मराठी मुरली · Brahma Kumaris

मराठी मुरली · 25 ऑक्टोबर, 2024

ओम शांती · BapDada ·

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली25 ऑक्टोबर, 2024 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

25.10.2024
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो - बाबांची एकदाच दृष्टी पडल्याने साऱ्या विश्वातील मनुष्यमात्र निहाल होतात (तृप्त होतात), म्हणूनच म्हटले जाते - नजर से निहाल…”
प्रश्न:- तुम्हा मुलांच्या मनामध्ये आनंदाचे ढोल वाजले पाहिजेत - कशासाठी?
उत्तर:- कारण तुम्ही जाणता - बाबा आले आहेत सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी. आता आपण आपल्या बाबांसोबत घरी (शांतीधाममध्ये) जाणार. हाहाकार झाल्यानंतर जयजयकार होणार आहे. बाबांच्या एका दृष्टीनेच संपूर्ण विश्वाला मुक्ती-जीवनमुक्तीचा वारसा मिळणार आहे. संपूर्ण विश्व तृप्त होईल.

ओम् शांती. रुहानी शिवबाबा बसून आपल्या रूहानी मुलांना समजावून सांगत आहेत. हे तर तुम्ही जाणता की तिसरा नेत्र सुद्धा असतो. बाबा जाणतात संपूर्ण दुनियेमध्ये जे पण आत्मे आहेत, सर्वांना वारसा देण्यासाठी मी आलो आहे. बाबांना तर वारसाच लक्षात राहील. लौकिक पित्याला देखील वारसाच लक्षात राहील. मुलांना वारसा देतील. मूल नसेल तर गोंधळून जातात की, आता वारसा कोणाला द्यावा. मग दत्तक घेतात. इथे तर बाबा बसले आहेत, यांची तर संपूर्ण दुनियेतील जे काही आत्मे आहेत, त्या सर्वांवर नजर जाते. जाणतात सर्वांना मला वारसा द्यायचा आहे. भले बसले इथे आहेत परंतु नजर साऱ्या विश्वावर आणि विश्वातील सर्व मनुष्य मात्रांवर आहे कारण सर्व विश्वालाच निहाल करायचे असते (तृप्त करायचे असते). बाबा समजावून सांगत आहेत - हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. तुम्ही जाणता बाबा आले आहेत सर्वांना शांतीधाम, सुखधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. सर्वजण तृप्त होणार आहेत. ड्रामा प्लॅन अनुसार कल्प-कल्प तृप्त होतील. बाबा सर्व मुलांची आठवण करतात. नजर तर जाते ना. सर्वच काही शिकणार नाहीत. ड्रामा प्लॅन अनुसार सर्वांना परत जायचे आहे कारण नाटक पूर्ण झाले आहे. थोडा काळ पुढे गेल्या नंतर आपणच समजतील की आता विनाश होणार आहे. आता नवीन दुनियेची स्थापना होणार आहे कारण आत्मा तर तशीही चैतन्य आहे ना. तर बुद्धीमध्ये येईल - बाबा आलेले आहेत. स्वर्गाची स्थापना होईल आणि आम्ही शांतीधाममध्ये निघून जाणार. सर्वांची गती होईल ना. आणि तुमची मात्र सद्गती होईल. आता बाबा आलेले आहेत. आपण स्वर्गामध्ये जाणार. जयजयकार होईल. आता तर खूप हाहाकार आहे. कुठे दुष्काळ पडत आहे, कुठे युद्ध चालू आहे, कुठे भूकंप होतात. हजारोंनी माणसे मरत असतात. मृत्यू तर होणारच आहेत. सतयुगामध्ये या गोष्टी नसतात. बाबा जाणतात आता मी जात आहे आणि मग संपूर्ण विश्वामध्ये जयजयकार होईल. मी भारतामध्येच जाणार. साऱ्या विश्वामध्ये भारत जणू काही एका गावाप्रमाणे आहे. बाबांसाठी तर गावच झाले. खूप थोडे मनुष्य असतील. सतयुगामध्ये संपूर्ण विश्व जसे एका छोट्याशा गावाप्रमाणे होते. आता तर किती वृद्धी झाली आहे. बाबांच्या बुद्धीमध्ये तर सर्व काही आहे ना. आता या शरीराद्वारे (ब्रह्मा तनाद्वारे) मुलांना समजावून सांगत आहेत. तुमचा तोच पुरुषार्थ चालतो जो कल्प-कल्प चालतो. बाबा देखील कल्पवृक्षाचे बीजरूप आहेत. हे आहे कॉर्पोरियल (साकारी) झाड. वर आहे इनकॉर्पोरियल (निराकारी) झाड. तुम्ही जाणता हे कसे बनले आहे. ही माहिती दुसऱ्या कोणत्याही मनुष्याला नाही. अज्ञानी आणि ज्ञानी यांच्यामधील फरक तर पहा. कुठे ज्ञानी लोक स्वर्गामध्ये राज्य करत होते, त्याला म्हटलेच जाते सचखंड, हेवन.

आता तुम्हा मुलांना आतून अतिशय आनंद झाला पाहिजे. बाबा आलेले आहेत, ही जुनी दुनिया तर जरूर बदलणार आहे. जितका-जितका जे पुरुषार्थ करतील, तसे पद प्राप्त करतील. बाबा तर शिकवत आहेत. या तुमच्या शाळेची तर खूप वृद्धी होत राहील. पुष्कळ विद्यार्थी होतील. सर्वांची शाळा एकत्र थोडीच असणार. इतके सगळे राहणार कुठे? तुम्हा मुलांच्या लक्षात आहे - आता आम्ही सुखधाममध्ये जात आहोत. जसे कोणी परदेशात जातात तर आठ-दहा वर्षे तिथे जाऊन राहतात ना. मग परत भारतामध्ये येतात. भारत तर गरीब आहे. विदेशी लोकांना इथे सुख वाटणार नाही. तसेही तुम्हा मुलांना देखील इथे सुख नाहीच आहे. तुम्ही जाणता आम्ही खूप उच्च शिक्षण शिकत आहोत, ज्याद्वारे आम्ही स्वर्गाचे मालक देवता बनतो. तिथे किती सुख असेल. त्या सुखाची सर्वजण आठवण करतात. या गावाची (कलियुगाची) तर आठवण सुद्धा येणार नाही, यामध्ये तर अथाह दुःख आहे. या रावण राज्यामध्ये, पतित दुनियेमध्ये आज अपार दुःख आहे उद्या मग अपार सुख असेल. आम्ही योग-बलाने अथाह सुखाची दुनिया स्थापन करत आहोत. हा राजयोग आहे ना. बाबा स्वतः म्हणतात - ‘मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. तर असे बनविणाऱ्या टीचरची आठवण केली पाहिजे ना’. टीचर शिवाय बॅरिस्टर, इंजिनियर इत्यादी थोडेच बनू शकतात. ही मग आहे नवीन गोष्ट. आत्म्यांना एका परमात्मा पित्यासोबत योग लावायचा आहे, ज्यांच्यापासून बहुकाळ (बराच काळ) दूर राहिले आहेत. ‘बहुकाळ’ म्हणजे काय? ते देखील बाबा आपणहूनच समजावून सांगत राहतात. मनुष्य तर लाखो वर्षे आयुष्य आहे असे म्हणतात. बाबा म्हणतात - ‘नाही, ते तर दर ५ हजार वर्षा नंतर तुम्ही जे सर्वात आधी हरवले होता तेच आधी येऊन बाबांना भेटता’. तुम्हालाच पुरुषार्थ करायचा आहे. गोड-गोड मुलांना कुठलाही त्रास देत नाहीत, फक्त म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजा’. जीव-आत्मा आहे ना. आत्मा अविनाशी आहे, जीव (शरीर) विनाशी आहे. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते, आत्मा कधी जुनी होत नाही. आश्चर्य आहे ना. शिकवणारा देखील वंडरफुल, शिक्षण देखील वंडरफुल आहे. कोणालाच आठवत नाही, विसरून जातो. आधीच्या जन्मामध्ये काय शिकत होतो, कोणाला आठवते का? या जन्मामध्ये तुम्ही शिकता, परंतु रिझल्ट नवीन दुनियेमध्ये मिळतो. हे फक्त तुम्हा मुलांनाच माहित आहे. हे लक्षात राहिले पाहिजे - आता हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, आम्ही नवीन दुनियेमध्ये जाणार आहोत. हे लक्षात राहिले तरी देखील तुम्हाला बाबांची आठवण राहील. आठवण राहण्यासाठी बाबा अनेक उपाय सांगतात. बाबा, पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु सुद्धा आहेत. तिन्ही रूपामध्ये आठवण करा. आठवणीत राहण्यासाठी किती युक्त्या सांगतात. परंतु माया विसरायला लावते. बाबा जी नवीन दुनिया स्थापन करत आहेत, बाबांनीच सांगितले आहे हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, हे लक्षात ठेवा, तरी देखील तुम्ही आठवण का करू शकत नाही आहात! युक्त्या सांगतात आठवणीत राहण्यासाठी. आणि त्याचबरोबर हे देखील सांगतात - माया अतिशय वाईट आहे. घडोघडी तुम्हाला विसरायला लावेल आणि देह-अभिमानी बनवेल त्यामुळे जितके होईल तितकी आठवण करत रहा. उठता-बसता, चालता-फिरता स्वतःला देहा ऐवजी देही (आत्मा) समजा. ही मेहनत आहे. नॉलेज तर खूप सोपे आहे. सर्व मुले म्हणतात - ‘आठवण टिकत नाही’. तुम्ही बाबांची आठवण करता, आणि माया मग आपल्याकडे खेचून घेते. यावरूनच हा खेळ बनला आहे. तुम्ही देखील समजता, आमचा बुद्धीयोग जो बाबांसोबत आणि अभ्यासाच्या विषयांमध्ये असला पाहिजे, तो नाही आहे, विसरून जातो. परंतु तुम्ही विसरता कामा नये. खरेतर या चित्रांची देखील आवश्यकता नाही परंतु शिकवताना काहीतरी समोर पाहिजे ना. कितीतरी चित्रे बनत असतात. पांडव गव्हर्मेंटचा प्लॅन बघा कसा आहे. त्या गव्हर्मेंटचे सुद्धा प्लॅन आहेत. तुम्हाला समजले आहे नवीन दुनियेमध्ये फक्त भारतच होता, खूप छोटा होता. संपूर्ण भारत विश्वाचा मालक होता. सर्व काही नवीन होते. दुनिया तर एकच आहे. ॲक्टर्ससुद्धा तेच आहेत, सृष्टी चक्र फिरत राहते. तुम्ही मोजाल, इतके सेकंद, इतके तास, दिवस, वर्ष पूर्ण झाले सृष्टीचक्र फिरतच राहील. आज-उद्या करता-करता ५ हजार वर्षे पूर्ण झाली. सर्व घडामोडी, खेळणे-बागडणे होत आले आहेत. किती प्रचंड मोठे बेहदचे झाड आहे. झाडाची पाने तर मोजू शकत नाही. हे झाड आहे. याचे फाउंडेशन (पाया) देवी-देवता धर्म आहे, नंतर मग हे मुख्य तीन धर्म निघाले आहेत. बाकी झाडाची पाने तर किती भरमसाठ आहेत. कोणाची ताकद नाही की मोजू शकतील. या समयी सर्व धर्मांच्या झाडाचा खूप विस्तार झालेला आहे. हे बेहदचे मोठे झाड आहे. हे सर्व धर्म आता राहणार नाहीत. आता बाकीचे सारे झाड उभे आहे परंतु फाउंडेशन राहिलेले नाही. वडाच्या झाडाचे उदाहरण एकदम अचूक आहे. हे एकच वंडरफुल झाड आहे, बाबांनी समजावून सांगण्यासाठी ड्रामामध्ये दृष्टांत म्हणून याचेच उदाहरण दिले आहे. फाउंडेशन तर नाही आहे. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. बाबांनी तुम्हाला किती समजूतदार बनवले आहे. आता देवता धर्माचे फाउंडेशनच राहिलेले नाही. बाकी काही खाणाखुणा शिल्लक आहेत - जणू पिठातल्या मीठा प्रमाणे. प्राय: (काही प्रमाणात) या खाणाखुणा शिल्लक राहिल्या आहेत. तर मुलांच्या बुद्धीमध्ये हे संपूर्ण ज्ञान आले पाहिजे. बाबांच्या देखील बुद्धीमध्ये ज्ञान आहे ना. तुम्हाला सुद्धा हे सर्व ज्ञान देऊन आप समान बनवत आहेत. बाबा बिजरूप आहेत आणि हे उलटे झाड आहे. हा खूप मोठा बेहदचा ड्रामा आहे. आता तुमची बुद्धी वरती (परमधाम मध्ये) आहे. तुम्ही बाबांना आणि रचनेला जाणले आहे. भले शास्त्रांमध्ये आहे परंतु ऋषी-मुनींना कसे कळणार. एकाला जरी माहित असते तरी पुढे परंपरा चालू राहील. गरजच नाही. जोपर्यंत सद्गती होत नाही तोपर्यंत असा मधूनच कोणीही परत जाऊ शकत नाही. नाटक पूर्ण होत नाही, जोपर्यंत बाबा इथे आहेत तोपर्यंत सर्व ॲक्टर्स इथेच राहणार; जेव्हा तिथे (परमधाम) एकदम रिकामी होईल तेव्हाच तर शिवबाबांची वरात जाईल. अगोदरच जाऊन बसणार नाहीत. तर बाबा बसून पूर्ण ज्ञान देतात. हे सृष्टीचे चक्र कसे रिपीट होते. सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग... नंतर मग संगमयुग येते. गायन आहे परंतु संगमयुग केव्हा असते, हे कोणालाच माहित नाही.

तुम्हा मुलांना समजले आहे - ४ युगे आहेत. हे आहे लीप युग, याला ‘मिडगेट’ (सर्वात छोटे युग) म्हटले जाते. श्रीकृष्णाला देखील ‘मिडगेट’ एकदम छोटा दाखवतात. तर हे आहे नॉलेज. या ज्ञानाची मोड-तोड करून भक्तीमध्ये काय-काय बनवून ठेवले आहे. ज्ञानाच्या पूर्ण धाग्याचाच गुंता झाला आहे. त्यांना समजावून सांगणारे एक बाबाच आहेत. प्राचीन राजयोग शिकविण्यासाठी विदेशामध्ये जातात. तो तर हाच आहे ना. प्राचीन अर्थात एकदम सुरुवातीचा. सहज राजयोग शिकविण्यासाठी बाबा आलेले आहेत. किती अटेंशन राहते. तुम्ही देखील खूप सतर्क राहता की स्वर्गाची स्थापना व्हावी. आत्म्याला आठवण तर येते ना. बाबा म्हणतात - ‘हे ज्ञान जे मी आता तुम्हाला देत आहे ते पुन्हा मीच येऊन देणार. या नवीन दुनियेसाठी हे नवीन ज्ञान आहे. हे ज्ञान बुद्धीमध्ये राहिले तर खूप आनंद होईल. आता खूप थोडा वेळ बाकी आहे. आता निघून जायचे आहे. एकीकडे आनंद होतो तर दुसरीकडे वाईट सुद्धा वाटते. अरे, असे गोड बाबा आम्हाला पुन्हा कल्पा नंतरच पहायला मिळणार. बाबाच मुलांना इतके सुख देतात ना. बाबा येतातच शांतीधाम-सुखधाममध्ये घेऊन जाण्याकरिता. तुम्ही शांतीधाम-सुखधामची आठवण करा तर बाबांची देखील आठवण येईल. या दु:ख धामला विसरून जा. बेहदचे बाबा बेहदच्या गोष्टी सांगतात. जुन्या दुनियेतून तुमचा मोह नष्ट होत जाईल तसतसा आनंद देखील होऊ लागेल. तुम्ही पुन्हा सुखधाममध्ये जाता. सतोप्रधान बनत जाल. कल्प-कल्प जे बनले आहेत तेच बनतील आणि त्यांनाच आनंद होईल मग हे जूने शरीर सोडून देतील. मग नवीन शरीर घेऊन सतोप्रधान दुनियेमध्ये येतील. हे नॉलेज नष्ट होईल. गोष्टी तर खूप सोप्या आहेत. रात्री झोपते वेळी अशा प्रकारे चिंतन करा तर आनंद वाटेल. आम्ही हे बनत आहोत. संपूर्ण दिवसामध्ये मी कोणते आसुरी वर्तन तर केले नाही? ५ विकारांपैकी कुठल्या विकाराने मला त्रास तर दिला नाही ना? लोभ तर आला नाही ना? असे स्वतःवर लक्ष ठेवायचे आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. १) योग बलाने अथाह सुखाची दुनिया स्थापन करायची आहे. या जुन्या दुःखी दुनियेला विसरून जायचे आहे. आनंद व्हावा की आम्ही सचखंडाचे मालक बनत आहोत.
  2. २) रोज आपणच आपल्याला तपासून पहायचे आहे की, संपूर्ण दिवसभरामध्ये कोणत्या विकाराने मला हैराण तर केले नाही ना? मी कोणते आसूरी काम तर केले नाही ना? मी लोभाला बळी तर पडलो नाही ना?
वरदान:- वरदात्याद्वारे सर्वश्रेष्ठ संपत्तीचे वरदान प्राप्त करणारे संपत्तीवान भव
एखाद्याकडे जर फक्त स्थूल संपत्ती असेल तरीही तो सदैव संतुष्ट राहू शकत नाही. स्थूल संपत्ती सोबतच जर सर्व गुणांची संपत्ती, सर्व शक्तींची संपत्ती आणि ज्ञानाची श्रेष्ठ संपत्ती नसेल तर संतुष्टता सदैव राहू शकत नाही. तुम्हा सर्वांजवळ ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. दुनियावाले फक्त स्थूल संपत्ती असणाऱ्याला श्रीमंत समजतात परंतु वरदाता बाबांद्वारे तुम्हा मुलांना ‘सर्वश्रेष्ठ संपत्तीवान भव’ हे वरदान मिळालेले आहे.
बोधवाक्य:- सच्च्या साधनेद्वारे ‘हाय-हाय’ला ‘वाह-वाह’मध्ये परिवर्तन करा.

||| ओम शांती |||

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.