मराठी मुरली · Brahma Kumaris

मराठी मुरली · 27 डिसेंबर, 2024

ओम शांती · BapDada ·

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली27 डिसेंबर, 2024 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

27.12.2024
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो - माया खूप बलवान आहे, तिच्यापासून सावध रहा, कधी हा विचार यायला नको की, आम्ही ब्रह्माला मानत नाही, आमचे तर डायरेक्ट शिवबाबांशी कनेक्शन आहे”
प्रश्न:- कोणत्या मुलांना सर्वांचे प्रेम आपोआप मिळते?
उत्तर:- जे प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा स्वतः प्रॅक्टिकलमध्ये करतात आणि नंतर दुसऱ्यांना सांगतात - त्यांच्यावर आपोआपच सर्वांचे प्रेम बसते. ज्ञानाला स्वतःमध्ये धारण करून मग अनेकांची सेवा करायची आहे, तेव्हा सर्वांचे प्रेम मिळेल. जर स्वतः करत नसतील आणि फक्त दुसऱ्यांना सांगत राहतील तर त्यांचे कोण मानेल? ते तर जसे काही पंडित झाले.

ओम् शांती. मुलांना बाबा विचारत आहेत, आत्म्यांना परमात्मा विचारत आहेत - हे तर जाणता की, आपण परमपिता परमात्म्याच्या समोर बसलो आहोत. बाबांना स्वतःचा रथ नाही आहे, हा तर निश्चय आहे ना? या भृकुटीच्या मध्ये बाबांचे निवासस्थान आहे. बाबांनी स्वतः सांगितले आहे - मी यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) भृकुटीमध्ये बसतो. यांचे शरीर लोनवर घेतो. आत्मा भृकुटीच्या मध्ये बसते तर बाबा देखील इथेच येऊन बसतात. ब्रह्मा देखील आहेत तर शिवबाबा देखील आहेत. जर हे ब्रह्माबाबा नसते तर शिवबाबा देखील नसते. जर कोणी म्हणेल की, आम्ही तर शिवबाबांचीच आठवण करतो, ब्रह्मा बाबांची नाही, परंतु शिवबाबा बोलणार कसे? वरती (परमधाममध्ये) तर कायम शिवबाबांची आठवण करत आलात. आता तुम्हा मुलांना माहिती आहे आपण बाबांजवळ बसलो आहोत. असे तर समजणार नाही की शिवबाबा वरती (परमधाममध्ये) आहेत. जसे भक्तिमार्गामध्ये म्हणत होता शिवबाबा वरती आहेत, त्यांची प्रतिमा इथे पुजली जाते. या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत. जाणता की बाबा ज्ञानाचे सागर, नॉलेजफुल आहेत तर नॉलेज कुठून ऐकवतात? ब्रह्माच्या तनाद्वारे ऐकवतात. अनेकजण म्हणतात, आम्ही ब्रह्माला मानत नाही; परंतु शिवबाबा म्हणतात - ‘मी या मुखाद्वारेच तुम्हाला सांगतो, माझी आठवण करा’. ही समजून घेण्याची गोष्ट आहे ना. ब्रह्मा बाबा तर स्वतः म्हणतात की, शिवबाबांची आठवण करा, हे कुठे म्हणतात माझी आठवण करा? यांच्याद्वारे शिवबाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. हा मंत्र मी यांच्या मुखाद्वारे देतो. ब्रह्मा बाबा नसते तर मी मंत्र कसा दिला असता? ब्रह्मा बाबा नसते तर तुम्ही शिवबाबांना कसे भेटला असता? माझ्याजवळ कसे बसला असता? चांगल्या-चांगल्या महारथींना देखील अशा प्रकारचे विचार येतात ज्यामुळे माया माझ्यापासून तुम्हाला दूर करते. म्हणतात - आम्ही ब्रह्माला मानत नाही तर त्यांची काय गति होईल? माया किती खूप बलवान आहे जी एकदम तोंडच फिरवून टाकते. आता तुमचे मुख शिवबाबांनी समोर फिरवले आहे. तुम्ही सन्मुख बसले आहात. मग जे असे समजतात की, ब्रह्माबाबा तर काहीच नाहीत, तर मग त्यांची काय गति होईल? दुर्गतीला प्राप्त करतात. मनुष्य तर बोलावतात - ‘ओ गॉड फादर!’ मग गॉडफादर ऐकतात काय? म्हणतात - ओ लिबरेटर या. तिथूनच लिबरेट करतील काय? कल्प-कल्पाच्या पुरुषोत्तम संगमयुगावरच बाबा येतात. ज्यांच्यामध्ये येतात त्यांनाच उडवले तर काय म्हणणार? मायेमध्ये इतकी ताकद आहे जी एक नंबरचा वर्थ नॉट ए पेनी (कवडी तुल्य) बनवते. असे देखील काही-काही सेंटर्सवर आहेत, म्हणूनच तर बाबा म्हणतात सावध रहा. भले बाबांनी ऐकवलेल्या ज्ञानाला दुसऱ्यांना ऐकवत देखील राहतात परंतु जसे पंडिता प्रमाणे. जसे बाबा पंडिताची कहाणी ऐकवतात… या वेळी तुम्ही बाबांच्या आठवणीमुळे विषय सागराला पार करून क्षीरसागरामध्ये जाता ना! भक्तिमार्गामध्ये खूप कथा बनवल्या आहेत. पंडित दुसऱ्यांना सांगत असे - राम नामाचा जप केल्याने पार व्हाल, परंतु स्वतःकडे मात्र एकदम शून्य जमेचे खाते होते. स्वतः विकारामध्ये जात रहायचे आणि दुसऱ्यांना म्हणायचे निर्विकारी बना. त्यांचा कसला प्रभाव पडणार? इथे देखील कुठे-कुठे ऐकवणाऱ्यांपेक्षा ऐकणारे वेगाने पुढे निघून जातात. जे खूप जणांची सेवा करतात ते जरूर सर्वांना प्रिय वाटतात. पंडित खोटा निघाला तर त्याच्यावर कोण प्रेम करेल? मग प्रेम त्यांच्यावर होईल जे प्रॅक्टिकलमध्ये आठवण करतात. चांगल्या-चांगल्या महारथींना देखील माया गिळून टाकते.

बाबा समजावून सांगत आहेत - अजून तरी कर्मातीत अवस्था बनलेली नाही आहे, जोपर्यंत युद्धाची तयारी होत नाही. एका बाजूला युद्धाची तयारी होईल, दुसऱ्या बाजूला कर्मातीत अवस्था होईल. पूर्ण कनेक्शन आहे मग युद्ध समाप्त होईल आणि मग ट्रान्सफर होतील. सर्वात पहिली रुद्र माळा बनते. या गोष्टी इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्ही समजता या दुनियेला बदलायचे आहे. ते समजतात दुनियेला अजुन ४० हजार वर्षे बाकी आहेत. तुम्ही समजता विनाश तर समोर उभा आहे. तुम्ही आहात अल्पसंख्य, ते आहेत बहुसंख्य. तर तुमचे कोण मानेल? जेव्हा तुमची वृद्धि होईल तेव्हा तुमच्या योगबलाने पुष्कळ खेचून येतील, जितकी तुमच्यामधून गंज निघत जाईल, तितके बळ भरत जाईल. असे नाही की, बाबा जानी-जाननहार आहेत. नाही, सर्वांच्या अवस्थेला जाणतात. बाबा मुलांच्या अवस्थेला जाणणार नाहीत का? सर्व काही माहित असते. अजून तरी कर्मातीत अवस्था होऊ शकत नाही. मोठ्या-मोठ्या चुका होण्याची देखील संभावना आहे, महारथींकडून सुद्धा होतात. बोलणे-चालणे, आचरण इत्यादी सर्व प्रसिद्ध होते. आता तर दैवी आचरण बनवायचे आहे. देवता, सर्वगुण संपन्न आहेत ना. आता तुम्हाला असे बनायचे आहे. परंतु माया कोणालाच सोडत नाही. छुईमुई (नाजूक) बनवते. ५ शिड्या आहेत ना. देह-अभिमान आल्यामुळे वरून एकदम खाली पडतात. पडला आणि मेला. आजकाल स्वतःला मारण्यासाठी काय-काय उपाय करतात! २० व्या मजल्यावरून उडी मारून एका फटक्यात मरून जातात. असे देखील व्हायला नको की हॉस्पिटलमध्ये पडून राहून, दुःख भोगत रहावे. मग कोणी स्वतःला पेटवून देतात, कोणी वाचवले तर किती दुःख भोगतात. जळून गेलो तर आत्मा पळून जाईल म्हणून जीवघात करतात. समजतात जीवघात केला तर दुःखातून सुटका होईल. जोश आला की मग बस्स. अनेकजण तर हॉस्पिटलमध्ये किती दुःख भोगतात. डॉक्टर समजतात की हे दुःखापासून सुटू शकत नाहीत, यापेक्षा तर गोळी द्यावी म्हणजे हे मरून जातील, ते बरे. परंतु ते समजतात अशी गोळी देणे महापाप आहे. आत्मा स्वतः म्हणते की या पीडा भोगण्यापेक्षा शरीर सोडणे चांगले आहे. आता शरीराला सोडवणार कोण? ही आहे अपार दुःखांची दुनिया. तिथे आहे अपार सुख.

तुम्ही मुले समजता - आपण आता रिटर्न जात आहोत, दुःखधामामधून सुखधामला जात आहोत तर त्यांची आठवण करायची आहे. बाबा देखील संगमयुगावर येतात जेव्हा की दुनियेला बदलायचे असते. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे तुम्हा मुलांना सर्व दुःखांपासून सोडवून नवीन पावन दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी’. पावन दुनियेमध्ये फार थोडे असतात. इथे तर पुष्कळ आहेत, पतित बनले आहेत म्हणून बोलावतात - ‘हे पतित-पावन…’ असे थोडेच समजतात की, आम्ही महाकाळाला बोलावत आहोत की आम्हाला या घाणेरड्या (विकारी) दुनियेमधून घरी घेऊन चला. जरूर बाबा येतील, सर्वजण मरतील तेव्हाच तर पीस (शांती) होईल ना. शांती-शांती करत राहतात. शांती तर शांतीधाममध्ये असणार. परंतु या दुनियेमध्ये शांती कशी असेल? जोपर्यंत इतकी प्रचंड लोकसंख्या आहे. सतयुगामध्ये तर सुख-शांती होती. आता तर कलियुगामध्ये अनेक धर्म आहेत. ते जेव्हा नष्ट होतील, एका धर्माची स्थापना होईल, तेव्हाच तर सुख-शांती होईल. हाहा:कारा नंतर मग जयजयकार होतो. पुढे जाऊन बघा मृत्यूचा बाजार किती तापलेला असेल ते! कसे मरतात! बॉम्बमुळे देखील आग लागते. पुढे जाऊन बघतील तेव्हा पुष्कळजण म्हणतील की खरोखर विनाश तर नक्कीच होणार आहे.

तुम्ही मुले जाणता की या सृष्टीचे चक्र कसे फिरते? विनाश तर होणारच आहे. एका धर्माची स्थापना बाबा करवून घेतात, राजयोग सुद्धा शिकवतात. बाकीचे अनेक धर्म सर्व नष्ट होतील. गीतेमध्ये काही दाखवलेले नाही आहे. मग गीता वाचून रिझल्ट काय मिळाला? दाखवतात की, प्रलय झाला. भले दुनिया जलमय होते परंतु सारी दुनिया काही जलमय होत नाही. भारत तर अविनाशी पवित्र खंड आहे. त्यामध्ये देखील आबू सर्वात पवित्र तीर्थ स्थान आहे, जिथे बाबा येऊन सर्वांची सद्गति करतात. दिलवाडा मंदिर किती सुंदर यादगार आहे. किती अर्थासहित आहे. परंतु ज्यांनी बनवले आहे, ते हे जाणत नाहीत. तरी सुद्धा चांगले हुशार तर होते ना. द्वापारमध्ये जरूर खूप हुशार असणार. कलियुगामध्ये तर आहेत सर्व तमोप्रधान. सर्व मंदिरांपेक्षा हे उंच आहे, जिथे तुम्ही बसला आहात. तुम्ही जाणता आपण चैतन्य आहोत, ते आमचेच जड यादगार आहे. बाकी काही वेळ ही मंदिरे इत्यादी अजूनही बनत रहातील. नंतर मग कोसळून जाण्याची वेळ येईल. सर्व मंदिरे इत्यादी मोडून-तुटून जातील. होलसेल (सामूहिक) मृत्यू होतील. महाभारी महाभारत लढाई गायली गेली आहे ना, ज्यामध्ये सर्व नष्ट होऊन जातात. हे देखील तुम्ही समजता - बाबा संगमावरच येतात. बाबांना रथ तर पाहिजे ना. आत्मा जेव्हा शरीरामध्ये येते तेव्हाच चुरपूर (हालचाल) होते. आत्मा शरीरातून निघून जाते तेव्हा शरीर जड होते. तर बाबा समजावून सांगतात आता तुम्ही घरी जाता. तुम्हाला लक्ष्मी-नारायणासारखे बनायचे आहे. तर असे गुण देखील पाहिजेत ना. तुम्ही मुले या खेळाला देखील जाणता ना. हा खेळ किती वंडरफुल बनलेला आहे. या खेळाचे रहस्य बाबा बसून समजावून सांगतात. बाबा नॉलेजफुल, बीजरूप आहेत ना. बाबाच येऊन साऱ्या वृक्षाची नॉलेज देतात - यामध्ये काय-काय होते, तुम्ही यामध्ये किती पार्ट बजावला? अर्धा कल्प आहे दैवी राज्य, अर्धाकल्प आहे आसुरी राज्य. जी चांगली-चांगली मुले आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये सर्व नॉलेज राहते. बाबा आप समान टीचर बनवतात. टीचर देखील नंबरवार तर असतात. काहीजण तर टीचर होऊन मग बिघडून जातात. खूपजणांना शिकवून स्वतः नाहीसे होतात. छोट्या-छोट्या मुलांमध्ये भिन्न-भिन्न संस्कार असतात. बाबा समजावून सांगत आहेत - इथे देखील जे ज्ञान व्यवस्थितपणे घेत नाहीत, वर्तन सुधारत नाहीत ते अनेकांना दुःख देण्यासाठी निमित्त बनतात. हे देखील शास्त्रांमध्ये दाखवले आहे - असुर लपून बसत होते नंतर बाहेर जाऊन ट्रेटर बनून किती त्रास देत होते. हे तर सर्व होतच राहते. उच्च ते उच्च बाबा जे स्वर्गाची स्थापना करतात तर किती विघ्न रूप बनतात.

बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही मुले सुख-शांतीचे टॉवर आहात. तुम्ही खूप रॉयल आहात. तुमच्यापेक्षा रॉयल यावेळी कोणी असत नाही. बेहदच्या बाबांची मुले आहात तर किती गोड होऊन राहिले पाहिजे. कोणाला दुःख द्यायचे नाही, नाहीतर शेवटी त्याची आठवण येईल. मग सजा भोगावी लागेल. बाबा म्हणतात आता तर घरी जायचे आहे. सूक्ष्मवतनमध्ये मुलांना ब्रह्माचा साक्षात्कार होतो त्यामुळे तुम्ही देखील असे सूक्ष्मवतनवासी बना. मुव्हीची (फरिश्ता स्वरूपाची) प्रॅक्टिस करायची आहे. अतिशय कमी बोलायचे आहे, गोड बोलायचे आहे. असा पुरुषार्थ करत-करत तुम्ही शांतीचे टॉवर बनाल. तुम्हाला शिकवणारे बाबा आहेत. मग तुम्ही इतरांना शिकवायचे आहे. भक्तिमार्ग आहे टॉकी मार्ग (आवाजाचा मार्ग). आता तुम्हाला सायलेन्स (शांत स्वरूप) बनायचे आहे . अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. २) स्वतःची दैवी चलन बनवायची आहे. छुईमुई (नाजूक) बनायचे नाही. युद्धापूर्वी कर्मातीत अवस्थेला पोहोचायचे आहे. निर्विकारी बनून निर्विकारी बनविण्याची सेवा करायची आहे.
वरदान:- पवित्र प्रेमाच्या पालनेद्वारे सर्वांना स्नेहाच्या धाग्यामध्ये बांधणारे मास्टर स्नेहाचे सागर भव जेव्हा स्नेहाचे सागर आणि स्नेह संपन्न नद्यांचे मिलन होते (संगम होतो) तेव्हा नदी सुद्धा बाप समान मास्टर स्नेहाचा सागर बनते. म्हणून विश्वातील आत्मे स्नेहाच्या अनुभवाने आपोआप समीप येतात. पवित्र प्रेम किंवा ईश्वरीय परिवाराची पालना, चुंबकाप्रमाणे आपोआपच प्रत्येकाला जवळ आणते. हा ईश्वरीय स्नेह सर्वांना सहयोगी बनवून पुढे जाण्याच्या धाग्यामध्ये बांधून टाकतो.
बोधवाक्य:- संकल्प, बोल, वेळ, गुण आणि शक्तींचे खजिने जमा करा म्हणजे यांचा सहयोग मिळत राहील.

||| ओम शांती |||

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.