| 27.11.2026 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो, भारत सर्वांचे तीर्थस्थान आहे, त्यामुळे सर्वधर्मीयांना भारत तीर्थस्थानाची महिमा ऐकवा, सर्वांना संदेश द्या” | |
| प्रश्न:- | कोणत्या पुरुषार्थाद्वारे तुमची अंत मती सो गति होईल? तुम्ही निद्राजीत बनाल? |
| उत्तर:- | रात्री झोपायला जाता तेव्हा पहिले बाबांची आणि वारशाची आठवण करा, स्वदर्शन चक्र फिरवत रहा. जेव्हा झोप येईल तेव्हा झोपून जा, म्हणजे मग अंत मती सो गति होईल. सकाळी जेव्हा उठाल तेव्हा तेच पॉईंट्स आठवत राहतील. असा अभ्यास करत तुम्ही निद्रेला जिंकणारे बनाल. जो करेगा सो पायेगा (जे प्रयत्न करतात त्यांना त्याचे फळ नक्कीच मिळते). असा अभ्यास करणाऱ्यांचा व्यवहार प्रसिद्ध होत जातो. |
| गीत:- | जो पिया के साथ है… |
ओम् शांती. जो पिया के साथ है. आता दुनियेमध्ये पिता तर अनेक आहेत, परंतु त्या सर्वांचे पिता रचयिता एकच आहेत. तेच ज्ञानाचा सागर आहेत. ज्ञानाद्वारेच सद्गती होते. मनुष्याची सद्गती देखील तेव्हा होते जेव्हा सतयुगाची स्थापना होणार असते. बाबांनाच सद्गती दाता म्हटले जाते. जेव्हा संगमाची वेळ येईल तेव्हाच तर ज्ञानसागर येऊन सद्गती मध्ये घेऊन जातील. यावेळी तर सर्वांचीच दुर्गती आहे. दुर्गती देखील सर्वांची एक सारखी होत नाही. सर्वात प्राचीन भारत आहे. भारतवासीयांचेच ८४ जन्म गायले गेले आहेत. तर जरूर जे अगदी सुरुवातीचे मनुष्य असतील तेच ८४ जन्मांच्या लायक असतील. देवतांचे ८४ जन्म, तर ब्राह्मणांचे देखील ८४ जन्म आहेत. मुख्य जो असतो त्याच्या विषयीच सांगितले जाते. शिवबाबा, ब्रह्मा बाबांद्वारे नवीन सृष्टी रचण्याकरिता सर्वप्रथम सूक्ष्मलोकची रचना करतात, नंतर मग नवीन सृष्टीची स्थापना होते. त्रिलोकीनाथ एक बाबाच आहेत. बाकी त्यांची मुले देखील स्वतःला त्रिलोकीनाथ म्हणू शकतात. इथे तर बऱ्याच मनुष्यांनी देखील त्रिलोकीनाथ नाव ठेवले आहे. देवतांची डबल नावे देखील स्वतःला दिली आहेत - गौरीशंकर, राधेश्याम; आता राधा आणि कृष्ण हे दोघेही वेगवेगळ्या राज्यातील होते. जी चांगली मुले आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये खूप चांगल्या प्रकारे पॉईंट्सची धारणा असते. जो हुशार डॉक्टर असेल, त्याच्या बुद्धीमध्ये जास्त प्रमाणात औषधांची नावे असतील. इथे देखील दररोज नवीन-नवीन पॉईंट्स निघत असतात. ज्यांची चांगली प्रॅक्टिस असेल ते नवीन-नवीन पॉईंट्स धारण करत असतील. जे धारणा करत नाहीत त्यांना महारथी म्हटले जाणार नाही. सर्व आधार बुद्धीवर आहे आणि भाग्याची देखील गोष्ट आहे. हा देखील ड्रामा आहे. ड्रामाला कोणीही जाणत नाहीत. हे देखील समजतात की, मी आत्मा शरीर धारण करून पार्ट बजावत आहे. परंतु ड्रामाच्या आदि, मध्य, अंताला जाणत नाहीत तर जणू काहीही जाणत नाहीत. तुम्हाला तर जाणून घेतले पाहिजे. मुलांचे तर कर्तव्य आहे की, इतरांनाही बाबांचा परिचय देणे. संपूर्ण दुनियेला सांगायचे आहे, कोणीही असे म्हणू नये की, आम्हाला तर माहीतच नव्हते. परदेशातून देखील पुष्कळ येणार आहेत. त्या सर्वांसाठी मुंबईमध्ये प्रबंध करूया (राहण्याची व्यवस्था करूया). ते लोक तर आर्थिक दृष्ट्या समर्थ देखील आहेत. पैसे तर त्यांच्याकडे भरपूर आहेत. ‘शिव’ना आपला मोठा गुरु तर मानतील ना; म्हणून समजावून सांगितले जाते की, या धर्मपित्यांचा देखील काही ना काही पार्ट आहे. मुलांनी सुरुवातीला साक्षात्कार केला होता की, हे क्राईस्ट, इब्राहिम इत्यादी सर्व भेटण्यासाठी येतील. तर त्यांची फिल्ड (विंग) बनवली पाहिजे. सर्व टुरिस्ट इत्यादी मुंबईमध्ये येत असतात. सर्वांना भारत खूप आकर्षित करतो. खरेतर भारत हे, बाबांचे जन्मस्थान आहे. आणि मग सर्वांमध्ये भगवान आहेत असे म्हटल्याने बेहदच्या बाबांचे महत्वच नाहीसे करून टाकले आहे. आता तुम्ही सर्वांना समजावून सांगता की, भारत सर्वात मोठे तीर्थस्थान आहे. बाकी सर्व पैगंबर येतात आपला धर्म स्थापन करण्यासाठी. त्यांच्या मागोमाग मग त्यांच्या धर्माचे देखील येतात. आता आहे अंत. आपण परत जावे यासाठी प्रयत्न करतात. परंतु त्यांना विचारा की, तुम्हाला इथे आणले कोणी? क्राईस्ट ने ख्रिश्चन धर्म स्थापन केला, त्याने तुम्हाला इथे खेचून आणले का? आता सर्वजण थकले आहेत, परत जाण्याकरिता बेचैन झाले आहेत. सर्व येतातच मुळी पार्ट बजावण्याकरिता. पार्ट बजावता-बजावता सरते शेवटी दुःखामध्ये यायचेच आहे. मग दुःखातून सोडवून सुखामध्ये घेऊन जाणे हे तर बाबांचेच काम आहे. बाबांचे जन्म स्थान भारत आहे. इतके भारताचे महत्व तुम्ही मुलेच जाणता; जे जाणतात त्यांना हा नशा चढलेला आहे. कल्प-कल्प भारतामध्ये बाबा येतात. हे सर्वांना सांगायचे आहे, निमंत्रण द्यायचे आहे. रचनेच्या नॉलेजला कोणीही जाणत नाहीत. तर असे सेवाभावी म्हणून आपले नाव प्रसिद्ध केले पाहिजे. हा मेळा सर्वत्र जाईल. तर जी हुशार मुले आहेत त्यांची मदत मागत राहतात. त्यांच्या नावाचा जप करत राहतात. एक तर शिवबाबांचा जप करतात आणि दुसरे ब्रह्मा बाबांचा आणि तिसरे मग कुमारका दादी, गंगे दादी, मनोहर दादी, यांचा जप करतील. भक्तिमार्गामध्ये हातात माळा घेऊन जपत राहतात. आता मुखाने नाव जपतात. अमकी खूप सेवाभावी आहे, निरहंकारी आहे, गोड आहे, देह-अभिमान नाहीये. म्हणतात ना - घुर त घुराय ( स्नेह दयाल तर स्नेह मिळेल) आता बाबा म्हणतात - तुम्ही दुःखी बनला आहात.
तुम्ही माझी आठवण कराल तर मी देखील मदत करेन. तुम्ही जर
माझा तिरस्कार कराल तर हा जणू स्वतःचा तिरस्कार करत आहात, पद मिळणार नाही. धन किती अथाह मिळते. एखाद्याला लॉटरी लागते तर किती आनंद होतो. त्याच्यामध्ये देखील किती इनाम मिळतात. मग सेकंड प्राईज, थर्ड प्राईज देखील असते. ही देखील ईश्वरीय रेस आहे (शर्यत आहे). ज्ञान आणि योगाची शर्यत आहे, जे यामध्ये वेगाने पुढे जातील तेच गळ्यातील हार बनतील आणि तख्तावर (सिंहासनावर) अगदी जवळ बसतील.
तुम्ही सर्व कर्मयोगी आहात. आपले घरदार देखील सांभाळा. क्लासमध्ये येऊन एक तास शिकायचे आहे. आणि मग घरी जाऊन रिवाईज करायचे आहे. स्कूलमध्ये देखील असेच करतात ना. शिकून मग घरी जाऊन रिवाईज करतात. बाबा म्हणतात - एक तास, अर्धा तास… दिवसामध्ये ८ तास असतात. त्यामध्ये देखील बाबा म्हणतात - एक तास, अच्छा ठीक आहे, अर्धा तास १५-२० मिनिटे देखील क्लासमध्ये शिकून मग धारणा करून मग काम-धंद्यामध्ये फेरी मारा. पूर्वी तुम्हाला बाबा बसवत असत की, बाबांच्या आठवणीमध्ये बसा. स्वदर्शन चक्र फिरवा. आठवणीचे ज्ञान तर होते ना. बाबांची आणि वारशाची आठवण करत, स्वदर्शन चक्र फिरवत जेव्हा वाटेल की झोप येत आहे, तेव्हा झोपून जा. म्हणजे मग अंत मती सो गति होईल. आणि मग सकाळी जेव्हा उठाल तेव्हा तेच पॉईंट्स आठवत राहतील. असा अभ्यास करता-करता तुम्ही झोपेला जिंकणारे बनाल. जो करेगा सो पायेगा. जो करणार असतो तो दिसून येतो, त्याचे वर्तन प्रसिद्ध होते. दिसून येते की, हे विचार सागर मंथन करतात, धारणा करतात, कोणता लोभ इत्यादी तर नाहीये. हे शरीर जुने आहे, याची देखील खूप काळजी घ्यायची आहे. हे ठीक देखील तेव्हा राहील जेव्हा ज्ञान-योगाची पूर्ण धारणा असेल. धारणा नसेल तर शरीर अजूनच सडत जाईल. सडता-सडता एकदमच कब्रदाखल होईल. नवीन शरीर मग भविष्यामध्ये मिळणार आहे. आत्म्याला पवित्र बनवायचे आहे. हे तर जुने मूत-पलिती शरीर आहे. याला कितीही पावडर लावा तरी देखील वर्थ नॉट ए पेनी आहे. आता तुम्हा सर्वांचा साखरपुडा शिवबाबांसोबत झाला आहे. जेव्हा लग्न होते तेव्हा त्यादिवशी जुने कपडे घालतात. आता या शरीराचा जास्त स्थूल शृंगार करायचा नाही. ज्ञान-योगाद्वारे स्वतःला सजवाल तर पऱ्या बनाल. हे आहे ज्ञान-मानसरोवर. यामध्ये ज्ञानाची डुबकी मारत राहा तर तुम्ही स्वर्गाच्या पऱ्या बनाल. प्रजेला परी म्हणणार नाही. म्हणतात की, श्रीकृष्णाने पळवून नेले आणि महाराणी, पट्टराणी बनवले. असे तर म्हणणार नाही की, पळवून नेले आणि प्रजे मध्ये चांडाळ बनवले. पळवले आहे पट्टराणी बनविण्याकरिता. तुम्हाला देखील असा पुरुषार्थ केला पाहिजे. असे नाही की, जे पद मिळेल ते चालेल. ही पाठशाळा आहे. इथे मुख्य आहे शिक्षण. गीतापाठशाळा भरपूर बनवतात. बसून गीता ऐकवतात, पाठांतर करून घेतात. कोणताही एक श्लोक घेऊन त्याच्यावर मग सविस्तरपणे समजावून सांगतात. कोणी असेच वाचून दाखवतात, कोणी मग एका श्लोकावर अर्धा-पाऊण तास भाषण करतात, त्याने फायदा तर काहीच नाही. इथे तर बाबा बसून शिकवत आहेत, एम ऑब्जेक्ट स्पष्ट आहे. आणि वेद-शास्त्र वाचण्यामागे कोणतेही एम ऑब्जेक्ट नाहीये. पुरुषार्थ करत राहा परंतु प्रत्यक्षात तुम्हाला काय मिळणार? जेव्हा जास्त भक्ती करतात तेव्हा भगवान भेटतात. ते देखील रात्रीच्या नंतर दिवस जरूर होईल. कल्पाचे आयुष्य कोणी काय सांगतात, आता ते समजावून सांगण्याची देखील ताकद पाहिजे. हे कार्य योग-बलाद्वारेच पूर्ण केले जाऊ शकते. जर करू शकत नसाल तर जणू ताकद नाहीये. योग नाही आहे. बाबा देखील मदत त्यांना करतात जी मुले योगयुक्त आहेत. ड्रामामध्ये जे आहे ते रिपीट होते. एक-एक सेकंद जो निघून जातो, टिक-टिक होत राहते. आम्ही श्रीमताद्वारे ॲक्टमध्ये येतो. श्रीमतावर चालला नाहीत तर तुम्ही श्रेष्ठ बनणार नाही. नंबरवार तर आहेत ना. या लोकांना (दुनियेतील लोकांना) वाटते की आपण सर्वांनी एक व्हावे, परंतु त्यांना त्याचा अर्थच माहिती नाहीये. त्यांनी कोणत्या रूपामध्ये एक व्हायला हवे? त्यांनी सर्वांनी मिळून एक पिता बनले पाहिजे की सर्वांनी एक भाऊ बनले पाहिजे? जर असे म्हणत असाल की सर्वांनी भाऊ बनावे, तर ते देखील ठीक आहे. श्रीमताद्वारे खरोखर आपण सर्व एक बनू शकतो. तुम्ही सर्व एक मतावर चालता. तुमचे पिता, टीचर, गुरु एकच आहेत. जे पूर्णपणे श्रीमतावर चालणार नाहीत ते श्रेष्ठ बनू शकणार नाहीत. जर तुम्ही श्रीमताचे अजिबात पालन केले नाहीत तर संपून जाल. शर्यतीमध्ये जे लायक हुशार असतात त्यांनाच ठेवतात. मोठ्या शर्यतीमध्ये चांगले घोडे घेतात कारण बक्षीस देखील खूप मोठे ठेवतात. ही देखील ह्यूमन अश्व रेस आहे (मानवी घोड्यांची शर्यत आहे). हुसेनचा घोडा देखील दाखवतात.
तुम्ही मुले जाणता की हिंसा दोन प्रकारची असते. एक नंबरची हिंसा आहे काम-कटारीची, ज्यामुळे अर्ध्या कल्पापासून आपला देखील खून आणि दुसऱ्यांचा देखील खून करत आले आहेत. या हिंसेला कोणीही जाणत नाहीत. संन्यासी देखील असे समजत नाहीत, ते फक्त एवढेच म्हणतात की, हा विकार आहे. बाबा तर म्हणतात - मुलांनो, हा काम विकार महाशत्रू आहे, हा आदि-मध्य-अंत दुःख देणारा आहे. हे देखील सिद्ध करून सांगायचे आहे की, आमचा प्रवृत्ती मार्ग आहे, राजयोग आहे; तुमचा आहे हठयोग. तुम्ही शंकराचार्यां कडून हठयोग शिकता. आम्ही शिवाचार्यां कडून राजयोग शिकतो. पुढे जाऊन तुमची प्रत्यक्षता जरूर होईल. काहीजण प्रश्न विचारतात की, देवतांचे ५ हजार वर्षांमध्ये ८४ जन्म झाले, मग ख्रिश्चनांचे किती झाले? क्राईस्टला २ हजार वर्षे झाली, आता हिशोब करा - त्यांचे सरासरी किती जन्म झाले? ३०-३२, एवढे तर क्लिअर आहे. जे खूप सुख बघतात ते खूप दुःख देखील बघतात. बाकीच्या धर्मातील लोकांना कमी सुख, तर दुःख देखील कमी मिळते. सरासरीमध्ये हिशोब काढायचा आहे. मुख्य जे प्रीसेप्टर्स आहेत (धर्मस्थापक आहेत) त्यांच्या एकूण जन्मांची संख्या शोधून काढतील. पाठीमागून जे येतात ते थोडे-थोडे जन्म घेतात. बुद्धाचा, इब्राहिमचा देखील हिशोब काढू शकता. फार-फार तर एक-दोन जन्मांचा फरक पडेल. खात्रीने सांगू शकत नाही, सर्वसाधारण अंदाज समजावून सांगतात. या सर्व गोष्टींवर विचार सागर मंथन करायचे आहे. जर कोणी तुम्हाला विचारले, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? तुम्ही सांगा की, पहिली बाबांची आठवण करा कारण बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. जितके जन्म घेतले असतील तितकेच घ्याल. बाबांकडून वारसा घ्या. व्यवस्थित समजावून सांगायचे आहे. मेहनतीचे काम आहे.
मुंबईमध्ये मुले खूप मेहनत करत आहेत कारण त्यांना खूप यशस्वी व्हायचे आहे. यामध्ये बुद्धी पाहिजे, बाबांच्या धनावर खूप प्रेम असले पाहिजे. काही लोक तर हे धन (ज्ञानरूपी धन) घेत नाहीत. अरे, ज्ञान-रत्ने घ्या आणि धारण करा. तर म्हणतात - ‘आम्ही काय करणार! आम्हाला हे काहीच समजत नाहीये’. जर समजत नसेल तर तुमची भावी (तुमचे नशीब). अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ज्ञान-योगाची धारणा करायची आहे. कोणत्याही वस्तूविषयी मोह ठेवायचा नाही. या ज्ञान-योगाने सजायचे आहे, स्थूल शृंगाराने सजायचे नाही.
२) एक तास, अर्धा तास अभ्यास जरूर करायचा आहे. ज्ञान आणि योगामध्ये रेस (शर्यत) करायची आहे.
| वरदान:- |
संगमयुगाच्या श्रेष्ठ चित्राला समोर ठेवून भविष्याचे दर्शन करणारे त्रिकालदर्शी भव भविष्यातील सर्व प्राप्तींचा अनुभव तुम्ही संगमयुगी ब्राह्मण आत्ताच करता. आता तुम्ही डबल ताज, तख्त, तिलकधारी, सर्व अधिकारांनी संपन्न अशा मूर्ती बनता. भविष्यामध्ये तर गोल्डन स्पून असेल, परंतु आता हिरे तुल्य बनता. पूर्ण जीवनच हिरा बनते. तिथे सोने आणि हिऱ्यांच्या झोपाळ्यामध्ये झोके घ्याल, इथे बापदादांच्या मांडीवर, अतींद्रीय सुखाच्या झोपाळ्यामध्ये झोके घेता. तर त्रिकालदर्शी बनून वर्तमानातील आणि भविष्यातील श्रेष्ठ चित्राला पाहून सर्वप्राप्तींचा अनुभव करा. |
| बोधवाक्य:- | कर्म आणि योग यांचा बॅलन्सच परमात्म ब्लेसिंगचा (वरदानांचा) अधिकारी बनवतो. |
हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.
तुम्ही प्रत्येक ब्राह्मण पित्यासमान चैतन्य चित्र बना, लाईट आणि माईट हाऊसची झाँकी बना. संकल्प शक्तीवर, सायलेन्सच्या शक्तीवर भाषण तयार करा आणि कर्मातीत स्टेजवर वरदानीमूर्तचा पार्ट बजावा; तेव्हाच संपूर्णता समीप येईल. आणि मग सेकंदापेक्षाही वेगाने जिथे कर्तव्य करायचे असेल तिथे वायरलेस द्वारा डायरेक्शन देऊ शकाल. सेकंदामध्ये कर्मातीत स्टेजच्या आधारे संकल्प केला आणि जिथे पाहिजे तिथे तो संकल्प पोहोचावा.