी करता तर त्याचा देखील ८ दिवसांसाठी इन्शुरन्स करून टाका. कोणी चांगला माणूस असेल तर पैसे देखील घेणार नाही. आणि जरी इन्शुरन्स केला नाही तरीही काय होईल. पुन्हा नवीन चांगली चित्रे बनतील. पावला-पावला मध्ये पद्म आहेत. तुमचे एक-एक पाऊल, एक-एक सेकंद खूप व्हॅल्युएबल आहे (मौल्यवान आहे). तुम्ही पदमपती बनता, २१ जन्मांसाठी बाबांकडून वारसा घेता तर किती चांगल्या प्रकारे समजावून सांगितले पाहिजे. तिथे स्वर्गामध्ये तुमच्याकडे अगणित धन असेल. मोजण्याचा प्रश्नच नाही. तर बाबा तुम्हाला किती धनवान, सुखी बनवतात. कमाई किती मोठी आहे. प्रजा देखील किती श्रीमंत बनते. हा आहे २१ जन्मांसाठी सोर्स ऑफ इन्कम. ही आहे मनुष्यापासून देवता बनण्याची पाठशाळा. शिकवतात कोण? बाबा. मग अशा शिक्षणामध्ये बेपर्वाई करता कामा नये. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) सदैव ही स्मृती रहावी की, या कल्याणकारी युगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण आहे; आमचे अकल्याण होऊच शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याणच आहे असे समजून सदैव निश्चिंत रहायचे आहे.

२) सदा गुलाब बनण्यासाठी पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. अभ्यासामध्ये बेपर्वाई करायची नाही. रुईचे फूल बनायचे नाही.

वरदान:- अमृतवेलेचे महत्व लक्षात घेऊन या वेळेला यथार्थ रित्या युज करणारे सदा शक्ती संपन्न भव
स्वतःला शक्ती संपन्न बनविण्यासाठी दररोज अमृतवेलेला शरीराने आणि मनाने फेरफटका मारा. जसा अमृतवेलेच्या समयाचा देखील सहयोग मिळत आहे, सतोप्रधान स्टेजच्या बुद्धीचा देखील सहयोग मिळत आहे, तर अशा वरदानी समयावर मनाची स्थिती देखील सर्वात शक्तिशाली स्टेजवाली पाहिजे. शक्तिशाली स्टेज अर्थात पित्यासमान बीजरूप स्थिती. साधारण स्थितीमध्ये तर कर्म करत असताना देखील राहू शकता, परंतु वरदानी समयाला यथार्थ पद्धतीने युज करा, म्हणजे मग कमजोरी (दुर्बलता) समाप्त होईल.
बोधवाक्य:- आपल्या शक्तिंच्या खजिन्याद्वारे शक्तिहीन, परवश (परावलंबी) आत्म्याला शक्तिशाली बनवा.

||| ओम शांती |||

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

जसे ब्रह्मा बाबा नेहमी आवाजापासून परे (आवाजाच्या पलिकडे) आपल्या श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित राहण्याचा अभ्यास करत राहिले. यामुळे ते सर्व व्यक्त आकर्षणांपासून दूर, शक्तिशाली न्यारे आणि प्यारे (अलिप्त, प्रिय) अशा स्थितीमध्ये राहिले. तशी तुम्ही मुले देखील त्या श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित राहण्याचा अभ्यास करत रहा, म्हणजे मग तुम्ही कर्म करताना देखील शांतीच्या शक्तीचा विशेष अनुभव करत रहाल. याच अभ्यासाद्वारे तुम्ही पित्यासमान संपन्न आणि संपूर्ण बनाल.

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.