| 26.11.2026 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो, स्वीट फादर आणि स्वीट राजधानीची आठवण करा, तर तुम्ही खूप-खूप स्वीट बनाल” | |
| प्रश्न:- | तुम्ही मुले कोणता पुरुषार्थ करून मनुष्यापासून देवता बनता? |
| उत्तर:- | तुम्ही आता ज्ञान-मानसरोवरमध्ये डुबकी मारून ज्ञान-परी बनता, ज्ञान-स्नानामुळे तुमची सीरत (स्वभाव) बदलत जाते. जे काही अवगुण आहेत, निघून जातात. बाबा आणि विष्णुपुरीची आठवण करून तुम्ही पावन देवता बनता. देवतांमध्ये पवित्रतेचेच तर आकर्षण आहे. याच कारणाने मनुष्य, देवतांच्या मंदिरांमध्ये अगदी दूर-दूरच्या ठिकाणी सुद्धा ओढीने दर्शनासाठी जातात. |
| गीत:- | हमारे तीर्थ न्यारे हैं... |
ओम् शांती. गोड-गोड रुहानी मुलांनी हे गाणे ऐकले. लकी तारे (भाग्यवान तारे) म्हणून मुलांचेच गायन केले जाते. ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्र, ज्ञान लकी तारे. ते (स्थूल) सूर्य-चंद्र तर मंडपाला प्रकाश देतात, म्हणूनच तुमची महिमा गायली गेली आहे. तुम्ही आहात - ज्ञान-तारे, त्यांना (या आकाशातील ताऱ्यांना) ज्ञान-तारे म्हटले जात नाही. ज्ञान-सूर्य नाव ऐकून समजतात की कदाचित तो सूर्य, ज्ञानस्वरूप आहे. कारण ते भगवान दगडा-मातीत आहे असे समजतात, त्यामुळे सूर्याला खूप मानतात. स्वतःला सूर्यवंशी म्हणवून घेतात. सूर्याची पूजा करतात, झेंडा देखील सूर्याचा आहे. तुमचा आहे त्रिमूर्तीचा झेंडा. किती वंडरफुल आहे. यामध्ये लिहिलेले देखील आहे - सत्य मेव जयते. खरोखरच विश्वावर विजय तर तेच प्राप्त करून देतात. तुम्ही आहात - शिव शक्ती पांडव सेना. त्यांनी नाव ठेवले आहे - त्रिमूर्ती मार्ग, त्रिमूर्ती हाऊस. याचा देखील अर्थ बाबा समजावून सांगतात की, या त्रिमूर्तीद्वारे मी कोणते कर्तव्य करवून घेतो. ब्रह्मा द्वारे स्थापना... त्यांनी त्रिमूर्तीमधून ‘शिव’चे चित्र काढून चित्रच खंडित करून टाकले आहे. आता तुम्ही जाणता या त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये किती रहस्य भरलेले आहे. सत्य शिवबाबा, ब्रह्मा द्वारे राजाई देतात. आम्ही मुले शिवबाबांद्वारे कल्पा पूर्वीप्रमाणे पुन्हा पवित्रता, सुख-शांती आणि संपत्तीचे राज्य घेत आहोत. शिक्षण नेहमी ब्रह्मचर्यमध्येच घेतले जाते. आता तर काहीजण लग्नानंतर देखील शिक्षण घेतात, कारण कमाई जास्त होते. इथे तुमची कमाई अगणित आहे. मुले जाणतात की, शिवबाबा आम्हाला विश्वाचा मालक बनविण्यासाठी आले आहेत. श्रीमत श्रेष्ठ गायली गेली आहे. बाबांचा बच्चा बनला तर जरूर बाबांच्या मतावर चालेल; भावा-भावाच्या मतावर नाही. ते तर तुम्ही अनेक जन्म चाललात परंतु त्यातून फायदा काहीच झाला नाही. आता बाबांच्या मतावर चालायचे आहे. साधू-संत इत्यादी सर्व भाऊ-भाऊ आहेत. आता बाबा आले आहेत उच्च मत देण्यासाठी. नेचर-क्युअरचे (निसर्गोपचाराचे) देखील खूप औषधोपचार करतात. ते आहेत सर्व अल्पकाळासाठी. हा आहे २१ जन्मांसाठीचा नेचर-क्युअर (निसर्गोपचार). ते म्हणतील थंड पाण्यामध्ये स्नान करा. असे करा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. इथे ती खाण्यापिण्याची गोष्ट नाहीये. इथे तर स्वीट फादर मुलांना म्हणतात - आता माझी आठवण करा तर तुम्ही खूप स्वीट बनाल. देवता स्वीट आहेत ना, त्यांच्यामध्ये किती आकर्षण असते. पूर्वी शिवची मंदिरे देखील उंच-उंच डोंगरावर बनवत असत. मनुष्य, दर्शन करण्यासाठी पायी चालत जात असत कारण पवित्रता आकर्षित करत असे. देवता जेव्हा पवित्र होते तेव्हा विश्वावर राज्य करत होते. आता त्यांच्या चित्रांसमोर जाऊन नमस्कार करून पाया पडतात. आता त्या स्वीट फादरची आठवण तर सर्वजण करतात. त्यांना यायचे देखील इथेच आहे. जरूर त्यांच्याकडून वैकुंठाचे अपार सुख मिळते तेव्हाच तर त्यांची आठवण करतात. जेव्हा रावण राज्याचा शेवट होईल तेव्हाच बाबा येऊन स्वर्गाची राजाई देतील. बाबा येतात देखील भारतामध्येच. शिवजयंती देखील भारतातच साजरी करतात परंतु त्यातून काय मिळते, ते कोणालाच ठाऊक नाहीये. बाबा म्हणतात - मी आलो आहे तुम्हा मुलांना स्वीट बनविण्यासाठी. तुम्ही किती छी-छी (पतित) बनला होतात. बाबा नॉलेजफुल आहेत, आता तुम्हाला सर्व नॉलेज मिळत आहे. बीजालाच संपूर्ण ज्ञान असेल ना. ते आहेत बीज; सत्य आहेत, चैतन्य आहेत आणि मग ज्ञानाचा सागर आहेत, सत्य बोलतात. ते देखील आत्माच आहेत, परंतु परम आहेत. परम-आत्मा अर्थात परमात्मा. ते कायम परमधाममध्ये राहतात, सर्वोच्च आहेत. खूप जण म्हणतात नावा-रूपा पासून न्यारे आहेत. परंतु नावा-रूपा पासून न्यारी अशी कोणतीही वस्तूच नसते. त्यांचे नाव ‘शिव’ आहे. सर्वजण त्यांची पूजा करतात, ते निराकार आहेत, आता आलेले आहेत. पूर्वी आपण देह-अभिमानी होतो. आता बाबा म्हणतात - मुलांनो, आत्म-अभिमानी भव. गीतेमध्ये देखील आहे - मनमनाभव. फक्त त्यामध्ये ‘शिव’च्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव घातल्यामुळे गीता खंडित झाली आहे. तरी देखील पुस्तक वाचल्याने थोडेच राजाई मिळेल. राजाई असते सतयुगामध्ये. जरूर बाबा संगमयुगावर येतील. आता ड्रामा अनुसार भक्ती पूर्ण होते. भक्ती नंतर आहे - ज्ञान. ही आहे जुनी दुनिया, सतयुग आहे नवीन दुनिया. सतयुगामध्ये सूर्यवंशी राज्य करत होते. हा आहे - नरापासून नारायण आणि नारी पासून लक्ष्मी बनण्याचा राजयोग. सतयुगामध्ये यांचेच राज्य होते. आता कलियुगामध्ये पाहा काय आहे! आता तुम्ही सतयुगामध्ये जाण्यासाठी पुन्हा शिकत आहात. भक्तिमार्गाची जेवढी पण वेद-शास्त्रे इत्यादी आहेत त्यांना सोडावे लागते. ज्ञान मिळाले मग भक्तीची गरज नाही. ज्ञानाद्वारे आम्ही विश्वाचे मालक बनतो.
बाबा आले आहेत - भक्तीचे फळ देण्यासाठी. ज्ञान ऐकवत आहेत. आता आपल्याला पतितापासून पावन सुद्धा जरूर बनायचेच आहे कारण पतित काही परत घरी जाऊ शकत नाहीत. मुक्तिधाममध्ये देखील सर्व पावन आत्मेच राहतात. सुखधाममध्ये देखील सर्व पवित्र असतात. आता कलियुगामध्ये सर्वजण पतित आहेत. आता त्यांना पावन कोण बनवणार? पतित-पावन आहेत एक बाबा. आता बाबा म्हणतात - मी यांच्या अनेक जन्मांतील शेवटच्या जन्मामध्ये येतो. सर्वात जास्त नंबरवन भक्त हे दादा (ब्रह्मा बाबा) होते. मग ब्रह्मा म्हणा अथवा लक्ष्मी-नारायणाची आत्मा म्हणा. ही खूप गूढ गोष्ट आहे समजून घेण्यासारखी आहे. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा आणि ब्रह्माच्या नाभीतून विष्णू प्रकटला... विष्णूच ८४ जन्मांनंतर ब्रह्मा बनतात. या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. बाबा देखील गीता पाठी (गीतेचे नियमित पठण करणारे) होते. जेव्हा ज्ञान आले, पाहिले की, बाबा तर विश्वाची बादशाही देत आहेत. विष्णूचा देखील साक्षात्कार झाला, मग लगेचच गीता इत्यादी वाचणे सुटले. बाबांची प्रवेशता झाली होती ना. मग पुन्हा कधी हातही लावला नाही. एका बाबांचीच आठवण करू लागले. हे (ब्रह्मा बाबा) म्हणतात - मी सुद्धा त्या बाबांकडून ऐकू लागलो. शिवबाबा म्हणतात - मी जेव्हा मुलांना ऐकवत असे तेव्हा हे देखील ऐकत असत. यांच्या शरीरामध्ये मी प्रवेश करून आलो आहे, म्हणून यांचे नाव ठेवले आहे - अर्जुन. शास्त्रांमध्ये घोड्याचा रथ दाखवतात. किती फरक आहे. घोडा-गाडीमध्ये बसून फक्त एकालाच ज्ञान दिले का? आता तुम्ही समजता हे कसे शक्य आहे. तुम्ही प्रॅक्टिकल पाहत आहात - बाबा कसे शिकवत आहेत. किती सेंटर्स आहेत. तर शिकवण्यासाठी जरूर पाठशाळा पाहिजे, युद्धाचे मैदान नको आहे. बाबा राजयोग शिकवतात. सतयुगामध्ये कोणतेही शास्त्र नसते. मी आता ज्ञान ऐकवले बस्स, सतयुगामध्ये याची गरजच नाही. जुन्या दुनियेतील जे काही आहे हे सर्व काही जळून राख होईल. हा राजस्व अश्वमेध यज्ञ आहे. अश्व या रथाला (ब्रह्माच्या तनाला) म्हटले जाते, यांना देखील स्वाहा करायचे आहे. आत्मा बाबांची बनली मग हे जुने शरीर देखील नष्ट होऊन जाईल. कृष्णपुरीमध्ये हे छी-छी (पतित) शरीर थोडेच घेऊन जातील. आत्मा अमर आहे. होळीमध्ये दाखवतात - कोकी (धाग्यात ओवलेली पुरणपोळी) जळून जाते परंतु धागा जळत नाही. बाबा मग बेहदची गोष्ट समजावून सांगत आहेत - आतापर्यंत जे काही ऐकले आहे ते विसरून जा. आता भारत झूठ खंड बनला आहे, काल सच खंड होता. सच खंड बाबांनी बनवला, मग रावणाने झूठ खंड बनवला. हा रावण सर्वांचा जुना शत्रू आहे. बस्स, लोक कोणाचेही काहीही ऐकून त्यावर विश्वास ठेवतात आणि त्यानुसार चालत राहतात. जसे दिलवाडा मंदिरामध्ये आदिदेवाचे नाव महावीर ठेवले आहे. महावीर हनुमानाला म्हटले जाते. आता कुठे तो हनुमान आणि कुठे हे. या मंदिरामध्ये हुबेहूब तुमचे यादगार आहे. वर स्वर्ग, खाली तपस्या. आदिनाथाची गोल्डन मूर्ती बनवली आहे. म्हणतात ना - भारत सोन्याची चिमणी होता. भारताइतके सोने इतर कोणत्याही ठिकाणी नाही. सोन्याचे महाल बनले होते. छतांमध्ये, भिंतींमध्ये हिरे-माणके जडवलेली होती. मंदिरांमध्ये किती हिरे-माणके होती, जी नंतर लुटून नेली. मशिदींमध्ये नेऊन लावली. तर त्यावेळी काय व्हॅल्यू असेल. अमाप संपत्ती होती म्हणूनच तर लुटून नेली. हे सर्वजण जाणतात की प्राचीन भारत खूप श्रीमंत होता. आता किती गरीब बनला आहे. गरिबांवर दया येते. रावणने किती इन्सॉल्व्हेन्ट (पतित) बनवले आहे. बाबा मग सॉल्व्हेन्ट (पवित्र) बनवतात. हे बेहदचे नाटक आहे, याच्या आदि-मध्य-अंताला कोणीही जाणत नाही. बाबा नॉलेजफुल आहेत. असे नाही की, बसून सर्वांच्या अंतर्मनाला पाहतो. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. पाप जे करतात त्याची शिक्षा तर मिळतेच. मला तर म्हणतातच - नॉलेजफुल, पतित-पावन. बोलावतात - ‘ओ बाबा या, येऊन आम्हाला नॉलेज द्या; पावन बनवा’. तर मी येऊन हे कार्य करतो. बाकी शास्त्रांच्या ज्या गोष्टी आहेत, त्या बाबा म्हणतात विसरून जा आणि जे मी ऐकवतो ते ऐका. आता बाबांकडून राजयोग शिकत आहात. नंतर मग सूर्यवंशी बनाल. त्यानंतर मग चंद्रवंशी, वैश्यवंशी, शूद्रवंशी बनाल. हे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. सतयुगामध्ये सर्व विसरले जाईल. तिथे बाबांची कोणीही आठवण करत नाही. वारसा मिळाला मग आठवण कशासाठी करतील. किती चांगल्या रीतीने समजावून सांगितले जाते! या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. वृक्षपती आहेतच मुळी बाबा. ते म्हणतात - माझी आठवण करा. क्रिएटर एक असतो की दगड-माती सुद्धा क्रिएटर असतील?
बाबा म्हणतात की, रावणाने तुमची बुद्धी किती खराब केली आहे. मोठ्या-मोठ्या विद्वानांना अहंकार किती आहे. बाबांना जाणतच नाहीत. ना रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. बाबा म्हणतात - मी तुम्हाला राजाई दिली. तुम्ही सर्व धन-दौलत संपवून टाकली, आता भीक मागत आहात, म्हणून आसुरी संप्रदाय म्हटले गेले आहे. देवतांची किती महिमा गायली आहे. मग म्हणतात - ‘हम निर्गुण हारे में कोई गुण नाही’. आता तुम्हा मुलांना गुण धारण करायचे आहेत, अवगुणांना काढून टाका. रावणाने तुम्हाला माकडासारखे बनवले आहे. आता बाबा तुम्हाला देवता बनवत आहेत. ज्यांच्यामध्ये ५ विकार आहेत त्यांना माकड म्हटले जाते. (नारदाचे उदाहरण आहे) आता तुमची सीरत (स्वभाव) बदलत आहे, मग आपण देवता बनू. या ज्ञान-मानसरोवरामध्ये डुबकी मारून आपण ज्ञान परी बनतो. ते (दुनियावाले) मग पाण्यालाच मान-सरोवर समजले आहेत. ही आहे ज्ञान-स्नानाची गोष्ट. हे तर मुले जाणतात, बाबा हुबेहूब ५ हजार वर्षांपूर्वीप्रमाणे आम्हाला समजावून सांगत आहेत, यामध्ये कोणतीही शंका येऊ शकत नाही. पतित-पावन बाबांची आणि विष्णुपुरीची आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. मनुष्य मुक्तीसाठी किती डोकेफोड करतात; परंतु घरा विषयी कोणालाच ठाऊक नाहीये. कोणी समजतात - आत्मा लीन होऊन जाईल. कोणी समजतात - आत्मा दुसरे शरीर घेत नाही. अनेक मते आहेत, बाबांना कोणी जाणतच नाही. संपूर्ण दुनिया समजते - श्रीकृष्ण भगवानुवाच. इथे बाबा म्हणतात - शिव भगवानुवाच. किती दिवस-रात्री इतका फरक आहे. नावच एकदम बदलून टाकले आहे. अच्छा!
गोड-गोड मुलांनो, हे बापदादा दोघेही म्हणतात. दोघांचीही मुले आहात ना! हे (ब्रह्मा बाबा) देखील स्टुडंट, तुम्ही देखील स्टुडंट. हे देखील शिकत आहेत. जे भारताला पावन बनविण्याच्या सेवेमध्ये व्यस्त आहेत, तीच मुले आहेत. जे पावन बनत नाहीत त्यांना पाहून देखील बाबा बघत नाहीत. समजतात - सजा भोगून नंतर येऊन आचारी बनतील. जे पावन बनतात, ते विश्वाचे मालक बनतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) स्वीट बनण्यासाठी स्वीट बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे. सच्च्या बाबांसोबत सच्चे होऊन राहायचे आहे. बाबांच्या श्रेष्ठ मतावर चालायचे आहे.
२) पुरुषार्थ करून संपूर्ण बनायचे आहे. भारताला पावन बनविण्याची सेवा करायची आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये शंका येऊ द्यायची नाही.
| वरदान:- |
ः- ज्ञानी तू आत्मा बनून ज्ञान सागर आणि ज्ञानामध्ये एकरूप होणारे सर्व प्राप्ती स्वरूप भव जे ज्ञानी तू आत्मे आहेत ते सदैव ज्ञान सागरामध्ये आणि ज्ञानामध्ये एकरूप झालेले असतात, सर्व प्राप्ती स्वरूप असल्यामुळे इच्छा मात्रम् अविद्येची स्टेज स्वतः असते. जे अंश मात्र सुद्धा कोणत्याही स्वभाव-संस्काराच्या अधीन आहेत, नाम-मान-शान मागणारे आहेत. ‘काय, का’, या प्रश्नांमुळे आक्रोश करणारे, आळवणारे आहेत, आत एक आणि बाहेर दुसरे रूप आहे - त्यांना ‘ज्ञानी तू आत्मा’ म्हटले जाऊ शकत नाही. |
| बोधवाक्य:- | ः- या जीवनामध्ये अतींद्रिय सुख आणि आनंदाची अनुभूती करणारेच सहजयोगी आहेत. |
हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.
ब्राह्मण जीवनाचे लक्ष्य आहे ब्रह्मा बाबांसारखे संपन्न अथवा कर्मातीत बनणे. या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी विशेष स्वतःमध्ये समेटण्याची शक्ती आणि सामावून घेण्याची शक्ती धारण करा. कर्मबंधनी आत्मे जिथे असतात तिथेच कार्य करू शकतात आणि कर्मातीत आत्मे एकाच वेळी चोहो बाजूंना सेवेचा पार्ट बजावू शकतात कारण कर्मातीत आहेत. त्यांचा स्पीड खूप तीव्र असतो, सेकंदामध्ये जिथे पाहिजे तिथे पोहोचू शकतात.