| 28.11.2026 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो, सर्वांना एका बाबांचाच परिचय द्या, एका बाबांबरोबरच देवाणघेवाण करा, बाबांनाच आपला खरा पोतामेल द्या (हिशोब द्या)” | |
| प्रश्न:- | मुलांकडून अजूनपर्यंत अनेक प्रकारच्या चुका होत रहातात, याचे कारण काय आहे? |
| उत्तर:- | मुख्य कारण आहे - मुले, योगमध्ये खूप कच्ची आहेत. बाबांच्या आठवणीमध्ये रहाल तर कोणतेही वाईट काम होऊ शकत नाही. नावा-रूपामध्ये अडकाल तर योग लागू शकणार नाही. तुम्ही पतितापासून पावन बनण्याच्या धूनमध्ये रहा. निरंतर शिवबाबांच्या आठवणीमध्ये रहा, तुमचे आपसामध्ये शारीरिक प्रेम असता कामा नये. |
| गीत:- | जले न क्यों परवाना... |
ओम् शांती. ही भक्तिमार्गातील गाणी गायलेली आहेत. शेवटी ही सर्व बंद होतील, यांची आवश्यकता नाही. गायन देखील आहे एका सेकंदामध्ये बाबांकडून वारसा मिळतो. तुम्ही जाणता बेहदच्या बाबांकडून जीवनमुक्तीचा वारसा मिळतो. जीवनमुक्ती अर्थात या दुःख-धाममधून मुक्त, भ्रष्टपणातून मुक्त. आणि मग काय बनाल? त्याच्यासाठी एम ऑब्जेक्ट तर खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगायचे आहे. बाबांनी रात्रीला देखील समजावून सांगितले होते की, जेव्हा कोणीही जिज्ञासू येतात तेव्हा पहिले त्यांना सर्वश्रेष्ठ भगवंताचा परिचय द्या. तुम्हाला विचारतात की, ‘इथला उद्देश काय आहे?’ तर सर्वात पहिला परिचय द्यायचा आहे - बेहदच्या बाबांचा. आता ते म्हणत आहेत - ‘माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल’. गातात देखील - ‘हे पतित-पावन या’. तर जरूर बाबांकडे कोणती ऑथॉरिटी असेल ना. कोणता तरी पार्ट मिळालेला असेल. त्यांना सर्वोच्च पिता म्हणतात. ते भारतामध्येच येतात. भारतालाच येऊन सर्वश्रेष्ठ बनवतात. वैकुंठाची सौगात घेऊन येतात. मनुष्यसृष्टीमध्ये उच्च ते उच्च आहेत देवी-देवता, सूर्यवंशी घराणे, जे सतयुगामध्ये राज्य करत होते. सतयुग स्थापन करणारे सर्वश्रेष्ठ भगवानच आहेत. त्यांना म्हणतात देखील हेवन स्थापन करणारे, हेवनली गॉड फादर. ते पिता आहेत, त्यांच्यासाठी कधी असे म्हणू शकत नाही की बाबा सर्वव्यापी आहेत. सर्वव्यापी म्हटल्यामुळे पित्याचा वारसा गायब होतो. किती गोड गोष्टी आहेत, पिता अर्थात वारसा. जरूर आपल्या मुलांनाच वारसा देतील. सर्व मुलांचे पिता एकच आहेत. ते येऊन सुख-शांतीचा वारसा देतात, राजयोग शिकवतात. बाकीचे सर्व आत्मे तर हिशोब चुकता करून परत निघून जातील. आता जुनी दुनिया नष्ट होणार आहे. त्याच्यासाठी हे महाभारत युद्ध आहे. अनेक धर्मांचा विनाश आणि एका धर्माची स्थापना होणार आहे. बुद्धी देखील म्हणते - जरूर कलियुगाच्या नंतर सतयुग आले पाहिजे. देवी-देवतांचा इतिहास रिपीट होतो. गायले देखील आहे ब्रह्मा द्वारे स्थापना करतात. उच्च ते उच्च पद प्राप्त करून देतात.
बाबा म्हणतात - मुलांनो, या शेवटच्या जन्मी पवित्र बना. आता मृत्यूलोक मुर्दाबाद आणि अमरलोक जिंदाबाद होणार आहे. तुम्ही सर्व पार्वती आहात, अमर कथा ऐकत आहात. मुलगे आणि मुली दोन्ही अमर बनतील ना. याला अमरकथा म्हणा, तीजरीची कथा म्हणा. जास्त करून माताच कथा ऐकतात. अमरपुरीमध्ये पुरुष असणार नाहीत काय? दोघेही असतील, हे बाबाच समजावून सांगतात की, भक्तिमार्गाची शास्त्रे काय म्हणतात आणि बाबा काय म्हणतात. हे देखील सांगतात की, भक्तीचे फळ देण्यासाठी भगवान येतात. बरोबर सतयुगामध्ये या देवी-देवतांचेच विश्वावर राज्य होते. यांना हे फळ कोणी दिले? कोणताही साधू-संन्यासी इत्यादी तर देऊ शकणार नाही. हे देखील जाणता की भक्ती देखील सर्वजण एकसारखी करत नाहीत. जे खूप भक्ती करतील त्यांना फळ देखील जरूर तसेच मिळेल. जे पूज्य होते तेच पुजारी बनले, आता पुन्हा पूज्य बनतील. भक्तीचे फळ तर मिळणार ना. या सर्व गोष्टी देखील समजावून सांगायच्या आहेत. सर्वात पहिले त्रिमूर्तीच्या चित्रावर समजावून सांगायचे आहे. असे नाही की, पहिले शिडीच्या चित्रावर घेऊन जा. या आहेत सविस्तर गोष्टी. सर्वप्रथम परिचय द्यायचा आहे - बाबांचा. ते आहेत उच्च ते उच्च. मग ब्रह्मा-विष्णू-शंकर यांचा परिचय, आणि नंतर मग लक्ष्मी-नारायणाचा परिचय द्यायचा आहे. बाकी भक्तिमार्गाची चित्रे तर असंख्य आहेत. सर्वात पहिले हे सांगा की, बेहदचे बाबा आहेत - ज्यांच्याकडून आम्ही बेहद स्वर्गाचा वारसा घेतो. उच्च ते उच्च भगवान वारसा देखील उच्च ते उच्च देतात. भारतामध्ये शिवजयंती देखील साजरी केली जाते, जरूर हेवनली गॉडफादरने येऊन हेवन स्थापन केला असेल. बापच स्वर्ग स्थापन करतात आणि मग ५ हजार वर्षानंतर नरक बनतो. रामाला देखील यावे लागते, तर वेळेवर रावणाला देखील यावे लागते. राम वारसा देतात, रावण शाप देतो. ज्ञान अर्थात दिवस; दिवस संपून मग रात्र सुरु होते. दिवसामध्ये फक्त सूर्यवंशी, चंद्रवंशी आहेत. या गोष्टी थोडक्यात समजावून सांगण्यासाठी खूप सोप्या आहेत. सर्वप्रथम उच्च ते उच्च बाबांचा परिचय देऊन त्यांना पक्के केले पाहिजे. मूळ गोष्टच ही आहे. सतयुगामध्ये देवी-देवता घराणे होते, सतोप्रधान होते, नंतर मग सतो-रजो-तमोमध्ये आले. हे आहे चक्र. एकच गोष्ट कायम राहू शकत नाही. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हेच लक्षात रहावे की, उच्च ते उच्च बाबांची आठवण करायची आहे. या आठवणीमध्येच खूप कच्चे आहेत. बाबा (ब्रह्मा बाबा) देखील आपला अनुभव सांगतात - आठवणच वारंवार विसरायला होते, कारण यांना खूप जबाबदाऱ्यांचे विचार असतात. म्हणून तर म्हटले जाते - ‘जिनके मत्थे मामला’, ते आठवणी मध्ये कसे राहू शकतील. बाबांचा पूर्ण दिवस विचार चालू असतो. किती गोष्टी समोर येतात. बाबांना पहाटे उठून बसायला खूप मजा येते. नशा देखील असतो.
बस्स, ही स्थापना झाल्यानंतर पुन्हा मी विश्वाचा महाराजा बनेन. जसा बाबा आपला अनुभव सांगतात की, सर्वात पहिली मुख्य गोष्ट आहे - बाबांचा परिचय. बाकी ज्या काही गोष्टी कोणी बोलतील, तर त्यांना सांगा - त्याने काहीही फायदा नाही. आम्ही तुम्हाला त्या सर्वोच्च पित्याचा परिचय देतो. तेच आम्हाला विश्वाचा मालक बनण्याचा उच्च ते उच्च वारसा देतात. आर्य समाजी लोक देवतांच्या चित्रांना मानत नाहीत. तुमच्याजवळ चित्रे बघतात तेव्हा पण रागावतात. ज्यांना वारसा घ्यायचा असेल ते येऊन शांतीने ऐकत राहतील. मुख्य गोष्टच एक आहे आणि ती म्हणजे - त्या सर्वोच्च भगवंताची. ब्रह्मा-विष्णु-शंकराला सर्वोच्च म्हणत नाहीत. त्या सर्वोच्च बाबांकडूनच वारसा मिळतो. तेच पतित-पावन आहेत. ही गोष्ट पक्की करा. गॉड इज वन. बाबा अर्थात वारसा. भारतामध्ये येऊन वारसा देतात. ब्रह्मा द्वारे नवीन दुनियेची स्थापना आणि शंकरा द्वारे विनाश. या महाभारत युद्धामुळेच स्वर्गाची दारे उघडतात. पतितापासून पावन बनतात. बेहदच्या बाबांकडूनच भारताला वारसा मिळत आहे. या एका गोष्टी व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. बाबा म्हणतात - माझी आठवण करा म्हणजे तुमच्यातील गंज निघून जाईल. ही एक गोष्ट जेव्हा नीट समजेल तेव्हाच मग इतर गोष्टी समजावून सांगा. ही जी इतकी चित्रे आहेत ही विस्तार आहेत. आम्ही म्हणतो ज्ञान अमृत पिऊन पवित्र बना. ते म्हणतात विष पाहिजे. त्याच्यावर देखील हे चित्र आहे, म्हणून तर म्हणतात - ‘अमृत छोड़ विष काहे को खाये…’
हे रूहानी नॉलेज स्पिरिच्युअल फादरच देतात. ते बाबा सर्वव्यापी कसे बरे असतील. तुम्ही बाबांना सर्वव्यापी मानत असाल तर भले माना, आता आम्ही ते मानणार नाही. पूर्वी आम्ही मानत होतो. आता बाबांनी सांगितले आहे की ही एक चूक आहे. बाबांकडून तर वारसा मिळतो . आता भारत नरक आहे, त्याला पुन्हा आम्ही स्वर्ग अर्थात पवित्र गृहस्थ आश्रम बनवत आहोत. आदि सनातन देवी-देवतांचा पवित्र गृहस्थ आश्रम होता. आता आहे अपवित्र विकारी दुनिया. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. उच्च ते उच्च शिवबाबा, क्रियेटर आहेत, त्यांच्याकडून वारसा मिळतो. आता कलियुगामध्ये असंख्य मनुष्य आहेत, सतयुगामध्ये तर फार थोडे मनुष्य असतात. तर त्यावेळी बाकीचे सर्व शांतीधाममध्ये असतात. म्हणजे जरूर आता युद्ध होईल तेव्हाच तर मुक्तीमध्ये जातील. या सर्व गोष्टी मुलांच्या बुद्धीमध्ये राहिल्या पाहिजेत. मुलांनी सेवा जरूर करायची आहे. सेवेमुळेच उच्च पद प्राप्त कराल. असे नाही, आपसात पटले नाही तर शिवबाबांना विसरून जायचे अथवा शिवबाबांची सेवा करणे सोडून द्यायचे. मग तर हे पद भ्रष्ट होईल. मग ही सेवा करण्याऐवजी डिस-सर्विस कराल. आपसात लून-पाणी होऊन (कटुता आल्यामुळे) सेवा करायचे सोडून देणे, याच्याइतके वाईट काम दुसरे कोणतेच नाही. बाबांची आठवण करा तर कमाई देखील होईल. आता ज्ञान मिळाले आहे - होली बना (पवित्र बना) आणि बाबांची आठवण करा. धुरिया (धुळवड) म्हटले जाते - ज्ञानाच्या वर्षावाला. ज्ञान आणि विज्ञान म्हटले जाते. विज्ञान आहे - योग, ज्ञान आहे - सृष्टीचक्राचे. होळी-धुळवड, याचा अर्थ मनुष्य अजिबात समजत नाहीत. बाबांची आठवण करणे आणि सर्वांना ज्ञान सांगणे. बाबा पुन्हा-पुन्हा समजावून सांगतात की सर्वोच्च बाबांना सर्वव्यापी म्हणू शकत नाही. नाही तर स्वतः कोणाची आठवण करतात? बाबा म्हणतात - निरंतर माझी आठवण करा. परंतु रचयित्याला जाणत नाहीत तर मिळणार तरी काय? न जाणल्या कारणानेच सर्वव्यापी म्हणतात. तर सर्वोच्च हे सिद्ध करून समजावून सांगा म्हणजे मग सर्वव्यापीच्या गोष्टी बुद्धीमधून निघून जातील. आपण सर्व भाऊ आहोत. बाबा दर ५ हजार वर्षानंतर येऊन वारसा देतात. सतयुगामध्ये देवी-देवता असतील. बाकीचे सर्व मुक्तीमध्ये जातील. सर्वांना बाबांचा परिचय देत रहा. क्राईस्टची प्रार्थना करतात, तर सांगा - क्राईस्ट काही सर्वांचा फादर नाहीये ना. सर्वांचा फादर तर निराकार आहेत, ज्यांना आत्मा बोलावते - ‘ओ गॉड फादर’. क्राईस्ट त्यांचा सन (मुलगा) म्हणून गायला गेला आहे. मुलाकडून वारसा कसा मिळेल? क्राईस्ट तर रचना आहे. असे कोणत्याही शास्त्रामध्ये लिहिलेले नाही की, क्राईस्टची आठवण केल्याने आत्मा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनेल. हे केवळ एका गीतेमध्येच आहे की, ‘मामेकम् याद करो’. गॉड फादरचे शास्त्र आहेच मुळी - गीता. फक्त बाबांचे नाव बदलून श्रीकृष्णाचे नाव लिहून ठेवले आहे. ही चूक केली आहे. उच्च ते उच्च बाबा आहेत. तेच सुख-शांतीचा वारसा देतात. ‘शिव’चे चित्र सर्वांनी आपल्याजवळ ठेवायचे आहे. शिवबाबा हा वारसा देतात, आणि मग मुले ८४ जन्मांमध्ये तो गमावतात. शिडीच्या चित्रावर समजावून सांगायचे आहे - पतित-पावन बाबाच येऊन पावन बनण्याची युक्ती सांगतात. ते (दुनियावाले) ‘श्रीकृष्ण भगवानुवाच’ म्हणतात, तुम्ही ‘शिव भगवानुवाच’ म्हणता. पहिल्या मजल्यावर सर्वोच्च बाबा रहातात, मग दुसऱ्या मजल्यावर सूक्ष्मवतन. हा तिसरा मजला आहे. सृष्टी इथे आहे, नंतर मग सूक्ष्मवतनमध्ये जातात. तिथे ट्रिब्यूनल बसते, सजा मिळतात. सजा भोगून पवित्र बनून वरती घरी निघून जातात. बाबा सर्व मुलांना घेऊन जातात. आता आहे संगम; याला १०० वर्षे दिली पाहिजेत. मुले विचारतात - बाबा, स्वर्गामध्ये काय-काय असेल? बाबा म्हणतात - मुलांनो, ते पुढे गेल्यावर (भविष्यात) बघा. अगोदर तुम्ही बाबांना ओळखा, पतितापासून पावन बनण्याच्या धूनमध्ये रहा. स्वर्गामध्ये जे व्हायचे असेल ते होत राहील. तुम्ही असे पावन बना जेणेकरून बाबांचा नव्या दुनियेचा पूर्ण वारसा मिळेल. बाकी मधल्या काळात काय घडणार आहे, ते देखील पुढे गेल्यावर बघायचे आहे. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आठवण न राहिल्याकारणाने वेळेवर लक्षात येत नाही, विसरून जातात. मुलांनी कर्म देखील चांगली करायची आहेत. बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याने वाईट काम होणारच नाही. खूप जण वाईट कामे देखील करतात. असे थोडेच आहे की, याच ब्राह्मणीचे फक्त चांगले वाटते. ती ब्राह्मणी गेली तर स्वतः देखील खलास. ब्राह्मणी मुळे मरून जातात (येणे बंद करतात). एका अर्थाने, बाबांकडून वारसा घेण्यापासून मेले (वंचित राहिले). हे देखील दुर्दैव म्हटले जाते.
बरीच मुले एकमेकांच्या नावा-रूपामध्ये अडकून पडतात. इथे तुमचे शारीरिक प्रेम असता कामा नये. निरंतर शिवबाबांची आठवण करायची आहे. कोणाकडूनही काहीही द्यायचे-घ्यायचे नाहीये. तुम्ही बोला, आम्हाला का देता? तुमचा योग तर शिवबाबांशी आहे ना. जे डायरेक्ट देत नाहीत त्यांचे शिवबाबांकडे जमा होत नाही. ब्रह्मा द्वारे स्थापना होते तर त्यांच्याद्वारे सर्व काही करायचे आहे. मध्येच कोणी खाऊन टाकले तर शिवबाबांकडे जमा तर झाले नाही. शिवबाबांना द्यायचे असेल तर ब्रह्माद्वारे द्यायचे आहे. सेंटर देखील ब्रह्माद्वारेच उघडा. आपणच सेंटर उघडतात तर ते थोडेच सेंटर झाले! बाप-दादा दोघेही एकत्र आहेत. यांच्या हातात आले अर्थात शिवबाबांच्या हातात आले. कितीतरी सेंटर्स आहेत ज्यांचा कोणताही समाचारच येत नाही. लिहिले पाहिजे - शिवबाबा, तुमच्या सेंटरचा हा पोतामेल (हिशोब) आहे. शेठकडे पोतामेल आला पाहिजे ना. बऱ्याचजणांचे शिवबाबांकडे जमा होत नाही. एवढी देखील अक्कल नाहीये, भले ज्ञान तर भरपूर आहे, परंतु युक्ती करता येत नाही. बस्स, आम्ही सेंटर उघडले. अरे, तुम्ही ज्याला दिलेत, त्याने सेंटर उघडले. ते शिवबाबांनी थोडेच उघडले. ते सेंटर मग भरभराटीला देखील येत नाही. सेंटर उघडायचे असेल तर शिवबाबांच्या थ्रू. शिवबाबा आम्ही हे देत आहोत, याच्यासाठी वापरा. मुले चुका खूप करतात. ‘योग’मध्ये खूप कच्चे आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञानासोबतच आपले भविष्य बनविण्याची युक्ती देखील शिकायची आहे. एका बाबांकडूनच वारसा घ्यायचा आहे. देहधारीच्या मागे लागून कमनशिबी बनायचे नाही.
२) आपसामधील कोणत्याही गोष्टीवरून बाबांची सेवा सोडायची नाही. पहाटे लवकर उठून स्वतःशीच गोष्टी करायच्या आहेत. आठवण करण्याची मेहनत करायची आहे.
| वरदान:- |
आपल्या श्रेष्ठ धारणांसाठी त्यागामध्येच भाग्याचा अनुभव करणारे सच्चे त्यागी भव ब्राह्मणांची श्रेष्ठ धारणा आहे - ‘संपूर्ण पवित्रता’. याच धारणेसाठी गायन आहे - ‘प्राण जाए पर धर्म न जाये’. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्या या धारणेसाठी कोणताही त्याग करावा लागला, सहन करावे लागले, सामना करावा लागला, धाडस करावे लागले तरीही आनंदाने करा - याबाबतीत त्यागाला त्याग न समजता भाग्याचा अनुभव करा, तेव्हाच म्हणणार - खरे त्यागी. अशी धारणा असणारेच सच्चे ब्राह्मण म्हटले जातात. |
| बोधवाक्य:- | सर्व शक्तींना आपल्या ऑर्डरमध्ये (आज्ञेमध्ये) ठेवणारेच मास्टर सर्वशक्तिमान आहेत. |
हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.
जसे साकारमध्ये बघितले शेवटचा संपन्न आणि कर्मातीत स्टेजचा पार्ट ब्लेसिंग देण्याचा होता, बॅलन्सची देखील विशेषता आणि ब्लेसिंगची देखील कमाल होती. असे फॉलो फादर. सोपी आणि शक्तिशाली सेवा हीच आहे. आता विशेष आत्म्यांचा पार्ट ब्लेसिंग्ज देण्याचा आहे. भले मग दृष्टीद्वारे द्या, नाहीतर मस्तकमणीद्वारे द्या. कर्म करत असताना देखील कर्माच्या बंधनातून सदैव अतीत अर्थात न्यारे राहा. कधीही कर्मांच्या वशीभूत नसावे, कर्मेंद्रियांच्या द्वारे प्रत्येक कर्म करताना अधिकारीपणाच्या नशेमध्ये राहा, हीच संपूर्णतेची स्टेज आहे.