मराठी मुरली · Brahma Kumaris

मराठी मुरली · 19 ऑक्टोबर, 2024

ओम शांती · BapDada ·

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली19 ऑक्टोबर, 2024 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

19.10.2024
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो - सदैव आनंदी रहा तर आठवणीची यात्रा सोपी होईल, आठवण केल्यानेच २१ जन्मांसाठी पुण्य आत्मा बनाल”
प्रश्न:- तुमचे सर्वात चांगले नोकर अथवा गुलाम कोण आहेत?
उत्तर:- नैसर्गिक आपत्ती आणि विज्ञानाने लावलेले शोध, ज्यामुळे साऱ्या विश्वातील घाण साफ होते. हे तुमचे सर्वात चांगले नोकर किंवा गुलाम आहेत, जे सफाई करण्यासाठी मदतगार बनतात. संपूर्ण प्रकृती तुमच्या अधिकारामध्ये राहते.

ओम् शांती. गोड-गोड रूहानी मुले काय करत आहेत? युद्धाच्या मैदानावर उभे आहेत. उभे तर नाहीत, तुम्ही तर बसले आहात ना. तुमचे सैन्य किती छान आहे. याला म्हटले जाते - रूहानी बाबांची रूहानी सेना. रूहानी बाबांसोबत योग लावून रावणावर विजय प्राप्त करण्याचा किती सोपा पुरुषार्थ करून घेतात. तुम्हाला म्हटले जाते गुप्त योद्धे (सैनिक), गुप्त महावीर. ५ विकारांवर तुम्ही विजय प्राप्त करता, त्यामध्ये देखील पहिला आहे देह-अभिमान. बाबा, विश्वावर विजय प्राप्त करण्यासाठी किंवा विश्वामध्ये शांती स्थापन करण्याकरिता किती सोपी युक्ती सांगतात. तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही हे जाणत नाही. तुम्ही विश्वामध्ये शांतीचे राज्य स्थापन करत आहात. तिथे (सतयुगामध्ये) अशांती, दुःख, रोगाचे नामो-निशाण सुद्धा नसते. हे शिक्षण तुम्हाला नव्या दुनियेचा मालक बनविते. बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, काम विकारावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही २१ जन्मांकरिता जगतजीत बनता’. हे तर अगदी सोपे आहे. तुम्ही आहात शिवबाबांची रूहानी सेना. रामाची गोष्ट नाही, कृष्णाची सुद्धा गोष्ट नाहीये. राम म्हटले जाते परमपिता परमात्म्याला. बाकी ते जी रामाची सेना वगैरे दाखवतात, ते सर्व चुकीचे आहे. गायले देखील जाते ना - ‘ज्ञान सूर्य प्रगटा, अज्ञान अन्धेर विनाश’. कलियुग म्हणजे घोर अंधार आहे. किती भांडण-तंटे, मारामाऱ्या आहेत. सतयुगामध्ये या होत नाहीत. तुम्ही आपले राज्य बघा कसे स्थापन करत आहात. यामध्ये हाता-पायाचा काहीच वापर करत नाही, यामध्ये तर देहाचे भान सोडायचे आहे. तुम्ही घरी जरी राहत असाल तरी देखील पहिले हे आठवा की, ‘मी आत्मा आहे, देह नाही’. तुम्ही आत्मेच ८४ जन्म भोगता. आता हा तुमचा शेवटचा जन्म आहे. जुनी दुनिया नष्ट होणार आहे. याला म्हटले जाते पुरुषोत्तम संगमयुगाचे लीप युग. शेंडी छोटी असते ना. ब्राह्मणांची शेंडी प्रसिद्ध आहे. बाबा किती सहजपणे समजावून सांगतात. तुम्ही दर ५ हजार वर्षांनी येऊन बाबांकडून हे शिक्षण घेता, राज्य प्राप्त करण्यासाठी. एम ऑब्जेक्ट देखील समोर आहे - शिवबाबांकडून आम्हाला हे (लक्ष्मी-नारायण) बनायचे आहे. होय मुलांनो, का नाही. फक्त देह-अभिमान सोडून स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर पापे नष्ट होतील. तुम्ही जाणता, या जन्मामध्ये पावन बनल्याने आपण २१ जन्म पुण्य आत्मा बनतो, मग उतरण सुरू होते. हे देखील जाणता आमचेच ८४ चे चक्र आहे. सर्व दुनिया तर येणार नाही. ८४ च्या चक्रावाले आणि या धर्माचेच येतील. सतयुग आणि त्रेता बाबाच स्थापन करतात, जे आत्ता करत आहेत; आणि द्वापर-कलियुग रावणाची स्थापना आहे. रावणाचा पुतळा देखील आहे ना, वरती गाढवाचे डोके आहे; विकारी तट्टू बनतात. तुम्ही समजता देखील की, आपण काय होतो! ही आहेच पाप-आत्म्यांची दुनिया. पाप-आत्म्यांच्या दुनियेमध्ये करोडो मनुष्य आहेत. पुण्य-आत्म्यांच्या दुनियेमध्ये सुरवातीला ९ लाख असतात. तुम्ही आता साऱ्या विश्वाचे मालक बनता. हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते ना. स्वर्गाची बादशाही तर जरूर बाबाच देतील. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला विश्वाची बादशाही देण्यासाठी आलो आहे. आता पावन जरूर बनावे लागेल. ते सुद्धा या मृत्यूलोकातील अंतिम जन्मामध्ये पावन बना’. या जुन्या दुनियेचा विनाश समोर तयारीत आहे. बॉम्ब्स इत्यादी सर्व असे तयार करत आहेत की तिथे घरबसल्या मारून टाकतील. म्हणतात देखील घरबसल्या जुन्या दुनियेचा विनाश करून टाकू. हे बॉम्ब्स इत्यादी घरबसल्या असे सोडतील की साऱ्या दुनियेला संपवून टाकतील. तुम्ही मुले घरबसल्या योगबलाद्वारे विश्वाचे मालक बनता. तुम्ही योगबलाने शांती स्थापन करत आहात. ते विज्ञानाच्या बळाने सारी दुनिया संपवून टाकतील. ते तुमचे नोकर आहेत. तुमची सेवा करत आहेत. जुनी दुनिया नष्ट करून टाकतात. नैसर्गिक आपत्ती इत्यादी हे सर्व तुमचे गुलाम बनतात. संपूर्ण प्रकृती तुमची गुलाम बनते. तुम्ही फक्त बाबांसोबत योग लावता. तर तुम्हा मुलांना आतून खूप आनंद झाला पाहिजे. अशा अतिप्रिय बाबांची किती आठवण केली पाहिजे. हाच पूर्ण भारत शिवालय होता. सतयुगामध्ये आहेत संपूर्ण निर्विकारी, इथे आहेत विकारी. आता तुम्हाला स्मृती आली आहे - बरोबर बाबांनी आम्हाला सांगितले आहे - हियर नो इविल… घाणेरड्या गोष्टी ऐकू नका. तोंडाने बोलूसुद्धा नका. बाबा समजावून सांगत आहेत - ‘तुम्ही किती गलिच्छ बनले आहात. तुमच्याकडे तर अमाप संपत्ती होती. तुम्ही स्वर्गाचे मालक होता. आता तुम्ही स्वर्गा ऐवजी नरकाचे मालक बनले आहात’. हा देखील ड्रामा पूर्वनियोजित आहे. दर ५ हजार वर्षांनंतर तुम्हा मुलांना मी रौरव नरकातून काढून स्वर्गामध्ये घेऊन जातो. रूहानी मुलांनो, मी सांगितलेले तुम्ही ऐकणार नाही का? परमात्मा म्हणतात - ‘तुम्ही पवित्र दुनियेचे मालक बना, तर बनणार नाही काय?’

विनाश तर जरूर होणार आहे. या योगबलाद्वारेच तुमची जन्मो-जन्मीची पापे नष्ट होतील. तसे तर जन्मो-जन्मींची पापे नष्ट होण्यासाठी वेळ लागतो. मुले अगदी सुरुवातीपासून आलेली आहेत परंतु १० टक्केसुद्धा योग लागत नाही त्यामुळे पापे नष्ट होत नाहीत. नवी-नवी मुले पटकन योगी बनतात तर पापे नष्ट होतात आणि सेवा करायला लागतात. तुम्ही मुले समजता आता आपल्याला परत जायचे आहे. बाबा घेऊन जाण्यासाठी आले आहेत. पाप-आत्मे काही शांतीधाम-सुखधामला जाऊ शकणार नाहीत, ते तर दुःखधाममध्ये राहतात. म्हणून आता बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुमची पापे भस्म होतील. अरे मुलांनो, गुल-गुल (फूल) बना. दैवी कुळाला कलंक लावू नका. तुम्ही विकारी बनल्यामुळे किती दुःखी झाला आहात’. हा देखील ड्रामाचा खेळ पूर्वनियोजित आहे. पवित्र बनला नाहीत तर तुम्ही पवित्र दुनिया स्वर्गामध्ये येणार नाही. भारत स्वर्ग होता, कृष्णपुरीमध्ये होता, आता नरकवासी आहे. आता तुम्ही मुलांनी तर आनंदाने विकार सोडले पाहिजेत. विष पिणे ताबडतोब सोडायचे आहे. विष पिता-पिता तुम्ही वैकुंठामध्ये थोडेच जाऊ शकाल. आता हे (लक्ष्मी-नारायण) बनण्यासाठी तुम्हाला पवित्र बनायचे आहे. तुम्ही समजावून सांगू शकता - यांनी ही बादशाही कशी प्राप्त केली आहे? राजयोगाने. हे शिक्षण आहे ना. जसा बॅरिस्टरी योग, सर्जन योग असतो. सर्जनसोबत योग लावला तर सर्जन बनतील. हे मग आहे भगवानुवाच. रथामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) प्रवेश कसा करतात? म्हणतात - ‘अनेक जन्मांच्या शेवटी मी यांच्यामध्ये बसून तुम्हा मुलांना नॉलेज देतो’. जाणतो हे विश्वाचे मालक पवित्र होते. आता पतित कंगाल बनले आहेत पुन्हा पहिल्या नंबराला हेच जातील. यांच्यामध्येच मी प्रवेश करून तुम्हा मुलांना नॉलेज देतो. बेहदचे बाबा म्हणतात - ‘मुलांनो, पवित्र बना तर तुम्ही सदैव सुखी व्हाल. सतयुग आहे - अमरलोक, द्वापर-कलियुग आहे - मृत्यूलोक. किती चांगल्या प्रकारे मुलांना समजावून सांगतात. इथे देही-अभिमानी बनतात आणि मग देह-अभिमानामध्ये येऊन मायेकडून हार पत्करतात. मायेचा एकच तोफगोळा असा लागतो की एकदम गटारात जाऊन पडतात. बाबा म्हणतात हे (जुनी दुनिया) गटार आहे. इथे सुख थोडेच आहे? त्यापुढे स्वर्ग तर काय! या देवतांचे राहणे-करणे बघा कसे आहे. नावच आहे स्वर्ग. तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतात तरीही म्हणता, आम्ही विष जरूर पिणार! तर मग तुम्ही स्वर्गामध्ये येऊ शकणार नाही. सजा देखील खूप भोगाल. तुम्हा मुलांचे मायेशी युद्ध आहे. देह-अभिमानामध्ये येऊन खूप घाणेरडी कामे करतात. समजतात की, आम्हाला कोणी बघतात थोडेच. क्रोध-लोभ काही गुप्त तर राहत नाहीत. काम विकारामध्ये गुप्तता असते. तोंड काळे करतात. तोंड काळे करता-करता तुम्ही गोऱ्याचे सावळे बनले आहात तर सारी दुनियाच तुमच्या मागोमाग खाली आली. अशा पतित दुनियेला अवश्य बदलायचे आहे. बाबा म्हणतात - ‘तुम्हाला लाज वाटत नाही, एका जन्मासाठी पवित्र बनत नाही.’

भगवानुवाच - काम महाशत्रू आहे. खरे तर तुम्ही स्वर्गवासी होता तेव्हा इतके श्रीमंत होता की काही विचारूच नका. मुले म्हणतात - बाबा, आमच्या शहरामध्ये या. काय काट्यांच्या जंगलामध्ये माकडांना बघण्यासाठी येऊ! तुम्हा मुलांना ड्रामा अनुसार सेवा करायचीच आहे. गायले जाते - फादर शोज सन. मुलांनीच जाऊन सर्वांचे कल्याण करायचे आहे. बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - ‘हे विसरू नका की, आपण युद्धाच्या मैदानावर आहोत’. तुमचे युद्ध आहे ५ विकारांसोबत. हा ज्ञानमार्ग एकदम वेगळा आहे. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला २१ जन्मांकरिता स्वर्गाचा मालक बनवतो, मग तुम्हाला नरकवासी कोण बनवतो? रावण. फरक तर बघत आहात ना. जन्म-जन्मांतर तुम्ही भक्तीमार्गामध्ये गुरू केले आहेत परंतु मिळाले काहीच नाही. यांना (शिवबाबांना) म्हटले जाते सद्गुरु. शीख लोक म्हणतात ना - ‘सतगुरु अकालमूर्त’. त्यांना कधी कोणता काळ खात नाही. ते सद्गुरु तर काळांचेही काळ आहेत. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा सर्व मुलांना काळाच्या पंजातून सोडविण्यासाठी आलो आहे. मग सतयुगामध्ये तर काळ येतच नाही, त्याला अमरलोक म्हटले जाते. आता तुम्ही श्रीमतावर सतयुगाचे मालक बनत आहात. तुमचे युद्ध पहा कसे आहे. सर्व दुनिया एकमेकांशी भांडण-तंटे करत राहते. आणि तुमचे मग आहे रावण ५ विकारांसोबत युद्ध. त्यांच्यावर विजय प्राप्त करता. हा आहे शेवटचा जन्म.

बाबा म्हणतात - ‘मी गरीब निवाज आहे. इथे येतातच गरीब. श्रीमंतांच्या तर नशीबातच नाहीये. संपत्तीच्या नशेमध्ये गुर्मीत असतात. हे सर्व नष्ट होणार आहे. फार थोडा वेळ शिल्लक आहे. ड्रामाचा प्लॅन आहे ना. हे इतके बॉम्ब्स इत्यादी बनवले आहेत, ते उपयोगात जरूर आणायचे आहेत. पूर्वी युद्ध तर बाण, तलवारी, बंदुकी इत्यादींनी होत असे. आता तर बॉम्ब्स अशी वस्तू निघाली आहे ज्यामुळे घरबसल्या मारून टाकतील. या वस्तू काही ठेवण्यासाठी थोड्याच बनवल्या आहेत. कधीपर्यंत ठेवणार, बाबा आले आहेत तर विनाशसुद्धा नक्की होणार आहे. ड्रामाचे चक्र फिरत राहते, तुमचे राज्य जरूर स्थापन होणार आहे. हे लक्ष्मी-नारायण कधी युद्ध करत नाहीत. भले शास्त्रांमध्ये दाखवले आहे - असुरांचे आणि देवतांचे युद्ध झाले; परंतु ते देवता सतयुगातील आहेत आणि हे असुर कलियुगातले आहेत. दोघे भेटणार कसे जे युद्ध होईल. आता तुम्ही समजता की, आम्ही ५ विकारांशी युद्ध करत आहोत. यांच्यावर विजय प्राप्त करून संपूर्ण निर्विकारी बनून निर्विकारी दुनियेचे मालक बनणार. उठता-बसता बाबांची आठवण करायची आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. काहीजणांच्या तर नशिबातच नाही आहे. योगबल असेल तरच विकर्मे विनाश होतील. संपूर्ण बनतील तेव्हाच संपूर्ण दुनियेमध्ये येऊ शकतील. बाबा देखील शंखध्वनी करत राहतात. त्यांनी (दुनियावाल्यांनी) मग भक्तीमार्गामध्ये शंख, तुतारी इत्यादी बसून बनवले आहे. बाबा तर या मुखाद्वारे (ब्रह्मा मुखाद्वारे) समजावून सांगतात. हे राजयोगाचे शिक्षण आहे. अतिशय सोपा अभ्यास आहे. बाबांची आठवण करा आणि भविष्य राज्याची आठवण करा. बेहदच्या बाबांना ओळखा आणि राज्य घ्या. या दुनियेला विसरून जा. तुम्ही बेहदचे संन्यासी आहात. तुम्ही जाणता ही जुनी दुनिया संपूर्ण नष्ट होणार आहे. या लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये फक्त भारतच होता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. १) आपल्या दैवी कुळाला कलंक लावायचा नाही. फूल बनायचे आहे. अनेक आत्म्यांच्या कल्याणाची सेवा करून बाबांचा शो करायचा आहे.
  2. २) संपूर्ण निर्विकारी बनण्यासाठी घाणेरड्या गोष्टी ना ऐकायच्या आहेत आणि ना तोंडाने बोलायच्या आहेत. ‘हियर नो इविल, टॉक नो इविल…’. देह-अभिमानाच्या आहारी जाऊन कोणतेही घाणेरडे काम करायचे नाही.
वरदान:- मनमनाभवच्या मंत्राद्वारे मनाच्या पाशातून सुटणारे निर्बंधन, ट्रस्टी भव
कोणतेही बंधन एक पिंजरा आहे. पिंजऱ्यातील मैना आता निर्बंधन, उडता पक्षी बनली आहे. भले शरीराचे काही बंधन असेलही तरीसुद्धा मन उडता पक्षी आहे कारण मनमनाभव झाल्याने मनाचे पाश तुटतात. संसार सांभाळण्याचे देखील बंधन नाही. ट्रस्टी होऊन सांभाळणारे नेहमी निर्बंधन राहतात. गृहस्थी अर्थात ओझे, ओझेवाला कधी उडू शकत नाही. परंतु ट्रस्टी असेल तर निर्बंधन आहे आणि उडत्या कलेद्वारे सेकंदामध्ये स्वीट होममध्ये पोहोचू शकतो.
बोधवाक्य:- उदासीनतेला आपली दासी बनवा, तिला चेहऱ्यावर दिसू देऊ नका.

||| ओम शांती |||

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.