| 26.12.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - तुम्ही आता शिक्षण शिकत आहात, हे शिक्षण आहे पतिता पासून पावन बनण्याचे, तुम्हाला हे शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे'’ | |
| प्रश्न:- | दुनियेमध्ये असे कोणते ज्ञान असताना देखील अज्ञान अंध:कार आहे? |
| उत्तर:- | मायेचे ज्ञान, ज्याद्वारे विनाश होतो. चंद्रापर्यंत जातात, हे ज्ञान खूप आहे परंतु नवीन दुनिया आणि जुनी दुनिया याविषयीचे ज्ञान कोणाकडेच नाही आहे. सर्व अज्ञान अंध:कारामध्ये आहेत, सर्वजण ज्ञान नेत्राने आंधळे आहेत. तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो. तुम्ही नॉलेजफुल मुले जाणता की, त्यांच्या डोक्यामध्ये विनाशाचे विचार आहेत, तुमच्या बुद्धीमध्ये स्थापनेचे विचार आहेत. |
ओम् शांती. बाबा या शरीराद्वारे समजावून सांगतात, याला जीव म्हटले जाते, यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) आत्मा देखील आहे आणि मी देखील यांच्यामध्ये येऊन बसतो, सर्वात आधी तर हे पक्के केले पाहिजे. यांना दादा म्हटले जाते. हा निश्चय मुलांना खूप पक्का झाला पाहिजे. या निश्चयामध्येच ज्ञानाचे मंथन करत रहायचे आहे. बरोबर बाबांनी ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे, ते बाबा स्वतः म्हणतात - ‘मी यांच्या अनेक जन्मांच्या अंतामध्ये येतो’. मुलांना समजावून सांगितले गेले आहे, हे आहे सर्व शास्त्र शिरोमणी गीतेचे ज्ञान. श्रीमत अर्थात श्रेष्ठ मत. श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत आहे एका भगवंताचे. ज्यांच्या श्रेष्ठ मताद्वारेच तुम्ही देवता बनता. बाबा स्वतः म्हणतात - ‘मी येतोच तेव्हा जेव्हा तुम्ही भ्रष्ट मताने पतित बनता’. मनुष्या पासून देवता बनण्याचा अर्थ देखील समजून घ्यायचा आहे. विकारी मनुष्या पासून निर्विकारी देवता बनविण्यासाठी बाबा येतात. सतयुगामध्ये मनुष्यच असतात परंतु दैवी गुणवाले. आता कलियुगामध्ये आहेत सर्व आसुरी गुणवाले. आहे सर्व मनुष्य सृष्टीच. परंतु ही आहे ईश्वरीय बुद्धी आणि ती आहे आसुरी बुद्धी. इथे आहे ज्ञान, तिथे आहे भक्ती. ज्ञान आणि भक्ती वेग-वेगळे आहे. भक्तीसाठीची पुस्तके किती ढीगभर आहेत. ज्ञानाचे पुस्तक एकच आहे. एका ज्ञान सागराचे पुस्तक एकच असायला हवे. जो कोणता धर्म स्थापन करतात, त्यांचे पुस्तक देखील एकच असते, ज्याला रिलीजस बुक (धर्मग्रंथ) म्हटले जाते.
सर्वात पहिले रिलीजस बुक (धर्मग्रंथ) आहे - गीता. सर्वात पहिला आदि सनातन देवी-देवता धर्म आहे ना की हिंदू धर्म. मनुष्य समजतात गीते द्वारे हिंदू धर्म स्थापन झाला. गीतेचे ज्ञान श्रीकृष्णाने दिले. केव्हा दिले? परंपरेने. कोणत्या शास्त्रामध्ये शिव भगवानुवाच तर नाहीच आहे. तुम्ही आता समजता या गीता ज्ञाना द्वारेच मनुष्या पासून देवता बनले आहेत, जे ज्ञान आता आपल्याला बाबा देत आहेत. यालाच भारताचा प्राचीन राजयोग म्हटले जाते. ज्या गीतेमध्येच काम विकाराला महाशत्रू असल्याचे लिहिलेले आहे. या शत्रूनेच तुम्हाला पराभूत केलेले आहे. बाबा यावरच विजय प्राप्त करवून जगतजीत विश्वाचे मालक बनवतात. बेहदचे बाबा बसून यांच्या द्वारे तुम्हाला शिकवतात. ते (शिवबाबा) आहेत सर्व आत्म्यांचे पिता. हे (ब्रह्मा बाबा) आहेत सर्व मनुष्य आत्म्यांचे बेहदचे पिता. नावच आहे प्रजापिता ब्रह्मा. तुम्ही कोणालाही विचारू शकता की, ‘ब्रह्माच्या पित्याचे नाव काय आहे’, तर गोंधळात पडतील. ब्रह्मा, विष्णू, शंकर या तिघांचा कोणी तरी पिता असेल ना. ब्रह्मा, विष्णू, शंकर हे सूक्ष्म वतनमध्ये देवता आहेत. त्यांच्या वरती आहेत शिव. मुले जाणतात - शिवबाबांची मुले जे आत्मे आहेत त्यांनी शरीर धारण केले आहे; ते बाबा तर सदैव निराकार परमपिता परमात्मा आहेत. आत्माच शरीराद्वारे म्हणते - परमपिता. किती सोपी गोष्ट आहे! याला म्हटले जाते - अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही) चे शिक्षण. कोण शिकवतात? गीतेचे ज्ञान कोणी ऐकवले? श्रीकृष्णाला काही भगवान म्हटले जात नाही. तो तर देहधारी आहे. मुकुटधारी आहे. शिव तर आहेत निराकार. त्यांच्यावर तर काही कोणता मुकुट इत्यादी नाहीये. तेच ज्ञानाचा सागर आहेत. बाबाच बीज रूप चैतन्य आहेत. तुम्ही देखील चैतन्य आहात. सर्व झाडांच्या आदि-मध्य-अंताला तुम्ही जाणता. भले तुम्ही माळी नाही आहात परंतु समजू शकता की बीज कसे टाकतात, त्यातून झाड कसे रुजून येते. ते आहे जड, हे आहे चैतन्य. आत्म्याला चैतन्य म्हटले जाते. तुमच्या आत्म्यामध्येच ज्ञान आहे, बाकी कोणत्याही आत्म्यामध्ये ज्ञान असू शकत नाही. तर बाबा चैतन्य मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहेत. हे चैतन्य क्रिएशन आहे (ही सजीव सृष्टी आहे).
ती सर्व आहेत जड बीज (स्थूल बियाणी). असे नाही की जड बिजामध्ये कोणते ज्ञान आहे. हे तर आहेत चैतन्य बीज रूप, त्यांच्यामध्ये संपूर्ण सृष्टीचे ज्ञान आहे. झाडाची उत्पत्ती, पालना, विनाशाचे संपूर्ण ज्ञान त्यांच्यामध्ये आहे. मग नवीन झाड कसे उत्पन्न होते, ते आहे गुप्त. तुम्हाला ज्ञान देखील गुप्त मिळते. बाबा देखील गुप्तपणे आले आहेत. तुम्ही जाणता हे कलम लागत आहे. आता तर सर्व पतित बनले आहेत. अच्छा, बीजा पासून सर्वात पहिले पान निघाले, तो कोण होता? सतयुगाचे पहिले पान तर श्रीकृष्णालाच म्हटले जाईल. लक्ष्मी-नारायणाला म्हणता येणार नाही. नवीन पान छोटे असते. नंतर मोठे होते. तर या बीजाची किती महिमा आहे. हे तर चैतन्य आहेत ना. भले इतर देखील निघतात, हळू-हळू त्यांची महिमा कमी होत जाते. आता तुम्ही देवता बनता. आपल्याला दैवी गुण धारण करायचे आहेत ही आहे मुख्य गोष्ट. यांच्यासारखे (लक्ष्मी-नारायणासारखे) बनायचे आहे. चित्र देखील आहेत. ही चित्रे नसती तर ज्ञान बुद्धीमध्ये कसे आले असते. ही चित्रे खूप उपयोगाला येतात. भक्ति मार्गामध्ये या चित्रांची पूजा होते आणि ज्ञान मार्गामध्ये तुम्हाला यांच्याद्वारे ज्ञान मिळते की, यांच्या सारखे बनायचे आहे. भक्तिमार्गामध्ये काही असे समजणार नाहीत की, आपल्याला असे बनायचे आहे. भक्तिमार्गामध्ये मंदिरे इत्यादी किती बनवतात, सर्वात जास्त मंदिरे कोणाची असतील? जरूर शिवबाबांचीच असतील. मग त्यांच्या नंतर क्रिएशनची (रचनेची) असतील. पहिली रचना हे लक्ष्मी-नारायण आहेत, तर शिवबाबांच्या नंतर यांची पूजा जास्त होईल. माता ज्या ज्ञान देतात त्यांची पूजा नाही. त्या तर शिकतात. तुमची पूजा आता होत नाही कारण तुम्ही आता शिकत आहात. जेव्हा तुम्ही शिकून, नंतर अज्ञानी बनाल तेव्हा मग पूजा होईल. आता तुम्ही देवी-देवता बनता. सतयुगामध्ये बाबा थोडेच शिकवायला जातील. तिथे असे शिक्षण थोडेच असेल. हे शिक्षण पतितांना पावन बनविण्याचे आहे. तुम्ही जाणता - जे आपल्याला असे बनवितात त्यांची पूजा होईल नंतर मग आपली देखील पूजा नंबरवार होईल. मग अधोगती होत-होत ५ तत्वांची देखील पूजा करू लागतात. ५ तत्त्वांची पूजा म्हणजे पतित शरीराची पूजा. हे बुद्धीमध्ये ज्ञान आहे की या लक्ष्मी-नारायणाचे संपूर्ण सृष्टीवर राज्य होते. या देवी-देवतांनी राज्य कसे आणि कधी प्राप्त केले? हे कोणालाच माहित नाही आहे. लाखो वर्षे म्हणतात. लाखो वर्षांची गोष्ट तर कोणाच्या बुद्धीमध्ये राहू शकत नाही म्हणून म्हणतात - हे परंपरेने चालत आले आहे. आता तुम्ही जाणता देवी-देवता धर्माचे इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत, जे भारतामध्ये आहेत ते स्वतःला हिंदू म्हणतात कारण पतित असल्या कारणाने देवी-देवता म्हणणे शोभत नाही. परंतु लोकांना ज्ञान कुठे आहे. देवी-देवतांपेक्षाही मोठी उपाधी स्वतःसाठी लावून घेतात. पावन देवी-देवतांची पूजा करतात, माथा टेकवतात, परंतु स्वतःला पतित थोडेच समजतात.
भारतामध्ये खास कुमारींना किती नमस्कार करतात. कुमारांना इतका करत नाहीत. मेल पेक्षा फीमेलला जास्त नमस्कार करतात कारण यावेळी ज्ञान अमृत पहिले या मातांना मिळते. बाबा यांच्यामध्ये प्रवेश करतात. तुम्ही हे देखील समजता की हे (ब्रह्मा बाबा) ज्ञानाची मोठी नदी आहेत. ज्ञान नदी देखील आहेत आणि पुरुष देखील आहेत. ब्रह्म पुत्रा नदी सर्वात मोठी आहे, जी कलकत्त्याच्या बाजूने सागराला जाऊन मिळते. मेळावा देखील तिथेच भरतो परंतु त्यांना हे माहीतच नाहीये की हा आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळावा आहे. ती तर पाण्याची नदी आहे, जिचे नाव ‘ब्रह्म पुत्रा’ ठेवले आहे. ते तर ब्रह्मला ईश्वर म्हणतात म्हणून ब्रह्म पुत्राला पावन समजतात. वास्तविक पतित-पावन काही गंगेला म्हटले जात नाही. इथे सागर आणि ब्रह्मा नदीचा संगम आहे. बाबा म्हणतात - हा (ब्रह्मा) फिमेल तर नाही आहे, ज्याच्याद्वारे दत्तक घेतले जाते, या अति गुह्य अशा समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ज्या नंतर प्राय:लोप होणार आहेत. त्याच्या नंतर मग मनुष्य या आधारावर शास्त्र इत्यादी बनवतात. अगोदर हाताने लिहिलेली शास्त्रे होती, नंतर मग जाडजूड मोठी पुस्तके छापली गेली. संस्कृतमध्ये श्लोक इत्यादी नव्हतेच मुळी. ही तर एकदम सोपी गोष्ट आहे. मी यांच्याद्वारे राजयोग शिकवतो मग ही दुनियाच नष्ट होईल. शास्त्रे इत्यादी काहीच राहणार नाहीत. मग पुन्हा भक्तीमार्गामध्ये ही शास्त्रे इत्यादी बनतील. मनुष्य समजतात ही शास्त्रे इत्यादी परंपरेने चालत आली आहेत, याला म्हटले जाते अज्ञान अंध:कार. आता तुम्हा मुलांना बाबा शिकवतात ज्याने तुम्ही प्रकाशामध्ये आले आहात. सतयुगामध्ये आहे पवित्र प्रवृत्ती मार्ग. कलियुगामध्ये आहेत अपवित्र प्रवृत्ती मार्गवाले. हा देखील ड्रामा आहे. नंतर आहे निवृत्ती मार्ग, ज्याला संन्यास धर्म म्हणतात, जंगलामध्ये जाऊन राहतात. तो आहे हदचा संन्यास. राहतात तर या जुन्या दुनियेमध्ये. आता तुम्ही जाता नवीन दुनियेमध्ये. तुम्हाला तर बाबांकडून ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे तर तुम्ही किती नॉलेजफुल बनता. यापेक्षा जास्ती नॉलेज असतही नाही. ते तर आहे मायेचे नॉलेज, ज्याद्वारे विनाश होतो. ते लोक चंद्रावर जाऊन शोध घेतात. तुमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीये. हा सर्व मायेचा भपका आहे. खूप दिखावा करतात. अति खोलात शिरतात की काही चमत्कार करून दाखवूया. अति चमत्कार केल्याने मग नुकसान होते. त्यांच्या डोक्यामध्ये विनाशाचेच विचार येतात. काय-काय बनवत राहतात. बनविणारे जाणतात की, यामुळेच विनाश होईल. चाचण्या देखील करत राहतात. म्हणतात देखील दोन बोके भांडले आणि लोणी तिसऱ्याने खाल्ले. कथा तर छोटीशी आहे परंतु खेळ किती मोठा आहे. नाव यांचेच प्रसिद्ध आहे. यांच्या द्वारे विनाशाची नोंद आहे. कोणीतरी निमित्त तर बनतात ना. ख्रिश्चन लोक समजतात पॅराडाईज होता परंतु आम्ही नव्हतो; इस्लामी, बौद्धी देखील नव्हते तरीही ख्रिश्चन लोकांची समज चांगली आहे. भारतवासी म्हणतात देवी-देवता धर्म लाखो वर्षांपूर्वी होता तर बुद्धू झाले ना. बाबा भारतामध्येच येतात, जे पराकोटीचे अज्ञानी आहेत त्यांनाच महान ते महान ज्ञानी बनवतात. परंतु तरीही आठवण राहील तेव्हा ना.
बाबा तुम्हा मुलांना किती सोपे करून समजावून सांगतात, माझी आठवण करा तर तुम्ही सोन्याचे पात्र बनाल त्याने धारणा देखील चांगली होईल. आठवणीच्या यात्रेनेच पापे नष्ट होतील. मुरली ऐकत नाहीत तर ज्ञान रफूचक्कर होते (गायब होते). बाबा तर दयाळू असल्याने सावरण्याचीच युक्ती सांगतात. शेवटपर्यंत सुद्धा शिकवतच राहतील. अच्छा, आज भोग आहे, भोग लावून लगेच परत यायचे आहे. बाकी वैकुंठामध्ये जाऊन देवी-देवता इत्यादींचा साक्षात्कार करणे हे सर्व व्यर्थ आहे. यासाठी खूप महीन बुद्धी पाहिजे. बाबा या रथा द्वारे म्हणतात - ‘माझी आठवण करा, मीच पतित-पावन तुमचा पिता आहे’. तुम्हीं से खाऊं... तुम्हीं से बैठूँ… हे इथल्या साठी आहे. वरती (परमधाम मध्ये) कसे असेल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- २) आठवणीच्या यात्रेद्वारे बुद्धीला सोन्याचे पात्र बनवायचे आहे. बुद्धीमध्ये ज्ञान कायम टिकून रहावे यासाठी मुरली जरूर वाचायची आहे किंवा ऐकायची आहे.
| वरदान:- | आपल्या पोझिशनच्या स्मृतीद्वारे मायेवर विजय प्राप्त करणारे निरंतर योगी भव ज्याप्रमाणे स्थूल पोझिशनवाले आपल्या पोझिशनला कधी विसरत नाहीत. तशी तुमची पोझिशन आहे - मास्टर सर्वशक्तिमान, याला नेहमी स्मृतीमध्ये ठेवा आणि रोज अमृतवेलेला या स्मृतीला इमर्ज करा तर निरंतर योगी बनाल आणि संपूर्ण दिवस त्याचा सहयोग मिळत राहील. मग मास्टर सर्वशक्तीमानच्या समोर माया येऊ शकत नाही, जेव्हा तुम्ही तुमच्या स्मृतीच्या उच्च स्टेजवर रहाल तर माया मुंगीला जिंकणे सोपे होईल. |
| बोधवाक्य:- | आत्मारुपी पुरुषाला श्रेष्ठ बनविणारेच खरे पुरुषार्थी आहेत. |