मराठी मुरली · Brahma Kumaris

मराठी मुरली · 28 डिसेंबर, 2024

ओम शांती · BapDada ·

आजची मुरली — aajchi murli, murli in Marathi.

18
मुरली28 डिसेंबर, 2024 · मराठी
0:00--:--

मजकूर निवडा → हायलाइट / बॉक्स / अधोरेखा

28.12.2024
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
मधुबन

“गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला सर्व खजिन्यांनी मालामाल करण्यासाठी, तुम्ही फक्त ईश्वरीय मतानुसार चाला, चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करून वारसा घ्या, मायेकडून हार पत्करू नका”
प्रश्न:- ईश्वरीय मत, दैवी मत आणि मनुष्य मत यांच्यामध्ये मुख्य फरक कोणता आहे?
उत्तर:- ईश्वरीय मतामुळे तुम्ही मुले पुन्हा आपल्या घरी परत जाता आणि मग नवीन दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त करता. दैवी मतामुळे तुम्ही सदा सुखी राहता कारण ते देखील बाबांकडून या वेळेला मिळालेले मत आहे, परंतु तरीसुद्धा उतरता तर खालीच आहात. मनुष्य मत दुःखी बनवते. ईश्वरीय मतानुसार चालण्यासाठी सर्वप्रथम शिकविणाऱ्या बाबांवर पूर्णत: निश्चय (विश्वास) पाहिजे.

ओम् शांती. बाबांनी अर्थ तर समजावून सांगितला आहे, मी शांत स्वरूप आहे. जेव्हा ओम् शांती म्हटले जाते तेव्हा आत्म्याला आपले घर आठवते. मी आत्मा शांत स्वरूप आहे. मग जेव्हा ऑर्गन्स मिळतात (शरीर मिळते) तेव्हा टॉकी बनते. आधी शरीर छोटे असते, मग मोठे होते. आता परमपिता परमात्मा तर आहेत निराकार. त्यांना देखील बोलण्यासाठी रथ (शरीर) पाहिजे. जसे तुम्ही आत्मे परमधाममध्ये राहणारे आहात, इथे येऊन टॉकी (बोलके) बनता. बाबा देखील म्हणतात - ‘मी तुम्हाला नॉलेज देण्यासाठी टॉकी बनलो आहे’. बाबा स्वतःचा आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचा परिचय देतात. हे आहे रुहानी (आत्मिक) शिक्षण, ते असते भौतिक शिक्षण. ते स्वतःला शरीर समजतात. असे कोणी म्हणणार नाही की, ‘मी आत्मा कानांद्वारे ऐकत आहे’. आता तुम्ही मुले जाणता - बाबा पतित-पावन आहेत, तेच येऊन समजावून सांगतात की, मी कसा येतो. तुमच्यासारखा मी गर्भात येत नाही. मी यांच्यामध्ये (ब्रह्मा मध्ये) प्रवेश करतो. त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. हा रथ आहे. यांना माता देखील म्हटले जाते. सर्वात मोठी नदी ब्रह्म पुत्रा आहे. तर ही आहे सर्वात मोठी नदी. पाण्याची काही गोष्टच नाही. ही आहे महानदी अर्थात सर्वात मोठी ज्ञान नदी. तर बाबा आत्म्यांना समजावून सांगत आहेत - ‘मी तुमचा पिता आहे. जसे तुम्ही बोलता तसाच मी सुद्धा बोलतो. माझा पार्ट तर सर्वात शेवटी आहे’. जेव्हा तुम्ही अगदीच पतित बनता तेव्हा तुम्हाला पावन बनविण्यासाठी यावे लागते. या लक्ष्मी-नारायणाला असे बनवणारा कोण आहे? ईश्वरा व्यतिरिक्त इतर कोणासाठीही असे म्हणू शकत नाही. बेहदचे बाबाच स्वर्गाचा मालक बनवत असतील ना. बाबाच ज्ञानाचा सागर आहेत. तेच म्हणतात - ‘मी या मनुष्य सृष्टीचे चैतन्य बीज आहे. मी आदि-मध्य-अंताला जाणतो. मी सत् आहे, मी चैतन्य बीजरूप आहे, या सृष्टी रूपी झाडाचे ज्ञान माझ्यामध्ये आहे’. याला सृष्टीचक्र किंवा ड्रामा म्हटले जाते. हे फिरतच राहते. तो हदचा ड्रामा (चित्रपट) दोन तास चालतो. याचे रीळ (फिल्म) ५ हजार वर्षांचे आहे. जो-जो वेळ निघून जातो, तो वेळ ५ हजार वर्षांमधून कमी होत जातो. तुम्ही जाणता प्रथम आम्ही देवी-देवता होतो, नंतर मग हळूहळू आम्ही क्षत्रिय कुळामध्ये आलो. हे सर्व रहस्य बुद्धीमध्ये आहे ना. तर याचे चिंतन करत राहिले पाहिजे. आम्ही अगदी सुरवातीला पार्ट बजावण्याकरिता आलो तेव्हा आम्ही सो देवी-देवता होतो. १२५० वर्षे राज्य केले. वेळ तर निघून जातो ना. लाखो वर्षांची तर काही गोष्टच नाही. लाखो वर्षांचे तर कोणी चिंतन करू देखील शकणार नाही.

तुम्ही मुले समजता - आपण हे देवी-देवता होतो, मग पार्ट बजावत, वर्षामागून वर्ष जाता-जाता आता किती वर्षे निघून गेली आहेत. हळूहळू सुख कमी-कमी होत जाते. प्रत्येक गोष्ट सतोप्रधान, सतो, रजो, तमो होते. जुनी नक्की होते. ही मग आहे बेहदची गोष्ट. या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे बुद्धीमध्ये धारण करून मग इतरांना समजावून सांगायच्या आहेत. सर्वच काही एकसारखे नसतात. नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगत असतील. चक्रा विषयी समजावून सांगणे सर्वात सोपे आहे. ड्रामा आणि झाड ही दोन्ही मुख्य चित्रे आहेत. ‘कल्पवृक्ष’ नाव आहे ना. कल्पाचे आयुर्मान किती वर्षांचे आहे हे कोणीही जाणत नाहीत. मनुष्यांची अनेक मते आहेत. कोणी काय म्हणतील, कोणी काय म्हणतील. आता तुम्हाला मनुष्यांची अनेक मते देखील समजली आहेत आणि एक ईश्वरीय मत देखील समजले आहे. किती फरक आहे. ईश्वरीय मताद्वारे तुम्हाला पुन्हा नवीन दुनियेमध्ये जावे लागते, बाकी कोणाच्याही मताद्वारे, दैवी मताद्वारे अथवा मनुष्य मताद्वारे परत जाऊ शकत नाही. दैवी मतामुळे तुम्ही उतरतच जाता कारण कला कमी होत जातात. आसुरी मतामुळे देखील उतरता. परंतु दैवी मतामध्ये सुख आहे, आसुरी मतामध्ये दुःख आहे. दैवी मत देखील या वेळी बाबांनी दिलेले आहे म्हणून तुम्ही सुखी राहता. बेहदचे बाबा किती दुरून येतात. मनुष्य पैसा कमावण्यासाठी बाहेर जातात. जेव्हा खूप पैसे गोळा होतात तेव्हा मग येतात. बाबा देखील म्हणतात मी तुम्हा मुलांसाठी भरपूर खजिना घेऊन येतो कारण मी जाणतो तुम्हाला भरपूर धन-संपत्ती दिली होती, ती सर्व तुम्ही गमावली आहे. तुमच्याशीच बोलतो, ज्यांनी प्रत्यक्षात गमावले आहे. ५ हजार वर्षांपूर्वीची गोष्ट तुम्हाला आठवते ना. म्हणतात - ‘हो बाबा, ५ हजार वर्षांपूर्वी तुम्हाला भेटलो होतो, तुम्ही वारसा दिला होता’. आता तुम्हाला स्मृती आली आहे की, खरोखर बेहदच्या बाबांकडून वारसा घेतला होता. बाबा, तुमच्याकडून नवीन दुनियेच्या राज्याचा वारसा घेतला होता. अच्छा, मग पुरुषार्थ करा. असे म्हणू नका - ‘बाबा, मायेच्या भुताने आम्हाला हरवले’. देह-अभिमाना नंतरच तुम्ही मायेकडून हार खाता. लोभ केला, लाच खाल्ली. लाचारीची गोष्ट वेगळी आहे. बाबा जाणतात लोभाशिवाय पोटपूजा होणार नाही, हरकत नाही. भलेही खा, परंतु कुठे तरी अडकून मरू नका, मग तुम्हालाच दुःख होईल. पैसा मिळाला की खूष होऊन खाल, कधी पोलिसांनी पकडले तर जेलमध्ये जावे लागेल. असे काम करू नका, नाही तर त्याला जबाबदार मी राहणार नाही. पाप करतात तर जेलमध्ये जातात. तिथे (नवीन दुनियेमध्ये) तर जेल वगैरे असत नाही. तर ड्रामा प्लॅन अनुसार कल्पापूर्वी जो वारसा तुम्हाला २१ जन्मांसाठी मिळाला आहे, तसाच पुन्हा घ्याल. संपूर्ण राजधानी बनत आहे. गरीब प्रजा, श्रीमंत प्रजा. परंतु तिथे दुःख असत नाही. याची बाबा खात्री देतात. सर्व एकसारखे तर बनू शकत नाहीत. सूर्यवंशी-चंद्रवंशी राज्यामध्ये सर्व पाहिजेत ना. मुले जाणतात बाबा कशी आपल्याला विश्वाची बादशाही देतात. मग आम्ही उतरतो (पतन होते). स्मृतीमध्ये आले ना. शाळेत अभ्यास आठवणीमध्ये राहतो ना. इथे देखील बाबा आठवण करून देतात. हे रूहानी शिक्षण जगभरात दुसरे कोणीही शिकवू शकत नाही. गीतेमध्ये देखील लिहिलेले आहे - मनमनाभव. याला महामंत्र वशीकरण मंत्र म्हणतात अर्थात मायेवर विजय प्राप्त करण्याचा मंत्र. ‘माया जीते जगत-जीत’. माया ५ विकारांना म्हटले जाते. रावणाचे चित्र अगदी स्पष्ट आहे - ५ विकार स्त्रीमध्ये, ५ विकार पुरूषांमध्ये. यांच्यामुळे गाढव अर्थात तट्टू बनतात म्हणूनच डोक्यावर गाढवाचे शीर दाखवतात. आता तुम्ही समजता ज्ञाना अभावी आपण देखील असेच होतो. बाबा बसून किती मनोरंजक पद्धतीने शिकवतात. ते आहेत सुप्रीम टीचर. त्यांच्याकडून आम्ही जे शिकतो ते मग इतरांना ऐकवतो. सर्वात आधी तर शिकणाऱ्याविषयी विश्वास निर्माण केला पाहिजे. बोला - ‘बाबांनी आम्हाला हे समजावून सांगितले आहे, आता माना अथवा नका मानू’. हे बेहदचे बाबा तर आहेत ना. श्रीमतच श्रेष्ठ बनवते, तर श्रेष्ठ नवी दुनिया देखील जरूर पाहिजे ना.

आता तुम्ही समजता आम्ही कचऱ्याच्या (विकारी) दुनियेमध्ये बसलो आहोत. दुसरे कोणीही समजू शकणार नाही. तिथे आम्ही बहिश्त स्वर्गात कायम सुखी असतो. इथे नरकामध्ये किती दुःखी आहोत. याला नरक म्हणा किंवा विषय वैतरणी नदी म्हणा, जुनी दुनिया घाणेरडी (विकारी) आहे. आता तुम्हाला जाणीव होते - कुठे सतयुग स्वर्ग, कुठे कलियुग नरक! स्वर्गाला म्हटले जाते जगातले आश्चर्य. त्रेताला देखील असे म्हणणार नाही. इथे या घाणेरड्या दुनियेमध्ये राहण्यात लोकांना किती आनंद होतो. विष्ठेतल्या किड्यांना भुंगा भूँ-भूँ करून स्वतः सारखे बनवतो. तुम्ही देखील कचऱ्यामध्ये पडलेले होता. मी येऊन भूँ-भूँ करून तुम्हाला किड्याचे अर्थात शूद्राचे ब्राह्मण बनवले आहे. आता तुम्ही डबल मुकुटधारी बनत आहात तर किती आनंद झाला पाहिजे. पुरुषार्थ देखील पूर्णपणे केला पाहिजे. बेहदचे बाबा स्पष्टीकरण तर किती सोप्या पद्धतीने देतात. मनातून वाटते देखील की बाबा खरे-खरे सांगत आहेत. या वेळी सर्वजण मायेच्या दलदलीमध्ये अडकले आहेत. बाहेर दिखाऊपणा किती आहे? बाबा समजावून सांगत आहेत - मी येऊन तुम्हाला या दलदलीतून वाचवतो, स्वर्गामध्ये घेऊन जातो. स्वर्गाचे नाव ऐकलेले आहे. आता काही स्वर्ग तर नाहीये, फक्त हे चित्र आहे. हे (ब्रह्मा बाबा) स्वर्गाचे मालक किती धनाढ्य होते. भक्तीमार्गामध्ये भले रोज मंदिरात जात होते, परंतु हे ज्ञान काहीच नव्हते. आता तुम्ही समजता भारतामध्ये हा आदि सनातन देवी-देवता धर्म होता. यांचे राज्य केव्हा होते, हे कोणालाच माहीत नाही आहे. मग देवी-देवता धर्मा ऐवजी आता हिंदू-हिंदू म्हणत राहतात. सुरुवातीला हिंदू महासभेचा अध्यक्ष आला होता. म्हणाला, आम्ही विकारी असुर आहोत, स्वतःला देवता कसे म्हणणार? मी (ब्रह्मा बाबांनी) सांगितले - ठीक आहे, याल तर तुम्हाला समजावून सांगतो देवी-देवता धर्माची स्थापना पुन्हा होत आहे. आम्ही तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवू. बसून शिका. म्हणाला, दादाजी वेळच कुठे आहे? वेळ नसेल तर देवता कसे बनाल! हे शिक्षण आहे ना. बिचाऱ्याच्या नशीबात नव्हते. मरून गेला. असे देखील म्हणणार नाही की तो काही प्रजेमध्ये येईल. नाही, असाच आला होता, ऐकून होता की इथे पवित्रतेचे ज्ञान मिळते. परंतु सतयुगामध्ये तर येऊ शकणार नाही. तरीही पुन्हा हिंदू धर्मामध्येच येईल.

तुम्ही मुले समजता माया अतिशय बलवान आहे. काही ना काही चूक करायला लावत राहते. कधी कोणते उलटे-सुलटे पाप झाले तर बाबांना खऱ्या मनाने सांगायचे आहे. रावणाच्या दुनियेमध्ये पापे तर होतच राहतात. म्हणतात - आम्ही जन्मोजन्मीचे पापी आहोत. हे कोण म्हटले? आत्मा म्हणते - बाबांसमोर की देवतांच्या समोर? आता तुम्हाला जाणवते की खरोखर आम्ही जन्म-जन्मांतरीचे पापी होतो. रावणराज्यामध्ये पापे जरूर केली आहेत. अनेक जन्मांच्या पापांचे वर्णन तर करू शकत नाही. या जन्मातील सांगू शकतो. ते सांगितल्याने देखील ओझे हलके होईल. डॉक्टरांना रोगाबद्दल सांगायला पाहिजे - अमक्याला मारले, चोरी केली..., असे सांगताना लाज वाटत नाही परंतु विकाराबद्दल सांगताना लाज वाटते. डॉक्टरांसमोर लाज वाटली तर रोग बरा कसा होणार? मग मन आतल्याआत खात राहील, बाबांची आठवण करू शकणार नाही. खरे सांगाल तर आठवण करू शकाल. बाबा म्हणतात - मी डॉक्टर तुमच्यावर किती उपचार करतो. तुमची काया सदैव कांचन राहील. डॉक्टरला सांगितल्याने ओझे हलके होते. कोणी-कोणी आपणहून लिहितात - बाबा मी जन्मोजन्मी पापे केली आहेत. पापात्म्यांच्या दुनियेमध्ये पापात्माच बनले आहेत. आता बाबा म्हणतात मुलांनो, तुम्ही पापात्म्यांबरोबर देवाण-घेवाण करायची नाही. खरे सद्गुरु, अकालमूर्त बाबा आहेत, जे कधीही पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. त्यांनी अकाल-तख्त नाव ठेवले आहे, परंतु अर्थ समजत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे आत्म्याचे हे तख्त आहे. शोभते देखील इथेच, तिलक देखील इथे (भृकुटीमध्ये) लावतात ना... खरे तर तिलक अगदी छोट्या बिंदू सारखे लावत होते. आता तुम्हाला आपणच आपल्याला तिलक द्यायचा आहे. बाबांची आठवण करत रहा. जे खूप सेवा करतील ते मोठे महाराजा बनतील. नव्या दुनियेमध्ये जुन्या दुनियेतील शिक्षण थोडेच शिकायचे आहे? तर इतक्या श्रेष्ठ शिक्षणाकडे मग खूप लक्ष द्यायला पाहिजे. इथे बसतात तरीही काहींचा बुद्धीयोग चांगला असतो, कोणाचा कुठे-कुठे निघून जातो. कोणी १० मिनिटे लिहितात, कोणी १५ मिनिटे लिहितात. ज्याचा चार्ट चांगला असेल त्याला नशा चढेल - बाबा, इतका वेळ मी तुमच्या आठवणीमध्ये राहिलो. १५ मिनिटांपेक्षा जास्त तर कोणी लिहू शकत नाही. बुद्धी इकडे-तिकडे पळते. जर सगळे एकरस झाले तर मग कर्मातीत अवस्था होईल. बाबा किती गोड-गोड सुंदर गोष्टी ऐकवतात. असे तर कोणत्याही गुरूने शिकवले नाही. गुरूकडून फक्त एकटाच थोडेच शिकेल? गुरूकडून तर हजारो शिकतील ना. सद्गुरु कडून तुम्ही कितीजण शिकता. हा आहे मायेला वश करण्याचा मंत्र. माया ५ विकारांना म्हटले जाते. धनाला संपत्ती म्हटले जाते. लक्ष्मी-नारायणासाठी म्हणणार - यांच्याकडे खूप संपत्ती आहे. लक्ष्मी-नारायणाला कधी माता-पिता म्हणणार नाही. आदि देव, आदि देवीला जगत पिता, जगत अंबा म्हणतात, यांना नाही. हे स्वर्गाचे मालक आहेत. अविनाशी ज्ञान धन घेऊन आपण इतके धनवान बनलो आहोत. अंबेकडे अनेक इच्छा मनात ठेऊन जातात. लक्ष्मीकडे फक्त धनाकरिता जातात आणखी कोणती इच्छा नसते. तर मोठी कोण आहे? हे कोणालाही माहित नाहीये की, अंबेकडून काय मिळते? लक्ष्मीकडून काय मिळते? लक्ष्मीकडून फक्त धन मागतात. अंबेकडे सर्व काही मिळते. अंबेचे नाव जास्त आहे कारण मातांना दुःख देखील खूप सहन करावे लागले आहे. त्यामुळे मातांचे नाव जास्त मोठे आहे. अच्छा, तरीसुद्धा बाबा म्हणतात - बाबांची आठवण करा तर पावन बनाल. चक्राची आठवण करा, दैवी गुण धारण करा. खूप जणांना आप समान बनवा. गॉड फादरचे तुम्ही स्टुडंट आहात. कल्पापूर्वी देखील बनला होतात, आता देखील तेच एम ऑब्जेक्ट आहे. ही आहे नरापासून नारायण बनण्याची सत्य कथा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. १) स्वतःचा आजार डॉक्टरांपासून कधीही लपवायचा नाही. मायेच्या भुतांपासून स्वतःला वाचवायचे आहे. स्वतःला राजतिलक देण्यासाठी सेवा जरूर करायची आहे.
  2. २) स्वतःला अविनाशी ज्ञानधनाने धनवान बनवायचे आहे. आता पापात्म्यांबरोबर देवाण-घेवाण करायची नाहीये. संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे द्यायचे आहे.
वरदान:- या कल्याणकारी युगामध्ये सर्वांचे कल्याण करणारे प्रकृतीजीत मायाजीत भव
संगमयुगाला कल्याणकारी युग म्हटले जाते, या युगामध्ये सदैव हा स्वमान लक्षात रहावा की, मी कल्याणकारी आत्मा आहे, माझे कर्तव्य आहे आधी स्वतःचे कल्याण करणे, मग सर्वांचे कल्याण करणे. मनुष्य आत्म्यांचेच नाही, तर आम्ही प्रकृतीचे देखील कल्याण करणारे आहोत म्हणून प्रकृतीजीत मायाजीत संबोधले जातो. जेव्हा आत्मा पुरुष प्रकृतीजीत बनते, तेव्हा प्रकृती देखील सुखदायी बनते. प्रकृती अथवा मायेच्या गोंधळामध्ये येऊ शकत नाही. त्यांच्यावर अकल्याणाच्या वातावरणाचा प्रभाव पडू शकत नाही.
बोधवाक्य:- एकमेकांच्या विचारांना सन्मान द्या तर माननीय आत्मा बनाल.

||| ओम शांती |||

मुरली म्हणजे काय?

मुरली म्हणजे ब्रह्माकुमारींचे दैनिक आध्यात्मिक शिक्षण — मधुबनहून दररोज सकाळी प्रकाशित होणारे ईश्वरीय ज्ञान. येथे तुम्ही आजची मुरली मराठीत वाचू शकता, ऑडिओ ऐकू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. अभ्यासासाठी मजकुरात हायलाइट किंवा बॉक्स करू शकता — तुमच्या खुणा याच ब्राउझरमध्ये सुरक्षित राहतात.

28 भाषांमध्ये मुरली

Daily Murli · Madhuban स्रोत: मधुबन मुरली विभाग हे एक स्वतंत्र वाचक अ‍ॅप आहे, अधिकृत वेबसाइट नाही.